संत निळोबाराय अभंग

शुध्द सत्त्व कैंचा गांठी – संत निळोबाराय अभंग – ७४४

शुध्द सत्त्व कैंचा गांठी – संत निळोबाराय अभंग – ७४४

शुध्द सत्त्व कैंचा गांठी ।
जेणें संवसाटीं तुम्हासी ॥१॥
म्हणोनि देवा वाटे भय ।
कैसेनि आपाय चुकती हे ॥२॥
यज्ञें स्वर्गे न चुके कदा ।
अध्ययनें संपदा सत्यलोक ॥३॥
निळा म्हणे रजतमें योनी ।
भोगा यतनी चौर्‍यांशी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शुध्द सत्त्व कैंचा गांठी – संत निळोबाराय अभंग – ७४४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *