संत निळोबाराय अभंग

मग त्या मिळोनियां सकळ जनीं – संत निळोबाराय अभंग ९५

मग त्या मिळोनियां सकळ जनीं – संत निळोबाराय अभंग ९५


मग त्या मिळोनियां सकळ जनीं ।
मध्यें बैसवूनियां शारंगपाणी ।
भोंवत्या खेळविती खेळणीं ।
नाचती नाचणीं गीतस्वरें ॥१॥
कृष्णा म्हणोनियां आळविती ।
मधुर स्वरें गायनें गाती ।
तेणेंचि मिसें त्या कृष्णासि स्तविती ।
आणि रंजविती परमात्मया ॥२॥
म्हणती गे नंदयशोदेचें पुण्य ।
उरलें त्रैलोक्या पुरोन ।
आम्हां झालें तें सुप्रसन्न ।
कृष्णाकृती या काळें ॥३॥
म्हणोनियां जिवेंप्राणें ।
ओवाळिती तनुमनें ।
घालूनियां दिव्यासनें ।
वरी कृष्णातें बैसविती ॥ ४॥
करुनियां आनंद सोहळा ।
खेळती नानापरीच्या खेळा ।
लई लई लखोटें पिंगे सकळा ।
फुगडया घलिती निज वारें ॥५॥
हेटी मेटी । कपाळ झेटी ।
पक्कें  घालिती  नमन लल्लाटीं ।
टोकर खडेही झेलिती बेटी ।
नाचती टिपरी घेऊनियां ॥६॥
निळा म्हणे ऐशियापरी ।
रंजविती जगदात्मयाहरी ।
आणि घेऊनियां अंकावरी ।
क्रीडा विनोदें खेळविती ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग त्या मिळोनियां सकळ जनीं – संत निळोबाराय अभंग ९५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *