संत निळोबाराय अभंग

कैसा याचा वेध जाणती अनुभवी – संत निळोबाराय अभंग – 1490

कैसा याचा वेध जाणती अनुभवी । जयां आहे ठावी कृपा याची ॥१॥

न ये तें दावितां सांगतांहि परी । वर्ते जें माझारीं भुलवूनियां ॥२॥

नेदीचि बाहेरीं उमसों बुध्दि मना । भरुनियां भावना झांकोळिली ॥३॥

निळा म्हणे तोचि साक्ष माझया जिवीं । चाळक गोसावी ब्रम्हांडाचा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *