संत निळोबाराय अभंग

मी तों संतांचें पोसणें – संत निळोबाराय अभंग – 1478

मी तों संतांचें पोसणें । देती समयीं तेंचि खाणें ॥१॥

अवघी चुकली जाचणी । उण्यापुयाची सोसणी ॥२॥

करुं सांगितलें काज । चिंता दवडूनियां लाज ॥३॥

निळा म्हणे फिटली खंती । जिणें मरणें त्यांचे हातीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *