संत निळोबाराय अभंग

आत्मा नाहींचि देखिजे ऐसा – संत निळोबाराय अभंग – 1527

आत्मा नाहींचि देखिजे ऐसा । उजळितां प्रकाशा रविकीर्णा ॥१॥

असोनियां पाठीं पोटीं । न देखेचि दृष्‍टी देखण्या ॥२॥

लेऊनियां सर्वांभरी । असोनि बाहेरी नाढळे ॥३॥

निळा म्हणे उगम जैसा । न देखेचि सहसा सागर ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *