संत निळोबाराय अभंग

मग धांवोनियां यशोदा – संत निळोबाराय अभंग ८५

मग धांवोनियां यशोदा – संत निळोबाराय अभंग ८५


मग धांवोनियां यशोदा ।
हदयी आळंगी गोविंदा ।
बारे तूंतें अरिष्टेंचि सदा ।
जैं पासुनि जन्मलासी ॥१॥
प्रथम पूतनेचा घात ।
दुजा भटाचा विपरीतार्थ ।
तिजा कागाचा हा अनर्थ ।
आम्हीं देखिला समस्ती ॥२॥
यावरी काय काय होईल ।
नकळे आम्हांते तें पुढील ।
मागें शकटाचेंहि नवल ।
मारिलेचि होतें तुज कृष्णा ॥३॥
कैसें रासचि पुसती ।
नानापरींचे उत्पात येती ।
काय करुं रे श्रीपती ।
कैसा वांचसील काय जाण ॥४॥
किती चिंता करुं खेद ।
मज हें न देखवती प्रमाद ।
तंव गगनवाणीचे शब्द ।
ऐकती झाली निज कर्णी ॥५॥
परमात्मा हा पूर्ण अवतार ।
उतरावया धराभार ।
तुझियें उदरींचा कुमर ।
निवटील असुर अपरिमित ॥६॥
जे जे पापी अतुर्बळी ।
आहेत हे भूमंडळी ।
तितुकियांसिहि मांडुनी कळी ।
पाठविल त्या यमपंथें ॥७॥
निळा म्हणे ऐकोनि कानीं ।
यशोदा संतोषली मनीं ।
टाळी पिटिली सकळही जनीं ।
थोर आश्चर्य वाटलें ॥८॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग धांवोनियां यशोदा – संत निळोबाराय अभंग ८५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *