संत निळोबाराय अभंग

काय नेणों आचरण केलें – संत निळोबाराय अभंग – ६२९

काय नेणों आचरण केलें – संत निळोबाराय अभंग – ६२९

काय नेणों आचरण केलें ।
जया आलिंगिलें हदयेंसी ॥१॥
हें तों न कळे माझिये मती ।
याचिलागीं चित्ती व्याकुळ ॥२॥
कोण्या भजनें पसन्न व्हाल ।
आपुला म्हणवाल शरणागत ॥३॥
निळा म्हणे दिवाभीता ।
जेंवि कां सविता उबगला ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

काय नेणों आचरण केलें – संत निळोबाराय अभंग – ६२९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *