संत निळोबाराय अभंग

नीत नवा प्रेमा कृपेचिया – संत निळोबाराय अभंग – ८०३

नीत नवा प्रेमा कृपेचिया – संत निळोबाराय अभंग – ८०३

नीत नवा प्रेमा कृपेचिया बळें ।
अंतरीं हा वोळे आनंदघन ॥१॥
नाचतीं मयूरें रोमांचीत दाटी ।
अमृताची वृष्टी जीवनकळा ॥२॥
आकाशें दुमदुमी गर्जे अनुहत ।
सुनीळ तळपत विदयुल्लता ॥३॥
पिकली भूमिका बीज आलें फळा ।
अव्दय निजकळा सवंगिलें ॥४॥
भाग्यवंत निळा सांठवी निराळीं ।
आत्मया जवळी निकटवासें ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नीत नवा प्रेमा कृपेचिया – संत निळोबाराय अभंग – ८०३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *