संत निळोबाराय अभंग

अखंडता ते झाली ऐसी – संत निळोबाराय अभंग – ७४८

अखंडता ते झाली ऐसी – संत निळोबाराय अभंग – ७४८


अखंडता ते झाली ऐसी ।
विठ्ठल राहिला मानसीं ।
ध्यानीं मनीं लोचनासीं ।
अहर्निशीं निजबोध ॥१॥
जनीं वनीं जनार्दन ।
नाढळें त्या भिन्नाभिन्न ।
एकात्मता अनुसंधान ।
नित्य दर्शन विठठलीं ॥२॥
देहीं असोनी देहातीत ।
गुणीं गुणातें नातळत ।
विषयीं विषयापासुनी मुक्त ।
भोगीं भोगासक्त नव्हती ते ॥३॥
नित्य निरामय निर्गुण ।
जगादात्मा जो आनंदघन ।
विटेवर पाउलें समान ।
लोधलें मन चरणीं त्या ॥४॥
निळा म्हणे विठ्ठल जपें ।
सांडिले ते पुण्यपापें ।
संकल्प सोडिले विकल्पें ।
त्रिविधतापें स्वानुभवी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अखंडता ते झाली ऐसी – संत निळोबाराय अभंग – ७४८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *