संत निळोबाराय अभंग

पावलो प्रसाद इच्छा केली – संत निळोबाराय अभंग – ८४८

पावलो प्रसाद इच्छा केली – संत निळोबाराय अभंग – ८४८

पावलो प्रसाद इच्छा केली तैसी ।
झाले या चित्तासी समाधान ॥१॥
मायबाप माझा उभा कृपादानीं ।
विटे सम जोडुनि पदांबुजें ॥२॥
सांभाळीसी येउ नेदिची उणीव ।
अधिकार गौरव राखे तैसे ॥३॥
निळा म्हणे सर्व जाणें अंतर्बाहे ।
जया तैसा राहे कवळुनिया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पावलो प्रसाद इच्छा केली – संत निळोबाराय अभंग – ८४८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *