संत निळोबाराय अभंग

आतां निजप्रेमाची हे – संत निळोबाराय अभंग – ९९८

आतां निजप्रेमाची हे – संत निळोबाराय अभंग – ९९८


आतां निजप्रेमाची हे जाती ।
देहभावीं नुरे स्फूर्ति ।
अवघिया संसारे निवृत्ति ।
देवो चितीं सर्वदा ॥१॥
ओकिलें अन्न जैसें राहे ।
कोणी फिरोनियां न पाहे ।
विषय देखोनि तैसें होये ।
महा वैराग्य त्या नांवे ॥२॥
एक आत्मा न दिसे दुजें ।
ज्ञान त्या नांव बोलिजे ।
विरक्ति निर्लोभता ते सहजें ।
देहममता न बाधी ॥३॥
साहे सर्वीचे अपराध ।
क्षमा त्या नांव तें अति शुध्द ।
सोसी अंगी दु:खादि बाध ।
निर्व्दव्द निर्मत्सर व्देष न करी तो ॥४॥
निळा म्हणे तेचि शांति ।
सर्वदा आनंदमय चित्तवृत्ति ।
दया ते भजन सर्वांभूतीं ।
भक्ती ते देवा न विसंबें ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतां निजप्रेमाची हे – संत निळोबाराय अभंग – ९९८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *