गोमटे पाय देखिले दिठीं – संत निळोबाराय अभंग – ८७७
गोमटे पाय देखिले दिठीं ।
समान नेहटी वीटेचिये ॥१॥
तैंचिपासुनी लागला छंद ।
याचिया वेध स्वरुपाचा ॥२॥
कटांवरी कर तुळसीमाळा ।
चंदनाचा टिळा मुगुट माथा ॥३॥
निळा म्हणे वेढिलें वसन ।
विदयुल्लतें समान तेज त्याचें ॥४॥