संत निळोबाराय अभंग

मग म्हणे गिळिले गोप – संत निळोबाराय अभंग ६५

मग म्हणे गिळिले गोप – संत निळोबाराय अभंग ६५


मग म्हणे गिळिले गोप ।
गाई खिल्लारांचे कळप ।
तारि हा चिरुनियां सांडीन सर्प ।
घेईन सूड या सकळांचा ॥१॥
कृष्ण शिरतीं त्याच्या वदनी ।
अधासुरा हर्ष न समाय मेदिनी ।
म्हणे कार्य साधिलें हा चक्रपाणी ।
गिळिलियावरी सर्व माझे ॥२॥
ऐसा आनंदला अघ ।
तंव लाघविया श्रीरंग ।
वाढला पाताळवरी स्वर्ग ।
नेदी जाभाडी मेळवूं त्या ॥३॥
नुगळवेचि तो उगळूं जातां ।
पुढेहि न चलेचि तत्वतां ।
फाडूनि वदन केल्या चळथा ।
व्दिभाग करुनि सांडियेले ॥४॥
तेणें उघडया पडल्या गाई ।
गोवळ म्हणती थोर नवाई ।
निमिषमात्रेंचि गेली धुई ।
पहारे स्मरणांचे खेवा ।
देखिला श्रीहरी दृष्टिपुढें ॥६॥
निळा म्हणे सांगती नवल ।
आजी अंधारिमाजी गाई गोवळ ।
पडिले होते आणि वायो प्रबळ ।
माघारेंही सरों नेदी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग म्हणे गिळिले गोप – संत निळोबाराय अभंग ६५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *