संत निळोबाराय अभंग

जिवाचाही जीव माझया – संत निळोबाराय अभंग – ८८४

जिवाचाही जीव माझया – संत निळोबाराय अभंग – ८८४


जिवाचाही जीव माझया शिवाचा शिव ।
पंढरीचा देव मन बुध्दी इंद्रियें ॥१॥
आईका हो श्रोते तुम्ही संत सज्जन ।
मी माझें हें जतन कोण करी यावरी ॥२॥
नयनाचेंही नयन माझया घ्राण ।
श्रवणाचेंहि श्रवण तोचि रसनेची रसना ॥३॥
त्वचेचीही त्वचा माझे वाचेची वाचा ।
बोलविसी बोलचा तोची अर्थ तात्पर्य ॥४॥
कराचेहि कर माझा चरणचे चरण ।
चैतन्याचें चैतन तोचि रसनेची रसना ॥५॥
त्वचेचीही त्वचा माझे वाचेची वाचा ।
बाकलविसी बोलचा तोची अर्थ तात्पर्य ॥६॥
कराचेहि कर माझया चरणाचे चरण्‍ ।
चैतन्याचें चैतन्य तोचि मनांचे मन ॥७॥
निळा म्हणे भुक्ति मुक्ति विरक्ति ज्ञान ।
शांति क्षमा दया तोचि सिध्दी साधन ॥८॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जिवाचाही जीव माझया – संत निळोबाराय अभंग – ८८४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *