संत निळोबाराय अभंग

वाचे शब्द असत्याचे – संत निळोबाराय अभंग – ९६६

वाचे शब्द असत्याचे – संत निळोबाराय अभंग – ९६६

वाचे शब्द असत्याचे ।
हेंचि दुर्जनांचे भांडवल ॥१॥
पुढिलांते उपहासिती ।
आणि मानिती संतोष ॥२॥
निंदा व्देष अहंकार ।
मद मत्सर वाढते ॥३॥
निळा म्हणे नर्कां जाणें ।
आहे पुरश्चरणें त्यांचीं हें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वाचे शब्द असत्याचे – संत निळोबाराय अभंग – ९६६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *