संत निळोबाराय अभंग

तुमच्या पायीं जडतां – संत निळोबाराय अभंग – ७२२

तुमच्या पायीं जडतां – संत निळोबाराय अभंग – ७२२

तुमच्या पायीं जडतां मन ।
नाहीं प्रयोजन शब्दांचें ॥१॥
तरी हे कां जी चेतविली ।
गुणीं प्रवर्तविली मति माझी ॥२॥
दिवस रात्रीं न पुरे लिहितां ।
उठती चळथा अक्षरांच्या ॥३॥
निळा म्हणे लाविला धंदा ।
न कळे गोविंदा लीला तुमची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुमच्या पायीं जडतां – संत निळोबाराय अभंग – ७२२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *