संत निळोबाराय अभंग

आजिवरी काळ वृथाचि – संत निळोबाराय अभंग – ९९५

आजिवरी काळ वृथाचि – संत निळोबाराय अभंग – ९९५

आजिवरी काळ वृथाचि गेला ।
जेथुनियां झाला सृष्टिक्रम ॥१॥
ऐसेचि नाना धरितां वेष ।
न तुटती पाश कर्माचे ॥२॥
केव्हां स्वर्ग केव्हां नर्क।
केव्हां दु:खदायक संसार ॥३॥
निळा म्हणे न पुरे घडी ।
ओढाओढी कल्प जातां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आजिवरी काळ वृथाचि – संत निळोबाराय अभंग – ९९५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *