संत निवृत्तीनाथ अभंग

निरशून्य गगनीं अंकुरलें एक – संत निवृत्तीनाथ अभंग

निरशून्य गगनीं अंकुरलें एक – संत निवृत्तीनाथ अभंग


निरशून्य गगनीं अंकुरलें एक ।
ब्रह्मांड कवतुक लीळातनु ॥ १ ॥
तें माये वो हरि गोपिका भोगिती ।
शुखचक्राकृति कृष्ण मूर्ति ॥ २ ॥
निराभास आस निःसंदेह पाश ।
तोचि ह्रशीकेश नंदाघरीं ॥ ३ ॥
निवृत्ति प्रकार ध्यानाचा विचार ।
सर्वत्र श्रीधर यशोदेचा ॥ ४ ॥

अर्थ:-

त्या निराशुन्य आकाशातुन प्रगटलेल्या एका बीजाने आपल्या लिळेतुन हे जगत विस्तारले किंवा जन्माला घातले. तोच परमात्मा शंख चक्र घेऊन कृष्णरुपात गोकुळात अवतरला व त्याचे सुख तेथील गौवळणी नित्य भोगतात. निवृतिनाथ म्हणतात, मी सर्वत्र त्या यशोदेच्या श्रीघराला पाहतो व तोच माझा ध्यानाचा प्रकार बनला आहे.


निरशून्य गगनीं अंकुरलें एक – संत निवृत्तीनाथ अभंग

संत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड रा

play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *