संत निळोबाराय अभंग

जेववाल तेंचि जेवीन – संत निळोबाराय अभंग – ६७७

जेववाल तेंचि जेवीन – संत निळोबाराय अभंग – ६७७

जेववाल तेंचि जेवीन मुखें ।
पांघरवाल सुखें पाघरेन ॥१॥
बैसवाल तेथे बैसेन उगा ।
निजवाल जागा न सोडीं तो ॥२॥
जैसें कराल मी होईन तैसा ।
न करुनियां आशा आणिकांची ॥३॥
निळा म्हणे जें कराल तें तें ।
होईन आज्ञेतें नुलंघीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जेववाल तेंचि जेवीन – संत निळोबाराय अभंग – ६७७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *