संत निळोबाराय अभंग

वत्सें वत्सप वनांतरी – संत निळोबाराय अभंग ७८

वत्सें वत्सप वनांतरी – संत निळोबाराय अभंग ७८


वत्सें वत्सप वनांतरी ।
माजी परमात्मा श्रीहरी ।
खेळतां खेळ नानापरी ।
पुढें धेनुक देखिला ॥१॥
सांगतां अंगीची बारव ।
मृणालिके ऐसी लव ।
शृंगे सुवर्णाची ठेव ।
रत्नापरी नयन दोन्ही ॥२॥
कर्णं जैसीं केतकी दळें ।
अती राजस पादतळें ।
खुर शोभति रातोत्पळें ।
जेवी जडूनि ठेविलीं ॥३॥
चारी चरण कर्दळीस्ताभ ।
हदयावकाशीं सूक्ष्म नभ ।
पाठीवरी त्रिवेणी भांव ।
पुच्छा स्वयंभ शेषफणी ॥४॥
कांबळी लोंबे कंठातळीं ।
विधुत्प्राय टिळकू भाळीं ।
वोसंड लवथवित्‍ मांस मोळीं ।
देखतां नव्हाळी डोळियां ॥५॥
गोंवळ म्हणती कृष्णा पोहें छ
नवल वृष्थ आला आहे ।
चुकारिचाचि नवल नाहे ।
न्यावा धरुनि मंदिरा ॥६॥
निळा म्हणे ऐकोनि हरी ।
दृष्टी घालोनियां सामोरी ।
म्हणे धेनुक हा निर्धारी
आलासे मुक्ति मागावया ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वत्सें वत्सप वनांतरी – संत निळोबाराय अभंग ७८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *