संत निळोबाराय अभंग

जाणीवचि माझी गिळूनि – संत निळोबाराय अभंग – ८८२

जाणीवचि माझी गिळूनि – संत निळोबाराय अभंग – ८८२

जाणीवचि माझी गिळूनि ठेला ।
नेणीवेतें प्याला निपटूनियां ॥१॥
निढळवाणें मज करुनि ठेविलें ।
जीवाचेंही हरिलें जीवपण ॥२॥
ज्ञानासी तो हा वाढोचि नेदी ।
ग्रासिल्या उपाधी परमार्थिका ॥३॥
निळा म्हणे येणें नेलें आपपर ।
मोडियेली थार दोहिंकडे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जाणीवचि माझी गिळूनि – संत निळोबाराय अभंग – ८८२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *