संत निळोबाराय अभंग

इंद्रियांची पुरली धांव – संत निळोबाराय अभंग – 1521

इंद्रियांची पुरली धांव । मनासी ठाव विश्रांति ॥१॥

तया नांव ब्रम्हप्राप्ती । जेथे उपरति चित्ताचीं ॥२॥

बुध्दीचीहि जाणीव विरे । तर्क मतांतरें मुरडलीं ॥३॥

निळा म्हणे कुंठित गती । पांगुळले ठाती पंचप्राण ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *