संत निळोबाराय अभंग

कळासूत्रीं तुम्ही नाटका – संत निळोबाराय अभंग – ६३७

कळासूत्रीं तुम्ही नाटका – संत निळोबाराय अभंग – ६३७


कळासूत्रीं तुम्ही नाटका नटक ।
देव ब्रम्हादिक आज्ञाधार ॥१॥
न सांगतां कळे सर्व अंतरींचें ।
सकळही जीवाचें मनोगत ॥२॥
माझेविशीं कां हा मांडिला आळस ।
भेटीचा वोरस वांयां धाडा ॥३॥
जिवित्वाची ऐशी मांडिली फरारी ।
झालें भूमीवरीं भार वृथा ॥४॥
श्रलाघ्यची न वाटे जिणें झालें ओस ।
धरिलें उदास तुम्ही देवा ॥५॥
निळा म्हणे धीर नुपजेची आतां ।
तुम्हीं तो अनंता मोकलिलें ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कळासूत्रीं तुम्ही नाटका – संत निळोबाराय अभंग – ६३७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *