तेचि भक्त भागवत ।
संतसेवे जे निरत ॥१॥
शुध्द त्यांचा भक्तिभावो ।
संत वरदें लाभे देवो ॥२॥
संतवचनी विश्वासती ।
सत्य परमार्थ त्यांचे हातीं ॥३॥
निळा म्हणे संतसेवा ।
घडे त्या उदयो झाला दैवा ॥४॥
तेचि भक्त भागवत ।
संतसेवे जे निरत ॥१॥
शुध्द त्यांचा भक्तिभावो ।
संत वरदें लाभे देवो ॥२॥
संतवचनी विश्वासती ।
सत्य परमार्थ त्यांचे हातीं ॥३॥
निळा म्हणे संतसेवा ।
घडे त्या उदयो झाला दैवा ॥४॥