संत निळोबाराय अभंग

हे देखोनियां गोवळ – संत निळोबाराय अभंग ८१

हे देखोनियां गोवळ – संत निळोबाराय अभंग ८१


हे देखोनियां गोवळ ।
आले धावोनियां सकळ ।
कृष्णासी म्हणती युध्द तुंबळ ।
केलें तुवां वृषभेंसी ॥१॥
आम्ही देखिलें दुरोनी ।
होतो डोंगरीं बसोनी ।
तो बैल आम्हांलागुनी ।
कृष्णा कोण तो सांग पा ॥२॥
येरु म्हणे तो असुर ।
तुम्हां भासला होता ढोर ।
कंसरायाचा तो हेर ।
जाता वधुनी सकळांते ॥३॥
ऐसा जाणोनियां निभ्रांता ।
शांति पावविला तो आतां ।
तुम्ही भयातें न धरितां ।
सुखे विचारा मत्संगें ॥४॥
माझिया भजनीं जे राहाती ।
त्यांचिया विघ्नाची शांती ।
करुनियां सुखविश्रांती ।
तया अर्पी सर्व सिध्दी ॥५॥
ऐसें ऐकोनियां हरिवचन ।
संतोषले सकळी जन ।
मग नमस्कारुनियां उभय चरण ।
गोकुळांप्रती चालिले ॥६॥
निळा म्हणे सांगती वडिलां ।
वनीं वर्तमान जो देखिला ।
धेनकासुर तो निपातिला ।
आजी कृष्णें युध्दसंधी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हे देखोनियां गोवळ – संत निळोबाराय अभंग ८१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *