संत निळोबाराय अभंग

प्रसाद तुमचा लाधलों आतां – संत निळोबाराय अभंग – 1545

प्रसाद तुमचा लाधलों आतां । झालों कृतकृत्यता सनाथ ॥१॥

पुरविला जीवींचा हेत । होतो चिंतीत मानसीं तो ॥२॥

कृपा करुनियां दाविला देवा । आपुला ठेवा उघडुनी ॥३॥

निळा म्हणे सद्गुरुनाथा । गाऊं आतां ओंविया गीतीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *