संत निळोबाराय अभंग

पहा ज्याचें तयाची परी – संत निळोबाराय अभंग – 1510

पहा ज्याचें तयाची परी । जीवनभातें याच्या करीं ॥१॥

देऊं जाणे यथाविधी । जैसा भाव तैशी सिध्दी ॥२॥

उंच नीच अधिकारें पावती आपुलाल्या व्यापारें ॥३॥

निळा म्हणे ज्यापरी रवी । ज्याचे वेवसाय तया दावी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *