संत निळोबाराय अभंग

म्हणोनियां तेथें उगाचि उभा – संत निळोबाराय अभंग ९१

म्हणोनियां तेथें उगाचि उभा – संत निळोबाराय अभंग ९१


म्हणोनियां तेथें उगाचि उभा ।
यावया जवळी पहननाभा ।
तोहि सर्वसाक्षी ओथंबा ।
जाणे हदगत केशियाचें ॥१॥
मग चालत मंजुळ चाली ।
हळूहळूचि गेला जवळी ।
लगाम धरुनिया निज करतळी ।
हातें कुरवाळी मुखांतरी ॥२॥
मग रिकेबी देवोनि पावो ।
चढला वरी यादवरावो ।
हालों नंदितांचि नवलवो ।
घातला भार त्रिभुवनांचा ॥३॥
केशीया पाहे उडावया ।
तंव ओझें भारी नुचलवे पायां ।
म्हणे गेली व्यर्थचि माया ।
रचिलें येवढें लाघव तें ॥४॥
मग न चलवे ऐसें जाणेनि हरी ।
बारवा फोडिला चाबुकावरी ।
केशिया ह्रदयींचि रुदन करी ।
म्हणे घेतला प्राण निश्रचयेसी ॥५॥
हालों नेदीची हा गोंवळ ।
महाबलीया आमुचा काळ ।
कृष्ण म्हणे हें मुसळ ।
व्यर्थचि पोसिलें बेटियानें ॥६॥
चारुनियां दाणाचार ।
पुष्ट केला बहु थोर ।
नाही मिनला चाबुक स्वार ।
तोंचिवरी शोंभला ॥७॥
मग उतरला झडकरी ।
हातीं धरिली लगाम दोरी ।
तंव तो उपायीं येऊनियां वरी ।
हाणों धांवे टापेनें ॥८॥
मागे पेर वाळे झाडित ।
आडवाचि उडे मग कुकात ।
तोंड  पसरुनियां विचकी दांत ।
डसावया श्रीहरी ॥९॥
येरु आतळोंचि नेदी त्या अंगा ।
धरिलें आंवरुनियां तुरंगा ।
घायांतळी आणूनियां चांगा ।
ताडिला मुष्ठीप्रहरें करुनि ॥१०॥
तेणेंचि तया आली तव ।
म्हणे कंसा वेगी धांव धांव ।
वेंचलों जीवेम करी कणव ।
सोडवीं मज याच्या हाती ॥११॥
तुझिया काजा वधावा हरी ।
म्हणोनियां आलों येथवरी ।
तव हा लाघविया मुरारी ।
बैसला जिव्हारी काय करुं ॥१२॥
पायीं बांधोनियां टाकिलें
माझियाचि भूषणी मज गोंविलें ।
नाही अंतरी हें मज कळलें ।
कैसे करुं हदयासी ॥१३॥
ऐसी या विलापें आक्रंदतां ।
प्राण सोडिले तत्वतां ।
म्हणे मी फिरांनियां मागुता ।
न येचि येथें श्रीकृष्णा ॥१४॥
निळा म्हणे ऐकोनि श्रीकृष्ण ।
म्हणे वाग्देवी तुझी तुज प्रसन्न ।
जारे मुक्ति पदीं बैसोन ।
वस्ती करी तेथे सुखें ॥१५॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

म्हणोनियां तेथें उगाचि उभा – संत निळोबाराय अभंग ९१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *