संत निळोबाराय अभंग

आंधळिया उगवोनी रवी – संत निळोबाराय अभंग – ६४५

आंधळिया उगवोनी रवी – संत निळोबाराय अभंग – ६४५

आंधळिया उगवोनी रवी ।
न दिसेचि तेंवि मज झालें ॥१॥
तेंवी तुम्ही स्वत:सिध्द हरी ।
परि मी माझारी भ्रांतीतमा ॥२॥
रोग्यारसने कैंची गोडी ।
जे ते निवडी रसस्वाद ॥३॥
निळा म्हणे वेडिया गोत ।
नाढळे धन वित्त दरिद्रिया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आंधळिया उगवोनी रवी – संत निळोबाराय अभंग – ६४५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *