संत निळोबाराय अभंग

दिवसरात्रीं हाचि धंदा – संत निळोबाराय अभंग – ७९२

दिवसरात्रीं हाचि धंदा – संत निळोबाराय अभंग – ७९२

दिवसरात्रीं हाचि धंदा ।
वर्णितों गोविंदा गुणकीर्ति ॥१॥
स्वप्नामाजी सुषुप्ती आंत ।
जागृतीये मात याचाचि ॥२॥
खातां जेवितां बोलतां ।
आठवे कथा नित्य याची ॥३॥
निळा म्हणे लगटोनि आलें ।
पीक चांगले असंभाव्य ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दिवसरात्रीं हाचि धंदा – संत निळोबाराय अभंग – ७९२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *