संत निळोबाराय अभंग

मागें बहुतांसि वांटिलें – संत निळोबाराय अभंग – ९६१

मागें बहुतांसि वांटिलें – संत निळोबाराय अभंग – ९६१


मागें बहुतांसि वांटिलें ।
पुढें आणिकांहि ठेवलें ।
भावें विश्वासिते पावले ।
अधिकारिया दिधले अधिकार ॥१॥
चतुरा चतुरशिरोमणी ।
सकळां जाणतियांचा धणी ।
करुं जाणतो वांटणी ।
भाग जैसें त्यापरी ॥२॥
एका वर्णाश्रमधर्में ।
एका यज्ञादिका कर्में ।
एका वेदाध्ययननेमें ।
एक चतुर्थाश्रमें संन्यासें ॥३॥
एका नामस्मरणमात्रें ।
एका पढतां स्तवनें स्तोत्रें ।
एका गुणानुवादचरित्रें ।
वर्णिता हा तोषला ॥४॥
एका ध्यानें समजाविलें ।
एका पूजनेंचि वारिलें ।
एका जपें बुझाविलें ।
एका स्थापिलें योगावरी ॥५॥
एका तीथें यात्रागमनें ।
एका ब्रम्हचर्यादि अनुष्ठानें ।
एका व्रतें पुरश्चरणें ।
गृहस्थाश्रमें वानप्रस्थें ॥६॥
निळा म्हणे हा सर्व जाणे ।
सर्वसाक्षी सर्वज्ञपणें ।
जयापरि तैसें देणें ।
करी हा उणें नाहीं यासी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मागें बहुतांसि वांटिलें – संत निळोबाराय अभंग – ९६१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *