संत निळोबाराय अभंग

मग होसोनियां बोलिजे – संत निळोबाराय अभंग ६६

मग होसोनियां बोलिजे – संत निळोबाराय अभंग ६६


मग होसोनियां बोलिजे कृष्णें ।
बेटे हो तुम्ही अवघेचि शहाणे ।
सर्पे गिळिले होतेती प्राणें ।
कैसे तरी वांचलेती ॥१॥
बरें झालें हातों मागें ।
तेणें वांचलेतीरे प्रसंगे ।
पैल पहारे महाभुजंगे ।
चिरुनी सांडिला त्याच्या फाळी ॥२॥
पहाती तंव भरोनियां दरा ।
पडिला वाहती शोणित धारा ।
म्हणती दाऊं वडिलांतें नवल हें ॥४॥
ऐंसा अघासुर मर्दिला ।
कृष्णें पवाडा हा केला ।
गोवळ नाचती विजयी झाला ।
श्रीहरी आला आमुच्या सांगाती ॥५॥
कंसातेंहि विदित झालें ।
जाउनी वार्तिकीं सांगितलें ।
तेणें चपपक त्याचें गेंलें ।
म्हणे ओढवलें दुर्मरण ॥६॥
निळा म्हणे इकडे गाई ।
चरतां फांकल्या दिशा दाही ।
वळत्या करुनियां त्या लवलाही ।
आणिल्या वृंदावनासमीप ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग होसोनियां बोलिजे – संत निळोबाराय अभंग ६६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *