संत निळोबाराय अभंग

एकींच नसतां एकपण दुजेपण कैचें – संत निळोबाराय अभंग – 1524

एकींच नसतां एकपण दुजेपण कैचें । म्हणउनियां न चले कांही तेथें शब्दाचें ॥१॥

पहातें पहाणें जेथें विरमोनि जाय । घेणें देणें कैंचें तेथें सांगावे काय ॥२॥

दृश्याचि नाहीं द्रष्टत्वाचा फिटला पांग । काया वाचा मनचि नाहीं धारणा योग ॥३॥

निळा म्हणे जेथें सुख सुखपणा नये । निजानंदी निजानंद हारपले ठाय ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *