संत बहिणाबाई

गुरुपरंपरा
केला मच्चें ऐकिला मछगर्मी ॥१॥
शिवहृदयीचा मंत्र पे आगाध ।
जालासे प्रसिद्ध भक्तियोगे ||२||
त्याने त्या गोरक्षा केले कृपादान ।
तेथोनि प्रमट जाण गहेनीप्रती ॥३॥
गहेनीने दया केली निवृत्तिनाथा ।
बाळपण असता योगरूप ॥४॥
तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद ।
जाले ते प्रसिद्ध सिद्धासनी ||५||
सच्चिदानंदबाबा भक्तीचा आगर । त्
यासी अभयवर ज्ञाने केला ||६||
पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर ।
तेणे राघवी विचार ठेविलासे ||७||
केशव चैतन्य बाबाजी चैतन्य ।
जालेसे प्रसन्न तुकोबासी ||८||
येकनिष्ठ भाव तुकोबाचे चरणी ।
म्हणोनी बहेणि लाधलीसे ।।९।।

आत्मचरित्र
देवगाव माझे माहेर साजनी
वेरुळ तेथोनी पूर्व भागी ।।१।।
देवांचा समूह सर्व जये ठाई
मिळालासे पाही देवगावी ||२||
हिमालयाहुनी चालिला अगस्ती
चातुर्मास्य वस्ती केली जेथे ||३||
तेथुनी पश्चिमे शिवनद वाहात ।
तीर्थ हे अद्भुत तीर्थामाजी ॥४॥
लक्ष तीर्थ जेथे येऊनी सर्वदा ।
लाक्षायणी सदा वास तेथे ।।५।।
ते स्थळ पवित्र देखोनी अगस्ती
अनुष्ठाना येती दिनोदई ।।६।।
वरद दिधला ऋषी अगस्तीने
लक्ष तीर्थे जाण लाक्षाग्रामा ।।७।।
स्नान दान करी जप अनुष्ठान
सिद्धी तेथे जाण होय नरा ॥८॥
अगस्ती राहोनी देवगावी जाण ।
शिवनदीस्नान करी सदा ||१||
बहेणि म्हणे ऐसे स्थळ देवग्राम
तेथे माझा जन्म जाला असे ।।१०।।

आऊजी कुलकर्णी लेखक तये स्थळी
तयाचिये कुळी जन्म जाला ।।१।।
माता ते जानकी पिता आऊदेव
देवगाव नाव स्थळ त्यांचे ॥२॥
तयांचिये कुळी नाही जी संतान ।
करी जी संताना काही बाही ।।३।।
लक्षतीर्थी नित्य करुनिया स्नान
शिव-अनुष्ठान आरंभिले ||४||
कितेक दिवसात जाले स्वप्न तया
माझिया पितया आउजीसी ।।५।।
होईल संतान कन्या दोन पुत्र
ब्राह्मणे पवित्रे सांगितले ॥६॥
बहेणि म्हणे वरुषा येका मी
उत्पन्न नवमास पूर्ण कन्या जाले ॥७॥

करिती उत्छाह वारसा ब्राह्मण
करुनी भोजन घरा गेले ||१||
पिता आऊदेव गेला अरण्यात
तव अकस्मात लाभ जाला ॥२॥
मोहर बांधली पितांबरी-गाठी
सापडली वाटी वेरुळाच्या ||३||
घरा येउनीया आनंदे बोलती ।
कन्या आम्हाप्रती लाभाईत ||४||
वीरेश्वर द्विज ज्योतिषी नेटका
तयाने पत्रिका संपादिली ॥५॥
होईल कल्याण इचेनि तुमचे ।
ऐसे पत्रिकेचे फळ वाची।।६।।
देवलसी काही भाग्याची होईल ।
आयुष्याचे बळ फार आहे ।।७।।
बहेणि म्हणे ऐसे द्विजे सांगितले ।
तयासी दिधले वस्त्र गाई ॥८॥

कन्यादान घडो हा अर्थ पाहोन ।
करावया लग्न द्विज आले ।।१।।
तव अकस्मात प्राक्तनासारिखा ।
सिऊराचा सखा येक आला ॥२॥
पूर्विल सोयरा लग्नाचा इच्छक विवेक
(की) पाठक रत्न नामी ॥३॥
लाउनी मागणे केले वाक्प्रदान ।
नेमुनिया लग्न संपादिले ।।४।।
तव बंधू जाला माझ्या पाठीवरी
अनुष्ठाना करी पूर्वीचिया ॥५॥
म्हणती हे सभाग्य बंधू पाठीवरी
जाला हे निर्धारी गुण इचा ||६||
बहेणि म्हणे ऐसी जाली वर्षे तीन ।
त्यापुढे जे होणे तेही बोले ।।७।।

मौनस गोत्र माझ्या पित्याचे वरिष्ठ ।
भ्रतारही श्रेष्ठ गौतम तो ।।१।।
शिवपुर नाम तेथील ज्योतिषी ।
मायबापे त्यासी समर्पिले ॥२॥ द्
वितीय- समंधी वरुषा तिसाचा ।
नोवरा भाग्याचा ज्ञानवंत ||३||
बहेणि म्हणे त्यासी कन्यादान केले
आंदन दिधले सर्व काही ॥४॥

लग्न संपादोनी जाली वरुष चारी ।
गोत्रजांचा वैरी पिता जाला ॥१॥
वृत्तीच्या समंधे कलह मांडला ।
माझा बोलाविला भ्रतार हा ॥२॥
“गोत्रजांची फेडा बाकीसाकी
रीण मागती लिहून सेतमळा ॥३॥
आता येथोनिया जावे पदरदेसी
तरीच आम्हासी सुख होते ॥४॥
तू सखा सोयरा जावई मित्र तू
आमुचा हा अंतु पाहू नको ॥५॥
घातलेसे बंदी सोडवील कोण
तू सखा होऊन सोडवावे”।।६।।
मग त्या प्रतारे काढिले बाहेरी
निशीचिया भरी मध्यरात्री ॥७॥
पिता माता बंधू मजही समवेत
गेले रातोरात गंगातीरा॥८॥
प्रवरासंगमी केले गंगास्नान
घेतले दर्शन सिद्धनाथे ||१||
बहेणि म्हणे पुढे चालिले तेथोनी
पाय वोसंतुनी महादेवा ||१०|

गंगा देखोनिया सिद्धेश्वर देव
तेथोनिया जीय नियो नेणे ॥१॥
आवडीचा हेत पूर्वील संस्कार
श्रवणी आदर कीर्तनाचे ||२||
पुराणश्रवण पूजा देवस्थान
ब्राह्मणपूजन प्रीति यांची ॥३॥
संन्यासी सज्जन संत महानुभाव
यांचे पायी जीव लागलासे ॥४॥
नियता तेथुन थोर वाटे दुःख
अदृष्ट करंटे काय कीजे ॥५॥
बहेणि म्हणे पुढे महादेवा जाये।
प्रतार गौरये नेत आम्हा ।।६।।

मागोनी भिक्षेसी क्रमितसे वाट
सोमुनिया कष्ट नानापरी ।।१।।
मायबाप बंधू प्रतारेसी जाण ।
महादेववन पाहावया ॥२॥
नरसिंहदर्शन घेउनी संपूर्ण
पांडुरंगस्थान देखियेले ॥३॥
भीमा चंद्रभागा पुंडलीक भक्त
वेणुनादी मुक्त प्राणिमात्रे ||४||
पद्मालयी स्नान देवाचे
दर्शन नामसंकीर्तन आइकिले||५||
राही रखुमाई सत्यभामा
सर्व देखियेले पूर्वद्वारयुक्त ||६||
महाद्वारातूनी करत प्रवेश
वाटले मनास महासौख्य ॥७॥
पांडुरंग मूर्ति देखोनी पवित्र
संतोषले नेत्र इंद्रियेसी ||८||
केली प्रदक्षिणा महाहर्षयुक्त चित्त
हे विरक्त करूनिया ||९||
वाटे मनामाजी राहावे येथेची परी
प्राक्तनाची दशा नाही ।। १०॥
जीव जावो परी पंढरीचे स्थळ न
संडावे जळ ऐसे वाटे ।।११।।
बहेणि म्हणे पंचरात्री पंढरीस केला
आम्ही वास पुण्ययोगे ।।१२।।

१०
चैत्रपौर्णिमेस गेलो महादेवा
देव-यात्रा सर्वा पाहाविले ॥१॥
जाले समाधान देखोनी शंकर
मागे अभयकर भक्तियोगे ।।२॥
पंचरात्री तेथे क्रमोनिया जाण
सिंगणापूर स्थान तेथे आलो ।।३।।
कोरान्नीचे कण सहज मेळ ।
तेणे सुखी जीउ होय माझा ।।४।।
अमृताचे परी वाटे गोड अन्न ।
पाप जळे जाण भक्षिलिया ॥५॥
बहेणि म्हणे माझे वय वर्ष नव ।
जाले आंतर्भाव सांगितला ॥६॥

११
प्रतार विचारी सर्वांस विचार
राहावया थार येथे नाही ।।१॥
ब्राह्मणाचे गावी जाउनी राहावे ।
ऐसे मनोभावे वाटतसे ।।२।।
रहेमतपुरी आहे ब्राह्मणसमुदाय
येथे वस्ती ठाय सर्व करू||३||
बहेणि म्हणे पूर्व-प्राक्तनाचे योग ।
न सोडी स्थळ त्याग केलियाही ||४||

१२
रहेमतपुरी सर्व जाउनी राहिलो
आवघीच लागलो मिक्षा करू ।।१।।
प्रतार तो थोर स्नानसंध्या करी ।
देव तयावरी कृपावंत ||२||
तेथील उपाध्या ग्रामीचा ग्रामस्थ
जावया उदित वाराणसी ||३||
ग्रामीचा वेवहार चालावयालागी
भ्रतार विभागी केला तेणे ||४||
आपण काशीस जाऊनी तुम्हासी
उपाध्या ज्योतिषी रत्नाकर ||५||
देखोनी नेटका शहाणा विद्यावंत
सर्वही गृहस्थ तथा पुसे ।।६।।
तेही केले मान्य मग तेथे राहो ।
वरुपाचा निर्वाहो येथे जाला ॥७॥
त्यावरी तो जाण आलीया ग्रामासी
रक्षिले आम्हासी वर्ष येक||८||
ऐसे वरुष अकरा जालीया
मजलागी वाटे संतसंगी असावेसे ||९||
कथा आइकावी पुराण-श्रवणी ।
ब्राह्मणपूजनी चित्त रिझे ।।१०।।
तेथुनी प्राक्तने बोढोनिया जाण ।
ते स्थळ त्यागून चालिपेलो ।।११।।
उदास आंतर नायडेथि काही
प्राक्तनासी नाही उपाय तो ।।१२।।
बग म्हणे पुढे कोल्हापूर क्षेत्र
जे अति पवित्र तेथे गेलो ।।१३।।

१३
हिरंभट एक ब्राह्मण वेदांती ।
दोही शाखी गती बजुर्वेदी ।।१।।
धोर भाग्यवंत पवित्र अग्रिहोत्र ।
विद्यार्थी सर्वत्र पठन करिती ॥२॥
तयाचिये गृही पाहोनिया स्थळ ।
राहोनी निश्चल अवण होय ॥३॥
“जयराम गोसावी” त्याची हरिकथा
नित्य भागवता श्रवण करू||४||
बहेणि म्हणे तेथे करोनिया वास ।
सदा निजध्यास आत्मचर्चा ॥५॥

१४
कोहि येक येळे अकराच्या ।
चरुषात सोमवारी व्रत धोर आले ॥१॥
हिरंभट यासी गोदान दिधले ।
द्विमुखी पाहिले यजमाने ॥२॥
काळी ते कपिला काळे तिचे ।
वस्त्र (वच्छ)प्रदक्षणे पुच्छ निवेदिली ||३||
सुवर्णाची शृंगे रुपियाचे खूर ।
वर पीतांबर पांघुरिला ॥४॥
सर्व उपचारे गोदान दिले ।
पाहावया आले सर्व जन ॥५॥
उपजोनिया यत्स गाय मेली परा ।
वत्स पीत क्षीरा दोहाचिया ।।६।।
जाले दिवस दहा अकराव्या दिनी
हिरंभटा-स्वप्नी द्विज बोले ||७||
ब्राह्मण हा तुझे आहे वोसरीस ।
कपिला तयास निवेदिजे ||८||
स्वप्न परी साचे केले हिरंभटे ।
प्रतारासी निष्ठे गाय दिल्ही ||९||
आनंदले मन सर्वांचेही जाण ।
गाई सुश्रूषण घडे आम्हा ॥१०॥
नित्य मायबाप जाती तृणालागी ।
पाळिती प्रयोगी जाण तोपे ||११||
गाईंचे ते वत्स तेही पै कपिला ।
माझ्या ठाई तिला हेत बहु॥१२॥
मीच सोडी तरी वत्स रिघे दोहा ।
करिता दोहावा सवे माझी ||१३||
मीच पाणी पाजी तृण घाली मीच
मजविण कांच मनी वाहे ।।१४।।
भी जाय पाणिया बोरडे ते वत्स ।
गाय बाय पुच्छ सवे चाले ।।१५।।
करुनीया लोक नवलची राहाती ।
उगेच पाहाती वत्स गाई||१६||
मोकळेचि वत्स असोनिया जाण न
बचे आपण गाईपाशी ।।१७।।
तृण घाली तरी भक्षिती आपण ।
पाजिल्या जीवन तेव्हा पिती ।।१८।।
रात्रीच्या अवसरी वत्स निजे सेजे ।
पुराणी ते फुंजे श्रवणकाळी ।।१९।।
कथेपासी जाय सवे तेहि येत ।
उभेची निवांत कथा ऐके ।।२०।।
गाय गोठा घरी आपण कथेसी ।
जाता मी स्नानासी सवे चाले ।।२१।।
करिती अपूर्व हे तुझे समंधी ।
लोक नाना शब्दी बोलताती ।।२२।।
कोण्ही म्हणे आहे योगभ्रष्ट वत्स ।
कोणी म्हणती नष्ट सवे इची ||२३||
कोण्ही म्हणती जन रिणाइन ।
इथे रीण फिटे तिचे तेच सुटे ||१४||
ऐसे नानापरी बस से न सोडी ।
मजही ते आवडी तयापासी ।।२५।।
न देखता वत्स हितु तळमळी ।
उदकेवीण मासोळी तेसे वाटे ।।२६।।
दळिता कांडिता वाहाताही पाणी ।
वत्सेविण जनी नावडे हो। २७।।
प्रतार रागीट नावडे की तथा ।
परी त्यासी माया मनी आली ।।२८।।
म्हणे ‘असो तुज नाही मूलबाळ ।
हाचि तुझा खेळ जाण मनी ।।२९।।
तुजही आवडी कथा- पुराणाची
संगती फुकाची तुज जाली ॥३०॥
तव तये वेळे जयराम गोसावी ।
तेथे तो स्वभावी सहज आले ।।३१।।
कथा घरोघरी ब्राह्मणाची पूजा ।
संतर्पणे द्विजा आरंभिली ||३२||
रात्री कथा होती दिवसाही करिती ।
मायबापे प्रीती पाहाती ते ।।३३।।
तेथे तया संगे मीही जाय कथे ।
वत्सही ते तेथे सवे चाले ||३४||
जेथे वैसे माय तेथे मी आपण
वत्सही धावोन सवे उभे ।।३५।।
हागेना ते मुते उभेचि श्रवणे ।
आइके कीर्तन नामघोष ।।३६।।
आरती जालिया नमस्कार होती ।
आपणही क्षिती ठेवी डोके ।।३७।।
देखोनीया जन हासती सकळ ।
परि ते प्रेमळ आल्हादची ||३८||
म्हणती योगभ्रष्ट पूर्वील हरिभक्त ।
गोवेष विरक्त पहा कैसे ।।३९।।
तव येके दिवसी मोरोपंते कथा ।
करावया भक्ता पाचारिले ।।४०।।
दिवस येकादशी प्रहरा दो ।
हरिकथा मांडिली तत्त्वत्ता महानंदे ।।४१।।
जयराम गोसावी शिष्य-समुदायेसी ।
बैसला सभेसी आसनी ते ।।४२।।
टाळ मृदंगेसी होतसे गायन ।
मिळालेसे जन सर्व तेथे ||४३||
तेथे आपणही मायबाप बंधू ।
कथा परमानंदू पाहातसे ।।४४।।
समागमे वत्स मजपासी बैसले ।
लोकी त्यासी नेले दारवंटा ।।४५।।
म्हणती स्थळ नाही बैसावया जना ।
पशू हे श्रवणा काय योग्य ।।४६।।
मी रहो लागले वत्सालागी तेथे ।
तब झाले श्रुत गोसाविया ।।४७।।
वोरडता वत्स मज येथे रडता ।
सांगती अवस्था स्वामीपासी ।।४८।।
म्हणती ‘येक मुली हिरंभटाघरी ।
ते आली श्रीहरी कीर्तनासी ।।४९।।
तिजसवे येक वत्स असे त्यासी ।
सांगाते तयासी हिंडविते ।।५०।।
ते वत्स बाहेरी घातिले अडचणी ।
त्यालागी ते रुसुनी रडत असे ।।५१।।
ते वत्स आरडत बाहेरी तिष्ठते ।
रडत हे येथे गलबला ||५२||
साक्ष अंतरीचा तो स्वामी जयराम ।
वत्स-आंतर्याम वोळखिले ॥५३॥
म्हणे “आणा त्यासी वत्साचे आंतरी ।
काय नाही हरी आत्मवेत्ता ।। ५४॥
कथेलागी होतो जीव कासावीस ।
पशू की तयास म्हणो नये” ।।५५||
आणविले वत्स बैसविले आसनी ।
पाहोनी नयनी तोष वाटे ।।५६।।
मजही कृपावंत कृपेचिये शब्दे ।
बोलावी प्रारब्धे पूर्व-पुण्ये ।।५७।।
कुर्वालोनी दोघा पाहे पूर्ण दृष्टी ।
न मानेचि गोष्टी जनालागी ।।५८।।
कथा होत असे गजर महाथोर ।
चित्त हे निर्भर वैष्णवाचे ।।५९।।
तयराम गोसावी याचे मनोगत ।
पुण्यसीळ सत्य उभयवर्गे ।।६०॥
कथेमाजी वत्स उमेचि तिष्ठत ।
रूपी सर्व चित्त आणुनिया ।।६१।।
हे मुली लहान वय इचे थोडे श् ।
रवण हे आवडे नवल मोठे ॥६२॥
म्हणे इचे कोण्ही आहे ये कबेसी ।
मायबाप तिसी सांगितला ॥६३॥
भ्रतारही इचा आहे बहु योग्य ।
परि इचे वैराग्य थोर दिसे ।।६४।।
मायबापासवे येतसे पुराणी
वत्सही घेउनी समागमे ॥६५॥
मग म्या आपुले आपण पाहिले
चरणी घातले लोटांगण ।।६६॥
वत्सही तैसेची पायावरी पडे ।
अपूर्वता पडे सर्व जना ।।६७।।
वाम सव्य दोन्ही होतो दोघे जण
चत्सा मज तेणे उठविले ।।६८।।
कथा संपलिया लोक गेले सर्व ।
परि हे अपूर्व म्हणती जन ।।६९।।
हिरंभट आणि आणिकही जन ।
म्हणती हे चिन्ह कोण कळा ॥७०॥
बहेणि म्हणे ऐसे कोल्हापुरी होये ।
पुढीलहि सोय तुम्हा सांगो ।।७१।।

१५
पिता-माता-बंधू-समवेत बिन्हाडी |
पावले से ही वत्सयुक्त ।।१।।
दोन घटिका रात्री होती समई ।
वत्स तये गाई पाजियेले ॥२॥
हिरंभटी स्नान केले अग्नीसवे |
कार्तिकाचे दिवे आकाशात् ॥३॥
सडे संमार्जन केले स्नान तेथे |
गौचे शृंग हाते कुवांळिले ||४||
भ्रताराने स्नान केले आपुलिया |
दक्षिणेची गया कोल्हापूर ||५||
तव कोण्ही एक निराबाई होती
तिने कथास्थिती सांगितली ।।६।।
प्रताराचे कानी कथेतील सर्व |
सांगाया अपूर्व म्हणोनिया ।।७।।
यत्साचे वृतांत माझेही रुदन भ्
रताराचे कान तृप केले ||८||
जयराम गोसावी विदेही अवस्था ।
तेणे हात माथा ठेवियेला ||९||
थोर याचे भाग्य तो यासी बोलिला ।
आशीर्वाद दिल्हा योग्य तेथे ||१०||
जातीचा भिक्षुक आला ।
बहुत रागावला गृहप्रती ।।११।।
धरूनिया वेणी मारिले यथेष्ट ।
हिरंभटा कष्ट फार जाले ।।१२।।
नावरे मारिता गायही थोरडे ।
वत्सही ते रहे कासाविस ।।१३।।
अठराव्या वरुषात मज होते तेथे ।
काय मी की सेवा आंतरले ।।१४।।
मायबाप बंधू न बोलती काही ।
भ्रतारे क्रोधही आवरिला ।।१५।।
शांत जालियाने पुसती तयास । स्
त्रियेवरी त्रास कासयाचा ।।१६।।
येरु म्हणे रात्री कथेत प्रतिष्ठा ।
काय यांची निष्ठा देखियेली ।।१७।।
कैचे हे पुराण कैची हरिकथा ।
मारीन अन्यथा नव्हे येथ ।।१८।।
इतुके बोलोनिया भ्रतार पुनरपि ।
क्रोध तो नाटोपी अनिऐसा ।।१९।।
बहेणि म्हणे तेव्हा देह संकल्पिले ।
प्राक्तनाचे केले कोण वारी॥२०॥

१६
आले मना तव मारिले बळकट ।
बांधोनिया मोट टाकियेली ॥१॥
हिरंभट म्हणे व्हा तुम्ही बाहेरी ।
हा दिसे हत्यारी चांडाळ की ।।२।।
मग मातापिता हिरंभटालागी ।
प्रार्थनिया वेगी स्थिर केले ||३||
म्हणती कृपा करा आजि दिसभरी ।
प्रातःकाळी दुरी ठाव पाहो ।।४।।
तयावरी वत्स गाय दोघे जण न
खाती की तृण जळेसहित ।।५।।
देखोनी वत्सासी गाईंचा वृत्तांत
मोट तो सोडित तये वेळी ।।६।।
आणिले जवळी गाई वत्सापासी ।
हुंबरली जैसी पुत्र माता ||७||
आपण देखिले वत्स आणि गाय |
म्हणे प्राण जाय तरी बरा ।।८।।
बहेणि म्हणे तया तृण पाणी पाजी |
न घेती ते माझी थोर माया ।|९||

१७
न खाती ते तृण न घेती जीवन
आपणही अन्न टाकियेले ।।१।।
नुठती सर्वथा स्वस्थळापासुन
येती सर्वजन पाहावया ।।२।।
जयराम स्वामीस सांगितले जनी
पाहावया निर्वाणी तेही आले ॥३॥
भ्रतारे तयासी केला नमस्कार ।
आपुले आंतर एकनिष्ठ ||४||
घातले आसन जयराम स्वामीस
हिरंभटी त्यास पूजियेले ।।५।।
मिळोनिया लोक पाहाती लोचनी ।
स्वामीही ते क्षणी आनंदले ।।६।।
म्हणती “ब्राह्मणा तू इचा भ्रतार
सांगतो निर्धार ऐक चित्ते ।।७।।
योगभ्रष्ट इची साधने बळकट ।
तू रे ईस कष्ट करू नको ॥८॥
स्वधर्मेची तुझी करील हे सेवा ।
उद्धरील जीवा आपुलिया ॥९॥
तुझे काही पदरी पूर्वील सुकृत ।
तेणे हा सांगात प्राप्त जाला ।।१०||
गाई आणि वत्स हे इचे सांगाती ।
अनुष्ठानी होती ऐक्यभावे ।।११।।
इचा हेच गुरु हे इचे साधन ।
तोडील बंधन आपुले हे ।।१२।।
इच्या समागमे करिती जे वास ।
तेही भक्तिरस घेती सुखे ।।१३।।
आइकसी तरी बरे होय तुझे
येथे काय माझे बळ आहे” ।।१४।।
बहेणि म्हणे ऐसे बोलोनी जयराम ।
पाहे मनोरम सर्व चिन्हे ।।१५।।

१८
स्वस्थाना आपण चालिले जयराम ।
शिष्यांचा संभ्रम फार होता ।।१॥
म्हणती जयराम “आनुष्ठानी तिघे ।
पूर्विल्या प्रसंगें एकनिष्ठ ।।२।।
आंतराय काही आनुष्ठानी राहिल्या ।
गायी या जन्मल्या पुण्यवेषे ||३||
हे मुली संपूर्ण आहे आनुष्ठान ।
चित्तशुद्धि जाण ईस आहे” ||४||
ऐसे परस्परे बोलती उत्तरे हे ।
कानी सादर आईकिली ॥५॥
बहेणि म्हणे गेले स्वामी स्वस्थानासी ।
मागील वृत्तांतासी जाण सांगो ॥६॥

१९
द्वादशी क्रमोनी त्रयोदशी आत
वत्सासी देहान्त समय आला ।।१।।
तेथ हिरंभट बोलियेला श्लोक ।
सहज स्वाभाविक ‘मूकं करोति’।।२।।
पूर्वार्ध श्लोकाचा सरताचि जाण
बोलिले आपण वत्स तेव्हा ॥३॥
‘यत्कृपा तमहं वंदे’ बोले शब्द ।
श्लोक- उत्तरार्ध वत्स बोले ||४||
आइकिला सर्व लोकी तो श्लोकार्थ ।
करिती संवाद परस्परे ।।५॥
तव त्या वत्से टाकियेला प्राण ।
आले मी धावोन तयापासी ॥६॥
प्राणासवे प्राण जाऊ पाहे माझा ।
प्राक्तनासी दुजा प्रयत्न नाही ।।७।।
गाय हुंबरडे दोहीवरी मान
टाकी परी जाण शब्द कैचा ।।८।।
बहेणि म्हणे देह प्राक्तनें राखिले
पुढे काय जाले कोण जाणे ।।९।।

२०
जयराम स्वामीस कळला वृत्तांत ।
वत्सासी त्या अंतकाळ जाला ।।१।।
श्लोकार्थ म्हणोनि प्राण वत्स त्यजी ।
योग लाजला जी तयापुढे ।।२।।
मग सर्व श्रेष्ठ संत साधुजन
करीत कीर्तन वत्स नेले ॥३॥
दिंडी पताकाने मिरविले वत्स ।
गाय सवे तुच्छ मानी देह ||४||
हुंबरडा हाणोनी चाले मागे
मागे गाय अंतरंगे महादुःखी ॥५॥
पुरूनिया वत्स आले सर्व जन
करूनिया स्नान गृहा गेले ।।६।।
गाय वत्सापासी जाउनी हुंबरे
मागुती ते फिरे गृहासी ये ॥७॥
मज अवलोकिता मी तो अचेतन
माझा देही प्राण आढळेना ||८||
ऐसे दिवस चारी लोटलियावरी ।
प्रतिपदेमाझारी मध्यरात्री ॥९॥
बोलिला ब्राह्मण येऊनी सन्मुख
“सावध विवेक धरी बाई ।।१०।।
सावध सावध सावध तू मनी”।
ऐकोनी श्रवणी देह कापे ||११||
तब गाय नाही वत्स ना ते लोक
माय ते सन्मुख बैसलीसे ||१२||
बंधू पिता आणि प्रतार बैसला ।
सोज्वळ लागला दीप असे ||१३||
तेथुनिया मन करोनी सावध स्
मरणी स्वतः सिद्ध चित्त केले ||१४||
बहेणि म्हणे देह सर्वही विकळ ।
परि ते निश्चळ चित्त माझे ।।१५।।

२१
उघडोनिया नेत्र पाहे जब पुढे ।
तब दृष्टी पडे पांडुरंग ॥१॥
देखिली पंढरी ध्याना तेचि येत ।
जयराम दिसत दृष्टीपुढे ।।२।।
ब्राह्मण स्वप्नात देखिला तो जाण ।
त्याची आठवण मनी वाहे ।।३॥
न दिसे आणिक नेत्रांपुढे जाण ।
नामाचे स्मरण मनी राहे ||४||
पूर्वील हरिकथा आइकिल्या होत्या
त्या मनी मागुत्या आठवती ॥५॥
तुकोबाची पदे अद्वैत प्रसिद्धे ।
तयांच्या अनुवादे चित्त झुरे ।।६।।
ऐसी ज्याची पदे तो मज भेटता ।
जीवास या होता तोष बहू ||७||
तुकोबाचा छंद लागला मनासी ।
ऐकता पदांसी कथेमध्ये ||८||
तुकोबाची भेटी होईल तो क्षण
वैकुंठासमान होय मज ॥९॥
तुकोबाची कानी ऐकेन हरिकथा ।
होय जैसे चित्ता समाधान ।।१०।।
तुकोबाचे ध्यान करूनि अंतरी ।
राहे त्याभीतरी गृहामाजी ।।११।।
बहेणि म्हणे तुका सद्गुरु सहोदर ।
भेटता अपार सुख आहे ।।१२।।

२२
मच्छ जैसा जळावाचुनी चरफडी
तैसी ते आवडी तुकोबाची ।।१।।
अंतरीचा साक्ष असेल जो प्राणी ।
अनुभवे मनी जाणेल तो ।।2।।
तृषितान जैसे आवहे ।
जीवन सायण विगतया ॥३॥
बहे म्हणे हेत तुकोबाचे पायी ।
ऐकोनिया देही पदे त्याची ॥४॥

२३
संचितासी दग्ध करी ऐसा कोण
सद्गुरुवाचून जाण मना ||१||
यालागी सद्गुरू असावा उत्तम
जेणे निमे श्रम संसाराचा ||२॥
त्रिविध तापासी कोण करी शांत
सद्गुरू येकांत न जोड़ता ||३||
जन्ममरणाची कथा के निवारे ।
सद्गुरू निर्धारि न भेटता ॥४॥
वासना निःशेष निवारील तेव्हा
भेटेल तुकोबा सद्गुरू तो ॥५॥
बहेणि म्हणे माझा जाऊ पाहे
जीव का पा न ये कीव तुकोबा रे।।६।।

२४
न बोलवे शब्द अंतरिचा धावा ।
नाइके तुकोबा काय कीजे ||१||
अदृष्ट करंटे साह्य नव्हे देव ।
अंतरीची हाव काय करू ||२||
तेरा दिवस ज्याने चहिया उदकात
घालुनिया सत्य वाचविल्या ||३||
मन्हाष्ट्र शब्दात वेदांतिचे अर्थ ।
बोलिला लोकात सर्वद्रष्टा ॥४॥
आंतर साक्ष आहे निरोपणी हेत ।
जडे परी चित्त वोळखेना ||५||
बहेणि म्हणे मीच असेन अपराधी ।
अन्याय त्रिशुद्धी काय त्याचा ||६||

२५
बहुत अंतरी शोक आरंभिला ।
का मज विठ्ठला मोकलिले ।।१।।
त्रिविध तापाने तापले मी बहू ।
जाईना का जीऊ प्राण माझा ॥२॥
तव अकस्मात सातवेया दिनी ।
नामसंकीर्तनी घोषयुक्त ।।३।।
तुकारामरूपे येउनी प्रत्यक्ष ।
म्हणे पूर्वपक्ष सांभाळिजे ||४||
नको करू चिंता आहे मी ।
तुजपासी घेई अमृतासी हातीचिया ॥५॥
गाय केले वत्समुखी निये धार ।
अमृत हे सार सेवी हेवी ||६||
ठेउनिया कर मस्तकी बोलिला ।
मंत्र सांगितला कर्णरंध्री ॥७॥
म्याही पायावरी ठेविले मस्तक ।
दिधले पुस्तक मंत्र गीता ।।८।।
कार्तिकात वा पंचमी रविवार ।
स्वप्नीचा विचार गुरु कृपा ॥१॥
आनंदले मन चिप कोंदले ।
उठोनिसले चमत्कारे ।।१०।।
मंत्र आठवती तुकोबास्वरूये ।
स्वप्नामाजी कृपा पूर्ण केली ।।११।।
अमृत पाजिले चयी अनारसी ।
साक्ष ज्याची त्यासी मनामाजी ।।१२।।
बहेणि म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची ।
तुकारामे साची पूर्ण केली ।।१३।।

२६
जाले समाधान ब्राह्मणाच्या शब्दे ।
स्वप्नामाजी पदे आठवती ॥१॥
परी अंतरीच तुकोबाचे ध्यान ।
दर्शनावाचून करितसे ॥२॥
जयाचिया पदे होतसे विश्रांती ।
त्याची देहाकृति बची ।।३।।
बिलासी तया नाही भेदभाव ।
ऐसे माझे मन साक्ष आहे ||४||
पांडुरंग तुका पांडुरंग तुका ।
वेगळीक देखा केवी होय ॥५॥
कलियुगी बीध्यरूप हरी हरी ।
तुकोबा-शरीरी प्रवेशला ॥६॥
तुकोबाची बुद्धि पांडुरंगरूप ।
मन ते स्वरूप तुकोबाचे ।।७।।
तुकोबाची सर्व इंद्रिय-चालक ।
पांडुरंग देख सत्य आहे ||८||
तुकोबाचे नेत्र तेही पांडुरंग ।
श्रोत्र ते अभंगरूप त्याचे ।।९।।
तुकोबाचे हात लिहिताती जे जे ।
ते ते ते सहजे पांडुरंग ।।१०।।
सर्वही व्यापार तुकोबाचे हरी ।
आपणचि करी अद्वयत्वे ।।११।।
वणि म्हणे रूपे व्यापक तुकोबा ।
ध्यान माझ्या जीवा हेचि वाहे ||१२||

२७
भ्रतारे मारिले मोट बांधोनिया न ।
सोसी ते तया क्लेश वत्सा ।।१।।
चतुर्थ दिवशी जीव टाकियेला ।
विठ्ठले दाविला चमत्कार ।।२।।
ब्राह्मणाच्या रूपे येउनी सांगत ।
सावधान चित्त करी पुढे ॥३॥
अंतरी सावध होउनी राहिले ।
चित्त म्या गोविले तुकोबासी ।।४।।
वत्स गेलियाने दिवस सातवा ।
येऊनि तुकोबा स्वप्नामाजी ॥५॥
केले समाधान पाजिले अमृत ।
वत्सासी करीत गाय भेटी ।।६।।
अमृत पाजोनी सांगितला मंत्र ।
जो का हा सर्वत्र लोक जपती ||७||
मस्तकी हस्तक ठेवोनिया कृपा ।
केली त्या स्वरूपा तोची जाणे ॥८॥
कृपेचा महिमा आहे तो अपार ।
वत्स बोले सार श्लोक- अर्ध ।।९।।
आठवे दिवसी सावध इंद्रिये ।
अमृते धालिये तुकोबाच्या ।।१०।।
तेधवा ते गाय देखिली सन्मुख ।
निमालिसी देख बत्तर कळे ।।११।।
म्हणे या वत्साते पाजिले अमृत ।
तयासी तो मृत्य कदा नाही ।।१२।।
अमर ते वत्स आहे मजपासी ।
चित्त अमृतेसी घेत गोडी ।।१३।।
बहेणि म्हणे इतुके वर्तलियावरी ।
पुढेही विस्तारी सांगिजेल ।।१४।।

२८
जयराम समर्थ ज्ञानाचा सागर ।
साक्ष ते अंतर त्याचे तया ।।१।।
बोलाविले तेणे हिरंभटाप्रती ।
माझी तया स्थिति पुसियेली ||२||
सांगितला तेणे वृत्तांत सर्वही ।
वर्तला जो काही गृही त्याचे ||३||
स्वप्नगत गुरू तुकोबाचे रूपे ।
स्वप्नीचिये कृपे बोध केला ||४||
सावध होउनी ते मुली ।
बैसली गाय समोखिली कुर्वानी ||५||
दुग्ध दुहुनिया घेतले तियेने ।
पाणी आणि तृण भक्षितसे ।।६।।
परी ते मुलीचे रूप पालटले ।
पूर्ण ते दाटले हृदय तिचे ।।७।।
तुकोबाचा छंद अंतरी लागला ।
मायबापे तिला सांगताती ॥८॥
भ्रतार हा तिचा वेडावला राहे ।
उगाची तो पाहे तिथेकडे ।।९।।
छांदस होउनी बैसली घरात ।
तुकोबाची चित्त लाउनिया ।।१०।।
ऐसा हा वृत्तांत हिरंभट सांगे ।
जयराम निजांगे संतोषला ।।१।।
बहेणि म्हणे ऐसा निर्धार ऐकोनी ।
जयराम स्वामींनी कृपा केली ।।१२।।

२९
कृपा उपजली जयराम स्वामीसी
आले पहावयासी भाव माझा ।।१।।
देखोनी तयासी आनंद वाटला
कंठ कोंदटला आनंदाने ।।२।।
मनेचि आरती केला नमस्कार ।
पुजिला साचार मनामाजी ।।३।।
बहेणि म्हणे माझे मनातील
तो निश्चित पांडुरंगा ॥४॥

३०
मजवरी दृष्टी कृपेची वोतली
प्रेमाची गुंतली माय जैसी ।।१।।
अंतरीची पूजा घेऊनी जयराम
गेला तो सप्रेम स्वस्थानासी ॥२॥
उगाची बैसला आसनी नेमस्त ।
करुनिया स्वस्थ चित्तवृत्ति ।।३॥
तव काही एक अपूर्व वर्तले ।
तुकारामे दिल्हे दर्शनासी ||४||
करी नमस्कार भेटुनी आनंदे
अत्यंत आल्हादे स्वामी सखा ||५||
मजही दरुषण दिधले
आळुमाळ घातला कवळ मुखामाजी ॥६॥
मज म्हणे “आलो जयराम भेटीसी ।
तुजही मानसी वोळखिले ||७||
तुम्ही आता येथे नका राहो
कदा आत्मज्ञानबोधा न संडावे” ||८||
बहेणि म्हणे दिल्हे दर्शन दुसरे ।
मनाच्या व्यापारे तुकोबाने ।।९।।

३१
नवल जनासी वाटले म्हणोनी
येती ते धावोनी पाहावया ॥१॥
भ्रतार हा माझा देखोनी तयासी ।
माझिया देहासी पीडा करी ।।२।।
न देखवे तथा द्वेषी जनाप्रती ।
क्षणाक्षणा चित्ती द्वेष वाढे ||३||
म्हणे ही बाईल मरे तरी बरी
ईस का पामरे भेटताती ॥४॥
काय आता घुमे येईल आंगासी
देव इचे पोसी पोट कैसे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसी भ्रतारासी चिंता ।
जाणोनी अनंता कळो आले ।।६।।

३२
अतार म्हणतसे आम्ही की ।
ब्राह्मण वेदाचे पठण सदा करू ॥१॥
कैचा शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी ।
बिघडली पत्नी काय करू ॥२॥
कैचा जयराम कैचा पांडुरंग ।
माझा झाला भंग आश्रमाचा ॥३॥
आम्ही काय जाणो नाम हरिकथा ।
भक्ति हे तत्त्वता नसे स्वप्नी ॥४॥
कैचे संतसाधू कैची भावभक्ती ।
भिक्षुकाचे पंगति वसो सदा ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे चित्तात भ्रतारे ।
चिंतोनी निधारे विचारिले ||६||

३३
विचारिले मनी भ्रतारे आपण  ।
आता हे त्यागून वना जावे ।।१।।
इस नमस्कार करितील जन  ।
आम्ही ईस तृण वाटो परी ॥२॥
खियेसी बोलती अनुवाद कथेचा  ।
आम्ही परि नीच ईस वाटू ||३||
पुसतची येती ईस पहा जन  ।
आम्ही की ब्राह्मण मूर्ख जालो ॥४॥
इचे नाव घेती गोसावीण ऐसे  ।
आम्हा कोण पुसे इंजपुढे ||५||
बहेणि म्हणे ऐसे भ्रतार मानसी  ।
चिंतुनी चित्तासी बोध करी ॥६॥

३४
म्हणे आता मना स्त्रियेची हे दशा
आता तू सहसा राहो नको ।।१।।
चाल वेगी जाऊ तीर्थासी वैराग्य ।
आमचे हे भाग्य वोडवले ॥२॥
सासू-सासरियास केला नमस्कार
आहे खी गरोदर मास तीन ॥३॥
आपण जातो तीर्थयात्रा करावया
देवलसी खिया यत्न कीजे ॥४॥
न पाहे मी मुख सर्वथा इयेचे ।
हीनत्व आमुचे कोण फेडी ।।५॥
भंडिमा सोसून कोण राहे येथे
ऐसिया खियेते कोण पाळी ।।६।।
बहेणि म्हणे ऐसे बोलिला भ्रतार ।
मज पडे विचार मनामाजी ।।७।।

३५
काय म्या अदृष्टा करावे आपण ।
आले जे ठाकून सोसी येथे ॥१॥
नाही येत वारे आंगासी माझीया ।
घुमारीन काया नव्हे माझी ॥२॥
स्वधर्म आपुला रक्षनिया मने ।
शास्त्राच्या श्रवणे देव साधू ॥३॥
भ्रताराची सेवा तोचि आम्हा देव ।
भ्रतार स्वयमेव परब्रह्म ।।४।।
तीर्थ भ्रताराचे सर्वतीर्थ जाण ।
तया तीर्थावीण निरर्थक ॥५॥
भ्रतारवचनासी उल्लंघीन जरी ।
पापे माझ्या शिरी पृथिवीची ॥६॥
धर्म अर्थ काम मोक्षासी अधिकारी ।
भ्रतार साचार वेद बोले ।।७।।
हा माझा निश्चय मनातील हेत ।
प्रतारेसी चित्त लाविलेसे ॥८॥
भ्रतारसेवेने सांग हा परमार्थ ।
भ्रतारेच स्वार्थ सर्व आहे ||९||
भ्रतारा वाचून अन्य देव ।
जरी येईल अंतरी ब्रह्महत्या ॥१०॥
सद्गुरु प्रतार साधन प्रतार ।
हा सत्य निर्धार अंतरीचा ।।११।।
बहेणि म्हणे देवा भ्रताराचे ।
मनी तुवा प्रवेशोनी स्थिर केले।।१२।।

३६
भ्रतार गेलिया वैराग्य घेउनी ।
पांडुरंगा जनी जिणे काय ।।१॥
प्राणेविण देह काय पावे शोमा ।
रात्री- विण प्रभा चंद्राचिये ॥२॥
प्रतार तो जीव देह मी आपण ।
प्रतार कल्याण सर्व माझे ॥३॥
प्रतार जीवन मी मच्छ तयात ।
कैसेनी वाचत जीव माझा ॥४॥
भ्रतार तो रवी मी प्रभा तयासी ।
वियोग हा त्यासी केवी घडे ॥५॥
बहेणि म्हणे माझ्या जिवाचा निर्धार ।
बोले में विचार हरी जाणे ॥६॥

३७
भ्रतारे वैराग्य घेतलिया वरी ।
जीव हा निर्धारी देईन मी ।।१।।
वत्सासाठी देह अचेतन
पडे हा तय रोकडे परब्रह्म ॥२॥
भ्रताराचे तीर्थ न सापडे जरी
अन्न खाय तरी मांस आम्हा ॥३॥
भ्रताराचे शेष न सापडे तरी
पापे माझ्या शिरी त्रैलोक्याची ॥४॥
चित्त हे भ्रताराविण जरी जाये
तरी केवी राहे प्राण माझा ॥५॥
भ्रतारदर्शनाविण जाय दीस ।
तरी तेचि रासी पातकाच्या ॥६॥
बहेणि म्हणे मज आज्ञाची प्रमाण
ब्रह्म सनातन स्वामी माझा ॥७॥

३८
पाषाण विठ्ठल स्वप्नातील तुका ।
प्रत्यक्ष का सुखा अंतरावे ।।१।।
घेईन उदंड सेवासुख हेही ।
साक्ष या वेदही आहे मज ॥२॥
भ्रताराची सेवा पतिव्रता करी ।
तरी ते उद्धरी उभवकुळे ।।३।।
बहेणि म्हणे माझ्या जिवाची ।
विश्रांती तारे समाप्ती जन्ममृत्यू ॥४॥

३९
भ्रतारे निश्चय केला मनामाजी ।
जावे उद्या आजि टाकूनिया ॥१॥
तव त्यासी व्यथा जाली शरिरास ।
जाला सात दिवस ज्वाळ देही ॥२॥
वोळखीचे जन नाइके उत्तर ।
आपण अहोरात्र तयापासौ ॥३॥
दिधल्या औषध नेदी तथा मान ।
जीव व्यथा पूर्ण फार सोसी ||४||
येक मासवरी अन-विवर्जित ।
व्यथा हे अद्भुत सोसीतसे ॥५॥
नाना देव कुळे देवतांची भाष
ठेविल्या विशेष बहु काही ||६||
परी तया व्यथेलागी न ये गुण
म्हणे तो मरण आले मज ॥७॥
काय पांडुरंगा तुकोबासी निंदी ।
व्यथा हेचि संधी आली मज ॥८॥
जरी तुकाराम निंदिला त्यागुणे
असेल दुखणे व्यथा मज ||९||
तरी चमत्कार दाखवावा सध्या
जीवी विश्ववंद्या तुकाराम ।।१०।।
बहेणि म्हणे झाला अनुताप प्रतारा ।
पांडुरंग पुरा अंतरसाक्ष ।।११।।

४०
वृद्धसा ब्राह्मण येऊनी बोलत
म्हणे “का रे मृत्यु इच्छितोसी ।।१।।
वैराग्य का तुज आले असे मना ।
स्त्रीचा त्याग कोण्या गुणे केला ॥२॥
आधी इचा मनी अपराध विचारी
मग कोपा करी प्रवर्तावे ॥३॥
वाचण्याची इच्छा असेल मानसी
तरी तू इयेसी अंगिकारी ॥४॥
स्वधर्माविरहित वर्तेल हे जरी
तरी तिचा करी त्याग वेड्या ||५||
हे आहे विरक्त निश्चये हरिभक्त
तुवाही निश्चित व्हावे तैसे ॥६॥
होईल कल्याण” बोलत ब्राह्मण ।
भ्रतारे चरण वंदियले ॥७॥
सांगितले सर्व कारण आपण
“देई जीवदान आजी मज ॥८॥
ये वेथेपासुनी वाचवी स्वामिया
जीव तुझ्या पाया लावीन मी ।।९।।
स्त्रियेसी सर्वथा न बोले
आपण हरिसी शरण जीवेभावे” ||१०||
केला नमस्कार प्रत्यक्ष उठोन
‘होईल कल्याण’ म्हणे द्विज ।।११।।
आइकले मीही दोघांचे बोलणे
घाली लोटांगणे भ्रतारासी ।।१२।।
जाला तो अदृश्य ब्राह्मण तत्काळ
आरोग्य कुशळ देह जाला ।।१३।।
बहेणि म्हणे देव कृपा करी तरी
सर्व सिद्धी द्वारी तिष्ठतील ।।१४।।

४१
आरोग्य तत्काळ वेथेचा हारास
केला दिसेंदीस भ्रतारासि ||१||
मग करी कृपा बोले समाधान ।
द्वेषाचे हे ठाण दूर केले ।।२।।
म्हणे आता सर्व जावे येथुनिया
आपुलिया ठाया स्वस्थानासी ।।३।।
देवे आपणासी ब्राह्मणाच्या वेषे
सांगितला शेष प्राक्तनाचा ॥४॥
तेचि आता करू हरीची निजभक्ति ।
मिरासीची खंती टाकियेली ॥५॥
माझी मायबापे तयासी सांगत
तुम्ही जा निवांत देवगावा ||६||
आपण अरण्यात दोघे करू वास ।
देवाच्या बोलास धरूनिया ||७||
हो आता कल्याण किंवा आकल्याण
आम्ही तो संपूर्ण भक्ति करू ॥८॥
तुकोबाचे गावी जाउनीच राहो ।
मनीचा दृढायो धरूनिया ||९||
ऐसी पालटली भ्रताराची बुद्धी ।
स्वामी कृपानिधि अंतरसाक्ष ।।१०।।
काय येक देव करील ते नव्हे ।
प्रत्यक्ष अनुभव सर्वजना ।।११॥
बहेणि म्हणे आवधी घेनी चालिलो
तुकोबाच्या आलो दर्शनासी।।१२।।

४२
वत्साचिये माय कपिला सांगाते ।
धावे एकचित्ते आम्हापुढे ||१||
मायबाप बंधु भ्रतारासहित ।
इंद्रायणी व तेथे आलो ॥२॥
करूनिया स्नानानं ॥३।।
आरती करित होते तेथे ।
नमस्कारे स्वस्थ चित्त केले ।।४।।
स्वप्नी जो देखिला तेचि ध्यान
तेथ देखिले नेमस्त पूर्णदृष्टी ||५||
बणि म्हणे ते तारे सांग
केला अंतरंग भावयुक्तः।।६।।

४३
माध्यान्ह जालीया पाहिजे ते अन्न ।
प्रतार जाऊन ग्राम हिंडे ।।१।।
तव तेथे येक ब्राह्मण कोंडाजी ।
म्हणे ‘तुम्ही या जी भोजनासी ॥२॥
भ्रतार बोलिला ‘आहो पाचजण
इतुकियासी अन्न कोण घाली ॥३॥
वे म्हणे ‘तुम्ही आधीच भोजनाः
याये नारायणा काय चिंता ॥४॥
जाये तुम्ही पाहोनी राह
माध्यान्ही येईजे गृहाप्रती ||५||
बहेणि म्हणे आला भ्रतार,
अन्नासी मेळविले त्यासी सांगितले||६||

४४
मंबाजी गोसावी त्या स्थळी नांदता ।
गृहप्रशस्तता देखियेले ।।१।।
जाऊनी तयासी मागितले स्थळ ।
तो अति चंचळ क्रोध तथा ॥२॥
मारावया उठे घातले बाहेरी
आनंदे-वोवरी प्रार्थियेले ||३||
तेथे राहोनिया भोजनासी गेलो ।
बहुत पावलो समाधान ॥४॥
वृत्तांत पुसिला कोठोनी आलात ।
चालतसा पंथ कार्य कवण ॥५॥
काहीबाही तथा सांगितले पूर्व
म्हणे राहा सर्व पर्वणीसी ॥६॥
सोमवारी आहे अमावास्या पुढे
राहा भक्तिकोडे सुख घ्यावे ।।७।।
नित्य हरिकथा होतसे देऊळी
तुकोबा माउली वैष्णवांची ॥८॥
राहा येथे तुम्हा भक्षावया धान्य
देऊ हेही पुण्य आम्हा घडे ।।९।।
बहेणि म्हणे मग राहिलो देहूस
धरूनी हव्यास तुकोबाचा ।। १०॥

४५
देवळात कथा सर्व काळ होत ।
श्रवण करीत दिनरात्री ।।१।।
तुकोबाची कथा वेदांतील अर्थ
पावे माझे चित्त समाधान ॥२॥
तुकोबाचे ध्यान पूर्वी कोल्हापुरी
जे स्वप्नामाझारी देखियेले ।।३।।
तेचि ध्यान डोळा प्रत्यक्ष देखोनी
आनंद लोचनी हेलावत ||४||
दिनरात्री निद्रा न ये तिळभरी
तुकोबा अंतरी प्रवेशला ||५||
बणि म्हणे देती सुखाचे डोलावे
जानती अनुभवे जाणते जे ।।६।।

४६
मंबाजी गोसावी भ्रतारासी म्हणे
तुम्ही शिष्य होणे खियायुक्तः ।।१।।
माझा देव आहे तुम्हीही |
हरिभक्त दिसता विरक्त उभयवर्गे ।।२।।
ऐकोनी ते गोष्टी दोनिचारी वेळ
मग त्या प्रांजळ सांगितले ॥३॥
आम्ही अनुग्रही आहो जी पूर्वील
न वाटे त्या सत्य गोष्ट काही ।।४।।
प्रतारे त्याप्रती सांगितले
सर्व कोल्हापुरी पूर्व वर्तले जे ||५||
ऐकोनीया द्वेष संचरला मनी
म्हणे काय स्वप्नी समाधान ।।६।।
नाही गुरुसेवा घडली जोवरी ।
हस्तक हा शिरी सद्गुरूचा ॥७॥
तोवरी तो गुरु कासयाचा खरा ।
शूद्राच्या आंतरा ज्ञान कैचे ।।८।।
स्वप्नीचा अनुग्रह गुरु केला
शूद्र तोही बळिभद्र ज्ञानहीन ।।९।।
तुम्हास वाळीन ब्राह्मणाचे पंक्ती
तुम्ही गुरुभक्ती नका सांगू ।।१०।।
बहे िम्हणे ऐसे मंबाजी बोलिला
द्वेषही मोडिला तेच क्षणी ।।११।।

४७
एके दिवशी वाटे देखिले
आपण मंबाजीसी पूर्ण हेतयुक्त ॥१॥
नमस्कार करावया गेले तेथे
येरू हा न सिवे दूरी पळे ।।२।।
म्हणे तुम्ही काय कोण याती नेणो
आम्ही शूद्र म्हणी तुम्हालागी ॥३॥
सोनार की तुम्ही गोळक यातीची
तुम्हा ब्राह्मणाची क्रिया नाही ||४||
तुम्ही कोठे जाल भोजनासी जरी ।
दिवाणात तरी घालीन मी ।।५।।
बहेणि म्हणे ऐसे ऐकोनी आपण
प्रतारासी पूर्ण सांगितले ॥६॥

४८
महादाजी कुलकर्णी कोंडाजीपंतासी
सांगितली ऐसी गोष्टी तथा ।।१।।
मग तेही नेले आपुल्या गृहासी ।
म्हणे की तयासी काम काय ? ॥२॥
परंतु तो द्वेष चालवी अत्यंत
मारू पाहे बात चिंतुनिया ॥३॥
म्हणे हे ब्राह्मण तरी गुरु शूद्र ।
हेचि तथा छिद्र सापडले ||४||
द्वेषही वाढला अत्यंत अद्भुत ।
सर्वाही लोकांत कलो आले म्हणे
देवाना निश्चय निर्धारी पाहातसे ॥६॥

४९
आपाजी गोसावी पुण्यात राहात ।
जो अतिविख्यात राजयोगी ॥१॥
तयाप्रती पत्र मंबाजी पाठवी ।
“तुकोबा गोसावी शूद्र वाणी ॥२॥
कथा करितसे देऊळी सर्वदा ।
द्विज त्याच्या पदा लागताती ।।३।।
रामेश्वरभट अति योग्य थोर
तेही नमस्कार त्यासी करिती ॥४॥
आम्हासी अन्याय हाचि चोर वाटे ।
होत असे खोटे वेदवाहा ||५||
तुम्ही थोर असा दंड करावया
बांधोनीया तथा न्यावे तेथे ॥६॥
आणिक हे येक स्त्री-पुरुष आहेत
तेही म्हणवित शिष्य त्याचे ||७||
म्हणविती ब्राह्मण आहेती सोनार
कुलकर्णीही फार मान्य केले ||८||
स्वधर्माचा लोप होतसे देखोन
म्हणोन लिहून पाठविले ||९||
याचा की अपमान न करिता
जाण राज्यही बुडून जाय तरी ।।१०।।
डोंबाळे मांडून स्वधर्म लोपला
पाहिजे रक्षिला स्वामीराजे” ।।११।।
बणि म्हणे ऐसे पत्र पाठविले
चोरून लिहिले रामाजी ।।१२।।

५०
आपाजी गोसावी वाचोनिया पत्र
क्रोधे फार नेत्र भोवंडीत ॥१॥
शूद्र होवोनिया नमस्कार घेत
पाप हे अद्भुत होत असे ॥२॥
सोनाराची जाती म्हणविती
ब्राह्मण तयाचे दर्शन घेऊ नये ॥३॥
शूद्राचा अनुग्रह घेताती ब्राह्मण ।
भ्रष्टाकार पूर्ण होत असे ॥४॥
त्यासी शिक्षा द्यावी दोष नाही यासी ।
ऐसे निश्चयासी नेम केला ||५||
बहे म्हणे याचे प्रत्युत्तर लिहिले
होय यथाकाले कार्यसिद्धी ॥६॥

५१
मंबाजी गोसावी द्वेष करी जीवे
म्हणे “तुम्ही जावे येथूनिया” ||१||
तेणे फार चिंता वाटतसे मनी।
विघ्न का भजनी वोडवले ।।२।।
कोण्हाचे न घेता न बोलताही काही
नसोनी अन्यायी द्वेष का हा ।।३।।
देवासी आठवी चिंतुनी मानसी
साक्ष तूचि यासी पांडुरंगा ॥४॥
माझे अंतरीचे जाणतोसी तूचि ।
चित्तात द्वेषासी थार नाही ||५||
हे विघ्न आणिले यासी तू निवारी
तुकारामा शिरी आहेसी तू ।।६।।
भक्ति करी यासी पीडीसी अंतरी ।
निष्ठा नानापरी लक्षिसी तू ।।७।।
बहेणि म्हणे देवा संचितासारखे
नाना सुखदुःखे प्राप्त होती ॥८॥

५२
कोल्हापुरी गाय होती ते सांगाते
ते गाय दुग्धाते देत होती ।।१।।
गाय ते बांधोन घातली घरता ।
सोटेही मारित तयेलागी ॥२॥
पाहो गाय तव न दिसे पहाता
तुकोबासी वेथा तेचि जाली ॥३॥
पहातोसी काय होत असे कष्टी
तीन रात्री खुंटी बांधलीसे ।।४।।
नाही तृण पाणी आरडतसे फार
धावण्यासी धार नाही दिसे ॥५॥
तुकोबा जागृत जाता तब पाठ
सुजली ते नीट होपचिना ।।६।।
सोटे अंगावरी दिसली तुकोबा
आठवी विठोबा नानापरी ।।७।।
देखोनी तयासी कष्ट होती
जना सांगितले स्वप्नातील सर्व ॥८॥
मग उणेपणे आठउनी देवा ।
“धाव रे माधवा सोडवणे ।।९।।
कोणे गाय कोठे बांधिली कळेना ।
धाव नारायणा गाय रक्षी” ।।१०।।
तव अकस्मात तयाचिये गृही
आग्न लागे तोहि महाथोर ।।११।।
धावोनिया लोक विझविती आम ।
गाय ते हुंबरून वरडा करी ।।१२।।
जे गाय पहाती आजी तीन
दिवस चांडाळे तियेस बांधिलेसे ।।१३।।
गाय सोडोनिया आणिली
बाहेरी तव पाठीवरी मारिलीसे ।।१४।।
भ्रतार आपुला बोलाउनी पाहे ।
“सांभाळी हे गाय ब्राह्मणा तू” ।।१५।।
तुकोबा धावोनी करी प्रदक्षिणा ।
“नमस्कारी गुणा धन्य तुझे ।।१६।।
दाखविले स्वप्न मज माय तुवा
न कळेचि धाचा केला मग ।।१७।।
तुझा माझा एक आत्मा सर्वागत ।
ते साक्षी निश्चित आली मज” ।।१८।।
एसो तुकोबाने केला फार धावा ।
तव माझ्या जीवा दुःख जाले ।।१९।।
मजही तैसेच क्लेश जाले फार
साक्ष हे अंतर विठ्ठलाचे ।।२०।।
तुकोबाची पाठी पहातात जन
गाईसी देखोन थोर कष्टी ।।२१।।
बहेणि म्हणे ऐसे वर्तले हे जाण ।
गाईचे निर्वाण हरी जाणे ।।२२||

५३
रामेश्वर भटे ऐकिला वृत्तांत
धावोनि त्वरीत तेथे आले ।।१।।
तुकोबाचे तेही घेतले दर्शन ।
गाय तेहि पूर्ण पाहियेली ॥२॥
दोहीचे पाठीचा दिसे येक भाव ।
रुदनी ते सर्व प्रवर्तले ॥३॥
तुकोबाचा पार वर्णीलसा कोण
कलियुगी जाण प्रल्हाद हा ।।४।।
सर्वातिर साक्षी करूनिया स्तुती ।
स्वसुखे रमती आपुलिया ॥५॥
बहेणि म्हणे लोक बोलती सकळ ।
“तुकोबा केवळ पांडुरंग ॥६॥

५४
महादाजी कुलकर्णी तयाचिये घरी
असोनि निश्चळी काळ क्रम् ।।१।।
येतात हेलावे दुःखाचे
अनेक लक्ष्मीनायक जाणतसे ॥२॥
घालोनी संकट देवावरी भार
असो निर्विकार येकनिष्ठे ।।३।।
तव तये काळी जालिया प्रसूत
कन्या झाली तेथे आपणासी ||४||
काशीबाई तिचे ठेवियेले नाव
दाखविला भाव पूर्ण काही ||५||
बणि म्हणे वत्स मेले कोल्हापुरी
ते आले उदरी ऐसे वाटे ।।६।।

आत्मनिवेदनपर
५५
देवगाव माझे माहेर साजणी
शाखा वाजेसनी मीनस गोत्र ।।१।।
तयाचिये कुळी घेतले शरीर
स्त्रीरूपे व्यवहार दावावया ॥२॥
जयाचिये कुळी गुरुपरंपरा
नाहीच सादरा श्रवण काही ।।३।।
बहेणि म्हणे जन्म अंतरीचा नेम
हे तो जाणे वर्म नारायण ||४||

५६
लोकांचिया मुली खेळती बोळकी
वाटे घ्यावे मुखी मज नाम ।।१।।
आणिक नावडे खेळ तो बालिश ।
नेणे तो विश्वास प्रगटला ॥२॥
नावडे फुगडी टिपरियांचा
खेळ असावे निश्चळ वाटे मना ॥३॥
बहेणि म्हणे पूर्वी होते जे पदरी
तेची या संसारी प्रगटले ||४||

५७
मातापितयाने लग्न संपादिले ।
कन्यादान केले गौतमगोत्री ।।१।।
झाला चार दिस लग्नाचा सोहळा ।
न कळे देवाचा हेत आन ॥२॥
मायबापे माझी दरिद्री पीडिली ।
उपद्व्यापे जाली कासावीस ॥३॥
देशत्याग झाला मिरासीच्या भये
तव गंगा जाय दोही थड्या ||४||
सांगाते घेतले माझिया स्वामीस ।
आले परदेशास महादेवी ॥५॥
मायबाप बंधू भ्रतारासहित ।
बहेणि म्हणे तेथ स्थिर जाले ॥६॥

५८
चालले पंढरी महादेवाहूनी
संतांचे दरुषणी सुख वाटे ।।१।।
संतसमागम जीवाहूनी गोड
परी भय दृढ भ्रताराचे ।।२।।
जमदग्नीचा क्रोध ऐकियला कानी ।
भ्रतार तो जनी तेचि रूप ||३||
बहेणि म्हणे झाले वरुषे एकादश ।
क्षणही जीवास सुख नाही ॥४॥

५९
वैदिक व्यवहार स्वामी उदरार्थ
करितसे तेथ देव कैचा ।।१।।
वेदपाठकाही नावडेचि भक्ती
पराधीन युक्ती न चले माझी ॥२॥
वय तो लहान लौकिक तो वेडा ।
वेदाचिया भिडा उभी राहे ||३||
बहेणि म्हणे माझे चित्त कासावीस
संसाराचा त्रास बहु झाला ॥४॥

६०
त्रियेचे शरीर पराधीन देह
न चाले उपाव विरक्तीचा ।।१।।
पडिले अंतर विवेकाचे बळे |
काय निर्मियेले राघोबाने ||२||
तापले शरीर त्रिविध तापाने
वाटतसे मने प्राण द्यावा ॥३॥
न घडे हरिची भक्ती अणुमात्र |
शत्रु इष्टमित्र संसाराचे ।।४।।
शरीराचे भोग वाटताती वैरी
माझी कोण करी चिंता आता ॥५॥
बहेणि म्हणे जैसा वोकियला वोक ।
तैसे हे मायिक वाटे मना ॥६॥

६१
हरण सापडे जैसे वाघुरेत
अंध अरण्यात पडे जैसा ।।१।।
तैसे मज झाले पुसू कोणा हित ।
होय माझे चित्त कासावीस ||२||
जलावीण मत्स्य गाईविण वत्स
मृगीविण पाडस जयापरी ।।३।।
बहेणि म्हणे देवा ऐसिया
संकटी करी कृपादृष्टी दीनावरी ।।४।।
विरक्तीचे मूळ प्रपंचाचा
त्याग पाहतांची एक गृहशैल ||१||
संकट मांडिले घाव तू झडकरी |
विवेक-उत्तरी बोधी चित्त ।।२॥
भ्रतार त्यागिता वेदासी विरुद्ध
परमार्थं तो शुद्ध सापडेना ॥३॥
द्वाराशी भुजंग प्रहजळे अंगी ।
जीव त्या प्रसंगी केवी राहे ||४||
वेदाचे वचन त्यागू नये धर्म
माझे तय प्रेम हरिभक्ती ॥५॥
बहेणि म्हणे ऐशी संकटे दाटती ।
क्लेश ते वाढती काय सांगू ॥६॥

६३
वेद हाका देती पुराणे गर्जती ।
त्रियेच्या संगती हित नोहे ॥१॥
मी तो सहज स्त्रियेचाचि देहा
परमार्थाची सोय आता कैची ॥२॥
मूर्खत्व ममता मोहन मायिक
संगची घातक स्त्रियेचा तो ।।३।।
बहेणि म्हणे ऐसा स्त्रीदेह घातकी ।
परमार्थ या लोकी केवी साधे ।।४।

६४
काय पाप केले पूर्वील ये जन्मी
आता पुरुषोत्तमी अंतरले ।।१।।
लाधले नरदेह खियेचेनि रूपे ।
असंख्यात पापे फळा आली ॥२॥
अधिकार नाही वेदार्थश्रवणी
गायत्री ब्राह्मणी गुप्त केली ||३||
करू नये मुखे प्रणवाचा उच्चार ।
बीजाचा संचार ऐको नये ।।४।।
बोलो नये बोल पराचिया संगे
भ्रतार तो अंगे जमदनी ॥५॥
बहेणि म्हणे होतो जीव कासावीस
न ये देवाजीस करुणा माझी ||६||

६५
नामाचा विटाळ आमुचिये घरी ।
गीताशास्त्र वैरी कुळी आम्हा ।।१।।
देव तीर्थयात्रा नावडती हरी ।
ऐसीयांचे घरी संग दिला ||२||
संतसमागम राघवाची भक्ती
नावडती श्रुती शास्त्र कथा ||३||
बहेणि म्हणे माझ्या पापाचा संग्रहो ।
तुटोनीया राहो चित्त स्थिर ||४||

६६
अनुतापे तापले बहुत मानसी
नये देवाजीसी करुणा कैसी ।।१।।
चाटे देह आता घालू अग्री-आत ।
किंवा ही करवत घालू माथा ||२||
वाटे जीव द्यावा नदीचे प्रवाही
किंवा दिशा दाही उल्लंघाव्या ॥३॥
चाटे अरण्यात घेऊनी धरणे
वैसावे, पारणे करू नये ||४||
बहेणि म्हणे माझा जीव हा
तळमळी का रे वनमाळी मोकलिसी ॥५॥

६७
गांजविसी देह भ्रताराचे हाते
माझिया तो चित्ते नेम केला ।।१॥
न सोडी भजन प्राणही गेलिया ।
आता देवराया दीनबंधु ॥२॥
पाहातोसी काय आता माझा
अंत होतसे देहान्त पती-हाते ।।३॥
करू काय मज मांडले साकडे
नाही देहाकडे हेत माझा ॥४॥
पडो देह परी राहतसे हेत
पहावा अनंत ज्ञानदृष्टी ॥५॥
करावी हे भक्ति स्वधर्म-आचारे ।
तुज ज्ञानद्वारे ओळखावे ।।६।।
राहील हे काय शरीर पीडेने ।
का रे हे वचन नायकसी ।।७।।
हेत राहे तथा जन्म घडे
पुन्हा वेदाच्या वचना आयकिले ||८||
आता या संकटी तुझे शिरी
हत्या राखावी अपल्या आपुलिया ॥९॥
णि म्हणे हरी बहिरा का
रे विश्वा झालासी तू ।। १० ।।

६८
सखा सहोदर तूंची एक हरी ।
दीनांचा कैवारी पांडुरंग ।।१।।
तुझी भक्ती पतिव्रताधर्म
ऐसे मेघश्याम, विचारावे ॥२॥
वेदासी विरुद्ध नव्हे तो परमार्थ
म्हणोनी हा अर्थ विचारावे ||३||
बहेणि म्हणे दोन्ही घडतील
हरी हेत हा झडकरी विचारावा ||४||

६९
मातापिता बंधु प्रपंचाचे सखे
होती महादुःखे माझ्या संगे ।।१।।
देवासी सांगता जाणसी अंतर
सांगावया थार नाही मज ॥२॥
सांगती न कोणी स्वहितविचार
नाही तो शेजार सज्जनाचा ॥३॥
एकली एकट पडियले बनी ।
क्षुधा तृषा मनी आठवेना ||४||
बोलावे न ऐसे वाटे कोणासवे
विचार केशवे करावा हा ||५||
बहेणि म्हणे नाम तुझे जाणे
एक कोणासी आणिक सांगू हरी ॥६॥

७०
सोसियले क्लेश जीवे बहु फार
जाली हे अपार दीन सख्या ।।१।।
चित्ती समाधान केले असे एक ।
प्रारब्धे हे दुःख आले भागा ।।२।।
भोगणे न चुके ब्रह्मादिका
दुःख इतर हे रंक कोण तेथे ||३||
बहेणि म्हणे माझ्या देहाचे प्रारब्ध ।
ऐसिया गोविंद काय करी ॥४॥

७१
देहाचिया माथां सुखदुःख आले
पाहिजे भोगिले आवश्यक ॥१॥
परिहार माझा होतसे पापाचा ।
लाग हाचि साचा मानियला ॥२॥
अंतरीचा हेत नामसंकीर्तनी ।
शरीर पीडेने पीडियले ॥३॥
बहेणि म्हणे माझ्या संचिती जे
आहे तव पीडा पाहे कवण वारी ||४||

७२
प्रारब्धाची गती न संडी सर्वथा
व्यर्थ आता चिंता कोण वाहे ।।१।।
निश्चय निर्धारी धरियला मनी ।
आता चक्रपाणी पांडुरंग ॥२॥
शरीराचे क्लेश निवारे न कोणा ।
अगा नारायणा कळो आले ||३||
बहेणि म्हणे आता केशवा शरण
नको माझे मन पाहू हरी ||४||

७३
तुटले संचित जाले शुद्ध चित्त ।
अंतरीचा हेत ओळखिला ॥१॥
कृपा केली देवे इंद्रायणीतीरी ।
देहग्रामी थोर भक्तिपंथ ||२||
तेथे पांडुरंग देवाचे देऊळ
रहावया स्थळ प्राप्त झाले ||३||
तुकाराम संत संताचे कीर्तन ।
तिन्ही काळ तीन दृष्टीपुढे ||४||
नमस्कार तथा न घड़े पतिभये ।
परि चित्त राहे सदा पायी ।।५।।
तुकाराम कथा करावी ती द्वारी ।
ऐसा हा अंतरी हेत होता ||६||
बहेणि म्हणे ऐसे मास झाले
सात अवघेचि संचित सरो आले ॥७॥

७४
आनंदवोवरी होती तये ठायी
वाटे तेथे काही बसावेसे ।।१।।
करूनिया ध्यान लावावे लोचन
करावे स्मरण विठोबाचे ॥२॥
तुकाराम तव देखता देखत
आले अकस्मात गुप्तरूपे ॥३॥
बहेणि म्हणे तेथ पुसोनी मातेसी ।
क्रमियल्या निशी तीन तेथे ॥४॥

७५
नेणे जपतप नेणे अनुष्ठान
घालावे आसन कळेना ते ।।१।।
ध्यानाचे लक्षण इंद्रियांचा रोध
नाही याचा बोध ऐकियेला ॥२॥
पाषाणप्रतिमा विठोबाचे ध्यान
हृदयी चिंतन राममुद्रा ||३||
तुकारामकथा करावी ती द्वारी ।
ऐसा हा अंतरी येत होता ॥४॥

७६
टाळ्या-चिपोळ्यांचा ध्वनी आपकता ।
आनंद हा चित्ता सामावेना ||१||
लावियले नेत्रनिद्रेत जागृती
तुकाराममूर्ती देखियेली ||२||
ठेवियला हात मस्तकी बोलून ।
दिधले वरदान कवित्वाचे ||३||
बहेणि म्हणे नेणे स्वप्न की
जागृती इंद्रियांच्या वृत्ती बोसरल्या ॥४॥

७७
आनंदे सद्गद जाहली इंद्रिये
तुकाराम-पाय आठवले ।।१।।
होऊनी सावध उघडिले
नेत्र आठवला मंत्र षडक्षरी ॥२॥
ठसावला ध्यानी मनाचिये ठायी ।
आणिक ते काही आठवेना ||३||
बहेणि म्हणे हात घातला मस्तकी ।
देह तो या लोकी आढळेना ||४||

७८
ते सुख सांगता वाचे पडे मौन
जाणता ते धन्य गुरुभक्त ।।१।।
झालासे आनंद इंद्रियांचे द्वारी ।
बैसले शेजारी चैतन्याचे ॥२॥
घट हा बुडावा जैसा डोहा-आत ।
न फुटता ओतप्रोत पाणी ।।३।।
बहेणि म्हणे तैसे झाले माझे मना ।
तुकाराम खुणा ओळखी त्या ||४||

७९
वाटे उठो नये जीव जाय
तरी सुख ते अंतरी हेलावले ।।१।।
आनंदे निर्भर होऊनिया मन
करू आले स्नान इंद्रायणी ॥२॥
घेतले दर्शन पांडुरंगमूर्ती
तव झाली स्फूर्ति बदावया ॥३॥
तुकोबासी तेथे करूनि नमस्कार ।
आले मी सत्वर बिन्हाडासी ||४||
बहेणि म्हणे जैसा लोटला
समुद्र हृदयाकाशी चंद्र बोले
पत्र लिहिले तातडी
मरणाची गुढी उभी पुढे ॥४॥
तेराविया दिवसी ब्राह्मणभोजन
करोनि निघणे अति वाचा ॥५॥

निर्याणपर
८०
रुक्मिणीची केली आम्ही बोळवण
आम्हासी प्रयाण त्याचि मार्गे ।।१।।
पाठवावे पत्र गोदेसी सत्वर ।
पडेल अंतर पुत्रपणा ।।२।।
टाकोनी सकळ काम धाम
धंदा मरणमर्यादा वाट पाहे ।।३।।
म्हणोनिया त्वरे ।।५॥
पडेल आक्षेप वाटेसी खोळंबा
टाकोनी विठोबा त्वरे येई ।।६।।
पाच दिवस पुढे देहांतसमये ।
रोधोनिया पाहे वाट वायु ।।७।।
आश्विनाची शुद्ध जाण प्रतिपदा ।
मरणमर्यादा सांगितली ।।८।।
बहेणि म्हणे पुत्रपणाचे उत्तीर्ण
होसील म्हणोन त्वरा करी ।।९।।

८१
बैसलो समस्त शुक्लेश्वरापासी
देखिले पत्रासी अकस्मात ।।१।।
वाचिले सत्वर निघालो तातडी ।
केली घडामोडी मनामाजी ॥२॥
आणावी जाऊन गोदातीरा माय
ऐसा ये उपाय करू आता ।।३।।
पाहोनिया स्थळ समाधीकारण
आलो मी धावून दर्शनासी ।।४।।

८२
ऐकोनिया पत्र आलासी तातही
घालोनिया उडी पुत्रराया ।।१।।
तेरावा दिवस केला रुक्मिणीचा ।
सद्गदित वाचा कंठ दाटे ॥२॥
जालासी उत्तीर्ण तूचि रे सर्वांचा
मने काया वाचा सर्वभावे ॥३॥
देखोनिया तुज संतोष वाटला
प्रेमाने दाटला कंठ माझा ||४||
मृत्यूचा संकल्प अश्विन शुद्ध प्रतिपदा ।
ऐक तू प्रसिद्धा सांगितला ॥५॥
खेद तो अंतरी न धरावा कदा
सांगता मर्यादा नुल्लंघावी ।।६।।
पुत्रपण तुझे आजी आले फळा
माझे अंतकाळा पावलासी ।।७।।
बहेणि म्हणे आता विचारी जे बाळा
साशंकता प्रबळा नको ठेवो ॥८॥

८३
अंतरीची साक्ष जाणिजे अंतरे ।
माय तू निर्धारि सद्गुरुही ||१||
देखियेले स्वप्न कचेश्वरी माये ।
विमान हे पाहे तुज आले ।।२।।
शंख भेरी नाना वाजताती वाद्ये ।
गर्जती आनंदे नामघोषे ।।३।।
शंख चक्र गदा अंकित वैडूर्य
करिती उत्छाव नानापरी ।।४।।
मृदंग वाजती टाळघोळ कथा ।
पताका अनंता गरुडटके ॥५॥
ब्राह्मणांचा थाट पुढे मागे लोक
माळा गळा देख तुळसीच्या ||६||
मिरवत विमान देखियेले स्वप्नी ।
आनंद हा मनी थोर वाटे ।।७।।
उधळती बुका गंधाक्षता हाती ।
ब्राह्मणांच्या पंक्ती नानापरी ||८||
देखियेले जना उत्छाव या मना
थोर झाला स्वप्नामाजी पाहे ।।९।।
उठोनी प्रातःकाळी आली मना
साक्ष स्वप्न है प्रत्यक्ष नव्हे मिथ्या ।।१०॥
बैसलो समस्त कचेश्वरापासी
देखिले पन्नासी अकस्मात ।।११।।
वाचुनी सत्वर निघालो तातडी
केली घडामोडी मनामाजी ।।१२।।
आणावी जाऊनी गोदातीरा माय
ऐसाची उपाय करू आता ।।१३।।
वंदुनी चरण उभा असे पुढे
मनातील गूढ जाणसी तू ।।१४।।
शुक्लेश्वरापासी मागितले स्थळ
आज्ञा ते केवळ तुझी आता ।।१५।।

८४
ऐकियेले तुझे वचन सादर ।
तुवा जो निर्धार केला असे ।।१।।
मानले माझिया स्थळ जाण चित्ता ।
परि ऐक आता एक माझे ।।२।।
नाही अवकाश ते स्थळी जावया
मृत्यूच्या समवालागी पाहे ॥३॥
प्रतिपदे आम्हा टाकणे शरीर
आजि तो साचार त्रयोदशी ।।४।।
यालागी निश्चय सांगतसे एक ।
तीर्थ आम्हा देख प्रणिता असे ।।५।।
रावणेरे येथे केले अनुष्ठान
शंकर प्रसन्न येथे जाला ।।६।।
वाहियेली शिरे नवही पुजेसी ।
सहस्र अन्यायसी ऋषी आले ||७||
ब्रह्मादिक देव यज्ञाच्या सन्निध
तीर्थ हे प्रसिद्ध शिवपूर ॥८॥
अवभृथस्नानी वरद तयांचा
समूह तीर्थाचा येथे असे ॥९॥
प्रणिता ती तीर्थ भूमंडळी
नाही चंद्रमौळी बोलिला ॥१०॥
काशी गया तीर्थ सर्व याची स्थळी
मानुनी सकळी स्नान कीजे ।।११।।
आमुचे मनीचा निर्धार हा खरा
माझिया अंतरा साक्ष आली ।।१२।।
तुवा हे वचन वंदुनी मस्तकी
असावे स्वस्थ की होवोनिया ||१३||
बहेणि म्हणे पुत्रा सांगितले
मनी धरूनी वचनी सिद्ध राहे ।।१४।।

८५
तीर्थ-देव यात्रा वर्तता स्वधर्म
तुझे माझे जन्म गेले बारा ।।१।।
तेरावा हा जन्म पुत्रपणे जाला ।
नाही तुझी तुला आठवण ||२||
तेरा जन्म तुझा माझा असे संग ।
अद्वय अभंग एकनिष्ठ ||३||
संभवता तुज मज जाली कृपा ।
वोळखी ते बापा सांगितली ।।४।।
पतिव्रता धर्म आमुचा सांगाती ।
बोलता ते गति ग्रंथ वाढे ॥५॥
ज्ञानेश्वरी पूर्ण पहावी हे जाली
आता ते उरली दशा थोडी ।।६।।
बहेणि म्हणे आता नाही जन्म
येणे उठले धरणे वासनेचे ॥७॥

८६
गोदा भागीरथी यमुना सरस्वती
तापी भोगावती सर्व तीर्थ ॥१॥
येती प्रणितेसी माझ्या अंत:काळी
निश्चळ अंतरी राहे पुत्रा ॥२॥
कृष्णा, तुंगभद्रा, भीमा, फल्गु, रेवा ।
पुष्कर ही सर्वा पृथिवीची ॥३॥
देवतेही सर्व येती तथे वेळी
मदत्यु हा अनुभवे तुज तेव्हा ॥४॥
ऋषिगण सर्व पांडुरंग उभा ।
जेव्हा मृत्युसमा येईल ते ||५||
बहणि म्हणे तुज वाटेल असत्य
सांगते ते तथ्य ऐक आता ॥६॥

८७
आत्मज्ञाना ऐसे तीर्थं कोण दुजे ।
ज्ञानिया उमजे पूर्व पुण्ये ।।१।।
जेथे हे मानस केले असे शुद्ध
तीर्थ हे प्रसिद्ध वेदशास्त्री ॥२॥
तयाच्या भजने जन्म गेले बारा
शुद्ध ते अंतर करावया ॥३॥
तेरावा हा जन्म लाथले साधन
तथा तीर्थी स्नान जन्म नाही ||४||
केले वो प्रयास साधनाचे कष्ट
होते योगभ्रष्ट म्हणोनिया ॥५॥
वासना मर्किन शुद्ध जाली येथे
ज्ञानियासी तीर्थ तेची खरे ॥६॥
वृत्ति शून्य होय मानस ते ज्ञानी ।
तीर्थ सर्वाहूनी श्रेष्ठ तेची ॥७॥
विचारोनी बरे पाहे तू अंतरी
बाह्य तीर्थातरी हेत नाही ॥८॥
बहेणि म्हणे वृत्ति जालीया निमन्ना
तीथांची ते संज्ञा तेची खरी ।।९।।

८८
अंतकाळ वेळे होईल निरभ्र
दिशा होती शुभ्र पाहे का रे ।।१।।
घेई याची साक्ष आपुले अंतरी
राहुन निर्धारी आपुलिया ॥२॥
येऊ निघाले तीर्थासी विमान
हेलावे ते जाण तीन येती ॥३॥
दग्ध जालियाने अस्तंगत देहे ।
पुत्रा तूची पाहे मनामाजी ॥४॥
बहेणि म्हणे तुम्ही धरोनी विश्वास
पहा साक्ष यास तुकाराम ॥५॥

८९
ऐक एक माते संदेह मानसी
वाटला तयासी कोण फेडी ॥१॥
गणगोत आम्हा मायही सद्गुरू ।
मनीचा निर्धारू जाणसी तू ॥२॥
‘बारा जन्म मागे साधलिया ज्ञान ।
आता माझे मन स्थिरावले ॥३॥
याचे काही मज नकळे सर्वथा ।
आशंका है आता फेडी माझी ॥४॥
जाणसी अंतर मनीचा तू हेत
आहेचि ते चित्त साक्ष तुझे ॥५॥
पूर्वानुक्रमे जन्म ते सांगिजे ।
माते कृपा कीजे येक वेळा ||६||

९०
ऐक सावधान पुत्रा तू वचन
बोलो नये मीन सांगतसे ।।१।।
न बोलावे कोणा न सांगावे गुज
साक्ष माझी मज आली असे ।।२।।
न सांगता तुज खेद हो
वाटेल हेतही तुटेल अंतरीचा ॥३॥
बहेणि म्हणे कदा न सांगावे जना ।
ऐकोनिया मना हेत फेडी ॥४॥

९१
बेटाऊद तापी-तीरी तेथे वैश्य
सांभवाचा दास केदार होता ॥१॥
त्यासी नाही कन्येचे संतान
केले अनुष्ठान महाउग्र ।।२।।
शंकर प्रसन्न करूनिया तेणे
स्वप्नगत येणे जाले हरा ।।३॥
पुत्र नाही तुज होईल संतान
एक कन्या जाण रूपवती ।।४।।
वारुणी हे नाम ठेवावे तियेसी ।
वाचेल सायासी वर्षे तेरा ॥५॥
केदार वैश्यासी रूपवंती नाम
खिया ते उत्तम पतिव्रता ॥६॥
पतीचे वचन तियेसी प्रमाण
शांभवी ते जाण दीक्षा तिची ॥७॥
रूपवंती गर्भ धरी तिये वेळा
जन्म मज दिला महारुद्रे ॥८॥
पूर्वील संस्कार होता काही शुद्ध ।
जन्मता प्रसिद्ध कळो आला ॥९॥
जन्मलिया मज वर्षाचिया पोटी
पहाताची दृष्टी वदन माझे ।।१०।।
आणिला सद्गुरू केदारे आपुला
तयाते दाविला भाव माझा ।।११।।
नाही लग्न करू दिले आपण |
माझा सहज गुण वोळखिला ।।१२।।
दिधली ते दीक्षा शंकराचा
मंत्र जपे अहोरात्र खेळताही ।।१३।।
खेळता देऊळी शंकराची
मूर्ती करीतसे भक्ति प्रेमरसे ।।१४।।
नावडेची काही आणिक सर्वथा ।
अखंडता चित्ता लागलीसे ।।१५।।
ऐसी तेरा वरुषे होताची
संपूर्ण जाले ते दर्शन तुझे येथे ।।१६।।
सद्गुरु आमुचा तेथे तू सेवक ।
जैसे एक रंक पोटासाठी ||१७||
माझे मुखे पुत्र घेतले रे तुज ।
अंत हा रे मज जाला तेव्हा ।।१८।।
तथापुढे दुसरा जन्म म्या घेतला
ऐक वा वहिला एकचित्ते ।।१९।।
बणि म्हणे पहिल्या जन्मांचे हे
मूळ आणिक केवळ सांगतसे ||२०||

९२
आणिक सांगेन पूर्वील वृत्तांत
सावधान चित्त असो तुझे ।।१।।
तीन जन्म माझे वैश्याचे
कुळी साधनाच्या मेळी भोगियेले ॥२॥
एक जन्म तुज सांगितला आता ।
पुढिली वेवस्था सांगेन ते ||३||
‘कुमचक्र’ ग्राम फल्गूचिये तीरी
सात्त्विकाच्या घरी जन्म आम्हा ||४||
स्वधर्मी तो वैश्य शंकराचा
भक्त अत्यंत विरक्त आत्मवेत्ता ॥५॥
तयाचा सद्गुरु सुवर्मा ब्राह्मण
आगमीचे पूर्ण ज्ञान तया ॥६॥
मंत्रविद्येमाजी असोनि प्रवीण
आत्मज्ञानी पूर्ण हेत तथा ।।७।।
तयाचा तू शिष्य सात्त्विक हा
भोळा पुत्र ते तयाला सात होते ॥८॥
कन्येसाठी थोर उद्वय मानसी
सद्गुरुने त्यासी सांगितले ॥९॥
अनुष्ठानविधी मंत्र उपासना
सांगेन ते धारणा वैष्णवीची ।।१०।।
तये वेळी स्वप्न होउनी तात्काळ ।
कन्या ते सुशील सदैव घेई ।।११।।
तिच्या हाते तुज सापडेल
धन न करूनी लग्न जाईल ते ।।१२।।
अठ्ठावीस वर्षे क्रमील तुजपाशी
आगर भक्तीसी करूनिया ।।१३।।
मग तेथे जन्म घेतला आपण
तुझा संग जाण तेथे होता ।।१४॥
गुरुबंधू मज तेथे जोडलासी ।
सहवासे अससी निरंतर ।।१५।।
बहेणि म्हणे ऐसा जन्म हा
दुसरा आणिक तिसरा पुढे सांगू ।।१६।

९३
सांगेन ते ऐक जन्मांतर
कथा जेणे तुजचित्ता सुख वाटे ।।१।।
गोदावरी जेथे प्रगट ब्रह्मगिरी ।
वैश्य तो अवधारी तेथे होता ||२॥
नाम हो तयाचे वर्धमान
शेटी धनवंतात कोटी दानपुरुष ||३||
तयाची हे भाज भामिनी सुंदरा ।
पतिव्रता खरा धर्म तिचा ॥४॥
तीन पुत्र तिसी चौथा तू पाळक ।
होउनी बाळक अससी तेथे ॥५॥
धन धान्य द्रव्य गायींची गोठणे
नसे काही उणे घरी तया ॥६॥
वर्धमान शेटी सर्वामाजी श्रेष्ठ ।
जाला स्थानभ्रष्ट एक वेळा ॥७॥
येउनी पांचाळी करी अनुष्ठान
यज्ञ तो संपूर्ण थोर केला ||८||
तयाचा हा हेत कन्या व्हावी
मज भामिनी सहज रूपवंती ॥९॥
तियेचे हे पोटी जाले मी निर्माण
माझे नाम जाण हेमकळा ।।१०।।
तयासी संतोष देखोनी
वाटला दानधर्म केला यथाक्रमे ।।११।।
लग्नविवंचना करी वर्धमान
तव जाले स्वप्न भामिनीसी ।।१२।।
लग्न करू नको इये कन्यकेचे
रूप विरक्तीचे हेमवती ॥१३॥
रागकला नाम ब्राह्मणाची सेवा
आठवी केशवा सर्व काळ ॥१४॥
तेथेही संगती जाली
मा आंतरीचे ज सांगे ।।१५।।
वर्षे ते चोवीस आयुष्यमर्यादा
सारुनी स्वानंदा देह गेला ॥१६॥
ऐसे तीन जन्म वैशाचिये पाती ।
घेवोनी विरक्ती वर्तिन्त्रले ।।१७।।
बहेणि म्हणे आता चौथा जन्म
एक करोनी विवेक सुखे राहे ॥१८॥

९४
चौथा जन्म सांगो पाचवा सहावा
आणि तो सातवा योगभ्रष्ट ॥१॥
गौळियांचे घरी कन्याचि होऊनी ।
गाई संरक्षणी वर्ततसे ॥२॥
नाम संकीर्तन काळाची क्रमणा ।
संगती ते जाणा वैष्णवांची ॥३॥
आवडती देव तीर्थ क्षेत्र यात्रा ।
ब्राह्मणा सर्वत्रा पूजा करी ॥४॥
गाईचे रक्षण अरण्यात वास।
तब जाला सहवास संन्याशाचा ||५||
देखोनी तयासी करी नमस्कार ।
जाणुनी संस्कार कृपा केली ||६||
सातवे जन्मीचा सांगेन वृत्तांत
मागिलाचा प्रांत सांडियेला ||७||
परी गौळियांचे घरी गायीचे
रक्षण करुनी कीर्तन देह पोषी ॥८॥
मग भेटले ते सिद्ध आत्मज्ञानी
तेही वोळखोनी नेले मज ।।९।।
म्हणती योगभ्रष्ट आहे हे विरक्त
दास्यत्वे सारी काळ बहु ||१०||
विरक्तीचे अंग ज्ञानाचा अभ्यास
करि रात्रंदिवस एकनि ।।११।।
सासष्टी बस्ने सातविये जन्मी
क्रमूनिया धर्मा प्रवर्तनीये ||१२||
अभ्यास करुनी टाकिले शरीर ।
तुज हा प्रकार सांगितला ॥१३॥
बहेणि म्हणे जन्म पुढे उरले
साही प्रसंगेची तेही सांगतसे ।।१४॥

९५
सांगेन ते जन्म आठवारे ऐक
धरूनी विवेक निश्चयाचा ॥१॥
वेरूळ ते तीर्थ शिवालय क्षेत्र ।
शास्त्रज्ञ समर्थ ब्रह्मवेत्ता ।।२।।
तयाचे ते नाम धर्मदत्त क्षेत्री ।
पूज्य तो सर्वत्री जनामाजी ||३||
तयाची सुंदर पतिव्रता भली ।
कीर्ती फार केली पतिधर्मे ॥४॥
तयांचिये पोटी मज जाला जन्म ।
कन्येचा उत्तम शांतिरूप ॥५॥
अठरा वरुषे क्रमिली आपण
करूनी श्रवण भागवत ॥६॥
लग्न केले परी भ्रतार नासला
हितावह झाला तोही मज ॥७॥
नववे ये जन्मी तेथेची जन्मले ।
नव वरुषे केले स्थान तेची ॥८॥
तेचि मातापिता तेचि बंधुवर्ग
अनुष्ठान सांग तेचि आम्हा ||९||
दहाविया जन्मी कौशिक ब्राह्मण ।
अग्नीचे सेवन त्याचे घरी ।।१०।।
नित्य हरिकथा वेदान्तश्रवण
नित्य करी स्नान शिवालयी ।।११।।
देवाचे दर्शन नित्य सेवाविध
आत्मज्ञाने बोध शांत देह ।।१२।।
कन्येचिया रुपे जन्म घ्या घेतला
काळ तो क्रमिला काही तेथे ||१३||
पितयाने ल केले कन्यादान ।
पाहोनी ब्राह्मण शुक्ल दीक्षा ||१४||
ब्राह्मणाची मिक्षा करिता कोरान्न ।
गाईंचे पाळण घरी तया ।।१५।।
बेचाळीस वरुषे आयुष्य घातले
तेथे पुत्र जाले तीन मज ।।१६।।
पहिला पुत्र तेथे तूचि रे जालासी ।
आणिक विशेषी दोन पुत्र ।।१७।।
तुझा माझा गुरु संन्यासी केशव ।
तेणे विद्या सर्व प्रबोधिली ||१८||
तयावरी तेथे ठेविले शरीर
दहा जन्म-सार सांगितले ।।१९।।
बहेणि म्हणे आता तीन जन्म
शेष सांगेन परिस ज्ञानवंता ॥२०॥

९६
आणिक आईक अकरावा जन्म ।
प्रवरासंगम गंगातीर ॥१॥
तेथे माध्यंदिन ब्राह्मण तो भला ।
वास तेथे केला गंगातीरी ॥२॥
अयाचित वृत्ती आलियासी अन ।
घालितसे जाण यथाकाळी ॥३॥
गोकर्ण है नाम तयाचे उत्तम ।
शांति दया धर्म क्षमादिक ॥४॥
तयाची वल्लभा भली पतिव्रता ।
सगुणाद्भुता नाम तिचे ॥५॥
तयां तिचे पोटी होऊनिया कन्या ।
नाम है सौजन्या ठेवियेले ॥६॥
साता वरुषावरी केले कन्यादान ।
पाहोनी निधान अतिज्ञानी ||७||
अत्यंत विरक्त योगाभ्यासी ।
ज्ञान घालोनी आसन योग साथी ||८||
नाम की तयाचे योगेश्वर ऐसे ।
सिद्धी त्या मानसी वोळगेल्या ।।९।।
सेवेने वाली तोषविले बहू ।
त्याचा माझा जीऊ एक झाला ।।१०।।
सांगितले मज योगाचे आसन ।
धरूनिया ध्यान खेचरीचे ।।११।।
गरू तो भ्रतार सर्वस्व आमुचा ।
घेतले सेवेचे सुख तेथे ||१२||
गुरु बंधू पुत्र सांगाती मागील ।
तू होसी कैवल्य जन्मोजन्मी ।।१३।। क्
रमोनिया तेथे वर्षे त्रेचाळीस ।
राहिला हव्यास ब्रह्मनि ।।१४।।
बहे म्हणे आता जन्म तो बारावा ।
सांगेन धरावा हृदयामाजी ।।१५।।

९७
तुझे मनोगत जाणोनी अंतरी ।
बोलिले वैखरी जन्म नाना ||१||
ऐक या बाया सांगेन तातडी ।
मृत्यूची हे थोडी वेळ आहे ॥२॥
लाखणी हे स्थळ अगाधचि तोथे ।
लक्ष तीर्थे पाहे तपे स्थळी ॥३॥
शिवनद पाहे और नदांतील ।
संगमीचे स्थळ महा उम्र ||४||
तेथे अनुष्ठानी होता एक द्विज ।
नाम तथा सहज रामचंद्र ॥५॥
तयाची वल्लभा जानकी पवित्र ।
तथा घरी पुत्र दोघे होती ॥६॥
थोर ब्रह्मज्ञानी शांतीचा आगर ।
तीर्थाचे माहेर तीर्थरूप ॥७॥
तयाचिया पोटी कन्येचिया रूपे ।
होउनिया तपे साधियेली ॥८॥
धरूनिया मौन वर्ततसे जनी ।
बोलती वचनी वाचा नसे ।।९।।
करोनिया लग्न दिधलेसे ब्राह्मणा ।
ज्योतिषी तो जाणा महाथोर ॥१०॥
तयासी प्रसन्न गणेश प्रत्यक्ष
बोलतसे साक्ष तयासी तो ।।११।।
तयाचिये गेही निराहार देही
सेवासुख पाही घेतले म्या ||१२||
विरक्त मानस विषयभोगी त्रास
सदा निजध्यास आत्मनिष्ठा ।।१३।।
रामचंद्र पिता राम-उपासक
अत्यंत विवेक ज्ञान तथा ।।१४।।
माझे अंतरीचा जाणोनिया हेत ।
केले माझे चित्त स्थिर तेणे ।।१५।।
लाउनी समाधी बैसवी सन्निध
अंतरी तो बोध उसावला ॥१६॥
स्वधर्म गौरव देउनिया पती
सेवा आत्मस्थिती करी त्याची ।।१७।।
कोठे चित्त अणुमात्रही न बैसे ।
सदा निजध्यासे देह वर्ते ||१८||
पडिले शरीर छत्तिसा वरुषात
व्हावे परी मुक्त शेष रहे ||१९||
बहेणि म्हणे जन्म बारावा तो
ऐसा तेराव्याची दशा सांगिजेल ॥२०॥

९८
ऐक सावधान सांगेन आणिक
मागील ते देख सांगितले ।।१।।
कित्येक संशय राहिले सांगता
त्वरा जाली चित्ता अंतकाळी ||२||
विवेक ते शास्त्र अनुभव अंगीचा
असेल तो साधा अर्थ जाणे ॥३॥
अवघेचि ते जन्म आठवती
मज अंतरीचे गुज मृत्यु-वेळा ॥४॥
आरसियात जैसे दिसे प्रतिमुख
तैसे जन्म देख दिसती डोळा ||५||
लटिकेचि शब्द व्यवहारी
मानीती मूर्ख तयांप्रती बोलो नये ॥६॥
कस्तुरीचा वास घेईल काउळा ।
तरिच हे कळा कळे तया ||७||
तेरा जन्मांपूर्वील आठवे समस्त
परी तैसा हेत नाही मज ।।८।।
मुंगीचा तो मार्ग न सापडे वाघा
जरी तो थोर गा जाला बहू ||९||
बहेणि म्हणे देव कृपा करी
जेव्हा सर्वही ते तेव्हा कळे मनी ।।१०।।

९९
तेरावा तो जन्म देहे वर्ते हाची
सांगेन तयाची मूळ कथा ||१||
देवगावी शाखा ‘वाजसनी’
जाण लेखक प्रवीण ऐक सांगो ॥२॥
मीनस कुळीचा ब्राह्मणाचा
भक्त भोळा ज्ञानवंत भाग्यनिधी ||३||
तयाची वल्लभा जानकी ते
नाम माता ती उत्तम पतिव्रता ।।४।।
तयाचिये घरी कन्या मी जालीये ।
लम केले तये स्थळी जाण ॥५॥
गौतम कुळीचा भ्रतार पाहिला ।
अत्यंत शोभला ज्योतिषी तो ।।६।।
तयाचिये घरी ‘शक्ति’ उपासना ।
तयाचि अंगना केली मज ॥७॥
काही एक योगे दक्षिणे कोल्हापूर
तेथे तो प्रतार वास करी ||८||
माझी मातापिता बंधु भगिनीसी ।
तयाचे भेटीसी सर्व गेलो ||९||
तेथे तो ‘जयराम’ कृष्णदास संत
महिमा अद्भुत सिद्धि त्यासी ॥१०॥
तयाचे संगती क्रमोनिया काळ ।
जाला तो दयाळ कृपानिधी ।।११॥
सांगितले मज पतीचे सेवन
तीर्थ ते घेऊन नित्य राहे ।।१२।।
गीतेचे पठण करी मी सर्वदा ।
वेदाची मर्यादा नुल्लंघोनी ||१३||
वाटले भ्रतारा जावे स्वदेशासी
निघाले त्वरेसी कुटुंब हो ।।१४।।
आलो इंद्रायणी देहु- ग्राम स्थळा
कोंडाजी भेटला पंत तेथे ।।१५||
ब्राह्मण म्हणोनी घातले भोजन
तेथे गर्भ जाण होता तुझा ।।१६।।
देखियले मग तेणे कुटुंबासी ।
म्हणे या स्थळासी रहा तुम्ही ।।१७।।
आहे गरोदर तुमची बी हे जाण ।
प्रसूत होवोन जावे पुढे ।।१८।।
देईन मी धान्य जे तुम्हा लागेल ।
क्रमुनिया काळ जावे स्थळा ।।१९॥
मग आम्ही राहिलो विचारोनी
मनी नामसंकीर्तनी काळ सारू ||२०||
पांडुरंग देव तुकाराम साधू
सर्वदा आनंदू हरिकथेचा ।।२१।।
नमस्कार करी तुकाराम वासी
चित्त पायापासी विठोबाच्या ।।१२।।
‘आनंदवोवरी’ देखियली मग
देव पांडुरंग तयापासी ।।२३॥
वाटले मानसी बैसावे एकांती
तीन अहोरात्री तये स्थळी ||२४||
प्रतार क्रोधाचा पुतळा सर्वही
एकांत तो पाहे केवी साधे ।।२५।।
तव अकस्मात कार्याच्या उद्देशे
प्रतार आयेशे पुण्या गेला ।।२६।।
पुसोनी मातेसी इंद्रायणी
स्नान के दर्शन पांडुरंग ॥२७॥
मना आवेश सत्त्वाचा लोटला
आनंद दाटला आसनी हो ||१८||
तीन अहोरात्री क्रमिल्या ते ठायी
आनंद तो देही र जाला ।।२९॥
तिसरे दिवशी तुकारामस्वरूपे
मंत्र तीन सोपे सांगितले ||३०||
“तेरावा हा जन्म लाभलीस
आता पूर्वी योगपंथा सिद्ध केले ।।३१।।
आता तुज पुढे नाही जन्म-योनी
पतीच्या भजनी राहीं मुखे ||३२||
तुझीये वो पोटी आला असे
पुत्र तो तुवा एकत्र जन्म तेरा ||३३||
तोही आत्मनिष्ठ होईल ज्ञानिया ।
पुढे जन्म तथा पाच होती ||३४||
कवित्वाची शक्ती दिल्ही तुझे मुखी ।
आत्मज्ञानी निकी बुद्धी राहे ।।३५।।
बोलोनिया ऐसे जाला तो
अदृश्य लाविला अंगुष्ठ ध्रुवोमध्ये ||३६||
मग म्या बाहेरी केले गंगास्नान |
घेतले दर्शन विठ्ठलाचे ||३७||
पाच पदे एक आरती लिहून
विठ्ठला घ्याऊन समर्पिली ||३८||
बहात्तरी वरुषे आयुष्यमर्यादा
आजी जाली सिद्धासनी पूर्ण ।।३९।।
अंतकाळ आला आला रे सन्धि
सांगितला बोध जन्म तेरा ॥४०॥
सोळा प्रहर शेष राहिले ते आता ।
सावधान चित्ता करी का रे ।।४१।।
अंतकाळ वेळ पाचही असावी
ते मना पुसावी मृत्युकाळी ।।४२।।
बहेणि म्हणे तेरा जन्मांचे सर्वही
सांगितले काही गुरुकृपा ||४३||

१००
तेरा जन्म तुज सांगितले आज ।
दृश्य माझे मज सर्व होती ।।१।।
आज याचि परी समयो जाणोनी ।
तुज रे निर्वाणी सांगितले ।।२।।
अठरा दिवस मृत्यू पुढे कळो आला
परि नाही सांगितला ऐक सांगो ॥३॥
रुक्मिणीसी आधी मृत्यु जाल्यावरी ।
जावे गोदावरी उत्तरकार्या ||४||
अठरा दिवस मृत्यू जाला अगोदर |
रुक्मिणी सादर पतिव्रता ॥५॥
माझा मृत्यु तुज सांगताचि खेद ।
नवजेसी गोदे क्रियाकर्मा ।।६।।
यालागी रे अंत सांगितला नाही
धरूनी हृदयी सावधान ||७||
तुज गेलियाने नागरिका सर्वा
सांगितला भाव अंतरीचा ॥८॥
तेरावा दिवस रुक्मिणीचा जेव्हा
तुम्ही पत्र तेव्हा पाठवावे ||९||
पाच दिवस मृत्यू तेथोनी उरला
हे सांगितला नागरिकांसी ||१०||
आठविली ते ते लिहिविली पदे ।
पाहोनिया शुद्ध लिही पुढे ।।११।।
बहेणि म्हणे देवबोलवी जे वाणी ।
असत्य जो मानी नरक तथा ||१२||

१०१
मृत्यूचे प्रसंगी असाये सावध
आत्मनिष्ठ बोध राखोनिया ।।१।।
ऐसे गीतेमाजी बोलिला वैकुंठ
आज तो शेवट असे आम्हा ॥२॥
अग्रीचे ते बळ आहे आजी देही ।
ज्योती ते हृदयी सावधान ||३||
दिवसाची मृत्यू शुक्लपक्षी आहे
सांगितले पाहे विचारूनी ॥४॥
नाही एक आजी उत्तरायण खरे
सद्गुरुनिधारे काय काज ||५||
उत्तराभिमुख घालुनी आसन
धैर्य सावरून प्राण रोधी ॥६॥
सद्गुरुस्मरणी पाचही ते योग
आम्हासी ते सांग फळा आले ।।७।।
बहेणि म्हणे तुज सांगितले
वर्म पुढीलही क्रम पाहे डोळा ||८||

१०२
प्रपंची विन्मुख जालियाने चित्त ।
उत्तरायण सत्य तेचि आम्हा ||१||
नाही काज तथा उत्तरायणाचे ।
सांगितले साचे तुज पुत्रा ॥२॥
प्रपंचाभिमुख मानस सर्वदा ।
दक्षिण प्रसिद्धा मन तेची ॥३॥
बहेणि म्हणे वेदशास्त्राचे
संमत सांगितले मत स्वानुभवे ॥४॥

१०३
मागीलही जन्म आठवती काही ।
त्वरा जाली देही मृत्युवेळे ।।१।।
यालागी राहिले सांगणे मागील ।
साधने प्रबळ होती खरी ।।२।।
देह-प्रासनाचे भोगिले संचित
स्वस्वरूपे चित भूमिका क्रमी ||३||
सही भूमिका वैराग्य सांगाती
स्वधर्म विरक्ति संपादिली ।।४।।
विदेह अवस्था भूमिका सातवी
ते येथे अनुभवी साधियेली ॥५॥
सरले संचित प्राक्तन देहाचे
माझी मज साची साक्ष याची ||६||
तेरा जन्म सर्व भूमिका साधिल्या
वृत्तिही राहिल्या निमत्रता ।।७।।
बणि म्हणे काही न धरू
संदेह विवेके विदेहदशा आली ॥८॥

१०४
मन हे विरक्त विषयी सर्वदा ।
इंद्रिये गोविंदा समर्पिली ॥१॥
तेचि प्रायश्चित्त घेतले अंतरी ।
सबाह्याभ्यंतरी एकनिष्ठे ||२||
मंत्रज्ञान सदा श्रीरामचिंतन |
सद्गुरुभजन सर्वकाळ ॥३॥
दश दाने दशकु परेसी समर्प
गोदाने संकल्पू वासनेचा ॥४॥
पंचगव्य तेचि जाण अर्थ-यात्रा ।
सोऽहं हे शब्दा प्राशियेले ॥५॥
ज्ञानगंगे स्नान मनाचे वपन
वृत्ति ह्या निमग्न ब्रह्मरूपी ||६||
हेचि प्रायश्चित्त सदा सर्वकाळ
मन हे अटळ निश्चयाचे ||७||
बहेणि म्हणे ऐसे केले प्रायश्चित्त
शास्त्राचा संकेत शाख जाणे ॥८॥

१०५
हेत तो प्रमाण जन्मासी कारण
अनुभव खूण हेचि आम्हा ।।१।।
ऐसे जाणूनिया हेत निर्दाळिला ।
अद्वय तो जाला हेत चित्ता ॥२॥
इंद्रिया जाणोनी दिले प्रायश्चित्त ।
ज्ञानमहातीर्थं आत्मनिष्ठा ||३||
विषयवासना भोगिली बहु
याचे निर्मू आणि केले ||४||
सद्गुरुवचन धनिया निष्ठा
वासना त्या भ्रष्टा शुद्ध केल्या ||५||
बहेणि म्हणे मना दिले प्रायश्चित्त
आता जाले मुक्त आत्मबोधे ॥६॥

१०६
तीन शते आणि वरुषे एकावन्न
आयुष्य निर्माण तेरा जन्मी ||१||
घातले स्त्रीरूपे साधने हरीच्या
निमाल्या मनाच्या वृत्ती जय ||२||
आता निश्चयाने सांगेन निर्धार ।
जाले निर्विकार चित्त माझे ||३||
बहेणि म्हणे पुढे काही नाही हेत ।
स्वरूपी निवांत चित्त माझे ||४||

१०७
हा देह जोवरी आहे तुझा जाण ।
तोवरी तू ज्ञान साधिसील ॥१॥
यापुढे तुज जन्म होती श्रेष्ठ ।
होसी योगभ्रष्ट जन्म नाना ||२||
तीन जन्म तुझे काशी क्षेत्र-वास
वैराग्यमानस होतील ते ।।३।।
एक तू जन्मसी संन्यासी नेमस्त ।
चित्त काही स्वस्थ होय तेथे ||४||
पाचविये जन्मी अठरा वर्षां तुज ।
विदेहत्व पूज्य होसी खरा ।।५।।
तयापुढे जन्म घेणे नाही कदा
सांगतसे धंदा नको आता ॥६॥
बहेणि म्हणे तुझे जाणवेल
तुज कृपा करे बुझ गुरु-खुणे ॥७॥

१०८  
आपले आपण देखिले मरण
तो जाला शकुन स्वानंदेसी ।।१।।
उभारिली गुढी मनाच्या सेवटी ।
जाली मज भेटी आत्मारामी ॥२॥
केला प्राणायाम सोऽहं धारणेसी
मिळाली ज्योतीशी ज्योती तेणे ॥३॥
सरले संचित आयुष्य देहाचे
क्रियमाण अंतीचे रामरूप ||४||
उठति रात्रंदिवस काम क्रोध माया
म्हणती अहा ! अहा ! यमधर्म ||५||
वैराग्याच्या श्रेणी लाविल्या शरीरा ।
ज्ञानाग्नि लाविला ब्रह्मत्वेसी ॥६॥
जाला प्रेतरूप शरिराचा भाव ।
लक्षियेला ठाव स्मशानीचा ।।७।।
फिरविला घट फोडिला चरणी
महावाक्यध्वनी बॉब झाली ॥८॥
दिली तिलांजुली कुछ नाम रूपासी
शरीर ज्याचे त्यासी समर्पिले ।।९।।
बहेणि म्हणे रक्षा जाली त्रिपुरेची
तुकारामे साची कृपा केली ।।१०।।

१०९
शेष प्राक्तनाची रक्षा भरूनिया ।
नेली ते अद्वयानंदतीर्थी ॥१॥
त्रिकोण वेदिका त्रिगुणाचा देह |
सिंपोनी विदेह रूप केले ॥२॥
निर्गुणाचे भाव येती जे आठही
गोमूत्र ते पाही तथावरी ।।३।।
लाविल्या पताका सात्त्विक
भावना मंत्राची धारणा ब्रह्मनिष्ठा ||४||
ऐसा सिंचनविधी संपादिला
येथे पुढे मोक्षपंथ 7 क्रियायोग ||५||
बहेणि म्हणे क्रिया करिता स्वदेहाची
माझी मीचि साची होउनि ठेले ॥६॥

११०
प्रथमदिनादारभ्य आरंभिली क्रिया ।
पिंडी पिंड पहा निवेदिला ||१||
दुसरे दिवशी द्वैत हरपले ।
अद्वैत बिंबले परब्रह्मी ॥२॥
तिसरे दिवशी त्रिगुणाची शांती
पिंडाची समाप्ती याचपरी ।।३।।
चवथे दिवशी चौदेहातीत
उघडा संकेत वोळखिला ॥४॥
पाचवे दिवशी केले पिंडदान
पाचही ते प्राण बोळविले ॥५॥
सहावे दिवशी पडूर्मी निमाल्या
वृत्ती स्थिरावल्या आत्मरुपी ।।६।।
सातवे दिवशी समधातु-अंतराहे
अखंडत्व अद्वयत्वे ||७||
आठवे दिवशी नाश अष्टभावा ।
अद्वय अनुभवा राहे सुखे ||८||
नवमी नवांक भक्ति नवविधा सरल्या,
आत्मबोधामाजी आल्या ||९||
दहावे दिवशी इंद्रिये दहाही
बोळवण देही केली त्यांची ॥१०॥
अश्मा ते उत्तरी पंचधा विषय
ज्ञानगंगे पाहे योग त्याचा ।।११।।
अकरावे दिवशी अकरावे
मानस परब्रह्मी त्यास निवेदिले ।।१२।।
वृषोत्सर्ग केला भवविरक्तीचा
विजनी तयाचा वास केला ।।१३।।
होम केला सर्व शेष प्राक्तनाचा
हेत सुतकाचा पुढे नाही ||१४||
सपिंडीचे कर्म बाराव्या दिवसात |
वासनेचा प्रांत होय तव ।।१५।।
व्हावया निर्वासना बाराव्या
दिवशी अय सरसी परब्रह्म ।।१६।।
भाषा अविद्येचे जाळिले बिंबले
असि-पदी आले ऐक्य मना ।।१७।।
सच्चिदानंद दृश्य द्रष्टा दर्शन
ध्येय ध्याता ध्यान विसरले ।।१८।।
त्रिपुटीचा नाश तोचि रे बारावा
ब्रह्मत्व या जीवा केले तेणे ।।१९।।
बिंबी प्रतिबिंब हरपले तेचि
बाराव्यासी हेचि साच संज्ञा ||२०||
सोऽहं हंस याची केली बोळवण
बारावा तो दिन आजी खरा ।।२१।।
उल्लंघोनी कळा चालले द्वादश ।
तेचि बारा मास श्राद्ध केले ॥२२॥
चंद्राचिया कळा सोळाचा उपरम ।
न्यूनाधिक सीमा तेचि आम्हा ||२३||
ज्ञान तेचि गंगा सांगे गुरु क्रिया ।
साक्षात्कार गया तेचि आम्हा ||२४||
करू मंगल श्राद्ध गुरूचे वचनी ।
ब्रह्मचि होऊनी ब्रह्म दावी ।।२५॥
ऐसी जाण क्रिया केली या शरीरे ।
विवेके निर्धारि आपुलिया ॥२६॥
बहेणि म्हणे आता असो देहभाव
आमुचा दृढ भाव हाचि खरा ।।२७।।

१११
बोलावा ब्राह्मण मंत्रस्नान करू ।
दानविधि सारू अंतकाळी ।।१।।
धरावे प्रायश्चित्त वेदाचिया मते ।
आमुचे देवत द्विज तुम्ही ॥२॥
दशदाने देऊनी केला नमस्कार
आता कृपा फार असो द्यावी ॥३॥
सात प्रहर शेष उरला अंतकाळा ।
दिंडीटाळघोळ-कथाभारे ||४||
ज्ञानेश्वरी ग्रंथ संपला पर्जन्य
करावे ब्राह्मण सिद्ध उभे ॥५॥
वाद्याचिये ध्वनी वाजती अंबरी ।
दशनाद भीतरी आइका रे ॥६॥
घालोनी आसन बैसोनी ध्यानस्थ
पाहे मी प्रशस्त गुरु-खुणे ।।७।।
शंख चक्र गदा, तुळसीच्या माळा ।
ब्राह्मणांच्या गळा शोभताती ॥८॥
सावधान तुम्ही म्हणा ज्ञानेश्वर ।
विठ्ठल निर्धार नाम जपा ||९||
सांगेन ते तुम्ही ऐका रे सर्वही
अंतकाळ देही जवळ आला ॥१०॥
बहेणि म्हणे आता पाचही ते
योग पाहो या प्रसंग येचि क्षणी ।।११।।

११२
आसनी बैसेन उत्तराभिमुख
सहजासन देख अंतकाळी ।।१।।
सूर्योदयापूर्वी घटिका तीन जाण
आसनी बैसेन ध्यानमुद्रे ॥२॥
तेव्हा तुवा पुत्रा बैसोनी पाठीसी ।
सावध मानसी आत्मनिष्ठे ॥३॥
बाह्य ध्वनि कानी पडती तुज
काही ध्यान ते हृदयी धरी तेथे ||४||
करावा गजर नामकीर्तनाचा
दिवस आनंदाचा महा थोर ।।५।।
लावीन रे हात जाण जये स्थळी
जाण तू ते मनी प्राण तेथे ॥६॥
तीन आणि तेरा सोळा घटिका
जाण आसनी बैसोन ध्यान मुद्रे ।।७।।
नव घटिका नाम न संडी उच्चार
चित्ताचा निर्धार सांगितला ॥८॥
सात पटिका पुढे तयाची वाटणी
इंद्रिये गोठणी सर्व येती ॥१॥
चार घटिका ध्यानी राहेन तटस्थ
तुवा मन स्वस्थ असो द्यावे ।।१०।।
ऐशा वो घटिका तेरा गेलियाने
सद्गुरुस्मरणे वदे जिव्हा ।।११।।
तुकाराम मुखी गंगाधरस्मरण
अठरा वेळ माळ करे तेचि ॥१२॥
त्यानंतरे पुढे नासिकाग्री दृष्टी
यलोनिया मुष्टी हात दोन्ही ॥१३॥
माळ तेव्हा कंठी घालीन स्वहस्ते
करूनी प्रशस्त चित्त रहे ।।१४।।
एकाग्रता सर्व वायूंचा उपरम
उदानी संभ्रम योग त्याचा ।।१५।।
हृदयी धरोन नारायण-ध्यान ।
राहे समरसोन चित्त तेव्हा ।।१६।।
अखंड अद्वय हृदय-व्यापक
स्मरण ते एक अद्वयाचे ।।१७।।
बहेणि म्हणे ऐसी अंतकाळस्थिती
सांगितली गति निश्चयेसी ।।१८।।

११३
सद्गुरू वोवाळा वोवाळा
उजळुनी निज-ज्योतिज्वाळा ।।१।।
पिंड हारपला पिंडी तेज
व्यापिले ब्रह्मांडी ॥२॥
शांतिसुखाचे आसन
अव बोधाचे पूजन ||३||
चिधन चिदानंदगाथा
सच्चिदानंद निजप्रभा ॥४॥
तेज प्रकाशले लोचनी
बगि हरपली चिनी ॥५॥

११४
घट फुटलियावरी नभ
नभाचे भीतरी ||१||
ऐसा देह गेलियाने
उरे स्वरूप चिद्धन ॥२॥
जळ आटलिया जाण ।
प्रतिबिंब म्हणे कोण ||३||
लागली कापुरासी ।
अग्निरूप नाही म्हैसी ||४||
बहेणि ऐसे नाम माया
गेले ध्याऊनी अद्वया ॥५॥

११५
शेवटी ते आता सांगतसे लोका ।
मनी धरा निका सत्य भाव ॥१॥
घरोघरी संत जाले कलीमाजी
केज्यावरी भाजी तैशापरी ||२||
बहेणि म्हणे येथे आपुला सद्भाव ।
तारील सर्वा सर्व हेचि जाणा ॥३॥
चिरंजीव संत विठ्ठलमहाराजांबद्दल

११६
उदर भराया केले असे ढोंग
घरोघरी बाँब उपदेशाची ॥१॥
आपणा कळेना लोका सांगे ज्ञान
धरोनिया ध्यान बक जैसा ॥२॥
आपण बुडती लोका बुडविती
हात धरुनी जाती यमलोका ||३||
विटा म्हणे काय करू त्यांच्या कपाळा ।
पापाचा कंटाळा न करिती ॥४॥

मन:पर अभंग
११७
सद्गुरुचे पाय धरीन हृदयात
राहीन ध्यानस्थ सर्वकाळ ॥१॥
मग तुझे मना काय तेथे उरे ।
ध्यानाचे वापुरे सापडसी ॥२॥
सद्गुरुवचनी धरीन विश्वास
प्रेम अविनाश होय तेथे ॥३॥
श्रीगुरुचा होईन मी दास ।
सर्वस्वे उदास होउनीया ||४||
देह वाचा मन समपन पायी ।
सद्गुरु हृदयी साठवीन ||५||
बहेणि म्हणे मना सांडी रे
भीषण होय तू शरण जी ।।६।।

११८
सर्व साधनांच्या माथा गुरुसेवा
जे करी या जीवा ब्रह्मरूप ||१||
तयाचिया पायी जाउनी राहेन ।
येथे मना कोण तुज पुसे ।।२।।
शाखवेद नाना दर्शनासह बहुता परी ||३||
बणि म्हणे स्वामी सद्गुरुची
कृपा दाखवील सोपा मार्ग मना

११९
बचनागाचे झाडी विष कोण
पाली इंद्रावती पण ॥१॥
तैसे मना भुज विषय हे अंगी ।
तुझे तुज रुचे गुळापरी ||२||
दुर्गंधी घाली ते विष्ठेआत कोण
कावळ्यासी गुण विष्ठा भक्षी ||३||
बहेणि म्हणे मना विषय मुझे
मूळ तेथे तू अचल वृत्तिदा ॥४॥

१२०
तृण अरण्यात पेरावया जावे ।
ऐसे कोण्ही जीवे आदरीना ||१||
मना तुज विषय भोगकरी
सांगेन विचारी नलगे कोणा ॥२॥
नाना वृक्षवाती डोंगरी लागती ।
स्वभावता क्षिती वाडी तया ||३||
पशुपक्ष्याप्रती कोण सांगे काम ।
ज्याचे जे जे कर्म ते तो करी ||४||
बहेणि म्हणे मना तुज हे धारणा
विषयाची वासना कल्पकोटी॥५॥

१२१
निंबा कडूपण देत असे कोण
युक्षा गोडपण कवण करी ।।१।।
बीज तैसे फळ गोडीचा निवाडा
हा अर्थ उघडा दिसतसे ॥२॥
इंद्रावनामुळी कोण घाली विष
अमृत आग्रास देत कवण ||३||
बचनागाआंगी विष कोण लावी ।
सुगंधता द्यावी नलगे पुष्पा ॥४॥
तीक्ष्ण मोहरी करितसे कोण
खारीक निर्माण मधुर का हो ।।५।।
बहेणि म्हणे बीजाऐसे येत
फळ उत्तम वोंगळ परीक्षावे ॥६॥

१२२
शुकरा आणि श्वाना गर्दभासी जाणा ।
विष्ठेच्या भक्षणा कवण सांगे ॥१॥
ज्याचा तो संस्कार घेउनिया उठे ।
लोका दुःख वाटे कासवासी ॥२॥
दंश करी ऐसे कोण सांगे सर्पा
विंचुवाच्या कोपा लोक कष्टी ।।३।।
व्याघ्र लांडग्यासी कोण सांगे कानी
राहोनिया अरण्यी जीव मारा ||४||
गोचीड टेकूण हे रक्त भक्षिती ।
है तथा सांगती लोक काई ॥५॥
बहेणि म्हणे पूर्वसंस्कार जीवाचा
प्रवर्तवी साचा न सांगता ||६||

१२३
केळी आणि तया नारेळी पोफळी
कोण घाली मुळी दूध तथा ।।१।।
बीज तैसे फळ येत असे गोड
जाणती निवाड संत याचा ॥२॥
फणस आणि आंबा सिताफळ
नाना मुळीचिया चिह्ना गोड होती ॥३॥
बहेणि म्हणे बीज गोड त्याचे
फळ उत्तम केवळ सेच्य सर्वा ||४||

१२४
मना तुझा संस्कार संग हा
पूर्वील विषयाचे बळ तुझे अंगी ।।१।।
म्हणोनी प्रार्थना करितसे तुझी ।
इंद्रियासी राजी केले असे ||२||
नाइकसी माझे सांगितले जरी
शरिराची उरी उसे नेदी ॥३॥
करीन उपवास कोंडोनिया श्वास
पंचाग्रीचा वास उष्णकाळी ||४||
धूम्रपाने देह पीडीन सर्वथा
हिंडवीन तीर्था सर्वं पृथ्वी ।।५।।
साधुनिया योग वैसेन आसनी
राहीन निर्वाणी उपोषणे ॥६॥
घालीन कर्वती देह हा आपुला
पुरीन मग तुला प्राप्त काय ॥७॥
बहेणि म्हणे मना सांगतसे ऐक
नाही तरी भीक मागसील ॥८॥

१२५
विवेक वैराग्य सापडले मजा
आता मना तुज कोण पुसे ॥१॥
धरुनी आणीन करीन ध्यानस्था
होईल तो अस्त इंद्रियांचा ॥२॥
तुझाच तुजला करीन पारखी
मना तू विलोकी आपणासी ।।३।।
बहेणि म्हणे मना यश घेता हित ।
आहे तू निवांत पाहे ऐसे ॥४॥

१२६
विवेकाचे बळे वैराग्य साधले
तरी तुझे केले काय चाले ॥१॥
म्हणोनी आपुल्या ठायी तू
आपण पाहे विचारून मनामाजी ॥२॥
काम क्रोध लोभ मद हा मत्सर ।
तुजसवे वैर चालविती ॥३॥
बहेणि म्हणे मंत्री विवेकासारिखा ।
जोडिला हा निका निश्चयाचा ॥४॥

१२७
म्हणसील मना इंद्र म्या ठकिला
ब्रह्मयाचा केला मानभंग ॥१॥
तुझा तेथे काय पाड असे मूढा ।
मनाचा पवाडा वेदशास्त्री ॥२॥
नारदाची केली नारदी आपण
माझे ठायी पण बोलो नये ॥३॥
शिवासी आपण हिंडविले रान ।
विष्णु करी ध्यान वृंदा वृंदा ||४||
व्यासासी ठकविले ऋषी नागविले ।
मज मनावेगळे काय असे ||५||
बहेणि म्हणे ऐसा मनाचा
प्रतिशब्द ऐकोनिया स्तब्ध चित्त जाले ॥६॥

१२८  
इंद्राचा संकेत होता लग्नकाळी
भोगीन मी बळे अहिल्येसी ।।१।।
हेत होता त्याचा त्वा काय केले ।
तेथ बांधिले ज्याचे तथा ॥२॥
ब्रह्मयाचा हेत भवानी सुंदर
अंगुठे विकार आणिला ।।३।।
नारदेही तेची मागितले दान
हेतेचि बंधन पावला तो ।।४।।
शिवासी कामाचा हेत सर्वकाळ ।
म्हणोनी चपळ बाधी तया ॥५॥
व्यासही तैसाची निष्काम तो नाही
तो पडे अपायी नवल कोण ॥६॥
बहेणि म्हणे हेत गुंतला ते ठाई ।
घालिसी अपायी सत्य मना ।।७।।

१२९
आम्ही तो निर्हेत साक्ष ऐसी येत
भोगामाजी चित्त क्षणु नाही ||१||
आता मना येथे काय तुझे
चाले निर्हेत पाउले विठ्ठलाची ॥२॥
मनात पाहिले बुद्धीत गाइले
चित्तात घ्याइले विठ्ठलासी ॥३॥
वासना गाळिली सर्वही चाळिली ।
शांति स्थिरावली विठ्ठली है ।।४।।
काम क्रोध लोभ मत्सराचे अंग ।
जाला पांडुरंग आपणची ||५||
बहेणि म्हणे मना हेतूचा उगाणा
करूनी निर्वाणा पहातसे ।।६।।

१३०
ब्रह्मचर्य आणि संन्यास घेईजे ।
वानप्रस्थ कीजे याचिलागी ।।१।।
निर्वासना साधे हेत हा निरसून ।
विषयांचा मन वीट धरी ॥२॥
योगयाग तपे व्रते अनुष्ठान
सेवावे अरण्य याचिलागी ।।३।।
बहेणि म्हणे हेत विषयांचा निरसला
तरी मना तुला कोण पुसे ||४||

१३१
दमुनी इंद्रिये आणिला विवेक
दाखविल सुख आत्मयाचे ॥१॥
मना तुझे मग काय चाले तेथे ।
राहे पै निवांत आपणची ॥२॥
काम तो निष्काम करील विवेक ।
शांतीपासी देख क्रोध राहे ॥३॥
लोमास निलोभ विकुनी घालील
मोहोही जाळील ज्ञानानळी ||४||
शुद्ध सत्त्व गुण तिन्ही अहंकार
घालील निर्धार धरी मना ||५||
आशा मनसा तृष्णा इच्छा है
वासना आधीन आपणा करील तो ॥६॥
सांगितले तेची इंद्रिये वर्तती ।
विवेकसंपत्ती ब्रह्मनिष्ठ ||७||
चणि म्हणे मना नको करू बळ ।
विवेककुशळ आत्मता ॥८॥

१३२
विवेक सांगाती जयासी जोडला
थारा तो मोडला पातकांचा ।।१।।
तो आम्ही विवेक केलासे कैवारी
मना तुझी करी कोण चिंता ||२||
विवेके वैराग्य जोडेल निश्चित
भक्ति है आंकित विवेकेशी ।।३।
बहेणि म्हणे मना विवेक हा
खरा तुझिया व्यापारा कोण पुसे ॥४॥

१३३
विवेके श्रवण करीन वेदांत
साधीन अद्वैत ब्रह्मनिष्ठा ।।१।।
तुजपुढे बोले पण हाचि मना
तू धरी धारणा आत्मयाची ॥२॥
श्रवणाचे सार्थक मनने होय जाण ।
निजध्यासी खूण विश्रांतीची ॥३॥
बहेणि म्हणे मना होई तू सुमन
कासया भांडण होय पुढे ॥४॥

१३४
दहाही इंद्रिये गोवीन हरिपदी
मग तुझी बुद्धी हारपेल ॥१॥
यालागी तू मना इंद्रियांसमो
शरणागत अच्युताचा ||२||
निश्चयेसी बुद्धी चित्त अहंकार ।
संकल्पे निर्धार आत्मयाचा ॥३॥
बणि म्हणे होये पायी वोलंगणा
विषयीक वासना सांडुनिया ||४||

१३५
मना तुझी सर्व वहने हिरोनी
नेली ते बांधोनी विवेके हो ॥१॥
बैसोनी हृदयात होय तू ध्यानस्थ
संकल्पाचा हेत बंधुनिया ||२||
दहाही इंद्रिये होऊनी पारखी
विवेकाची सखी सर्व जाली ॥३॥
बि म्हणे तुज रूप नाही
नाव मना तुझी धाव पारुपली ||४||

१३६
नयन गोविले ध्यानी केशवाच्या
श्रवण हरीच्या कीर्तनी हो ॥१॥
विवेके इंद्रिया दाखउनी सुख ।
गोविली आणिक नाठवती ॥२॥
वाचा हे गोविली नामसंकीर्तनी
सेवायुक्त पाणि केशवाच्या ॥३॥
पाय तीर्थयात्रा देवाच्या दर्शना
कर्मेद्रिय-खुणा वोळखाव्या ||४||
दहाही इंद्रिये विवेके गोविली ।
मना तू नायोगे ||५||
बणि म्हणे मना विषयसेवनी
न येती नेमोनी टाकली ती॥६॥

१३७
चित्त नाही शुद्ध जयाचे
अंतर विषयी तत्पर सर्व काळी ||१||
तथा ज्ञान साधे असे तो घडेना ।
जानेवीण जाणा मोक्ष कैचा ||२||
नाही ज्या अपेक्षा साधनाची चाड
दोषाचा उघड वोतलासे ॥३॥
बहेणि म्हणे ज्ञान संतसंगे होय
चित्त जरी राहे सदा पायी ॥४॥

१३८
माझिया रे मना सख्या सज्जना
ऐक तू प्रार्थना विनवितसे ||१||
सांडी हे मीपण अहंतालक्षण |
निवांत आपण सुखी रहे ||२||
किती वणवण करिसी भ्रमण
व्यर्थ वायाविण श्रम देही ||३||
मायामृगजलापाठी का लागसी
कष्ट का भोगसी चौन्यांशीचे ||४||
येणे काय हित घडी पाहे तुज
धरी काही लाज सज्जनांची ॥५॥
बहेणि म्हणे गेले संत जया
वाटा पावले ते निष्ठा सुखरूप ||६||

१३९
शुक वामदेव व्यास पराशर
गेले थोर थोर जेणे पंथे ।।१।।
जेणे पंथे सुखी जाले मै निर्भय
मना तेचि सोय धरी का रे ||२||
वसिष्ठ अंबऋषी सनकादिक
पाहे गेले लवलाहे जेणे पंथे ||३||
बळी विभीषण प्रल्हाद वाल्मीक
पावले ते सुख जेणे पंथे ॥४॥
ऐसे किती सांगो चहु वर्णामाझारी
जाले संवसारी सुखरूप ॥५॥
बहेणि म्हणे मना धरी रे
धारणा लागले चरणा निजभावे ||६||

१४०
मना तूंचि माझें संचित क्रियमाण
भोग हे भोगणें सुखदुःख तुझेनीच
मज बंध मोक्ष जाण येन्हवीं
पुसे कोण मजलागीं ॥२॥
मी हें माझें द्वैत वाढविला विकल्प
पुण्य आणि पाप तुझे देठी ||३||
निश्चलता तुज जरी हे असती ।
सुखदुःखाची प्राप्ति कोणालागीं ॥४॥
जीवशिव नामे वाढली उपाधी ।
तुझेनीच बुद्धि मना जाण ॥५॥
बहेणि म्हणे मना भाकितसे करुणा
सोडवी मज दीना काळाहाती ॥६॥

१४१
काळ आणि वेळ तास घटिका
पळा तुझेनी हैं मूळ गणनेलागीं ॥१॥
जेथे नाही काळ तेथे कैची वेळ ।
उपाधीचे मूळ तूचि मना ॥२॥
अणूचे प्रमाण सूक्ष्मब्रह्मणा ।
एवडी गणना तुझेमुळे ॥३॥
पंचमहाभूतें वर्तती आपण
चंद्रसूर्य जाण दिनमानेसीं ||४||
अवघी है गणना ब्रह्मांडरचना ।
मना तुजविणा नाहीं नाहीं ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे काळचक्र चाले ।
येवढे तुझे चाळे दिसती बापा ॥६॥

१४२
मना तू व्यापकापरीस व्यापक
ब्रह्मांड हे देख व्यापियेले ।।१।।
तेथे निजसुख कैसे जीवालागी ।
म्हणोनी तुजलागी विनवितसे ॥२॥
जेथवरी मना तुझा फिरे वारा
तेथवरी धारा सुखा नाही ॥३॥
जेबवरी मना तुझा रे पसर ।
सुखाचा विचार तेथे नाही ॥४॥
तुझी कृपा होये तरीच सुख लाहे ।
म्हणोनिया पाय धरितसे ॥५॥
बहेणि म्हणे तुवा ठकिले बहुवस ।
तेणे कासावीस जीव माझा ॥६॥

१४३
विधात्याएवढा तपोनिधि होता ।
त्यासी त्वा तत्त्वता ढकियेले ॥१॥
ऐसे तुझे खेळ खेळसी विलगट
भोगविसी कष्ट जीवालागी ॥२॥
विष्णूसी ठकिले नारदा विटंबिले
शंकराचे केले लिंगपतन ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे सांगता
अपार मना तुझे चार न कळती ।।४।।

१४४
तुजसाठी मना धरिती धारणा
योगमुद्रा जाणा नानापरी ॥१॥
ऐसे तपोनिधी साधिता साधना ।
नाकळसी मना काय सांगो ।।२।।
येक प्राणापान निरोधोनी द्वारे
ब्रह्मांडविवरे वायू नेती ॥३॥
उघडे बोडके जाळ सुडके
होऊनिया मुळे हिंडताती ॥४॥
येक भूमीमाजी पुरोनिया घेती
वनी विचरती अत्रेविण ॥५॥
बहेणि म्हणे ऐसी नाना मते
सांग हिंडती वैराग्ये मनासाठी।।६।।

१४५
तुज साधावया एकचि कारण
फार जया पुण्य गाठी वसे ।।१।।
तेव्हा निजमन वश पै आपण
जैसे केले जाण तैसे होय ॥२॥
तथाचिया राशी से ज्याचे गाठी
तेव्हा मन हाती गवसे पा ||३||
बणि म्हणे मग मन तेचि तृण ।
पाहिजे कारण पुण्यप्राप्ती ॥४॥

१४६
वश मन जाले मग काय
उरले ब्रह्मांड घातले पालथे जेणे ॥१॥
ऐसे पुण्य करा मनासी या वरा ।
सद्गुरूचे धरा पाय आधी ॥२॥
मन वश होता साधने साधिता ।
ब्रह्मसायुज्यता रोकडेची ॥३॥
मन जो नाकळे मग केवी कळे ।
वायाचि सोहळे साधनांचे ॥४॥
मन नाही ठायी सोंगे घेउनी कायी ।
झकवावयाही अज्ञानासी ।।५।।
बहेणि म्हणे येथे केले ते आपण
जेवी त्याची खूण वाढिता जाणे ॥६॥

१४७
तुजसाठी मना जाईन येथोनी
राहीन चरणी सद्गुरूचे ॥१।।
मग तुझे काय चाले पाहे तेथे
येता तुज तेथे हाल होती ॥२॥
तुजसाठी मना घेईन देसोटा
धरीन मी निष्ठा गुरूपायी ॥३॥
बहेणि म्हणे मना ब्रह्मांडासगट ।
भरीन तुझा घोट गुरुकृपे ||४||

१४८
विषयांचा लंपट जरी तू नसतासी
मग मना तुज संबंध काई ।।१।।
मग निजसुख सहज तू आपण ।
साधनांचा सीण कोणासाठी ||२||
सांडोनिया वृत्ति असतासी निवृत्ति ।
मग भोगप्राप्ती कोणालागी ॥३॥
बहेणि म्हणे मना विषयाचे संगती
एवढी आटाआटी करिसी जीवा ॥४॥

१४९
सद्गुरुकृपेने साधीन तुझ्या कळा ।
वासना अबळा दंडीन मना ||१||
मग तू कीलवाणे करिसील मुख
तुझे तूचि सुख नेणसी घेऊ ॥२॥
अनाथाची परी होईल तुजलागी ।
ऐसे वीतरागी करीन झणी ॥३॥
बहेणि म्हणे तुझ्या सांडवीन खोडी
विवेकाची बेडी जडीन पायी ॥४॥

१५०
निंबोलिया भरे निवासी भरल्या
सुकाळ जाहला वायसांसी ||१||
कावकाव तेथे मदे ओरडती ।
परी ते नेणती चवी कैसी ||२||
तैसे नको मना मातो कामभरे
हित होय बरे तेचि करी ।।३॥
मुक्ताफळे हंस सेवित पक्षिया ।
हासती ते तथा काग कैसे ॥४॥
परी त्याची गोडी नेणती विचार ।
मुखे अविचार भरले फाटा ||५||
जो जेथे रातला तो तेथे मातला
पूर्ण ब्रह्मकळा- चवी नेणे ॥६॥
विष्ठा पे कस्तुरी केवि ते समान
बहेणि म्हणे ज्ञान दुर्लभ है।।७।।

१५१
ज्याचे गाठी फार पुण्याची ही साठ ।
मन त्याचे विटे विषयभोगी ॥१॥
मग तो देवाचा सांगाती निजाचा ।
सखा तो आमुचा प्राणदाता ।।२।।
आत्मसुखालागी सर्वस्व त्यागिले ।
विरक्तीसी केले साहा जेणे ||३||
संसाराचा त्रास ज्यामनी उपजला
सर्व धनी जाला निजसुखाचा ॥४॥
उरलेनि प्रालब्धे आयुष्य घालविती ।
स्वरूपाची स्थिति अखंडत्वे ||५||
बहेणि म्हणे मना सोडी मज आता ।
ब्रह्मसायुज्यता सुख देई ||६||

भक्तिपर
१५२
भक्ति हे कारण साधन वरिष्ठ
रोकडे वैकुंठ हाती बसे ।।१।।
स्थिर करी चित्त प्रेम अखंडित
पावसी अच्युतपद पाहे ||२||
भक्तीपासी ज्ञान वैराग्य आंदणे
सर्वही साधने लया जाती ।।३।।
बहेणि म्हणे भक्ति विरक्तीचे मूळ ।
चित्त हे निश्चळ करी का रे ॥४॥

१५३
संताचे वचनी दृढ जया भाव ।
भक्ति अभिनव हेचि खरी ॥१॥
सांगितली खूण आइके जो मनी ।
पावेल निर्वाणी तोचि एक ॥२||
संताचे वचन शासचे आधारे ।
भक्तिचे निर्धारेि दृढ व्हावे ||३||
बहेणि म्हणे संतापायी जया आतं ।
हाचि भक्तिपंथ वोळखावा ||४||

१५४
नामसंकीर्तन सर्वकाळ जया
भक्तिवंत तया म्हणी आम्ही ॥१॥
क्षण एक नाही नामेविण वाचा !
सोस हा भक्तीचा सर्वकाळ ||२||
नेत्री हरिध्यान मुखी ते कीर्तन ।
सर्वदा श्रवण मोक्षशास्त्रे ||३||
सेवा घडे हाते पायी प्रदक्षिणा |
विश्रांति धारणा आत्मयाची ||४||
आठही प्रहर नाही आराणुक
संताघरी रंक होउनि ठेला ॥५॥
बणि म्हणे भक्ति खरी मोक्षदा
पाहिजे संगती सेवा।।६।।

१५५
उदकेवीण मासा जैसा तळमळी
चातक भूतळी मेघ इच्छी ।।१।।
तैसे मक्तीलागी कळवळी मन
भक्ति हे निर्वाण तेचि खरी ||२||
एकुलता पुत्र सापडे वैरिया
कुरंग हा ठाया पारथीचे ||३||
पतिव्रता पतिवियोगे तडफडी ।
भ्रमर प्राण सांडी पुष्पेविण ||४||
तृषाकांत जैसा इच्छित जीवना ।
चकोर हा जाण चंद्रामृता ||५||
बहेणि म्हणे तैसी आवडे हरिभक्ति ।
तेव्हा आंतरविरक्ति वोळखावी ||६||

१५६
भक्तीविण काय वाचोनिया व्यर्थ ।
अंतरला स्वार्थ देखताची ।।१।।
नये त्याचे तोंड पाहे पा सर्वथा ।
कासयासी माता तथा व्याली ॥२॥
न करी सेवन न पूजी सज्जन
न करी श्रवण मननामाजी ॥३॥
बहेणि म्हणे जया न घडे हरिभक्ति ।
मग त्या विरक्ति केवी साधे ॥४॥

१५७
चित्तशुद्धि होय भक्तिचेनि योगे ।
होईल वाउगे दृश्यजात ||१||
वैराग्य संचरे मनामाजी जाण ।
जैसे हे वमन सर्व तैसे ||२॥
विषय असत्य रोहिणीचे जळ
वाटते सकळ भ्रांतिरूप ||३||
बहेणि म्हणे जंव शुद्ध चित्त नाही ।
प्रपंच तो काही न सुटेचि ॥४॥

१५८
विषयाचा संग नावडे जयासी ।
वैराग्य मानसी संचरल्या ॥१॥
मग काय उणे सुखालागी तथा ।
सर्वदा सुखिया तोचि एक ॥२।।
नावडे ज्या संग स्त्रियापुत्रधन ।
इंद्रियाचरण नावडेची ।।३॥
नावडे पाहाणे बोलणे ऐकणे ।
नावडे मिष्टान्ने भोग भोगू ||४||
नावडे संपत्ति गणगोत काही
नावडेचि देही अहंपण  ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे होईल
मानस प्रपंचाची आस तच तुटे ॥६॥

१५९
भ्रतारेही गावा गेलियाने सती
भोग ते लागती विषाऐसे ।।१।।
अनुताप तैसा संचरे शरीरी
आत्मा हा अंतरी वोळखता ||२||
अपूर्ण हा काम जालिया कामुका ।
भोग सर्व विखापरी होती ||३||
धनलोभियाचे धन नेता चोरी ।
क्षणही अंतरी सुख नाही ||४||
मीन उदकातुनी काढिलियावरी ।
विष सर्वपरी होत तया ॥५॥
बहेणि म्हणे तैसे ब्रह्मप्राप्तीविण
जाय एक क्षण युगाऐसा ||६||

१६०
परलोक नावडे इंद्राची संपत्ती
इहलोक वाटे विष जैसे ।।१।।
तो एक विरक्त ज्ञानासी अधिकारी ।
ब्रह्मप्राप्ति खरी होय तया ॥२॥
सर्व सिद्धि येता घरासी सर्वथा
नावडती चित्ता विरक्तीने ॥३॥
रंभा तिलोत्तमा उवंशी मेनिका ।
नावडती एका हरवीण ॥४॥
चंदन आगरु नाना उपचार ।
गमती विखार हरीविण ||५||
बहेणि म्हणे पूर्ण विरक्ती
मानसी ज्ञान हे दयासी वोलंगण ॥६॥

१६१
प्रपंच असत्य कळो आला
जया विषय हे तथा नावडती ।।१।।
उनदासीनापरी वर्ततो प्रपंची ।
आशा हे मनाची सांडोनिया ॥२॥
मनाचा स्वभाव संकल्प विकल्प
होय साक्षिरूप तयांचा ही ॥३॥
बुद्धीचा निश्चय अनुसंधानी चित्त ।
अहंकारी हेत अहंतेचा ||४||
सर्वही माईक व्यवहार जाणती ।
निश्चय अद्वैती ठेवोनिया ||५||
बहेणि म्हणे माया सत्य ना असत्य ।
श्रीगुरूने तथ्य सांगितले ॥६॥

 सद्गुरूंची थोरवी
१६२
असत्य हे माया म्हणी जाता दिसे ।
सत्य म्हणता नसे ज्ञानदृष्टी ॥१॥
ऐसा हा संदेह निवारी सद्गुरु ।
विवेक निर्धार करूनिया ॥२॥
ब्रह्माहरिहर मायेचेचि गुण माया
ब्रह्मी जाण बोलो नये ॥३॥
माया काल्पनिक अकल्पित ब्रह्म
नकळे याचे वर्म कोणेपरी ॥४॥
माया हे सावेव किंवा निरावेव
न कळे याचा नाव कोणेपरी ॥५॥
बहेणि म्हणे याचे वर्म कळावया ।
वोळंगावे पाया सद्गुरूच्या ॥१६॥

१६३
ब्रह्मापासुनिया जाली म्हणो माया ।
उपाधी हे तथा केवी घडे ॥१॥
करावा निवाडा सद्गुरुवचन ।
मेद निरसून विकल्पाचा ।।२।।
माया ब्रह्मी नाही ऐसे म्हणो जरी
स्वतंत्रता तरी म्हणो नये ॥३॥
बणि म्हणे ऐसा संदेह मायेचा
निरसी जो साचा तोचि गुरु ॥४॥

१६४
ब्रह्म तो अद्वय श्रुतीचे संमते
वेगळी माया ते म्हणो कैसी ।।१।।
कोणासी पुसावे मायेचे ठिकाण ।
नद्गुरुवाचून सत्य जाणा ॥२॥
सुवर्ण कांकण नाममात्र भिन्न
ज्ञानदृष्टी जाण वोळखावे ।।३।।
तोय तरंग निद नाममात्र
ऐक्य हे सर्वत्र ज्ञानदृष्टी ॥४॥
सूत वस्त्र दोन्ही ऐक्यता सहजे
ज्ञानदृष्टी वोजे पाहिलिया ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा पाहाता
विवेक सहजची ऐक्य मायाब्रह्म ।।६।।

१६५
असत्य हे माया म्हणता प्रत्यक्ष
मायेचा हा पक्ष दृश्य आवधे ।।१॥
काय ते धरावे काय ते सांडावे ।
रहावे अनुभवे कोण्यापरी ||२||
ब्रह्माहरिहर नाम अवतार
मायेचा बडिवार दिसतसे ||३||
बहेणि म्हणे बाया असत्य म्
हणता गुणांच्या अवस्था दिसताती ॥४॥

१६६
सत्य म्हणो माया ज्ञाने निरसत
अनुभवे अद्वैत होउनी ठेले ।।१।।
सत्य म्हणो जाता नसे हे सर्वधा ।
आता काय चित्ता बोध करू ॥२॥
सूर्यापुढे काय अंधकार राहे ।
विवेक हा ठाये न दिसे इच्या ॥३॥
बहेणि म्हणे सत्य म्हरो नये
कदा संत आत्मबोधा पावलिया ||४||

१६७
गुरुकृपा पूर्ण जयासी लाधली ।
माया ही निरसली तथा मनी ।।१।।
येर ते अज्ञान पडिले भ्रमणी ।
संसार – जाचणी अनिवार ||२||
जयांचा विकल्प निरसला निश्चित ।
तेचि ब्रह्मभूत होउनी ठेले ||३||
जयांची वासना निमाली अंतरी ।
तेचि निर्विकारी सहज जाले ॥४॥
जयांचा हा हेत निरसला देहीचा
रावो ब्रह्मांडीचा तोचि एक ॥५॥
बहेणि म्हणे काय सांगावे कवणा
मायेचा देखणा विरुळा असे ।।६।।

१६८
सूर्याचिये घरी राहाणे जयासी ।
अंधकार त्यासी स्वप्नी नाही ||१||
तैसे स्वानुभवी न देखे तो माया
ब्रह्म तो अद्वयानंद अंगे ।।२।।
परिस तो जाणे काय सोने लोह ।
निर्ममते मोह कदा नाही ||३||
बहेणि म्हणे नलगे तृषा ते
जीवना पूर्णत्वे भावना भावशुद्धी |

१६९
सूर्याचिये अंगी भासले मृगजळ
सूर्य तो केवळ नेणे तथा ॥१॥
तैसी जाण माया ब्रह्मीच आभासे ।
परी स्पर्श नसे ब्रह्मत्यासी ।।२।।
चुंबकासत्रिय लोहासी भ्रमण
सूर्य-सते जन वर्तसे ।।३।।
बणि म्ह ऐसा अनुभव पाहिजे
स्वसुखी राहिजे निरंतर ॥४॥

१७०
दृश्य आणि द्रष्टा दर्शने समवेत ।
ब्रह्म सदोदित सर्वकाळ ||१||
काय घेऊ काय सांडू कोणीकडे ।
अनंत ब्रह्मांडे रोमरंध्री ॥२॥ ध्
येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञप्ति ज्ञान
साध्य तो साधन आपण जाला ॥३॥
बहेणि म्हणे द्वैत स्वप्नामाजी नसे ।
अवघाची प्रकाशे राम माझा ॥४॥

१७१
कैची माया आणि अविद्या कल्पना
कैची हे वासना पाहतोसी ॥१॥
जगदाकार ब्रह्म अखंडित सर्व
पाहे हा अनुभव निश्चयाचा ॥२॥
कैचे मन बुद्धि कैचा रे अभिमान
सर्व नारायण अंतर्बाह्य ॥३॥
बहेणि म्हणे अवघे गुणाचे विकार ।
ब्रह्म निर्विकार स्वतः सिद्ध ॥४॥

१७२
त्रिगुणे हे सर्व व्यापिलेसे जग ।
यामाजी श्रीरंग वेगळाची ||१||
विश्वकार तोचि पहाता अनुभवा
येथील गौरव सद्गुरु जाणे ॥२॥
उफराटी दृष्टी पाहिलियावरी ।
सौख्य हे अंतरी होय तेव्हा ॥३॥
बणि म्हणे गुण मायेचे अंकुर ।
ब्रह्म परात्पर अद्वयत्वे ।।४॥

१७३
सत्त्वगुण साथी ज्ञानाचिये सिद्धी
स्थिर होय बुद्धि आत्मरूपी ॥१॥
कासवा रज तम जगी दिसे अंगी ।
वाढविसी संगी पापरूप ||२||
काय एक नाही सत्त्वगुणापासी
पाहे तू मानसी आपुलिये ॥३॥
सत्त्वगुणे स्वर्ग साधेल मोक्षही
विचारूनी देही पाहे का रे ।।४।।
सत्त्वगुण आणि संतांची संगती ।
कर्माची निवृत्ति होय तेणे ॥५॥
बहेणि म्हणे सत्त्व मोक्षाचे कारण
पाहिजे ते ज्ञान शुद्ध अंगी ॥६॥

१७४
स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान
करी सावधान आत्मनिष्ठे ।।१।।
फळाशा सांडोनी अहं कर्तव्यता |
मोक्ष तो आता तेथे असे ||२||
स्वधर्माचरण आपुलाले वर्ण यज्ञ
आणि दान करी सर्व ||३||
बहेि म्हणे ऐसा साधील तो
जरी सत्य तो अंतरी प्रवेशला ||४||

१७५
दुधाचिये चाडे गायीचे सेवन ।
आंव्याचे पाळण फळालागी ।।१।।
तैसे कर्म करी फळाशी धरून ।
रजोगुणी जाण वोळखावा ॥२॥
द्राक्षाचिया मुळा दुधाची घागरी
समर्थाचे घरी आमंत्रणे ॥३॥
बहेणि म्हणे ऐसी क्रिया जयापासी ।
ज्ञान तयापासी न ये कदा ||४||

१७६
वेदशास्त्र जया नाहीची प्रमाण
अशुची तो जाण अंतर्बाहा ।।१।।
तामसी तो खरा वोळखावा नर ।
तयासी अघोर कल्पकोटी ॥२॥
वेदाचे प्रमाण ते ते अप्रमाण
भल्यासीही मान नाही जेथे ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे अंगेधि दुर्जन
त्यासी संभाषण करू नये ॥४॥

१७७
जन्मजन्मांतरी वासनेचा भ्रष्ट
मोक्ष हा वरिष्ठ केवी साधे ।।१।।
जैसा तो काउळा अमंगळी प्रीती।
राजहसपंगति कैची तथा ।।२॥
कुकर्म आवडे अधर्मप्रवृत्ती
अंधतम मूख घेत असे ||३||
बहेणि म्हणे त्याचे तोंड पाहू नये ।
नरकाचा ठाय तोचि येक ।।४।।

१७८
गुणाची वाघुर मांडिलीसे जीवा
सुटेल केधवा केशीराजा ॥१॥
ऐसा अनुताप होईल अंतरी
मोक्ष होय तरी प्राणियासी ॥२॥
कामक्रोधलोमा वैरी हे भोवते ।
करावी अनंते कृपा आता ॥३॥
बहेणि म्हणे धन्य ते एक
संसारी पूर्ण जयावरी गुरुकृपा ॥४॥

१७९
न लगती वेद शास्त्राचे पठण
परमार्थाची खूण वेगळीच ॥१॥
सद्गुरुसी जाई शरण सर्वभावे ।
मग तू स्वभावे ब्रह्मरूप ॥२॥
न लगती तपे व्रते अनुष्ठान
आत्मत्वाची खूण वेगळीच ॥३॥
न लगती देव तीर्थं क्षेत्र यात्रा
आगमीच्या मंत्रा धांडोळावे ||४||
न लगती योग याग प्राणायाम
साधनाचे वर्म वेगळेचि ॥५॥
न लगे ब्रह्मचर्य गृहस्थ संन्यास ।
व्रताचे हव्यास व्यर्थ तेही ॥६॥
न लगती पंचामी धूम्राचे प्राशन
आकाश-वसन नलगे काही ॥७॥
बहेणि म्हणे एक श्रीगुरूवाचोनी ।
मोक्ष तो गहनी प्राप्त नव्हे ॥८॥

१८०
शब्दाचे बोलणे दृश्य हे तोवरी ।
अदृश्य वैखरी हरपले ||१||
तेथे हा श्रीगुरू बोधील समर्थ ।
दाखयोनी अर्ध श्रुति शास्त्रे ।।२।।
बुद्धीचे बोधक चित्ताचे चिंतन
अदृश्य हे जाण हरपले ||३||
इंद्रियांचे सर्व आकारी बोलणे
निराकारी जान हरपले ||४||
बहेणि म्हणे जेथे अनिर्वाच्य बोली
सद्गुरु माऊली तेखि दावी ॥५॥

१८१
प्रारब्धाआधीन शरीर लागले ।
आत्मत्व निराळे वेगळेचि ।।१।।
सुखदुःख हे याचे नाणावे अंतरी ।
पूर्ण साक्षात्कारी स्थिर राहे ।।२।।
केले ते भोगील आपले आपण
होय उदासीन सर्वभावे ॥३॥
बहे म्हणे त्याचे सांगेन विंदान
सद्गुरुचरण साधी पा रे ।।४।।

१८२
पिंडब्रह्मासी करोनी ऐक्यता ।
होय या परता साक्षीरूप ॥१॥
सर्व सूचि होसी सही वेगळा
ऐसी साथ कळा सद्गुरुमुखे ।।२।।
हिंग-हिरण्यासी ऐक्य करूनिया
जाय तू अद्वया ब्रह्मपदा ॥३॥
आशा तृष्णा माया एकरूप दोनी ।
करोनिया जनी वतें सुखे ।।४॥
सर्वही प्रपंच ऐक्यतेसी आणी
तूचि जनी बनी होउनी राहे ।।५।।
बहेणि म्हणे सर्व हारपली
मुळी ते रूप न्याहाळी ज्ञानदृष्टी ॥६॥

१८३
काळे-गोरेपण धुतलिया जाये ।
दाहकपण काय अग्नि सांडी ॥१॥
तैसे ते प्राक्तन न सोडी सर्वथा ।
ज्ञानियाच्या माथा साट वाजे ||२||
शीतलता उदक काय सांडी गुण
चंचलत्व मन केवि सांडी ॥३॥
बहेणि म्हणे याचे सांगेन
विंदान सद्गुरुचरण पाहलिया ॥४॥

१८४
गुरु गुरु अवधे
जाले उपदेश मांडिले
सद्गुरुकृपेचा न कले
महिमा कोणा ।।१।।
नानापरीचे ज्ञानध्यान ।
सांगती जपतप अनुष्ठान
परि ते सद्गुरु-लक्षण ।
अगम्य जाणा ||२||
आगमनिगमधारी ।
एक ते जारणाधिकारी
चुकोनिया जाले वैरी
देवाचे कैसे ।।३।।
नाना मंत्र उपासना ।
सांग यंत्रधारणा ।
परी ते सद्गुरुचरणा ।
न पावती कोन्ही ||४||
बहेणि म्हणे आता
वाया जन्म का
करावा जाया ।
भजावे श्रीगुरूच्या पाया ।
सर्वही सिद्धि रे।।५।।

१८५
गुरुपरंपरा आम्हा चैतन्य बळी
तयाच्या स्मरणे आम्ही वैकुंठी बळी ॥१॥
नमस्कार हा तया साष्टांग माझा ।
वोवाळू जीवे साधु चैतन्य-राजा ॥२॥
चैतन्य हा सर्वगत व्यापक गुरु
प्रगटला हा तुकाराम वेष दातारु ।।३।।
तयाचे हे ध्यान सदा माझे अंतरी ।
अंतरीचे ध्यान सबाह्याभ्यांतरी ||४||
नेणे स्नान दान जप आसन मुद्रा
सदासर्वकाळ ध्याऊ चैतन्य पदा ||५||
बहेणि म्हणे आम्ही मुक्त
गुरूचे ध्याने प्रेमे भक्ति-भावे

तया वोवाळू प्राणे ॥६॥


१८६
आता सद्गुरु स्वामी राणा ।
माझिया प्राणा॥ध्रु.॥
ठेवीन मी मस्तक त्याचे
चरणी लावील मज स्मरणी ।
ध्याईन मी निश्चल अंत:करणी
निज दावील नयनी ।।१।।
ज्याचे दर्शनी द्वैत
निरसे माया न स्पर्शे ।
अमृतवृष्टि ज्यावर वर्षे आनंदे हर्षे ॥२॥
खंती वाटे त्याची मज गे
किती सांगू मी तुज गे ।
सांगेल मुक्तीचे बीज गे ।
बहेणि म्हणे मग गे ||३||

अनुतापपर
१८७
अनुताप हा अग्र लागला अंतरी
आता कृपा करी जगन्नाथा ॥१॥
तापत्रये फार पीडिले शरीर ।
नलगे संसार स्वर्ग तोही ।।२॥
पेटली इंद्रिये धडाडित अंगे ।
कृपा करी वेगे पांडुरंगा ॥३॥
बहेणि म्हणे सुख तेचि जाले दुःख ।
ऐसा हा विवेक संचरला ॥४॥

१८८
पाहे परतोन मी हा येथे कोण
देह तो हे जाण नासिवंत ॥१॥
इंद्रियाचरण होतसे कैसेनी
सृष्टीचा तो धनी कोण येथे ||२||
पृथ्वी आप तेज वायो हे गगन
सर्वही निर्माण जाले कोठे ||३||
बहेणि म्हणे याचा करावया शोध ।
होउनि सावध विचारिजे ||४||

१८९
आपुलीये मनी विचारूनी
सर्व पुसावया दाय पहातसे ॥१॥
जेथे पुसे थे देह तुटेना करि
स्थिर मना कोण ऐसा ||२||
शास्त्रासी पुसावे थोडे तो आयुष्य
कर्मी तो अवश्य कर्मी गोवी ||३||
बहेणि म्हणे ऐसी चिंता
साधकाली कैशी भवपाशी मुक्त ॥४॥

१९०
जेथे पुसो जावे तेथे अभिमान
आपुलेचि ज्ञान प्रतिष्ठी तो ।।१।।
जाणोनि अंतरी न सांगती कोणी ।
कोणाचा वचनी स्थिर राहो ॥२॥
लय हे लक्षण सांगती धारणा ।
नाना उपासना नाना मंत्र ॥३॥
एक ते सांगती पंचमुद्रा जप
एवं खटाटोप आसनाचा ॥४॥
एक ते सांगती तीर्थे तपे
व्रत एक ते अनंत पूजाविधि ॥५॥
बहेणि म्हणे आता नव्हे स्थिर
मन जेथे तेथे गुण अविद्येचा ॥६॥

१९१
कामाचे विकिले क्रोधाचे जिंकिले ।
लोभाचे अंकिले सर्व भावे ॥१॥
तयासी पुसता काय देती सुख ।
अंतरी विवेक नाही जया ॥२॥
आशेलागी जया आंदन दिधले
ममतेचे जाले सेवक ते ।।३।।
बहेणि म्हणे तेचि प्रासिले मायेने
आम्हा सोडवणे केली होती ॥१४॥

१९२
दुसरियाचे दुःखे शिणे ज्याचे चित्त ।
तोचि एक संत वोळखावा ।।१।।
तयासी पुसता हरील तो शीण
दुःख पे हिरोन रोकडेची ॥२॥
परोपकार जया आलासे विभागी
शांती हे सर्वांगी डोलतसे ॥३॥
बहेणि म्हणे नाही आपुले पारिखे ।
वर्ततो विवेके ज्ञानदृष्टी ॥४॥

१९३
चंदन सर्वांगे झिजोनिया जाय ।
संतोषवी प्राणिये जेणेपरी ।।१।।
तैसे साधुजन मने वाचे काये ।
सुख देता नोव्हे उदासीन ॥२॥
उदक जैसे संतोषवी जना
उपकार तो तृणा आदिकरूनी ||३||
बहेणि म्हणे संती अवतार
घेतले जनहित केले सर्वापरी ||४||

१९४
अनुतापे विरक्त होईल मानस ।
विषयाचा ध्यास तुटेल ते ॥१॥
वाटेल जे चित्ता नावडती जन्म
इंद्रियासी नेम होय तेव्हा ||२||
स्वर्ग संसाराची तुटेल आवडी
होय देशोधडी काम-क्रोध ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे होय जे अंतर
तेच होय घर सद्गुरुचा ||४||

१९५
इहलोक सत्य मानिताचि जाण
आली नागवण घरा आधी ||१||
निश्चय विवेक करूनी निर्धार
शाश्वत हे सार घेई मूढा ||२॥
इहलोक पाहता क्षणातुनि नासे
येथील हव्यास धरू नये ||३||
बहेणि म्हणे देह प्रपंच असत्य
मनातील तथ्य सांगितले ॥४॥

१९६
असत्य प्रपंच म्हणऊनि सांडिसी
नागवण परियेसी तेही तुज ।।१।।
असत्येचि सत्य साधला जाणिजे
विवेक पाहिजे आपुलिया ॥२॥
असत्य शरीर तयाचेनि जाण
साधिती निर्वाण ब्रह्मनिष्ठ ||३||
सोहागी असत्य परी एकवटी सोने
लोखंड भूषणे घडवितसे ॥४॥
नाग तो विखार सेविता तो हित
महाविषे मृत्यु न बाधती ||५||
बहेणि म्हणे सत्य असत्येचि
साधे सद्गुरुचे बोधे वर्तलिया।।६।।

१९७
आणिले उसने पाचांचे शरीर
साधावया सार मोक्षपंथ ॥१॥
येथे तुवा जरी मांडिला स
होईल तरी नाश स्वहिताचा ॥२॥
भाड्याचे घोडे करुनी आणिले
पाहिजे साथिले कार्य त्यरे ॥३॥
बहेि म्हणे ज्याचे नेईल तो
धनी होईल ते हानि स्वहिताची ॥४॥

१९८  
पृथ्वी आप तेज वायु आणि
नम ब्रह्मांडी स्वयंभ वर्तती ते ॥१॥
आणियले अंश नाव करावया ।
भव तारावया स्वहित ते ।।२।।
अस्थिमांसत्वचा नाही आणि रोम
पाच हे उत्तम धरित्रीचे ॥३॥
लाळ मूत्र स्वेद शुक्र हे शोणित ।
आणिले हे सत्य उदकाचे ||४||
क्षुधा तृषा निद्रा आलस्य मैथुन
मागितले गुण तेजापासी ॥५॥
चलन आणि वळन अकोचन निरोधन
प्रसरण हे जाण वायुपासी ॥६॥
राग द्वेष भय लजा मोह पाहे ।
हे गुण निःसंदेह नमापासी ।।७।।
ऐसे हे पाचांचे गुण पंचवीस
आणिले सायास करूनिया ॥८॥
शंभरा वर्षांचा करूनिया नेम
आणिले उत्तम गुण तिन्ही ।।९।।
चान्ही वेद यासी आउले ठेविले ।
बळीसी दिधले बलिदान ||१०||
बहेणि म्हणे नाव भवसिंधुतारक
निर्मिले अनेक जीवमात्र ।।११।।

१९९
सत्त्वाचिये घाटी घालुनी चालिली
ते जाण पावली स्वर्गलोका ।।१।।
चितिलिया ठायास जाइजे चिंतिता
हित ते तवता विचाराये ॥२॥
स्नाचिये घाटी लोटिले जरी
मूलोकातरी पाते ।।३॥
तमोगुणी घाट पाहोनी चालिली
अधोगती गेली तेचि नाव ||४||
शुद्ध सखी नाव लोटलिया जाण
पावती निर्वाण ब्रह्मपदी ॥५॥
बहेणि म्हणे तारी मारी नाव
हेची वासना जयाची तयापरी ।।६।।

२००
सत्य साथ श्रुति-धर्मासी चालवी
तापसी तो देवी संपतीचा ॥१॥
तो स्वांसी सत्याचिया चले ।
त्यागुनी सकळ कर्मपंथा ॥२॥
दयाक्षमा भूत-कृपा जयापाशी
निष्कामनेसी शुद्ध बुद्ध ॥३॥
निश्चय सबळ अंगी जया धैर्यं ।
वचनी माधुर्य अवंचक ।।४।।
संतोषी सर्वदा नुल्लंघुनी वेद ।
अंतरी आनंद सर्वकाळ ॥५॥
संताची संगती सद्गुरुसेवन
नाही दुजेपण जयामध्ये ||६||
वैराग्ये वर्तत प्रपंच्याचा साक्षी
आलियाचे रक्षी चित्त जो का ||७||
बहेणि म्हणे ऐसा स्वर्गा जाय
नर आत्मज्ञानशूर जाय मोक्षा ||८||

२०१
कर्म करी देही धरुनी फलाशा ।
द्वैताचा वळसा जयापाशी ।।१।।
तयासी हा जाण प्राप्त मृत्युलोक ।
रजोगुणी एक वोळखावा ||२||
गर्व जयापाशी क्रोध सर्वकाळ ।
निद्रा ते जवळ ठेविलीसे ||३||
मोहाची साखळी सर्वकाळ कंठी ।
परस्त्रिया दृष्टी न्याहाळकु ||४||
आलियाने घरा इंद्राची संपत्ती
समाधान चित्ती नाही जया ||५||
पापिया निष्ठुर विषयांचा ध्यास
जया अविश्वास सर्वकाळ ॥६॥
चुंबक निंदक भूतमात्री द्रोहो
नाही निःसंदेहो चित्त ज्याचे ||७||
बणि म्हणे ऐसावतें जो मानस
मृत्युलोकी त्यासी देह येणे ॥८॥

२०२
विधिहीन वर्ते वेदांसी न मानी ।
श्रेष्ठ अव्हेरुनी वर्ततसे ।।१।।
तथा दुर्जनासी नर्कयोनी जन्म
जाणावा अधम तमोगुणी ॥२॥
करितसे घात विश्वास देउनि
हिंसक अवगुणी मंदबुद्धि ||३||
अखाद्य भक्षण अचोष्य चोषण
अपेयाचे पान सुखे जया ||४||
न धरी भय मनी नरक होती
मज वर्तणे सहज पापबुद्धि ॥५॥
बणि म्हणे ऐसा जाणा तमोगुणी
पडेल पतनी हीनमती ॥६॥

२०३
त्रिगुणाचे जाण शरीर बोतले
देही क्रिया चाले गुणापरी ॥१॥
म्हणानिया साक्षी होय तु गुणाया ।
मग तुज कैचा द्वैतभाव ॥२॥
त्रिगुणाचे भय ब्रह्मादिका असे
त्रिगुणाचे फासे घातकी हे ||३||
त्रिगुणसाकळी जीवासी जडली ।
तयाचेनि जाली बाधकता ॥४॥
त्रिगुणाचा सर्प झोंबला जयासी
मरण ते त्यासी आले खरे ||५||
बहेणि म्हणे गुण निवारील ऐसे
एक कृपा से सद्गुरूची ॥६॥

२०४
त्रिगुणापरते आहे तेची एक
भावने भाविक जाणती ते ।।१।।
सर्वामाजी असे सर्वाही वेगळे ।
इंद्रिया नाकळे अखंडत्वे ॥२॥
आहे म्हणो तरी न दिसेच डोळा
नाही तो आगळा भास याचा ।।३।।
बहेणि म्हणे नाही नामरूप
गुण सर्वांठायी पूर्ण सदोदित ।।४।।

२०५
जाला वासनेचा अंत ।
तेचि जाणावे लळित ||१||
ऐसे जाणती सज्जन
साक्षी जया आले मन ॥२॥
आला विषयांचा त्रास
पुढे राहिले सायास ||३||
चित्त जाले पाठिमोरे एक
आपुल्या निर्धारि ।।४॥
ज्ञाने सिंचित राहिला निवांत ॥५॥
म्हणे स्थिर बुद्धि हे अखंड समाधि॥६॥

२०६
रूप नसोनिया डोळियांसी
दिसे तेजही प्रवेशे नेत्रांमाजी ||१||
ते रूप चोरटे ओळखे तू चित्ता ।
बुद्धीचा आरुता पैस जेथे ||२||
सगुण निर्गुण लक्षातीत वस्तु
जाला तेथ अस्तु इंद्रियांचा ||३||
बहेणि म्हणे शब्दी न सापडे
तरी शब्द त्या भीतरी अंतर्बाहा ॥४॥

२०७
पृथ्वीयेचा गंध उदकीचा रस
तेजामाजी अंश आत्मयाचा ॥१॥
परी तो न दिसे ज्ञानचक्षुविण ।
पाहिजे अंजन गुरुकृपेचे ||२||
वायूमाजी ज्याचे वसतसे रूप ।
नभी असे दीप आत्मयाचा ||३||
बहेि म्हणे सर्व सर्वांही आगळा ।
ज्ञानाचिया डोळा पाहे का रे ।।४।।

२०८
पाहावया जाता पाहाणेची सरे ।
विज्ञान ते विरे जयामाजी ।।१।।
ते रूप डोळ्यास पाहाता न दिसे ।
जयाचेनी अंशे श्रेष्ठाश्रेष्ठ ||२||
लक्षू जाता लक्ष हारपले जेथे
परेचाही प्रांत तेथ जाला ॥३॥
बहेणि म्हणे तेथ व्यवहार राहिला ।
जे वेळी पाहिला देवराणा ||४||

२०९
बोध मंद बुद्धि यशोदा गोकुळी
जन्म झाला कुळी गौळियाचे ।।१।।
ते रूप सावळे पहा डोळेभरी ।
बाह्य अभ्यंतरी वोतप्रोत ||२||
नवविध नवमास पूर्ण जाले तेथे ।
कृष्ण अखंडित जन्मला तो ॥३॥
बहेणि म्हणे रूप सावळे
सुकुमार राक्षसांचा भार उतरिला ॥४॥

२१०
आकाशीचा सूर्य जळात बिंबला
तरी काय बुडाला तथामाजी ||१||
तैसा या शरीरी अलिप्तच असे
इंद्रियसमरसे असोनिया ॥२॥
चुंबकदर्शने लोखंडा चळण
आत्मा देही जाण तैसा असे ||३||
पूर्ण चंद्र होता सिंधूसी भरते ।
तैसा देह वतें आत्मवाने ||४||
आलिया वसंत येती पुष्येफळे
तैसा देह च आत्मसत्ता ।।५।।
बहेणि म्हणे आत्मा सर्वाही
अतीत अनुभवे पदार्थ सर्वं कळे ॥६॥

२११
कवणे ठायी असे कवणे ठायी नसे ।
ऐसे तो मानसे चोजवेना ॥१॥
यालागी सद्गुरू बोलती जे भावे ।
आत्मा तो स्वभावे कळावया ॥२॥
कवण याचा ठाव कवण याचा गाव ।
न कळे स्वयमेव काय धरू ।।३।।
कवण याचे कूळ कवण याचे स्थळ
कवण वासी बळ कळेचिना ॥४॥
कवण याची माता कवण याचा पिता ।
अमुकची तत्त्वता कवण जाणे ||५||
बहेणि म्हणे कोणा पुसो याची कथा ।
ऐसे विवंचिता कल्प गेले ॥६॥

२१२
सत्य म्हणता माया ज्ञाने लया जाय ।
असत्य तरी नव्हे कदा काळी ।।१।।
जाणती अनुभव ज्ञान दृष्टिरूप
मायेचे अमूप रूप वाढे ॥२॥
आकारले जे जे मायिक ते खरे
शब्द तो निधारे मायारूप ॥३॥
ज्ञान तेही माया ध्यान ते मायाचि ।
मायेविण कैची दृष्टी वाडे ||४||
जोवरी हे द्वैत मनामाजी वसे
तोवरी मायांशे लोकत्रय ॥५॥
बहेणि म्हणे माया लटकी म्हणो
नेदी करोनी वेवादी पहा बरे ॥६॥

२१३
घट भंगलियावरी ।
नभ नमाचे भीतरी ।।१।।
तैसा देह गेलियाने जीव
शिव मिथ्या भान ||२||
जळ आटलियावरी ।
प्रतिबिंबा कैची उरी ||३||
बहेणि म्हणे भासे द्वैत
जाण उपाधीने येथ ||४||

२१४
चालता पाऊल पंढरीच्या वाटे ।
ब्रह्मसुख भेटे रोकडेची ।।१।।
दिंडी ध्वजा भार चालती अपार ।
मृदंग-गंभीर स्वरश्रुति ।।१।।
हमामा बली पालिती परवड
होउनी उपडी विष्णुदासा ॥३॥
चणि म्हणे ऐसा आनंद वाटेचा
कोण तो देवाचा देखे डोळा ||४||

संतवर्णनपर
२१५
गर्व जयापासी नाही अणुमात्र
सर्वांगे पवित्र संतवृत्ति ।।१।।
तेचि एक साधु तारितील जन
प्रांती हे हिरोन ज्ञान देती ।।२।।
अंतर्बाह्य शुद्ध सूर्याचिये परी
ज्ञान कर्म करी बाह्यात्कार ।।३।।
रत्न की कर्पूर शुद्ध अन्तर्बाह्य
मनातील गुह्य सांगे जनी ||४||
कृपा जयापासी होउनी आंदन
आनंदी निमम सदा काळी ॥५॥
बहेणि म्हणे मनी भूतकृपा पूर्ण ।
तेचि वोळखण संतजना ॥६॥

२१६
तीर्थे इच्छिताती तथा साधुजना
पुण्याची गणना कोण करी ॥१॥
ब्रह्मरूप स्वये तारावया जन
अवतार घेउन येथे आले ॥२॥
ब्रह्मादिक देव इच्छिताती भेटी ।
अमृताची वृष्टि क्रिया तैसी ||३||
बहेणि म्हणे ज्याचे बोलणे सहज
वेदांतिचे बीज हाता वसे ॥४॥

२१७
गंगेच्या प्रवाहा सागरीच गति ।
बोलताती श्रुति ब्रह्मवरी ।।१।।
तैसी जाण बुद्धि चाले तोचिवरी ।
निश्चय-शिखरी निमोनि जावे ॥२॥
पतिव्रते काम वाढे तो भ्रतारी
सूर्य तो अंबरी प्रभा दावी ||३||
बहेणि म्हणे तैसे संतांचे बोलणे
साक्षात्कार मने होय जीवा ||४||

२९८
सहज स्वभावे गोडी ते अमृती
पुष्पी जाण दृती अंगीच जी ॥१॥
तैसा तो स्वभाव क्रिया जे वर्तत ।
वेद मूर्तिमंत आकारला ॥२॥
परिसाचा गुण अंगी साच खरा ।
रत्न गार हिरा सूर्य जैसा ।।३।।
बहेणि म्हणे तैसी सहज अंगी शांति ।
संतांची संपत्ति सर्व कर्म ॥४॥

२१९
संत असंताचे शरीर सारिखे
मित्रत्व वोळखे क्रियेपासी ।
काय सांगों फळ दोहाचे वेग
जाणत्यासी कळे ज्ञानदृष्टी ||२||
परिस आणि गार सारिखे स्वरूप
तेल आणि तूप पाहे पारे ||३||
काच आणि मणि पहाता समान
अंतरिचे गुण भिन्न असे ||४||
खरे आणि खोटे सारिखेचि
नाणे तक्र-दुधी गुण वेगळाची ॥५॥
बहेणि म्हणे मैंद साधु वोळखण
पुढे त्याचे गुण अंगिकारी ॥६॥

२२०
संतसंगे शुद्ध होय चित्तवृत्ति ।
लागेल प्रवृत्ति संतसंगे ।।१।।
यालागी तयांचे करावे दास्यत्व ।
तेणे निजतत्व सापडेल ||२||
संतसंगे दोष नासतील सर्व जाईल को ||३||
संतसंगे सापडेल निज संतसंगे
गुज प्रगट दिसे ॥४॥
संतसंगे दृष्टि पडेल स्वरूपी
संतसंगे स्वल्पी मोक्ष जोड़े ||५||
बहेि म्हणे संग धरावा निःसंग
साधनाचे अंग कळे तेव्हा ॥६॥

२२१
संतसंगे होय वैराग्य मनासी
आणील शांतीसी संतसंग ।।१।।
संत हे सर्वांचे शिरोमणि थोर ।
पाहिजे स्व निर्धार एकनिष्ठा ।।२।।
संतसंगे ज्ञान विज्ञान उसावे
संतसंगे नव्हे दुःख देही ।।३॥
बणि म्हणे संतसंगाचा विचार
जाणती ते सार भक्तिवंत ॥४॥

२२२
संत महावैद्य भवरोग फेडिती
सांगेन ते गति ऐक त्यांची ॥१॥
अर्धमात्रा रस देउनिया जीव ।
रोग दूरी सर्व करिताती ॥२॥
विषयाचा त्याग सांगोनिया पथ्य ।
भाव यथातथ्य सेवविती ।।३।।
बणि म्हणे ऐसे जाणोनी अंतर ।
तैसाची प्रकार प्रेरिताती ||४|

२२३  
चंदनाचा संग लाधलिया वृक्ष ।
तैसेचि प्रत्यक्ष होती जाण ॥१॥
तैसी हे संगति साधूची जालिया ।
संत आपसया होती जीव ॥२॥
गावीचा वोहळ मिळालिया गंगे ।
गंगारूप संगे होय जैसा ||३||
परिसाचा संग जालियाने लोह ।
होय ते विदेह सुचणंची ॥४॥
वातीसी लाथला दीपकाचा संग
प्रकाश अभंग साध्य तया ॥५॥
बहेणि म्हणे संग सज्जनाचा करी ।
तोचि रे संसारी धन्य एक ।।६।।

२२४
दुर्जनाचे संगे दुर्जनची होय ।
पाहे अभिप्राय सहज तो ।।१।।
हिंगाची संगती लागली कापुरा ।
स्वगुण तो खरा हरपला ||२||
तक्राचे संगती नासले ते दूधा
भांग करी मुग्ध जीव क्षणे ||३||
बहेणि म्हणे संग आपुलेसी
करी म्हणोनी विचारी साधुजना||४||

२२५  
वोळखोनि करी संग तू निर्धारी
सुख तू अंतरी पावसील ॥१॥
हा जाण निर्धार विवेकाची युक्ति ।
न धरावी आसक्ति मनामाजी ॥२॥
सुपंथ जाणोनी सज्जनाच्या संगे
पावसी सर्वांगे आनंद तू ।।३।।
बहेणि म्हणे शास्त्र केले याचिलागी
कळावया जगी मार्गामार्ग ||४||

२२६
संतसंगतीचा महिमा अद्भुत
होती ज्ञानवंत सत्त्वगुणी ।।१।।
यालागी सेवावे संतांचे चरण ।
स्थिर होय मन येक क्षणे ॥२॥
संतांचे बोलणे आइकता कानी ।
ब्रह्मरूप जनी होय सर्व ||३||
बहेणि म्हणे संतदर्शनेचि मोक्ष
अनुभव प्रत्यक्ष पाहे याचा ||४||
तीर्थे हिंडलिया काय होय फळ
अंतर निर्मळ नाही जव ॥१॥
यालागी निर्मळ होय चित्त येणे ।
संतांचे दर्शने घेतलिया ॥२॥
पाषाणप्रतिमा काय बोलतील ।
सुख हे देतील काय चित्ता ॥३॥
बहेणि म्हणे ज्याचे वचने निःसंदेह
होईल विदेह रोकडाची ॥४॥

२२७
तीर्थे हिंडलिया काय होय
फळ अंतर निर्मळ नाहीं जंब ||१||
यालागी निर्मळ होय चित्त येणें ।
संतांचे दर्शन घेतलीया ||२||
पाषाणप्रतिमा काय बोलतील
सुख हैं देतील काय चित्ता ॥३॥
बहिणी म्हणे ज्याचे वचन
निःसंदेह होईल विदेही ॥४॥

२२८
प्रपंची असोनि प्रपंचा अतीत ।
करतिल संत सर्व कर्मी ॥१॥
बालागी सेवावे संतांचे चरण ।
मोक्षाचे कारण हेचि येक ।।२।।
तक्रातिल लोणी न मिळेचि पुन्हा
वेगळ्याच गुणा आत आले ॥३॥
पद्मिनीचे पत्र न मिळे उदकात
असताही तेथ जन्मवरी ||४||
बहेणि म्हणे तैसे प्रपंथी असोन
न बाधी खूण साधूपासी ॥५॥

२२९
संतकृपा जाली ईमारत
फळा आली ॥१॥
ज्ञानदेवे घातला पाया ।
उभारिले देवालया ॥२॥
नामा तयाचा किंकर ।
तेणे रचिले आवार ॥३॥
जनार्दन बेकनाथ खांब
दिल्हा भागवत ॥४॥
तुका जालासे कळस ।
भजन करा सावकास ।।५॥
बहेणि फडकती ध्वजा
निरोपण केले बोजा ॥६॥

२३०
संत होती खरे भवार्णवी तारू ।
जाणती उतारू प्राणियांचा ॥१॥
कासे लाविताती निष्ठेचिया बळे |
नेती ते कृपाळ पैलतीरा ॥२॥
नामाची सांगडी बांधोनी बळकट
दाविताती तट सायुज्याचे ||३||
बहेणि म्हणे मागे उतरिले बहुत ।
येणेपरी संत तारू खरे ||४||

२३१
एका मते संत धन्वंतरी जाण
मंत्रवादी पूर्ण भारताती ।।१।।
वाचविले जीव सर्पदृष्टीपासाय
सामर्थ्या अपूर्व वाटतसे ॥२॥
पंचमुखी आहे सर्प ज्या झोंबले
लहरी येती बळे नानाविध ||३||
बहेणि म्हणे संत पाहती जयाकडे
विष त्याचे झडे नवल मोठे ॥४॥

२३२
संतांपासी असे ज्ञानाची निजशक्ति ।
अज्ञाननिवृत्ति होय तेणे ।।१।।
यालागी संतासी जावे लोटांगणी ।
रिघावे शरण मनोभावे ॥२॥
संताचिये कृपे विषयमळा नाश
सापडे अविनाश परब्रह्म ||३||
बहेणि म्हणे संत देव हे प्रत्यक्ष
का रे न घ्या साक्ष मनामाजी ||४||

२३३
संतसंगे योग संतसंगे याग
संतसंगे प्रयोग जोड़े मना ।।१।।
यालागी आवडी धरावी संतांची ।
प्रत्यक्ष मोक्षाची वाट हेचि ॥२॥
संतसंगे तीर्थ संतसंगे क्षेत्र
संतसंगे मंत्र सिद्धि जोडे ।।३।।
बहेणि म्हणे संतसंगे जोडे
ज्ञान संतसंगे मन स्थिर होय ||४||

२३४
संत देखता दृष्टी ।
वृत्ति जाली उफराटी ।
हारपल्या अवघ्या गोष्टी ।
पडिले मौन ॥१॥
दृश्याचे लोपले भान ।
द्वैताचे उठले ठाण ।
ब्रह्मानंदसुखे गगन
भरोनी ठेले ||२||
मनासी जाहले ठक ।
डोळीया पडले टक ।
देखोनि अखंड एक
स्वरूप डोळा ||३||
शब्द निःशब्द झाला
निवृत्तीसी सामावला |
सुमनाचा ध्यास तुटला
जयाचे ठायी ॥४॥
बहेणिस लागता संतसंग
संतप्रेमा अंतरंग सकळाचा
होऊनी भंग अखंड ठेली ॥५॥

२३५
आजि माझा जन्म सफल गे
माये संतसज्जनांचे देखियले पाये ।
त्यांचे चरणरजे देहभार जाये ।
सुख हे होय अनिवार ।।१।।
आजि माझे भाग्य फळासी आले ।
साधुसंतांचे पाय देखिले ।
सप्रेम या देही दाटले
सुख सुखावले सहजची ॥२॥
एकपणे होते अनेक झाले
पाहाता विश्वाकार विस्तारले ।
वटबीजन्याये कैसे विरूद्धले
सर्व होउनी ठेले माझी मीच ॥३॥
आले गेले अवधान नाथिला भ्रम
आजवरी प्रकृतीने केला हा धर्म ।
रज्जुसर्पन्याये मिथ्या जाला
भ्रम देखता चरणरज नाचे ||४||
बहेणि म्हणे तेणे अहंपण
माझे संसारदुःख रिले थोझे
तुकाराम मेटला धन्य जिले
माझे कृतकृत्य जाते सहजची|५||

बोधपर
२३६
पाचाचे उसने घेऊनी शरीर
आलासी ते सार ब्रह्म साधी ॥१॥
कासया काबाड वाहतोसी ओझे ।
लटिके ते तुझे नोव्हे रया ||२||
अस्थि मांस त्वचा नाडी आणि
रोम ज्याचे त्यासी वर्म समर्पावे ॥३॥
लाळ मुत्र स्वेद शुक्र हे शोणित ।
आपाचे हे सत्य गुण पाच ॥४॥
क्षुधा तृषा निद्रा आळस मैथुन
तेजाचे गुण जाण पाच ॥५॥
धावन वळण निरोध आकोचन
पाच गुण जाण वायूचे हे ||६||
राग द्वेष भय लजा आणि मोह ।
पाच गुण होय आकाशाचे ।।७।।
ऐसे हे पंचवीस पाचाचे जाणून ।
ब्रह्मप्राप्ति जाण साधी पा रे ।।८।।
ऐसे हे शरीर घेऊनी आलासी
साधी आत्मयासी येथे बापा ॥९॥
बहेणि म्हणे नको भुलो त्या अनित्या ।
वोळखोनी सत्या राहे पा रे ।।१०।।

२३७
शरीर असत्य पहाता विवेके ।
त्याची सुखदुःखे कोण मानी ||१||
सत्य हा निर्धार ज्ञानियाचे मत
अकळ शाश्वत चित्त ज्याचे ॥२॥
प्रापंचिक सर्व असत्य वेव्हार ।
लाभालाभ फार कोण मानी ॥३॥
बहेणि म्हणे जेथे त्रिपुटीच नाही
प्रारब्ध ते काई तेथे सत्य ॥४॥

२३८
आकार विकार निमाला विचार
एक निरंतर निर्विकल्प ॥१॥
त्वंपद तत्पद असि पदातीत
अनादि अनंत अरूप ते ||२||
ज्ञान ना अज्ञान अभाव ना भाव
आनंदासी ठाव मूळ नसे ||३||
बहेणि म्हणे जो हा इतुका
तितुका सूचि सर्व लोका अंत ॥४॥

२३९
मरण न यो म्हणतो रे नर
मरण न यो म्हणतो स्वानुभविक
सुख नाही जयासी विषयी जो रमतो ||१||
स्त्री सुत धन दुहिता प्रिय
ज्यासी भ्रमर जसा भ्रमतो ।
आवडि मान प्रतिष्ठा लौकिक
येथेची जो रमतो ||२||
राज्यसुखी राति आर्त मूर्छना
कामी लुब्धक तो जो व्यसनप्रिय
मद्य-परस्त्री-पट तास तो ॥३॥
वांच्छित इंद्रपद प्रमदासुख
त्यास्तव याज्ञिक तो बहेणि म्हणे
अरे ये स्थितीचा नर मृत्युभयास भितो ||४||

२४०
मृत्युभया न बिहे रे ज्ञानी
मृत्युभया न बिहे सिंधुवरी
जसे बुदबुद येती वाते त्या विलय ॥१॥
मायिक सर्व प्रपंचचि मिथ्या
कैचा त्या प्रलय स्वप्न जसे
प्रतिभासत मिथ्या देह तदन्वय हे ||२||
घृत जैसे थिजले विधुरे मग
तेचि पुन्हा घट ये रे ।
हेमाचे नग आटुनि हेमचि
काय तयासी भये रे ||३||
बहेणि म्हणे निज अनुभव ज्यासी,
द्वैतहि ते न थे देह पडो अथवा
न पडो परि अनुभवी प्रत्यासि लो ||४||

२४१
थोरपणा दूरी टाकूनिया जाण
संतांसी शरण जाय वेगी ।।१।।
तुझी सर्व चिंता हरेल चित्ताची ।
स्थिरता मनाची होय तरी ||२||
सर्वभावे शरण रीघ तू संतासी
ज्ञानाभिमानासी टाकूनिया ||३||
बहेणि म्हणे संत दयानिधी खरे
चित्ताच्या निधरि सेवी बापा ॥४॥

२४२
योगयाग भोगत्याग देहासी दंडन
जपतप अनुष्ठान नामेविण विटंबण ॥१॥
ते हे जपा नाम तुम्ही सुखाचे निधान ।
हरतिल भवयातना तुटेल जीवाचे बंधन ||२||
उपास पारणे जरि ते जाले मौनी नम
पंचानी धूम्रपानी मिथ्या अवधे नामेविण ॥३॥
बहेणि म्हणे नाम नाही ज्याचे मुखी
नातळावे त्यासी सत्य जाणावा सुतकी ॥४॥

२४३
जरी जाला भाग्यवंत ।
धनधान्यसंपन्न अद्भुत
भगवंती नव्हे जयाचे
चित्त तरी तो यथार्थ सुतकी ॥१॥
न वजावे तयाचे घरा नातळावे
घरदारा जळो त्याची द्रव्यदारा
पापी खरा सुतकी ॥२॥
कन्यापुत्र कनकसंपन्न ।
सोयरेधायरे धनवंत जाण
भगवंती जयाचे विमुखपण
तरी तो जाणा सुतकी ||३||
जरी जाले वेदज्ञ पंडित
शास्त्राभ्यासी तत्त्वार्थ
भगवंती नसे जयाचे चित्त
तरी तो यथार्थ सुतकी ॥४॥
जरी झाले ज्ञानी आणि महानुभाव
पूर्णपणे जरी देखिला
देव नामपाठी जयाचा
अभाव तरी त्या नाव सुतकी ||५||
बहेणि म्हणे निवृत्ति कारण
नाम-पाठी ठेविले मन हरावया
देहदोष जाणं हरिकीर्तन करिते ॥६॥

२४४
नलगे घ्यावे सोंग टोपी-मुद्रा धरणे ।
भक्ति ही कारण असो द्यावी ||१||
तेथे सर्व सिद्धि नांदती स्वभावे ।
आपुलाल्या देवे घ्यावे येथे ॥२॥
नलगे योगयागे नलगे भोगत्याग
असावा अनुराग भक्तिसवे ॥३॥
नलगे जप तप दान तीर्थाटणे ।
भक्ति असो देणे बेक गाठी ।।४।।
नलगे ज्ञान ध्यान नम्र पे हिंडण ।
भक्ती है कारण असो द्यावी ॥५॥
बहेणि म्हणे आम्हा भक्ती तेचि
मुक्ति ऐशा वेदश्रुति गर्जताती ।।६।।

२४५
जोहरियापासी न चले खोटे
कुडे तैसे संतांपुढे मन मग ॥१॥
आपणचि कळे भल्याचे लक्षण ।
नलगे पुसणे येरयेरा ।।२।।
मन मुरोनिया जे जे वर्तणूक
आपणचि देख उमटे आंगी ॥३॥
शांती क्षमा दया डोलती सर्वांगी ।
नुरे उपभोगी वासना काही ||४||
भागलीया दोरा भेटे पाणी-छाया
मुरकुंडी त्या ठाया मिठी मारी ।।५।।
मारिता ढळेना उठविता उठेना ।
बहेणि म्हणे जाणा तैसे मुख ॥६॥

२४६
गुरु ते जाणावे समुद्रासारिखे ।
कदाकाळी देखे नुचंबळती ।।१।।
ऐसे ते जाणावे सद्गुरू वेव्हारे।
कल्पांती न सरे निजधन ॥२॥
संत ते जाणावे धैर्यमेरूपरी
पडता नभ वरी दळती ना ॥३॥
संत ते जाणावे प्रेमाचे सागर
उदार गंभीर ज्ञानघन ।।४।।
संत ते जाणावे पूर्ण वेदमूर्ती ।
कर्मब्रह्मस्थिति उसावली ॥५॥
संत ते जाणावे वैराग्य विरक्ति ।
तिळ ते आसक्ति विषयी नाही ||६||
संत ते जाणावे उदासीन वृत्ति ।
द्वंद्वातीत मूर्ति लीनरूपी ||७||
संत ते जाणावे क्षमेचे सागर ।
दयेचे आगर शांतिवेषे ||८||
भूतकृपा वसे ब्रह्म सर्व असे
संत ते मानसे वोळखावे ||९||
तीर्थ देव यात्रा करिती उत्छाव ।
तेचि संत राव कलीमाजी ||१०||
आहारी वेव्हारी इंद्रियांचे द्वारी
युक्त जे निर्धारी तेचि संत ।।११।।
बहेणि म्हणे ऐसी गुरूची पारखी ।
शोधूनिया सुखी होय शिष्य ।।१२।।

२४७
स्वरूप स्थितीचे ज्ञान
वेगळे ते लक्षण पहावे पै
आत्मज्ञान स्वरूप स्थिती ॥१॥
पंचीकरण महावाक्य। पहावे
उपनिषदभाग स्वरूपस्थितीचे
पै अंग कळेल तेव्हा ॥२॥
धरावी हे उपासना आठवावे
नारायणा न सोडावे
गुरुचरणा साधन हेची ||३||
नित्य हे सारावे कर्म ।
जया जैसा वर्णधर्म नैमित्य
सारावा राम स्वरूप स्थिती ।।४।।
बहेणि म्हणे शांती क्षमा
वोळावी भूतकृपा जाणा ।
दया पाहिजे करुणा ।
भगवंत तोची ॥५॥

२४८
परिवरि ष संताचा भीतरी
भ्रमकस इंद्रियांचा ।।१।।
ऐसे संत जाले कली
बोले बोल तो न पाळी ||२||
सभा देखोनी धरी मौन
मागे भुंके जैसे श्वान ॥३॥
तोंड देखोनी बरवे बोले
मागे जगझोडीचे चाळे ||४||
बहेणि म्हणे हे भांड
अशास कोठे व्याली रांड ॥५॥

२४९
लटिक्याचे अवंतणे जेविलिया
साच तयाचा विश्वास काय खरा ॥१॥
ऐसे शब्दज्ञान सांगती उदंड
करणीचे लंड मतवादी ॥२॥
खांबसूत्री घोडे राऊत नाचती
काय ते झुंजती रणामाजी ||३||
दश अवतारी दाखविती सोंगे ।
काय होती अंगे रामकृष्ण ||४||
बहेणि म्हणे तैसे लढकियाचे
जिणे दिसे लाजिरवाणे बोलताची ॥५॥

२५०
सद्गुरूचे नाम नाही ज्याचे मुखी ।
तो जाणावा सुतकी सर्व काळ ।।१।।
ऐसे ते जाणावे गुरुद्रोही अभक्त
केला तो परमार्थ वाया जाय ||२||
सद्गुरूचा महिमा न बोले वो
वाचे पूर्वज तयाचे अधोमुख ॥३॥
सद्गुरुपदार्थ न करी उच्चारण
जाणावे ते श्वान जन्मा आले ||४||
कुलगुरू कुलदेव विद्या जो शिकवी
त्यासी जो नाठवी तो अन्य बीज ॥५॥
माता आणि पिता सद्गुरू भयहतां ।
त्यासी नाठविता पातकी तो ॥६॥
जाती है विजाती गुरू हो का कोन्ही ।
लोपी जो या जनी हत्या त्यासी ॥७॥
बहेणि म्हणे आम्हा गुरू ‘तुकाराम’।
सदा नाचो प्रेमगीती गाता ॥८॥

२५१
असावे स्वधर्मे जाणावे ते वर्म ।
जेणे कर्मब्रह्म हातवसे ||१||
तेव्हा ते आतुडे ब्रह्म सर्वगत
भूती भगवंत सर्व होये ||२||
कर्म आणि ब्रह्म वेगळे न भासे
तथा कर्म दिसे ब्रह्मरूप ॥३॥
बहेणि म्हणे ब्रह्म बळे भावितां
कर्म अधःपाता घालील देखा |१४||

२५२
वेदासी विरुद्ध म्हणे आत्मज्ञानी
पडला तो पतनी रीरखाचे ।।१।।
ऐसे ते चांडाळ न पडावे दृष्टी ।
ज्यांच्याने हे कही उभय कुळे ।।२।।
वेदासी विरुद्ध असता सर्वथा
अनर्थ परमार्था हाचि येकृ ||३||
बहेणि म्हणे त्याचे जळो आत्मज्ञान ।
त्याने नारायण वैरी केला ||४||

२५३
कर्म-ज्ञान- उपासना करिती त्रिकांड ।
चालिला प्रचंड भक्तीवरी  ||१||
ऐसा हा अनुभव जाणते जाणती ।
तया पुनरावृत्ति नाही नाही ॥२॥
भक्ति आणि ज्ञान बैराग्य
विज्ञानः कर्मण वेद बोले ॥३॥
ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ वानप्रस्थ ।
चौथा तो संन्यास बेदांवरी ॥४॥
गुरु शास्त्र आणि तिसरी आत्मप्रचीति ।
चालिल्या निरुक्ति वेदांमाजी ॥५॥
बहेणि म्हणे जया वेद मान्य जाला ।
ब्रह्मी होऊन ठेला तोचि एक ॥६॥

२५४
साधके ते कर्म साधावे ते ब्रह्म
या दोहींचाही धर्म वेदांमाजी ॥१॥
ऐसी ज्याची क्रिया तोचि ब्रह्म जाणा ।
ब्राह्मण या नामा म्हणती बापा ॥२॥
साध्य आणि साधन साधिता हे
तिन्ही अवघे देवाचेनि बळिवंत ॥३॥
बहेणि म्हणे देव ॐकार सर्वांचा
तेथेचि वेदांचा पसारा दिसे ॥४॥

२५५
पृथ्वी आप तेज वायू पै गगन
विस्तार हा जाण वेदान्वये ।।१।।
अणूच्या प्रमाण नाही वेदावीण
एवढे ब्रह्म जाण कोठे वसे ॥२॥
एकवीस स्वर्गे दश दिशा पाताळ
अवघा भूगोल वेद जाणा ||३||
बहेणि म्हणे वेद सर्वांचे हे
मूळ स्वरूप केवळ वेद होय ॥४॥

२५६
जिही या वेदांचा केला मानभंग ।
नव्हे तोचि मग ब्रह्मज्ञानी ।।१।।
दोहीकडे जया जाली नागवणी ।
पडिले पतनी जन्मोजन्मी ॥२॥
वरी वरी जगडंब दावी लोकाचार
भीतरी साचार मांग जैसा ॥३॥
बहेणि म्हणे त्याचे न घडावे
दर्शन घडता पै पतन रोकडेचि ॥४॥

२५७
विषय ब्रह्मरूप तेव्हा सत्य होती
जे लाभे आत्मस्थिति स्वस्वरूपी ||१||
तेव्हा तो जाणावा ब्रह्मनिष्ठ खरा ।
नातळे विकारा देहबुद्धि ॥२॥
इच्छा मावळेल अहंता गळेल ।
वासना विरेल स्वस्वरूपी ॥३॥
जिव्हा उपस्थाचा पडे ज्या विसरू ।
इंद्रियव्यापारू पारुषेल ||४||
बहेणि म्हणे वृत्ति जै पावेल निवृत्ति ।
विषय तेव्हा होती ब्रह्मरूप ॥५॥

२५८
आगम तो कैसा विचारूनि
पाहे सद्गुरुचे पाय धरोनिया ।।१।।
गुरुकृपेवीण साधिसी आगम
तरी तो दुर्गम होय तुज ॥२॥
सत्रावीचे जीवन तेचि प्रथम जाण ।
द्वितीयेची खूण इंद्रिय शुद्धि ॥३॥
मनःशुद्धि तेची तृतीय पै जाण ।
सोहं मंत्रज्ञान चतुर्थ ते ॥४॥
पंचमी ते जाणा पंचम अवस्था
भोगुनी मोक्षपंचा जावे तुवा ।।५।।
सत्य सांगितला आगम तो
हाची चुकू नये येथींची वर्मखूण ||६||
रसनाविषयावरी ठेवुनिया चित्त ।
आगमी म्हणवीत जनामाजी ||७||
वर्म चुकोनिया आचरती आगम
जना म्हणती सुगम मार्ग हाचि ॥८॥
ते गुरु न म्हणावे सत्य वेद-वाणी
वेद-विरुद्ध करणी काय काम ||९||
आगमी तो जाणे आगमाची कळा ।
इतर ते गोंधळालागी करिती ॥१०॥
बणि म्हणे साधी गुरुवचने आगम
नाहीतरी श्रम पावसील ॥११॥

२५९
कोणी एक म्हणती मायाचि
प्रमाण ऐसे हे वचन नाइकावे ||१||
होई सावधान पाहे निरखून
सांगता हे मन घाली बरे ||२||
समन्ब्रह्म म्हणती करिती संकर
ऐसे ते पामर जाणा येथे ||३||
विषयसुखमुक्ति मान ते मुक्ति ।
ऐसे जाणा चित्ती पापदेही ||४||
माता आणि भगिनो स्वपत्नीसमान ।
ऐसे एक ज्ञान पतनवासी ॥५॥
अवधे ब्रह्म जेथे कैचा धर्म तेथे
आचरती मते चांडाळाची ॥६॥
मद्यमांस एका पूजनी प्रधान ।
सत्कर्माची आण असे तथा ।।७।।
अधर्म अकर्म अनाचार पाहे
हा जयासी आहे कुलधर्म ॥८॥
रजस्वला मांगी दैवत जयाचे
ऐसे ये कलीचे ज्ञान पाहे ।।९।।
सत्याचा कंटाळा हिंसेचा पसारा
कंटक तो खरा विष्णुदास ||१०||
वरिवरी टिळेमाला राम उच्चारिती ।
लौकिक राखिती गेंद जैसे ।।११।।
बहेणि म्हणे ऐसे जाणावे ते लंड
न पाहावे तोंड स्वप्नी त्यांचे ॥१२॥

२६०
सूर्याचिया योगे वर्तत हे जन
लागे त्यासी कोण क्रिया त्यांची ||१||
तैसा जाण आत्मा करुनि अकर्ता ।
वोळखावे चित्तामाजी संती ||२||
भ्रामका देखोनी लोहासी चलण ।
भ्रामकासी सीण काय त्याचा ||३||
चंद्र देखोनिया समुद्र उल्हासे ।
सोम तो आकाशी वेगळाची ||४||
बहेणि म्हणे पंचकारणां वेगळा ।
जाणती ते कळा संत कोन्ही ॥५॥

२६१
मी जेवी कमकणीचे पत्र
असोनी एक लिए नव्हे ||१||
तैसा देही जाग परी
तो निश्चित वेगळाची ||२||
तक्रामाजी जैसा लोणीयाचा वास ।
परी तो तपास वेगळाच ॥३॥
बहेणि म्हणे जैसा काष्ठामाजी
अन परी तथा भिन्न जाण तैसा ॥४॥

२६२  
घटपट नाममात्र व्योम
व्यापक सर्वत्र ॥१॥
तैसा विश्वी विश्वंभर
वोळखीजे परात्पर ॥२॥
पट पाहता तो भिन्न
तंतू तयासी अभिन्न ॥३॥
अलंकारी भेद होती ।
सोने सर्वांत निश्चिती ||४||
वापी कृप तडागात ।
रवि एकचि निवांत ॥५॥
बहेणि म्हणे भेदमान
अभेदचि नारायण ||६||

२६३
गुळाविण कैची गोडी
जाणी येईल आवडी ||१||
तैसा देव भावेवीण केवी
जाणावा आपण ॥२॥
पुष्पेविण न कळे वास
त्याचे ज्ञान पडे बोस ||३||
बहेणि म्हणे जनी देव
वोळखावा स्वयमेव ||४||

२६४
जन तेखि जनार्दन ।
ऐसे भुतीचे वचन ।।१।।
म्हणयोनी जनी आहे देव
विवेके तू पाहे ||२||
चंदनाचे खोडी आहे
सुगंध परवडी ||३||
बणि म्हणे जळी रस
तंतूमध्ये जी कापूस ॥४॥

२६५
मृगजळी तृषा हरे हे
तो वाउगी उत्तरे ||१||
तैसे नाशवंत देव
मानिलिया ज्ञान वाव ॥२॥
चित्रातील रवी ।
भावे अंधारे उगवी ||३||
बहेणि म्हणे दृश्य जाये ।
तेथे देव कैचा राहे ||४||

२६६
देव न लभे तानमाने
शब्दज्ञाने सर्वथा ॥१॥
संत समागमाविण
नारायण साधेना ||२||
देव न लभे तीर्थयात्रे
कुरुक्षेत्रे हिंडता ||३||
बणि म्हणे धर्म थोडे
मूर्ख बेडे जाना॥४||

२६७
संतसमागमी राहे ।
त्यासी काय उणे हो ।।१।।
पाहिजे ते निष्ठाबळ
हेचि अढळ मानसी ||२||
संत केवळ ते ज्ञान ।
निज खूण दाविती ॥३॥
बहेणि म्हणे संतापासी
सिद्ध दासी कामाच्या ||४||

२६८
मोक्ष संतांचे वचने
प्राप्त क्षणे तो होये ।।१।।
परी तुवा काया वाचा
करी साचा संकल्प ||२||
मागसी ते ते देती संत ।
निमिषात पै एका ||३||
बहेणि म्हणे दाते संत ।
हाचि अर्थ वेदाचा ॥४॥

२६९
संत पूर्ण कृपानिधि
स्थिर बुद्धि स्वरूपी ॥१॥
साचे वोळखावे चिन्ह
दया पूर्ण भूतांची ॥२॥
संत सदा तृप्त मनी ।
अनुसंधानी सर्वदा ||३||
बहेणि म्हणे पर
उपकारी दीनावरी कृपाळ ||४||

२७०
संतुष्ट मानसी सदा सर्वकाळ
हृदय निर्मळ जेवी गंगा ।।१।।
संत ते जाणावे ब्रह्मप्राप्ती लागी
धन्य तेचि जगी शरण त्यासी ॥२॥
सर्वभूती बुद्धि समान सारिखी ।
आपुली पारखी चिंतू नेणे ||३||
बहेणि म्हणे द्वैत हारपूनी गेले
अद्वैत बिंबले ब्रह्म डोळा ||४||

२७१  
आपुलिया दुःखे जैसे होती
क्लेश इतरांचे तास चिपरी ।।१।।
ऐसे जे जाणती आपुले मानसी
संत निश्चयेसी वोळखावे ।।२।।
पराविया सुखे सुख मानी मनी
देखे जनी बनी जनार्दन ||३||
बहेणि म्हणे तोय तैसे त्यांचे
मन संतांचे लक्षण हेचि एक ॥४॥

२७२
अमृतासी कोण घालील भोजन
किंवा त्या गगना पांघरूण ।।१।।
ज्याचे तोचि जाणे आपले
महिमान इतरांसी दूषण जाणावया ||२||
कुबेराचे कोण फेडील दरिद्र
किंवा तो समुद्र तृषा हारी ।।३।।
बहेणि म्हणे सूर्य प्रकासील
कोण पृथ्वीसी तुळण केवी घडे ।।४।।

२७३
एकपत्नीव्रत चालविले रामे
यथानुक्रमे ब्रह्मनिष्ठा ॥१॥
ज्याचे तथा शोभे येरा ते अलभ्य
जाणती हा गर्भ आत्मवेत्ते ॥२॥
परद्वारी कृष्ण लीलावेषधारी ।
भोगुनिया नारी अभोक्ता तो||३||
साठी खंड्या भक्षी दुर्वास ब्राह्मण ।
निराहारी पूर्ण ब्रह्मवेत्ता ॥४॥
क्रोधाचे माहेर देखा तो जमदग्नि ।
ब्रह्मनिष्ठ जनी त्यासी साजे ||५||
बहेणि म्हणे कळी लाविजे नारदे ।
ब्रह्मनिष्ठ बोधे निश्चयाचा॥६॥

२७४
त्रैलोक्य हिंडोनी भागली विरक्ति ।
फार तिथी शक्ति हीन जाली ॥१॥
मग तिचा केला अंगिकार संती ।
तेणे त्या महती थोर आली ||२||
भक्तिही सीणली कोन्ही अंगिकारा ।
न करिती निर्धारा को आले ॥३॥
बणि म्हणे धृती नाही तिसी
ठाव सांडोनिया गवं आली येथे ॥४॥

२७५
जपी तपी वृत्ती मौन्य अनुष्ठानी ।
साधिली पंचानि धूम्रपान ||१||
ऐसे नाना क्लेश पीडिती शरीर ।
परि निर्विकार चित्त नोव्हे ||२||
वायो साधुनिया निरोधिती प्राण
षड्चक्र भेदून आसनी ते ।।३।।
बहेणि म्हणे शुष्क शरीर करोनी
एक पर्णाशनी निराहारी ||४||

२७६
निर्विकार नोव्हे चित्त देवतीर्थी
हिंडलेती क्षिती जरी नाना ।।१।।
संत-समागमे शुद्ध होय चित्त ।
वासना विरक्त क्षणे होये ।।२॥
निर्विकार नोव्हे चित्त कर्मामाजी
गायी गज बाजी दिथलिया ||३||
बहेणि म्हणे याचे धर्म
संतसंगे से अंगे साधनाचे ॥४॥

२७७
तीर्थे केलियाने स्नान देहमळ ।
नासती सकळ निश्चयेसी ॥१॥
परी मनोमळ नाश नव्हे जाण ।
श्रीगुरुवाचून सत्य सत्य ||२||
प्रतिमा पूजलिया देहदंड जाला
सार्थकाला आला देह त्याचा ॥३॥
बहेणि म्हणे मन शुद्ध
निर्विकार होईल निर्धार गुरुकृपे ||४||

२७८
चित्तासी विवेक वैराग्य यावया ।
ज्ञान साधावया मूळ हेचि ।।१।।
सद्गुरूचा हस्त मस्तकी घेसील ।
तरी पावसील ब्रह्मपद ॥२॥
सर्वत्र समान ब्रह्म परिपूर्ण
व्यापक चैतन्य तेच होय ॥३॥
बहेणि म्हणे चित्त स्थिर तेच घडे ।
ब्रह्मत्व आतुडे रोकडेची ||४||

२७९
सद्गुरुवचनाचे करी अमृतपान ।
जन्ममृत्यु जाण नासतील ।।१।।
होसी तू अमर स्वामी इंद्रियांचा ।
मने काया वाचा शरण जाई ||२||
सद्गुरुचे तीर्थ अमृताची वाटी
नित्य सेवी तुटी नको आणू ॥३॥
बहेणि म्हणे जीवी होसील संतुष्ट ।
सद्गुरुवरिष्ठ पूजिलिया ॥४॥

२८०
काजळासारिखी कस्तुरीही काळी ।
गुणे ती वेगळी आपुलाल्या ॥१॥
जाणता तो जाणे दोहीचा
पारखी सगुण विवेकी ज्ञानवंत ॥२॥
तक्र आणि दूध वर्ण ते समान ।
परि वर्म भिन्न भिन्न त्यांचे ॥३॥
बहेणि म्हणे गारा परिसही
शुभ्र नीर आणि अभ्र समत्वची ॥४॥

२८१
आपुले कल्याण इच्छिणे जयासी ।
तेणे या नामासी विसंबो नये ||१||
करील मनीचे परिपूर्ण हेत ।
पाहिजे हे चित्त नामापाशी ॥२॥
मुक्ति आणि मुक्ति जोडतील
सिद्धि होईल का वृद्धि अपरिमित ।।३।।
बहेणि म्हणे पहा जपोनिया
नाम पुरतील काम जो जो ॥४॥

२८२
भाजी घेणार केल्याचा
काढा मागतो केळाचा ॥१॥
मूर्ख न विचारी चित्ती ।
मनी इच्छितसे मुक्ती ॥२॥
तुळापुरुष गाजराचा
मार्ग लक्षी वैकुंठीचा ॥३॥
बहेणि म्हणे भांबावला
मूर्ख जनाचिया बोला ||४||

२८३
मायेची निवृत्ति केली जब नाही
आत्मतत्व ठायी पडे केवी ॥१॥
बालागी सद्गुरु सेविती सज्ञान
मायेचे निर्शन करावया ॥२॥
द्वैताचा हाराश केला जब नाही
आत्मतत्व ठायी पडे केवी ||३||
कल्पनेचा ठाव पुसिला जब नाही
आत्मतत्व ठायी पडे केवी ||४||
भ्रांतीचे हे स्थान छेदिले जब नाही
आत्मतत्व ठायी पडे केवी ॥५॥
अहंकार देहीचा गेला जब नाही
आत्मतत्व ठायी पडे केवी ।।६।।
बहेणि म्हणे ज्ञान साधिले जब नाही
आत्मतत्व ठायी पडे केवी ॥ ॥७॥

२८४
कर्ममार्ग एक भक्तिमार्ग दुजा
अभ्यास तो तिजा वोळखावा ॥१॥
साधावे स्वहित आत्म- अनुभव ।
सुखाची राणीव भोगी कारे ।।२।।
एक तो हटयोग दुसरा विषयत्याग ।
तिसरा योगमार्ग वोळखावा ।।३॥
बहेणि म्हणे आत्मा साधितो हा
मार्ग सांगितला सांग आत्मप्राप्ती ॥४॥

२८५
अचेतन कर्म सचेतन ब्रह्म
वोळखीजे धर्म दोहींचाही ॥१॥
मग तो ब्राह्मण बोलिजे निश्चित
सावधान चित्त सर्वकाळ ||२||
मन बुद्धि चित्त अहंकार सर्व
वोळखोनी पूर्व कर्म करी ॥३॥
बणि म्हणे कर्म-कर्तव्य वोळखे ।
ब्राह्मण विवेके वोळखीजे ||४||

२८६
श्रीबीज संयुक्त पांडुरंग मंत्र
जपता पवित्र महापापी ॥१॥
नाही या संदेह पहा वेदशाख ।
गुहा है सर्वत्र सांगितले ॥२॥
पाठिमोरा देव होईल सन्मुख
अंतरीचे दुःख निवारील ||३||
दुन्हावला मोक्ष येईल जवळी ।
फिटेल काजळी मानसाची ||४||
पापाचे पर्वत क्षणे होती दग्धा
ज्ञानाचा उद्बोध होय चित्ती ॥५॥
बहेणि म्हणे नका पाहू रिद्धिसिद्धीसी
जपे जो तपासी फळे आधी ॥६॥

२८७
एकांती आसन घालुनिया शिव ।
ब्रह्मादिक देव ध्याती जया ।।१।।
ते पाय आणिले चंद्रभागे तीरी ।
पहा डोळेभरी एक वेळा ||२||
असंख्यात जन्म केले अनुष्ठान
नकळे ब्रह्मज्ञान जालेवाही ||३||
बहेणि म्हणे पायी सर्वांची उत्पत्ति ।
अंती साठवती भूतमात्रा ||४||

२८८
आश्रमाचे धर्म चालविल्यावरी
शुद्ध ते अंतरी चित्त होय ||१||
तेणेचि वैराग्य मनासी ठसावे ।
श्रवण मनने होय मोक्ष तथा ॥२॥
आश्रमाचे योगे सर्व सिद्धि
धरा होईल अंतरा एकनिष्ठा ||३||
बहेणि म्हणे काय नव्हे या
आश्रमी पाहिजे स्वधर्मी एकनिष्ठा ॥४॥

२८९  
कलियुगी घोर पाप हे खतेले ।
स्वधर्म सांडिले चहूवर्णी ।।१।।
बळी पै मोहाचे माहात्म्य वा जेथे ।
गुरुशिष्य तेथे एक होती ||२||
धनाचिया चाडे पुराणपठण
वेदांतश्रवण धनालागी ||३||
दाटोनिया एक देती उपदेश |
धरोनिया सोस कांचनाचा ||४||
वेदाज्ञेकरोनी न करिती स्वहित
नव्हती अतीत देहाहूनी ॥५॥
एक स्त्रियांलागी उपदेश करिती ।
अंतरी लुलती रतिसुखा ||६||
बहेणि म्हणे नका घेऊ त्यांचे
नाम मुखी स्मरा राम सर्वकाळ ॥७॥

२९०
सर्पाचे सारिखा दोर आहे
जरी देखलियावरी सर्प जाला ।।१।।
तोचि निश्चयाने पाहिलियावरी ।
वस्तु तेचि खरी वस्तुरूपे ॥२॥
शिंपीची झगमगी रुपेचि वाटते
मृगजळे भरते भूमंडळ ॥३॥
स्तंभ हा पुरुष नये निश्चयासी
खोटी मुद्रा जैसी खरी वाटे ॥४॥
करणीचे रत्न देखियेले डोळा ।
सारविला निळा काच भूमी ||५||
बहणि म्हणे ऐसा ज्ञानेचि हाराश ।
साधन ते त्यास विवेकाचे ||६||

निवृत्तीपर
२९१
अष्टधा प्रकृति तेचि या गोपिका ।
अष्टभाव देखा गोपाळ हे ।।१।।
क्रीडती गोकुळी सदा या शरीरी ।
स्वानंदे निर्भरी परमानंद ।।२।।
इंद्रियगोधने विषय-तृण
घरे तुमती अपारे जिये ||३||
गोरसाचे मेरे निजसत्त्वे अखंड संचले ।
सुखे सुखावले स्वानुभवे ||४||
तेणे सुखानंदे नाचती गोपाळ
करिती गदारोळ गोपिका त्या ॥५॥
बहेणि म्हणे जेथे कृष्णाचा अवतार
तेथे व्यभिचार स्वप्नी नाही ॥६॥

२९२
गौळणी-रंगणी परब्रह्म खेळतो ।
गोमयी रुळतो बाळकृष्ण ॥१॥
क्षीरसागरीचे सुख सांडोनी परते ।
अनुसरला येथे भक्तीलागी ॥२॥
नवल हे आवडी न कळे निजवर्म ।
बेडावले ब्रह्म भक्तीलागी ॥३॥
अश्वमेधादिक यज्ञाचे आते
न पाहे तयाते आनुमान ॥४॥
तो हा गोपाळा-करीचे उच्छिष्ट
अन्न खावया लागून वाट पाहे ॥५॥
वेद श्रुती वर्णिता न घेचि पे चित्ती ।
श्रमलिया म्हणती नेति नेति ॥६॥
बहेणि म्हणे फुका सापडला
हरी प्रेमदोरी गळा लावू ||७||

२९३
गौळणीबाळा देखियला डोळा
गोविंद साला बायांनो वेधलीसे ||१||
वृत्ति लागली हे स्थिति
गोरस हा चित्ती विसरल्या ||२||
माझा हरि घ्यावा माझा हरि घ्यावो ।
अंतरीचा भावो पालटला ॥३॥
शरीरभावाच्या पहिल्या बिसरी
गोरसासी हरी म्हणताती ॥४॥
हरीच्या या केशा पडियेल्या
छंदी हिंदी विदोबिदी बाजारेसी ||५||
बहेणि म्हणे जया गोरसाची भूक
तयासी हरीचे सुख काय कळे ॥६॥

२९४
देहघट लवंडोन रिता केला ।
निजज्ञाने पाणीया भरिनला ||१||
कैसी चाले दमकत जो हे बाळा
अंतरीची वेगळी प्रेमकळा ॥२॥
ज्ञानगंगे यमुने भरी पाणी
ऊर्ध्वदृष्टी लक्षी त्या चक्रपाणी ||३||
सोहं दुडी वाहोनी चाले धीर ।
मी तूपण मोकळे चारी पदर ||४||
सुखे स्वरूपी लागली निजगोडी ।
तेणे घरचा अहंकाररांजण फोडी ||५||
सारोनिया वाच्यांश-खडा थोर
लक्षुनिया सुक्षण हाणे वर ||६||
तेणे मिसे ते जूट जाली नारी ।
मग बोले वरिवरी लोकाचारी ||७||
ऐशा करिता मुकली बेरझार
मग देव मांडिला संगिकार ||८||
बहेणि म्हणे लाधले सुखे सुख ।
जैसे जीवनी लवण समरस ||९||

२९५
उठा चला जाऊ गे तेथवरी जेथे
नांदे आमुचा आत्मा हरी ||१||
कैसा छंद लागला तथा नारी ।
परपुरुषी अखंड दृष्टी वरी ||२||
कामाधामा विसरू कैसा जाला ।
कृष्णप्रेमा तो अंगी उसावला ||३||
विसरल्या देहभाव जेथे तेथे
पहा कैसे व्यापिले कृष्णनाथे ॥४॥
बणि म्हणे वेधल्या कृष्णवाणी
त्याही गाइल्या वेदशास्त्रपुराणी ॥५॥

२९६
शब्द त्या आरता लक्ष त्या
परोते लक्षालक्ष जेथे मन जाले ॥१॥
तेथे काय आता पुसणे सांगणे ।
भलते आपण जाणताती ||२||
ज्याचे जितुके ज्ञान तितुक्यासी
देव शब्दाचा निर्वाह आरुताची ||३||
आतुरासी बोलता कैचे समाधान ।
म्हणोनिया मौन धरिता मले ||४||
पाहावे ते एक सीत चाचपोनी ।
अवधे घाटोनी कोण सिद्धी ॥५॥
बणि म्हणे अवच्या वासनेच्या
चेहा तेथे ब्रह्मनिष्ठा कासवाची ॥५॥

२९७
देहनगरी म राजा राज्य चालवी ।
आपुले दोषी खिया तयालागी निवृत्ति ।
प्रवृत्ति हे भले निवृत्ति ज्ञानाची कन्या ।
प्रवृत्ति अज्ञानी वोतले सवतीमत्सर ।
दोघी तथा भांडण लागले ॥१॥
ऐका सावध श्रोते तुम्ही करा ।
निवाड दोषींचा मांडती त्या परोपरी ।
थोर गर्जताती वाचा निवृत्ति न बीहे ।
कोणा मन भोगी प्रवृत्तीचा तयाचिया ।
बळे दोघी वर्म काढती है साच ॥२॥
प्रवृत्तीने व्याप केला पुरे पठणे ।
बसविली देश दुर्गे नानापरी राया ।
पाडियेली भुली पुत्र कन्या प्रजा कैसी ।
येकायेकी प्रसवली। लावण्य दाविले ।
मना प्रवृत्तीने ख्याती केली ॥३॥
प्रवृत्ति- “सर सर वेडिये बाई ।
तुझे नामचि निवृत्ति येथे तुज ।
ठाव कैचा” घाली बाहेर प्रवृत्ति ।
निवृति- “ऐक वो तू म्हणणे ।
माझे ऐक वचन तू बाई ।
मुठा मीच आहे पाही ॥४॥
पठराणी माझे नाव रावो विसरला ।
देही देखोनी लावण्य तुझे भ्रम ।
जालासे कायी जाय वो तू परती ।
होय तुझे लावण्य लटिके अज्ञान हा ।
पिता तुझा मुळी पाहे आधी निके” ॥५॥
प्रवृत्ति प्रवृत्ति हैं काय बोले ।
“ऐक वचन सवती ब्रह्मादिक बाले माझी ।
ऐसी नेणसी तू ख्याती रविचंद्रादि ।
देव अवघे माझ्या गृहात असती ।
सनकादिक माझे नातू ।
ऐसे कळो तुझे चित्ती” ||६||
निवृत्ति- “आम्ही भारी पठाचिया ।
अखंड रायाचे शेजारी घरचार ।
करावया दाही घातली बाहेरी।
ब्रह्मादिक चाळे पाळीं ।
पठराणी येईल सरी चंद्रसूर्यादिक ।
तेही माझे सत्तेने निर्धारी ” ||७||
प्रवृत्ति-“तू तव पठाची खरी ऐसे ।
बोलसी वचन रावणाने सीता ।
नेली ते का न चाले मजविण ।
दंभाची स्त्रिया केली एवं ।
मिथ्या तू वो जाण प्रवृत्ति मी ।
थोर गाढी नाही नाही मजविण ॥८॥
निवृत्ति-“ऐके वा विदेह माझा ।
पिता ज्ञानी हा समर्थ होता मी ।
रामाचपासी यज्ञ करावया तेथ ।
परी मी अदृश्य रामीं तू वो ।
नोळखसी सत्य तुझे अंग क्रिया ।
माझी तुम्हा सर्व साक्षभूत “||९||
प्रवृत्ति-“एक वो का बोलतेसी ।
मुझे संगे सुख नाही म्हणउनी म ।
प्रवृत्तीची माळ घातली पाही ।
अवतारही कृष्णादिक मजसाठी ।
कष्टी तेही कासया बोलसी व्यर्थ ।
अदृश्य हे मिथ्या देही” ॥१०॥
निवृत्ति- “उन्मनी हे नाम माझे ।
मज निर्गुणाचा संग सगुण आरते ।
बाई मी तव अव्यय अभंग ।
प्रवृत्ति है माझी सत्ता मना ।
लागला झोटिंग मनपण आले ।
मना माझिया आलेसे बघ” ||११||
प्रवृत्ति-“ऐक वो निवृत्ति एक ।
तुझे स्थळ येथे कोण इतुके सांगे ।
मज मी जो जाईन येथून ।
कन्यापुत्रासमवेत राज्य टाकून ।
जाईन वासी जरी मिथ्या होय ।
तरी रायाचीच आण” ॥१२॥
निवृत्ति-“निरंजनवन स्थळ माझे
निवृत्तीचे आहे भाऊ माझा ।
परमार्थ यासी मिथ्या बाई नोव्हे ।
भाव आणि निजबोध पुत्र ।
कन्या ज्ञानाची हे बोलो जाय ।।१३।।
प्रवृत्ति “निवृत्तीसी शब्द नाही निरंजनी
पाहे बाई परादिक बाचा फिरे ।
तरी येथे तुझे काई बोलसी जिये ।
याचे ते तव प्रवृत्तीचे आहे तापी ।
तुझे बाई काय येथे हो स तु देही ||१४||
निवृत्ति कुंठित झाली प्रवृत्तीने निकियले
त एक आठवले तुझे माहेर वहिले।
निवृत्ति “सांग यो मजलागी मायबाप
कोण बोले इडुके सांग वो ।
बाई खरे खोटे तेथे कले” ||१५||
प्रवृत्ति- “अज्ञान हा पिता ।
माझा अहंकार पूर्वज मोहो ।
काम क्रोध पुत्र कन्या आशादिक ।
मज क्षेत्र है हो घर माझे ।
काय पुसतेसी मज जाय तू येथोनी ।
आता नये बोलता लाज” ।।१६।।
निवृत्ति “घर जेव्हा तुझे तेव्हा ।
कोठे तू सहसी अज्ञान हे पजे जैसे
रवि प्रकाश समासी मनपण मन ।
सांडी ते तू कोठे गे बाई हागवण
गेलीमग कैचा ठावो कडतरासी ।।१७।।
बरे तो सवतीबाई मन जेव्हा विषयी ।
विटे तेव्हा सांडिले प्रवृत्ति तुज तव।
देसवटा आला, ऐसे जाण चित्ती बोलसी ।
ते शब्द वाया जाय परती प्रवृत्ति ।।१८।।
प्रवृत्तीचे भान मिथ्या ज्ञान पाहसी जरी ।
बाई अज्ञान ही ज्ञान दोन्ही जाली ।
स्वरूपाचे ठायी अज्ञाना ठावो नाही ।
मी हे आहे कोण कायी इतुकेनिच हे ।
आहे आधी शरण रिघे गुरुपायी ।।१९।।
प्रवृत्ति प्रवृत्ति मानली गोठी ।
म्हणे “निवृत्ति बहेणि तुम्ही आम्ही ।
नांदी येथे सुखे सुख मनपणी गुरू तो ।
कवण तेथे मज सांग वो निर्वाणी शरण ।
मी आले तुज जोडूनिया कर दोन्ही “||२०||
निवृत्ति- “ऐक वो वचन येक प्रवृत्ति ।
हे तुझे नाव प्रवृत्तीचा धर्म तोचि ।
भ्रतारासीच भजावे मनाचे तू धरी ।
पाय सुख पावसी स्वभावे हे मन ।
उन्मन पदाते। ज्ञाने पावसील देवे” ||२१||
मी हे कोण आठविता नामे प्रवृत्ति तत्त्वता ।
मनचि उन्मन जाले ठेविताचि चरणी ।
माथा सवतीचा द्वैत गेला अवधी ।
निवृत्ति तत्त्वता। येकरूप दोघी
झाल्या सवती भांडता भांडता ॥२२॥
बहेणि म्हणे प्रवृत्तीत अवधी
निवृत्ति आहे अज्ञानाचे मूळ सांडी
आपणचि द्वैत जाये विकल्प हा
स्वये तुटे तेथे द्वैत कैचे राहे सवती
त्या एकरूपा मनपणी मन आहे ।।२३॥

२९८
ऐका तुम्ही भाविक सज्जन काही एक बालकवचन ।
आत्म्या कावे लागले भांडण साधुसंती द्यावे निवडून ।।१।।
काया म्हणे आत्मयासी “पाहे मज स्वामी मोकलिसी काये ।
हे तो तुज उचित पै नव्हे। आधी बरे विचारी का है ।।२।।
मर मर आत्मया रे नष्टा मज येथे सांडिसी पापिष्टा”
येरू म्हणे “ऐक काये माझे देह तब लटिके सहजे ||३||
आत्मा अविनाश श्रुति गर्जे का या व्यर्थ भांडिसी सांगिजे ।
सोडी मज वेडिये अज्ञाने तुज मज वेगळीक ज्ञाने” ||४||
काया- “ऐके स्वामी आत्मया जिवलगा
मजसंगे सुख तुज की गा नानापरी सोनी
की गा सेखी मज सांडुनी जासी गा ॥५॥
आत्मा-“ऐक वेडे नाव हे समुद्री
प्राण्यालागी नेत पैलतीरी नाव राहे उदकी
जयेपरी तैसे तुज जाहाले सुंदरी ॥६॥
काया- “तुजमज वियोगचि नाही जाण्याआधी
सांगेन तुज पाही टाकावे हे उचितचि
नाही सेवा मजपासुनिया घेई” ॥७॥
आत्मा- “अश्वावरी पार्थिव बैसला नेउनिया
स्वस्थानी उतरला आंतरसुख काये,
प्राप्त त्याला अश्वा प्राप्त झाली अश्वशाळा”॥८॥
काया- “रतिसुख आत्म्या मजसी नानापरी
घेतले विशेषी इंद्रियद्वारे सुख घेसी
सेखी मज पापिष्टासांडिसी!” ॥९॥
आत्मा “लोहारासी अप्रिचाड आहे
म्हणउनिया फुंकिती उपाये
कार्य या टाकील सर्व है
जैसे मुझे काम आम्हा काये ||१०||
लोहोसंगे अन भासे परी पण
पडिती लोहाचेच शिरी ॥ तैसे तुझे संगती
माझारी असोनिया अलिप्त सुंदरी ” ।।११।।
काया- “आम्ही तव पतिव्रता
नारी स्वामी जाता जाळून
शरीरी तू रे तव नष्ट सर्वापरी
भोगुनिया चालिलासी वरी” ॥१२॥
आत्मा- “तुझे नाव पाहता तुकडी ।
तुज आम्हासंगती आवडी
निज आत्मा निर्गुण निर्वडी ।
जाय परती आहेसी बेडी ||१३||
तू काया- “मजआत कासया
वर्तसी अंती आम्हा सांडुनिया
जासी सुखभोग सर्वही तू ऐसी
अलिप्त है नाम मिरविसी” ।। १४॥
आत्मा- “तुजमज संगतीच मूळ
जैसा चंद्र उदकीच सोज्वळ
भासे परी अभिन्न केवळ तैसा
कार्यमध्ये हा गोपाळ ” ।।१५।।
ऐसा आत्मा बोलता आपण
मग कुडी पडियेली जाण ।।
आत्मा आहे व्यापक परिपूर्ण
देही आहे परी विलक्षण ||१६||
देह-आत्मा संबंधुचि नाही
गुरुकृपे करूनिया पाही ।।
तुकारामी निष्ठा पूर्ण तेही
बहेणि हे मुळी नाव नाही।।१७।।

जोगी
२९९
जाग रे जगजोगी जगजोगी ।
तोचि आहे तुमच्या संगी ||१||
ऐसे सांगे क्षेत्रपाळ तुम्ही
पूजा रे सकळ ।।२।।
काया–काशीपुर नगरी आत्मा
शिव राज्य करी ।।३।।
ज्ञान भागीरथीनीर निर्मळ
चाहे स्थिर स्थिर ||४||
अखंड पर्वकाळ तेथे
ब्रह्मादिक मिळती जेथे ॥५॥
तथा जाती काशीपुरा
होती वेगळे संसारा ||६||
पंचतत्त्व पंचक्रोशी
अवधी लिंगमय काशी ॥७॥
ऐसे देह-काशीपुर ।
विश्वनाथाचे नगर ||८||
काळभैरव दंडपाणी ।
तेचि विवेक विचार दोन्ही ||१||
तेथे उभा धुंडिराज येथे
निजबोध सहज ।।१०॥
प्रयाग त्रिगुण त्रिवेणी
आली गंगेसी मिळोनी ।।११।।
मना-गुणा जेथे भेटी
मनकर्णिका तेचि घाटी ||१२||
काशी तेचि मूळमाया
मन येता तिच्या ठाया ||१३||
दोघा होता जेथे भेटी ।
जाली ब्रह्मानंदे सृष्टी ||१४||
नाम घाट मनकर्णिका ऐसे
म्हणती तेथे देखा ।।१५।।
तेथे घडे जया स्नान
पडती गाठी कोटि पुण्य ||१६||
तया पुण्याचेगी योगे
होय भवाचे दर्शन ।।१७।।
भवानी से निकला शुद्ध
ब्रह्मीचा जिव्हाळा ।।१८।।
न तुरीया ना उन्मनी
तथा म्हणती भवानी ।।१९।।
तिचे घडता दर्शन
भेटे ब्रह्म परिपूर्ण ||२०||
बहेणि म्हणे भाव धरा एक
वेळ जा रे काशीपुरा ॥२१॥

३००
प्रणव पंढरी विस्तारले
क्षेत्र अथ चंद्रभागा ॥१॥
बिंदु वेणुनाद अनुद याजवितो
छंदे जाणती तो ।।१।।
अकार ते भीमा जाणते जाणती ।
दुजी पुष्पावती उकार तो ||३||
मकार पद्माळे अनुभव पंढरी
ब्रह्मसाक्षात्कारी वोतलीसे ||४||
विठ्ठल अतीत आकारावेगळा
व्यापुनी राहिला पंढरीये ॥५॥
पुंडेलिके तेथे अनुभव पाहिला ।
बहेणि म्हणे केला विस्तार हा ।।६।।

निवृत्तिपर

३०१
अजी सर्वन्याये ठकावले मन
तटस्थता जाण हाउनी तेली ।।१।।
तेथे आता काय पुसावे सांगावे ।
स्वानुभव अंगे नाही जया ॥२॥
कीटकभृंगीन्याये जाली तद्रूपता ।
निमाल्या अवस्था चारी तेथे ॥३॥
बहिणीसी उन्मनी लागली
अवस्था भोगी त्यापरता ब्रह्मानंद ||४||


पद

३०२
अदळ कमळी कमळ विकसले
ते म्या गगनी उफराटे देखिले ॥धृ॥
बाइये स्वानुभवे पाहा कैसे ।
जेणे आत्माराम भेटे तैसे ।।१।।
मनाच्या उल्हासे कमळी कमळ
भेटे आनंदाचा पूर लोटे गे बाई ||२||
तेथे काय कारण सरले शेवटीचे
एक उरले बहिणी म्हणे ते म्या
देखिले गगनाचे माथा ||३||


३०३
निरसिता निरसले अवचिता स्वरूप ।
तेचि भरले रूप नयनी माझ्या ।।१।।
झाडिता झाडेना काढिता काढेना
नेणो काय मना केले येणे ॥२॥
जे जे पडे दृष्टी ते ते पड़े मिठी ।
नवल या गोठी कोण जाणे ॥३॥
‘बहेणि म्हणे माझे व्यापिले
मानस लावियेले पिसे काय सांगो।।४॥


३०४
निशीचिये भरी दिवस ना राती
प्रकाश ना ज्योती कैसी माये ।।१।।
हे सुख जाणते जाणती स्वभावे ।
पूर्ण कृपा देवे केली ज्यासी ॥२॥
बिंबी बिंब कैसे सामावोनी ठेले ।
स्वरूप कोंदले दशदिशा ।।३।।
बहेणि म्हणे तेथे बोलावे ते काये ।
मज माजी पाहे हारपले ||४||


३०५
पाहो जो गेलिया मीच हरपलिये ।
नवल कैसे जाले बाईयांनो ||१||
काय सांगो कैसे विपरीत चोज
पहिले माझे मज तक कैसे ||२||
देखत देखता अंगी संचारले
नाठवेसे जाले मी हे माझे ||३||
बहेणि म्हणे नवल सांगो कोणापासी
माझे मी मानसी लाजिलिये ॥४॥


३०६
होउनी निवांत पाहता एकांत
अवधीचि विश्रांत घडली मना ||१||
अद्वैत आपण ब्रह्म परिपूर्ण
स्वानंदघन हाउनी सर्व ठेले ||२||
निवांत एकांत वास अद्वैताचा
सोहळा सुखाचा संत घेती ।।३।।
बहेणि म्हणे नेणों काय पुण्य केले ।
सुख हे लाधले गुरुकृपा ॥४॥


३०७
दिवस ना राती प्रकाश ना ज्योती
तेथे निजवस्ती केली जीवे ||१||
आनंदी आनंद गोविंदी गोविंद
भोगू परमानंद बाईयांनो ॥२॥
अध ना ऊर्ध्वं गति ना विगति ।
तेथे निजवस्ती केली मने ||३||
बहेणि म्हणे सोऽहं हंस यासकट
भरुनी ठेला घोट एकसरा ॥४॥


३०८
जळ ना स्थळ ना कैची भवनदी
वाउगी उपाधि जडली देही ।।१।।
ऐसे जाणोनिया म्या केली तातडी
साधावया गोडी स्वरूपाची ।।२।।
कैची भ्रम कैची शिवपुरी
का भरावे उसी वाउगेची ॥३॥
कैचे ताजे आणि जरठ कमळ
निरंजन कमळ कैचे तेथे ॥४॥
महा कमळावरी आलेखाची मदी ।
तयावरी गुढी प्रेमज्योती ||५||
अवधे कमळ पाहे ज्या स्वरूपाखालती ।
बहेणीची निजवस्ती जाली तेथे ॥६॥


३०९
परेचे परते त्याहूनी परते
सारोनीया चौबे पाहे पा रे ।।१।।
तेथि से होउनी पाहे पा तू कैसा
व्यर्थ दाही दिशा हिंडो नको ।।२॥
सच्चिदानंदाचा खुंटला संवाद
तुटला वाद जये ठायी ||३||
बहेणि म्हणे वस्ती मोडिली परेची
वार्ता ओंकाराची नाही नाही ॥४॥


निर्गुणपर

३१०
अक्षर ते क्षरले रूपासी ते आले ।
निर्गुण ते जाले सगुणचि ॥१॥
पैल भीमातीरी उभा विटेवरी ।
स्वरूपे साजिरी दिव्यमूर्ति ||२||
विजातिया कैसे जाले कुळनाम
निःसीमासी सीम नवलमोठे ||३||
अशोभ तो शोभा पावलाहे कैसा
बहेणि म्हणे दिशा व्यापूनिया ॥४॥


३११
ब्रह्मांडावेगळी वेदासी निराळी
चोविसा आगळी विठ्ठलमूर्ति ।।१।।
धन्य ते आगळी घेती प्रेमसुख ।
पाहती श्रीमुख विठ्ठलाचे ||२||
सा ची आठरासी अगम्य चोजवेना ।
ते हे मूर्ति जाणा पंढरीची ॥३॥
वैकुंठनिवासे स्वच्छा निर्मिले
अक्षर ते सरले भक्तिमुखा ॥४॥
अनंत ब्रह्मजिपाचे ही
होती घडामोडी सर्वकाळ ||५||
बहे म्हणे ते हे पंढरीची
मूर्ति कारली व्यक्ती विठ्ठलयेथे ॥६॥


तुळसीमाहात्म्य

३१२
जेथे नाही वृंदावन ।
तेचि जाणावे स्मशान ।।१।।
राहू नये तये ठायी ।
एक घडी पळ पाही ।।२।।
जेथे असे तुळसीपान ।
तेथे असे नारायण ॥३॥
बहेणि म्हणे विष्णु नांदे
तुळसीचे ठायी मोदे ||४||


३१३
ब्रह्मा विष्णु वृंदावनी ।
शिव राहे तये स्थानी ।।१।।
धन्य तेचि जीव जाणा ।
करिती जे प्रदक्षिणा ॥२॥
सर्व सिद्धी वृंदावनी ।
येती तुळसी दर्शनी ||३||
बहेणि म्हणे वृंदावन ।
कलियुगी मुक्तिस्थान ॥४॥


३१४
गंगा आणि भागीरथी
तुळसीचे ठायी येती ।।१।।
होय दर्शन जयासी ।
तोचि देह पुण्यरासी ॥२॥
सर्व तीर्थांचे माहेर
आहे तुळसी साचार ||३||
बहेणि म्हणे तुळसी जेथ
तेथे तीर्थाचा संघात ॥४॥


३१५
तुलसीचे पत्र ।
असे देवासी एकत्र ||१||
नाही दोघा भिन्नभेद
दोघांचे ते एक पद ।।२।।
तुळसीचे पानी यसे
राधाकृष्ण दोन्ही ||३||
बहेणि म्हणे धन्य देवा
जया तुलसीची सेवा ||४||


३१६
सर्व तीर्थी जया चाड
पुण्य सर्वाहूनी वाड ।।१।।
ते एक वृंदावनी आहे ।
तुळसीचे ठाई पाहे ॥२॥
देव तेहेतीस कोटी ।
येती तुळसीचे भेटी ||३||
बहेणि म्हणे वृंदावन
आहे बैकुंठा-समान।।४।।


३१७
देव न सापडे मना
तरी जावे वृंदावना ||१||
तेथे होय समाधान
स्वये भेटे नारायण ||२||
देव हारपला ज्याचा
वृंदावनी भेटे साचा ||३||
बहेणि म्हणे भाव खरा
पाहिजे तो गाठी बरा ॥४॥


३१८
वृंदावनी केला धावा
म्हणे धाव रे केशवा ॥१॥
द्रौपदीसी पावे हरी
वृंदावनी निर्धारी ॥२॥
वारी सकळ संकट
धन्य तुळसी सर्वा श्रेष्ठ ॥३॥
बहेणि म्हणे सर्व गुण
वृंदावनापासी जाण ॥४॥


३१९
चहू वर्णामाजी जाण
दारी करा वृंदावन ॥१॥
भजा तुळसीस भावे ।
कदा नुपेक्षिजे देवे ॥२॥
भाळी लावी तुळसी माती
तया होय सद्या मुक्ती ॥३॥
बहेणि म्हणे लागे वारा
होय वेगळा संसारा ॥४॥


३२०
देव, तीर्थ, वृंदावन ।
अग्रिहोत्र यांचे स्थान ||१||
धन्य स्थळ ते पवित्र
संतसाधूंचे जे क्षेत्र ॥२॥
होते वेदांचे पठण जेथे
गायींचे गोठण ॥३॥
बहेणि म्हणे भाव धरा
देव यसे तेथे खरा |४||


३२१
ऐसे देवाचे बोलणे बहुता
ग्रंथी असे जाणे ।।१।।
करी माता-पितांची सेवा
तेथे वास सदा देवा ॥२॥
भजनापासी धाव ।
वराडिया ऐसा देव ||३||
बहेणि म्हणे स्थान तरी
पाहोनिया वास करी ||४||


३२२
तुळसी वृंदावनी गायींचे गोठणी ।
बैसता भजनी देव जोडे ।।१।।
नाही या संशय पाहिजे विश्वास ।
साक्ष अंतरास येत असे ||२||
वृंदेसी वचन दिल्हे नारायणे ।
तुजला टाकोन न बजे कोठे ॥३॥
मग ते तुळसी जाली अंगे वृंदा ।
म्हणोनी गोविंदा प्रीति तिची ||४||
बहेणि म्हणे करा तुळसी स्मरण
केलिया पावन तिन्ही लोक ॥५॥


ज्ञानपर

३२३
सांसारिक ज्ञाने तरसी संसार
हा तुझा निर्धार जाय वाया ॥१॥
पालागी तू मूळ साथी
तोडोनी उपाधी अंतरीची ।।२।।
स्वर्गाशी जाशील ते जरी साधिले
व्यर्थ तेणे गेले पूर्व तुझे ॥३॥
ब्रह्मांडी चढविला प्राणवायु जरी
व्यर्थ ते अवधारी जाईल स्या ॥४॥
मंत्र उपासने साधिली दैवते ।
श्रम तोचि तेथे फळा आला ॥५॥
बहेणि म्हणे शोध करी आत्मत्वाचा
मग तुज कैचा जन्ममृत्यु ||६||


३२४
नाही आत्मज्ञान हाटामाजी उमे
घेशील तें लोभं करूनिया ॥१॥
पाविजे विवेके सद्गुरूच्या संगे ।
कृपे पांडुरंगे पंढरीच्या ॥२॥
आत्मज्ञान शेती पेरोनी
(न) पाविजे हिंडता
(न) लाहिजे दाही दिशा ||३||
आत्मज्ञान तपी तीर्थी नव्हे प्राप्त ।
त्यजिसी जरी आप्त संसारीचे ||४||
आत्मज्ञान नव्हे पंचामि साधिता ।
धूम्रपाने वृथा क्लेश होती ॥५॥
बहेणि म्हणे साधे सद्गुरूचे कृपे ।
रिघसी अनुतापे शरण जरी ||६॥


३२५
आत्मज्ञान डोळा दिसे ऐसे नाही
लक्षी जैसे पाही मने काही ||१||
बुद्धीचा उपरम होईल सर्वही ।
आत्मज्ञान ठाई पडे तेव्हा ।।२।।
आत्मज्ञान नव्हे सुवर्णाचा गोळा ।
चंद्र-सूर्य मेळा सापडेल ||३||
बहेणि म्हणे ज्ञान साधेल संगती
संतांचे निश्चिती बुद्धि-योगे ।।४।।


३२६
अप्रीविण काष्ठ जेवी नाही जाण
तैसे स्थूळ विणवस्तु नाही ।।१।।
परी ज्ञानेविण नव्हे आत्मबोध |
केलिया संवाद न सापडे ||२||
कोणता पदार्थ असे वस्तूनि
वायूचे स्पर्शन नसे कोठे ।।३।।
बणि म्ह आत्मा सर्वांतरव्यापी ।
परी तो संकल्पी अंतरला ||४||


३२७
पिंड ब्रह्मांडाचा करूनि उगवू ।
मग तो अनुभवू होय तुज ।।१।।
विश्वी विश्वंभर विस्तारला जाण ।
पाहे याची खूण वेदशास्त्री ||२||
दुधामाजी तूप आहे निश्चवेसी
युक्ती काढावासी पाहिजे ते ||३||
बहेि म्हणे देही आत्मत्व विचारी
ब्रह्म तुज उरी उरली नाही ||४||


३२८
मनाचा चाळक बुद्धीचा बोधक
पाहता आणिक कोण दुजा ।।१।।
परी तू कल्पना सांडुनी पहासी ।
तरीच पावसी ब्रह्मपदी ॥२॥
नेत्रीचे पहाणे कानाचे ऐकणे
मुखीचे बोलणे कोणाचेनी ।।३।।
बहेणि म्हणे तुझे शरीरीच पाहे
मग पुढे जाये हिंडावया ॥४॥


३२९
प्रणवापासोनि सृष्टीचा विस्तार
करोनी विचार सार सेवी ।।१।।
साधन ते कासया साथिसी पामरा |
प्रणवीचा खरा वास तुझा ||२||
ओंकारापासोनी विस्तारले वेद ।
अक्षरांचा भेद वोळखावा ||३||
बहेणि म्हणे मूळ ओंकाराचे ज्ञान
जालिया निर्वाण ब्रह्म होसी ॥४॥


३३०
भक्तिप्रेमसुख न कळे आणिका
पंडिता वाचका वैदिकांसी ।।१।।
जीवन्मुक्त जरी जाला आत्मनिष्ठ ।
भक्तिप्रेमसुख दुर्लभ त्या ||२||
अभेदूनी भेद स्थापिला पै अंगी
वाढवावया जगी प्रेमसुख ||३||
बहेणि म्हणे देव कृपा करिल
काही तरीच हे ठाई पड़े वर्ग ॥४॥


३३१
आकारले ते ते ब्रह्मचि सर्वही
मनामाजी पाही विवेकाने ।।१।।
कासवा हिंडसी दंडिसी शरीरा ।
विकल्पं भीतरा वाजगाची ।।२।।
ब्रह्येविण तुजे नाइले सर्वथा
अनुभव ऐसा सर्व शास्त्री ||३||
बहेणि म्हणे शोध करी तू मनात ।
ब्रह्म सदोदित सर्व काळ ॥४॥


३३२
विश्वाकार ब्रह्म विस्तारले सर्व
पाहे तू सावेव ज्ञानामाजी ॥१॥
माया म्हणवोनी द्वैत का कल्पिसी
नसते जीवासी बंधन ते ||२||
सुतेविण व काय ते होईल
घट तो नव्हेल मातीविण ॥३॥
बहेणि म्हणे सोन्याविण अलंकार ।
न पडे साचार जाण ऐसे ।।४।।


३३३
गुळेविण गोडी पुष्पेविण वास
न दिसे सावास केला जरी ॥१॥
तैसा विश्व जाण विश्वात्मा पाहिजे ।
अलक्ष्य सहजे एन्हवी तो ॥२॥
सूर्याचिया मूर्ती तेज मुसावले
तेही कळो आले चेष्टेने ते ।।३।।
बहेणि म्हणे तैसा ब्रह्म विश्व हरी ।
जाणिजे हे खरी ज्ञानदृष्टी ।।४।।


३३४
देह अचेतन वर्तवी ते मन
व्यापक त्रिभुवन साक्षिरूप ॥१॥
तवाचे स्वरूप पाहे गुरुमुखे ।
सर्व तुझी दुःखे निवारती ।।२।।
जागृती जागणे स्वप्नी साक्षिभूत ।
सुषुप्ती वर्तत साक्षपणे ॥३॥
बहेणि म्हणे याचा घेई बरा
शोध होय मना बोध ब्रह्मपणी ॥४॥


३३५
विकल्पेचि सृष्टी वाढलीसे जाण ।
विकल्पेचि मन द्वैत मानी ||१||
करावा निरास विकल्पाचा जाण ।
मग तू पावन होसी रवा ।।२।।
विकल्पेचि जन्म, विकल्पेचि मृत्य ।
विकल्पेचि सत्य हरपले ॥३॥
बहेणि म्हणे वारे विकल्प घातकी
केली होती सुखी संगतीने ॥४॥


३३६
अवगुण ज्याचे तया न दिसती
म्हणोनी नच होती क्लेश तथा ॥१॥
काय करू यासी न चले उपाय ।
इंद्रावण नोहे गोड कदा ॥२॥
अग्नीचा हा ताप जाळी भलतेया
त्याचा गुण तथा बरा वाटे ॥३॥
बचनाग मारक करी प्राणहानि ।
त्याचे त्यालागोनी न कळे काही ||४||
बहेणि म्हणे जाण कोळसा हा
शुभ्र होईल ते अम्र नभी खरे ॥५॥


३३७
संचित हैं जळे ज्ञानाचेनि मुळे
ज्ञान तें आकळे संतसंगे ॥१॥
म्हणोनीया संग धरावा संतांचा
मने काया वाचा निर्धार हा ।।२।।
इंद्रियाच्या वृत्ति स्थिरावती मागे
साध्येनि संगे पाहे बरे ।।३।।
द्वैताचा हाराश वासनेचा नाश ।
तुटतील पाश संतसंगे ||४||
अहंकार जाय ममता देहीची
आसक्ति कामाची संतसंगे ॥५॥
बणि म्हणे संग असावा निःसंग ।
तोचि पांडुरंग पंढरीचा ॥६॥


३३८
संत तेची देव संत तेची देव
संत तेचि राव साधनांचे ॥१॥
ऐसा हा निर्धार जयाचे मानसी
फळेल तो त्यासी भव नेणे ||२||
संत तेचि तप संत तेचि
जप संत ते स्वरूप ईश्वराचे ||३||
बहेणि म्हणे संत कृपेचे सागर ।
तीर्थांचे माहेर तीर्थरूप ||४||


३३९
संतांचे सन्निध पालटे संचित
नवी सृष्टी होत क्षणे एके ।।१।।
ऐसे जाण संत अगाध गुणांचे ।
कायामनेवाचे शरण होय ॥२॥
संतांचे वचनी भानुतेजवृष्टी
दर्भा अग्री सृष्टी ठेवियेली ॥३॥
बहेणि म्हणे संत जै होती कृपाळ ।
तेच पर्वकाळ येती घरा ।।४।।


३४०
संतांचे सेवनी होय आत्मज्ञान
शांतिक्षमा पूर्ण वोळंगती ।।१।।
म्हणोनि सेवेसी असावे तत्पर ।
बुद्धि निर्विकार होईल ते ||२||
संतांचे संगती होय चित्तशुद्धि ।
अष्टमहासिद्धि द्वारपाळ ||३||
बहेणि म्हणे संत कृपाळ जै होती
तेच ब्रह्म-स्थिती प्रगट होय ॥४॥


३४१
शिष्य नव्हे तोचि जाणावा निश्चये ।
सद्गुरूसी जो पाहे फार बोले ||१||
शिष्य नव्हे जाण करी सपिटी
अखंड चावटी ज्ञानगयें ।।१।।
साधु नव्हे तो हा गुरुसी विन्मुख
नाही ज्या विवेक साधु नव्हे ||३||
बहेणि म्हणे साधु नव्हे तो सहसा
जयाच्या मानसा सुख नाही ॥४॥


३४२
निवृत्तीशी नाही प्राक्तनाचे
अनुभवी केवळ जाती है ।।१।।
निर्धारिती आले असत्य शरीर
मानुनी विचार सार घेती ॥२॥
नाही दंड जैसा निःस्पृही रायाचा ।
तैसा प्राक्तनाचा निवृत्तीसी ।।३।।
बहेणि म्हणे पाहे प्राक्तन वरिष्ठ
प्रवृत्ति हे श्रेष्ठ मानी तया ॥४॥


३४३
शरीराचे माथा वर्तते प्राक्तन
शरीर ते जाण प्रकृतीचे ।।१।।
ज्ञानियांचे मत देहचि हा मिथ्या ।
प्राक्तनाची कथा तेथे कोण ॥२॥
प्राक्तन भोगवी भोग तो शरीरी
ज्ञानिया अंतरी सुखरूप ॥३॥
बहेणि म्हणे देह-प्राक्तन
तोवरी विचार अंतरी निश्चयाचा।।४।।


३४४
जळाले ते वस्त्र कैसे पांघरेल
देशी का जडेल पक्कपत्र ॥१॥
तैसे ज्ञानियाचे भासते शरीर ।
बाधील संसार केवी तथा ।।२॥
जळातील सूर्य प्रकाशेल काई
चित्रीचा तो पाही अग्रि जाळी ||३||
बहेणि म्हणे त्वचा – सर्पाचिया
विखे मेला तो नायके विवेक हा ||४||


३४५
भाजले ते बीज अंकुरेना कदा
न मिळेचि दुधामाजी लोणी ।।१।।
पैसा तो ज्ञानिया जन्म न घे जाण ।
वासना भाजून वर्ततसे ॥२॥
परिसासी लागता लोह पालटले ।
काळिमा हे भेटे पुन्हा कैसी ॥३॥
बहेणि म्हणे गोदा मिळाली सागरी
न येची माघारी त्र्यंबकाते ॥ ४॥


३४६
माझिया हो मने घेतला उच्चाट ।
पाहावे वैकुंठ पंढरी हे ।।१।।
सांडोनिया सर्व काम धाम धंदा
वेधले गोविंदा गोपीराजा ॥२॥
आधारापासोनी भेदियेली चक्रे
इंद्रिये ही एकत्रे करोनिया ॥३॥
प्राणांचा निरोध करोनी पाहिले ।
निश्चये गाइले नाम तुझे ॥४॥
तव पुढे नाद गर्जताती नाना
तेथील धारणा ठाकियेली ॥५॥
सोऽहं शब्द तोही आरुताचि पाहे ।
लक्ष्यी लक्ष जाय मिळोनिया ||६||
सद्गदित कंठ दाटताच मन
करोनिया स्नान चंद्रभागा ॥७॥
बहेणि म्हणे देव विठ्ठल
पाहिला द्वैतभाव गेला हारपोनी ||८|


३४७
विश्वचि विठ्ठल विस्तारला
सर्व विकारेचि देव अंतरला ।।१।।
तकुनिया बुद्धि उसावली माया
ठमकत गेलीया श्रुति मागे ॥२॥
लंघिली साधने लक्ष हरपले
लघुत्व घेतले साधनांनी ।।३।।
बहेणि म्हणे तो हा विठ्ठल पाहता
आली अद्वयता सहज मना ||४||


३४८
चंचल मानस चुकले, चिरूप चढले,
प्रताप जियाचा हा ।।१।।
तेचि चंद्रभागा तेथे करीवास
पुंडलीका ध्यास अखंडत्वे ||२||
द्रवोनिया चित्त दृश्य हारपले
चिद्रूप संचले चिदाकाशी ||३||
भागली संचिते भाग होता शरीरी ।
भाविली पंढरी भाव-बळे ||४||
गाइले हे वेदी पुराणे गर्जती ।
गौरव वर्णिती श्रुती जिचा ॥५॥
बहेणि म्हणे ऐसी चंद्रभागा जाण ।
तेथे अनुष्ठान भक्त करी ॥६॥


३४९
वैद्याचा देह व्यापियेला रोगे ।
मात्रा मागे, त्यागे, मूर्ख तोची ॥१॥
यालागी पारखी करोनिया जाण
होई कल्याण सर्व तुझे ॥२॥
आपणचि बुडे कासे लावी जना
तयाच्या वचना मूर्ख मानी ॥
३झा घरीच उपवासी आमंत्री
लोक सत्य मानी एक तोही मूर्ख ||४||
बहेणि म्हणे अंगी जयासी सामर्थ्य |
सर्वही पदार्थ सिद्ध तेथे ॥५॥


३५०
कल्पतरूपासी मागता कल्पिले
सामर्थ्य ते भले तथा अंगी ||१||
कासवासी शीण करिसी तू मने ।
क्रिया ते निर्वाण पाववील ||२||
चिंतामणीपासी मागता चिंतिले
भावना ते फळे सर्व तुझी ॥३॥
कामधेनूपासी होती पूर्ण काम
परिसी उत्तम होय काळे ||४||
अमृताचे पासी मागता अमरत्व
ज्ञानेचि पूर्णत्व पावसील ॥५॥
बणि म्हणे अंगी क्रिया ज्या
समर्थ सर्वही पदार्थ सिद्ध थे।६॥


३५१
धन्य मानी मन विठ्ठली जयाचे
चित्त निश्चयाचे स्वस्वरूपी ॥१॥
तयाचे संगती होय चित्तशुद्ध ।
अंतरी हा बोध प्रगट दिसे ॥२॥
निंदा आणि स्तुती जयासी समान
देही अभिमान नाही जया ॥३॥
बहेणि म्हणे जया नाही द्वैतभाव ।
तोचि जाणा ठाव आत्मयाचा ॥४॥


३५२
तोचि रे भवरोग फेडील अंगीचा
जयासी शांतीचा भाव देही ॥१॥
इतर ते व्यर्थ दांभिक कासया ।
पाडिती संशयामाजी लोका ।।२।।
तोचि रे निरसील भवपाश सर्वही
जया बोध देही सर्वकाळ ||३||
तोचि रे दवडील माया अंधकार
जयासी विकार नाही स्वप्नी ।।४।।
तोचि रे उतरील विषयविष पाहे ।
भूतकृपा राहे जयामाजी ||५||
बहेणि म्हणे ऐसी करावी परीक्षा
पावसी अपेक्षा सहजगुणे ॥६॥


३५३
सूर्य अभ्रामाजी सापडला जरी
काय तेज तरी उणे होय ॥१॥
तैसा जाण साधू दिसे प्रपंचात
परि तो अतीत सर्व कर्मी ॥२॥
सुवर्ण पुरिले जरी पृथ्वी- आत
काय ते हारपत तयेमाजी ॥३॥
सूर्य उदकात बिंबला आपण तोय
त्यालागून काय बाधे ||४||
वदन आरशात बिंबले दिसत
आरशाचे तेथ काय लागे ॥५॥
बहेणि म्हणे रंगी ठेविला स्फटिक
रंग त्या बाधक होईल काय ॥६॥


३५४
पय आणि तक्र वर्णही सारिखे ।
शुभ्र गार दिसे परीसही ॥१॥
परी त्यांचे गुण जाणते जाणती ।
मूर्ख ते मानिती समान हो ||२||
सुवर्ण पितळ दिसे पीतवर्ण
गंगाजल अन्य सारिखेची ||३||
चहेणि म्हणे येथे परीक्षक जाणे ।
येर ते शहाणे काय करू ॥४॥


३५५
कावळा आकाशी करितसे गती ।
गरुडपक्षा रीती तेचि असे ॥१॥
काय ते मानावे समान सज्जनी ।
आपुलाल्या गुणी वोळखाव ।।२।।
सूर्याचिया तेजे वर्ततसे जन
दीपही धरून तेज वर्ते ||३||
गाईगाढवीचे सारिखेचि दूध
परद्वारे निंद्य पतिव्रता ॥४॥
तुळसीचा वृक्ष आणि तो धोतरा
फणस इंद्रावना सम पाहे ||५||
बहेणि म्हणे ज्ञान पाहिजे अंतरी
वस्तु ते निर्धारी कळे तथा ॥६॥


३५६
सुरतरू म्हणोनी बाभूळ मानिली ।
व्यर्थचि ते गेली भावना हो ।।१।।
यालागी वोळखी असावी नेटकी
येईल परिपाकी गुण तथा ।।२।।
साखरेचा खडा गार ते एकवर्ण ।
हंस पक्षी जाण सारिखेची ॥३॥
बहेणि म्हणे पाहे विचारूनी
मनी ज्ञान सर्वानी श्रेष्ठ असे ॥४॥


३५७
अहंकारे देह धरी जीवदशा
मग तो पडे सोसा संसारिका ।।१।।
तेणेचि अंतर पडिले मुळाशी ।
मग भोग सोसी नाना योनी ।।२।।
अहंकारे वाढे खी धनाचा लोभ
माया ते स्वयंभ वाटली त्या ॥३॥
बहेणि म्हणे याचा करावा
विचार आत्मज्ञान-सार सापडेल ||४||


३५८
त्रियांचेनि रूपे माया जाली सत्य
धन्य मानी येथे चित्त वाटे ||१||
येईल वैराग्य मानसासी जेव्हा ।
आत्मज्ञान तेव्हा होय तुज ॥२॥
हाव-भाव इच्या कटाक्षाचे वाण
साहे ऐसा कोण भूमंडळी ||३||
बहेणि म्हणे मूळ नाशासी कारण
सिया आणि धन मोक्षमार्ग ॥४॥


३५९
मा उतरेल एका दो दिवसात
सागर निवांत होईल तो ॥१॥
परि जाण हे या खियांसी मुलला ।
तो मद उतरला नाही पैसा ||२||
तपराज्यमद जाईल तो क्षणे
आणिक ते जाण नाना मद||३||
बहेणि म्हणे नरक श्रीकामे वाढती
या मद्या निवृत्ति नोहे मना ||४||


३६०
वत्सापाशी जेवी धावे ते गाउली
किंवा ते माउली बाळकी हो ।।१।।
तैसे भक्तिपाशी ज्ञान सहज स्थिती
सापडे प्रतीती आली मज ॥२॥
पुष्पापाशी जेवी भ्रमर गुंतत
गुळासी टाकीत मक्षिका ये ? ||३||
बहेणि म्हणे तैसे भक्तिपाशी ज्
ञान अनायासे खूण सापडली ॥४॥


३६१
विश्वी विश्वंभर पाहे ज्ञानदृष्टी
घेऊनी कसोटी वेदशास्त्रे ।।१।।
काय उणे मग आपल्या स्वसुखा ।
होऊनिया मुका] राहे तेथे ।।२।।
पुष्पामाजी वास नेणती ते नेत्र
प्राविण ओज व्यर्थ सर्व ||३||
बहे म्ह देवे व्यापियले जग
ज्ञानदृष्टि चांग पाहिजे ते।।४।।


३६२
पाहिजे ते ज्ञान सात्त्विक चांगले
निद्वंद्व एकले एकनिष्ठ ।।१।।
तेणेचि तो बसे विश्वामाजी हरी ।
बाह्य अभ्यंतरी वोतप्रोत ||२||
असलीया नेत्र सूर्य वस्तु दिसे ।
पुष्पाचे विकासे फळप्राप्ती ||३||
बहेणि म्हणे सत्त्वगुणी पूर्ण कृपा ।
तेच आत्मरूपा पावसील ||४||


३६३
भेटी होय म्हणो जाता आले द्वैत
आत्मा अखंडित सर्वव्यापी ।।१।।
श्रुतिस्मृतिसाक्षा सिद्ध ऋषिमते
आत्म्याविण रिते नाही स्थळ ॥२॥
कल्पना मनात वाढली अपार ।
तेणेचि अंतर आत्मयासी ॥३॥
बहेणि म्हणे न जाय जे कल्पना
तेच नारायणा पावसील ||४||


३६४
विश्वरूप आत्मा माविसील जरी
असत्य निर्धारी विश्वाकार ||१||
सद्गुरूची कृपा होईल जे क्षणी ।
वोळखसी जनी जनार्दन ।।२।।
दिसे ते ते सर्व नासेल सर्वथा
आकारले वृथा भास याचा ॥३॥
बहेणि म्हणे दृश्या अतीत बोलती
तयाची प्रचीती घेई का रे ।।४।।


३६५
दृश्य मिथ्या याचा घेवोनी अनुभव ।
मग तुझा देव तुजपासी ।।१।।
सद्गुरूचे पायी वोळगे सर्वस्वी ।
मग तुज विश्वी विश्वंभर ||२||
दृष्टि सत्य तेव्हा दृश्य होते सत्य
तुम्ही यथातथ्य शोध करा ।।३।।
बहेणि म्हणे वाचा बोसरली
परा दृश्यपणा धारा तेथे कैचा ||४||


३६६
दृश्यत्वीच देव सापडता जरी
शास्त्रार्थविचारी कोण धावे ।।१।।
पाहे विचारोनी आपुलिया देही ।
हिंडसील मही कासयासी ॥२॥
नेत्रांसी गोचर होता जरी आत्मा
भजनसंभ्रमा काय काज ||३||
बहेणि म्हणे दृश्य सर्वही मायिक ।
आत्मा तो सम्यक वेगळाची ||४||


३६७
तीर्थ तपे व्रते अनुष्ठाने नाना
धरिता धारणा योगमुद्रा ।।१।।
न सापडे त्यासी तत्व आत्मयाचे ।
जगीच ते साचे केवी घडे ॥२॥
मास-उपवासी नाना कृच्छ्रे चांद्रायणे ।
आत्मतत्त्व येणे दृष्टी न पडे ॥३॥
बहेणि म्हणे चक्रे भेदुनीया मना ।
कोंडिती पवना जयालागी ॥४॥


३६८
वैराग्य विरक्ति साधिती शम दम
धूम्रपाने नेम इंद्रियांचा ॥१॥
परी ते न साधे आत्मतत्त्व तथा ।
अद्यापि संशया न सांडिती ||२||
राज्य त्यजूनिया बैसले वनात
एक ते ध्यानस्थ सर्वकाळ ||३||
बहेणि म्हणे देव प्रपंची असता
तरी का हे अवस्था भोगिती ते ||४||


३६९
एक दिगंबर हिंडताती नम
एक ते निमग्न सर्वकाळ ॥१॥
परि त्या अद्यापि न सापडे
सत्य सोलीव जे तत्त्व विवेकाचे ॥२॥
मुंडिती खंडिती दंडिती देहासी ।
एक मौनवेषी हिंडताती ॥३॥
बहेणि म्हणे जटा नखे वाढवूनी
हिंडती अवनी भ्रांतवेषे ॥४॥


३७०
दृश्य नव्हे वस्तु हा खरा निर्धार
वेदेही साचार हाचि केला ||१||
सद्गुरु-अंजन घालोनी पहासी ।
तरीच पावसी आत्मयासी ॥२॥
सगुण मायिक नासेल सर्वथा ।
निर्गुण पहाता आडळेना ||३||
बहेणि म्हणे आता विवेकाचा
दीप घेवोनी स्वरूप पाहे डोळा ॥४॥


३७१
विवेक वैराग्य सद्गुरूची कृपा
होय तई सोपा आत्मबोधू ॥१॥
नाही त्या संदेह निश्चय मानसी ।
याचि साधनासी प्रवर्तावे ॥२॥
श्रवण मनन सदा निजध्यास
पुढे होय त्यास साक्षात्कार ||३||
बहेणि म्हणे तुज पावावया निज
उपाय सहज हाचि असे ||४||


३७२
गीतार्थ पाहोनी असत्य त्यजावे ।
सत्यासी भजावे आदरेचि ॥१॥
मग तू सहज पावसील सुख ।
संवसारीचे दु:ख सर्व नासे ||२||
माया अविद्येचा नाश विवेकाने
करी तू निर्वाण पावसील ||३||
बहेणि म्हणे देही विरक्ति ठसावे ।
तरीच मुसावे परब्रह्म ||४||


३७३
वर्णाश्रमसेवा वा वेदाचेनि मते
कर्म करी त्याते मोक्ष साधे ।।१।।
चित्तशुद्धि होय विरक्ति सबळ
ज्ञानेचि प्रबळ नाश त्याचा ॥२॥
यथोचित कर्म, फळाचा तो त्याग
कर्तृत्व-विभाग अहंत्यागे ॥३॥
हे म्हणे कर्मत्याग नाही कदा
करावे मर्यादा नुल्लंघोनी ||४||


३७४
वेदे प्रतिपाद्य केले असे कर्म
मोक्षाचे हे वर्म पाहोनिया ।।१।।
परी ते नेणती करिता चुकले
तेथेचि पावले जन्म-मृत्यु ॥२॥
ब्रह्मचर्य आणि गृहस्थ वानप्रस्थ
आणिक संन्यास वेदमते ||३||
बहेणि म्हणे वेद बोलिला नेटके।
क्रियेपाशी सुखे दुःखे येती ॥४॥


३७५
वेदां ऐसी नाहीं माउली आणिक ।
प्राणिया विवेक सांगितला ।।१।।
परी ते नेणती वेदार्थाचे वर्म
चुकोनिया कर्म आचरती ॥२॥
वेदा ऐसा कैचा बाप या जगासी
कर्मेचि मोक्षासी पाववितो ।।३।।
चहेणि म्हणे मोक्षासी कारण
परी क्रिया जाण पाहिजे ते ।।४।।


३७६
ब्रह्मचर्यां जया जाली निर्वासना
तेथोनिच जाणा मोक्ष तया ।।१।।
निर्वासना मूळ असावी नेटकी ।
आश्रमी विवेकी वेद बोले ।।२।।
गृहस्थ आश्रमी हेत निमालिया
तेथुनीच तया मोक्ष पाहे ॥३॥
वानप्रस्थी विषयवासना निरसली ।
मुक्ति हे साधली तेथे तया ||४||
संन्यास घ्यावया मूळ विषय त्याग ।
येन्हवी प्रसंग नाही खरा ||५||
बहेणि म्हणे वेद प्रमाण तो खरा
आश्रमी निर्धारा मोक्ष व्हावा ॥६॥


३७७
वेदाचा आधार सर्वही आश्रमा ।
वेदासी उपमा नाही खरी ।।१।।
यालागी प्रमाण सर्वांसी हा
वेद आश्रमासी वंद्य महावाक्य ॥२॥
वेद तेचि ज्ञान वेद तेचि ध्यान ।
वेद करी पावन वर्णमान्त्रा ||३||
वेद तोचि जप वेद तेचि तप ।
वेद तो स्वरूप आत्मयाचे ॥४॥
वेद तेचि तीर्थ वेद अनुष्ठान
वेद तो निर्वाण योगनिष्ठ ॥५॥
वेद तोचि योग वेद तोचि याग ।
वेद तो संयोग जीवात्मया ॥६॥
वेद तोचि भाव वेद तोचि देव ।
वेद तोचि ठाव सर्वज्ञते ||७||
बहेणि म्हणे वेद अमान्य जयासी
तथा रौरवासी घडे जाणे ॥८॥


३७८
वेदार्थ- विचारे आत्मा दुरी नाही
सर्वातरी पाही वोतप्रोत ||१||
परी ते नेणती कल्पनेचे योगे ।
इंद्रियांच्या संगे प्रांत जाले ||२||
आकाश व्यापक जैसे असे सर्वा ।
आत्मत्व अनुभवा तयापरी ॥३॥
बहेणि म्हणे जैसे अलंकारी सोने
आत्मा तेची खुणे वोळखावा ||४||


३७९
आत्म्यावरी जग विस्तारले सर्व
विश्वामाजी ठाव असे तथा ||१||
पहा अनुभवे आपुलिया मनी ।
ब्रह्मी ब्रह्मपणी ब्रह्मानंदे ॥२॥
उदकी तरंग उठावले परी
तृषा ते न करी हरण की ||३||
बहेणि म्हणे बीजी वृक्ष आहे खरा ।
विवेके चतुरा पाहे बापा ||४||


३८०
काष्ठामाजी अन जैसा असे गुप्त
आत्मा सर्वगत तैसा असे ||१||
विवेके करूनी पडिजेल ठायी ।
महावाक्य पाही शोध लागे ॥२॥
जळी सूर्यबिंब दिसतसे जैसे
आत्मत्व हे तैसे वोळखावे ।।३।।
बहेणि म्हणे आत्मा सर्वही
व्यापक परी तो निष्टंक वेगळाची ॥४॥


३८१
पद्मपत्र जैसे उदकात असोन
लिम नव्हे जाण जेणेपरी ॥१॥
तैसाची तो आत्मा विश्वाकार भासे ।
ज्ञानियासी दिसे वेगळाची ||२||
दुधामाजी लोणी असोनी अलिप्त
नभ अखंडित घटी भासे ।।३।।
बहेणि म्हणे आत्मा
बोलखिजे ऐसा परेशानी ||४||


३८२
माया कोठूनिया जालीसे निर्माण
इचे अधिष्ठान वोळखावे ||१||
सात्त्विक बुद्धीने सद्गुरूची कृपा ।
वेदार्थ घेई पा विवेकेसी ||२||
कोठोनिया जाली कैसी विस्तारली
माया विवंचिली पाहिजे ते ।।३।।
बहेणि म्हणे माया सत्य की असत्य
विचारूनि तथ्य स्वीकारिजे ॥४॥


३८३
स्फूर्तिरूप तेथे मायेचा उद्भव
प्रपंचासी ठाव मूळ तेथे ।।१।।
ब्रह्म एकले ते गमेना म्हणोनि
स्फूर्ती हे चिंतनी स्वसंवेद्य ||२||
उदकी बाबुळ होऊनि निर्माण
तेथेचि ते जाण आच्छादिले ||३||
तैसे जाले जाण, ब्रह्मीचीच माया
लपोनिया तथा प्रगटली ||४||
अग्रीचे पासाव धूम्राची उत्पत्ति ।
तयाची प्रदीप्ती लोप करी ॥५॥
डयाचे पडळ डोळयासी रोधी
काळी ते बाधी दीपकासी ।।६॥
आम्रवृक्षी हो कावरे निर्माण ।
तयासीच जाण आच्छादले ||७||
बहेणि म्हणे तैसी माया आच्छादित
सद्गुरूचा हस्त नाही तरी॥८॥


३८४
सत्य म्हणो जरी मायेसी तत्त्वता
तरी निश्चितार्था असत्यची ॥१॥
न कळेचि पार इचा विधातिया ।
वेदान्तेही ठाया नये खरी ।।२।।
असत्य म्हणता प्रत्यक्ष दिसत ।
कोण इचा अंत घेऊ शके ।।३।।
बहेणि म्हणे वाचा खुंटली वर्णिता
कोण तो तत्त्वाचा शोध करी ||४||


३८५
सत्यासत्यातीत मायेसी म्हणता
आलीसे तत्वता नागवण ।।१।।
बीजेविण वृक्ष की द्विजेविण पक्ष ।
बजे दक्ष केवी पड़े ||२||
सूर्याविण भी जल रंग व गवी आहे ||३||
महि माया सत्य ना असत्य
दोहीसी अतीत केवी पडे ||४||


३८६
वांझेच्या पुत्रासी नपुंसककन्या
दिधली त्यांच्या लग्ना चला जाऊ ॥१॥
तैसी जाण माया सत्य ना असत्य
तिचे ते शाश्वत केवी बापा ||२||
मृगजळे जेवी तृषा बोळविली
जीवे मेल्या भरली तरळ जैसी ॥३॥
बहेणि म्हणे मिथ्या म्हणो नेदी
कदा सत्य याचि शब्दा स्तब्ध ठेले ||४||


३८७
ऐसा होय व्यवहार ।
जेणे राहे मन स्थिर ||१||
हेचि मायेचे निरसन
जाणे गुरुगम्य खूण ॥२॥
राहिलिया तळमळ ।
तोचि उपदेश सबळ ||३||
शब्दज्ञाने करिसी सोस
तेथे कैचा माये-नाश ॥४॥
बहेणि म्हणे राहे मौन
हेचि स्थिरप्रज्ञखूण ||५||


३८८
तळमळ निराकारी ।
जाली माया तेचि खरी ।।१।।
हा तो अनुभव संतांचा
पाहे ग्रंथी आहे साचा ।।२।।
रूपी वेद जाला मुका
इतरांचा कोण लेखा ॥३॥
नाही शब्दाचे ते काम
पाहा शेषे केला श्रम ||४||
बहेणि म्हणे शय्या जाला
तेव्हा अंगीकार केला ||५||


३८९
हाचि पुराणी विचार केला
बुद्धी करी स्थिर ||१||
करी गुरू उपदेश
तेथे मीन्येची प्रवेश ||२||
शब्दमाया नाही भिन्न
श्रुती सांगितली खूण ॥३॥
शब्द नव्हे रामराम
पार्वतीला सांगे शिव ||४||
बहेणि म्हणे ब्रह्मरस
सेवी का रे सावकाश ॥५॥


३९०
म्हणे राम ब्रह्मरूप नाही ।
तोचि खळवादी पाही ||१||
नामरूप दोन्ही एक ।
हाचि वेदींचा विवेक ॥२॥
उपनिषदांचे सार ।
रामरूप निर्विकार ||३||
नाना इतिहास वार्ता
नामरूपचि तत्त्वता ॥४॥
बहेणि म्हणे नाम सार ।
हेचि उन्मनी निर्धार ॥५॥


३९१
ऐका चौवाचे विवरण स्थान मान
कळा जाण देह अवस्था निदान।
संकलित कथन ऐकावे ||१||
कोण स्वर कोण वाचा अभिमानी
ह्या देहाचा शक्तिमात्र स्थान याचा
अभिप्राय गुणाचा बोलिजेल ॥२॥
प्रणवाचा कोण चरण ।
कोण वेद तेथीचा जाण
हे स्वानुभवे जयासी ज्ञान
स्वतः तो आपण परमात्मा ॥३॥
हे अनुष्टुप कथन पंचीकरणामाजी
विवरण आशंका नुपजे
ऐसियाने करोनी जाण ठेविले ||४||
त्याचे नाम ज्ञानप्रकाश जो का
ब्रह्मविद्येचा सौरस आत्मत्वाचा ज्ञानघोष
परमहंस दीक्षेचा मुगुटमणी ||५||
त्यामाजी कार्यकारण काढिले
वाचाविवरण ते ऐकावी
स्थानमाने संकळित मार्गे ॥६।।
(१) जेथे महाकारणदेह तेथे
तुर्यावस्था होय अभिमानी प्रत्यगात्मा
पाहे भोग लाहे स्वानंदाचा ||७||
स्थान से मूर्धनी जाण ज्ञान
शक्ति जाणिजे खूण शुद्ध सात्त्विक
तो गुण मात्रा जाण ओंकाराची ||८||
चौथा चरण प्रणवाचा उद्भव
अथर्वण वेदाचा प्रकाश षोडश
कलेचा वारा जनीचा रहिवासू ।।९।।
तेथेचि हे जाण परावाचा जेथे उल्लेख
उन्मेषाचा बोध चाले सत्रावीचा ।
ब्रह्मानंद सुखाचा रहिवासू ।।१०।।
स्थान ते नाभिकमळ |
अंत:करण ते निर्मळ
हे परेचे निजमंदिरस्थळ ।
जाणती कुशल अनुभवी ।।११।।
(२) पश्यंतीचा जेथे रहिवास तेथे
अटळकमळाचा विकास अंगुष्ठमात्रप्रमाण
प्रकाश दीपवत क्रीतसे ||१२||
कारण देह सुषुमी अवस्थाप्राज्ञ
अभिमानी आनंदयोग तत्त्वता
हृदयस्थान इच्छाशक्ति देखा ।
गुण तामस वर्तत ।।१३।।
मकार मातृका जाण ।
प्रणवाचा तिसरा चरण वेद
तो आपण सामक जाणिजे ।।१४।।
तेथे उन्मेषाचा ध्वनी ।
ऊष्म स्वर ये उमटोनी
पश्यंती नाम तियेलागुनी
जाणावी सज्जनी स्वानुभवे ।।१५।।
(३) आता मध्यमा वाचा जेथ
लिंगदेह जाणिजे तेथ अवस्था
ते विशेष स्वप्न जाणिजे ।।१६।।
अभिमानी तो तैजस प्रत्युक्त
भोग सावकाश कंठस्थानी
रहिवास करी घोष महानाद ।।१७।।
तेथे जाणावी द्रवशक्ति ।
गुण तो रजोगुणस्थी मात्रा ते
उकाराची प्रणवाचा
दुसरा चरण ।।१८।।
तेथे यजुर्वेद आपण
करी घोषाचे उच्चारण ।
परी त्या वैखरीवाचून
न कळे काही ।।१९।।
(४) आता वैखरी नांदे
जेथे स्थूल देह वर्ते तेथे ।
अवस्था जागृती वर्तते ।
अभिमानी जाणिजेसु विश्व पै ||२०||
युक्त भोग तेथीचा रहिवास
तो नेत्रींचा गुण सात्त्विकाचा ।
मिश्रित साचा वर्तत ।।२१।।
मात्रा ती अक्षरांची महिमा ते
प्रथम चरणाची जे का मूळ
प्रणवाची ऋग्वेदाची जाणिजे ।।२२।।
तेथे वैखरीचे स्थान करी बत्तिसा
अक्षरांचे उच्चारण शब्दापशब्द
आपण कळती जाण उच्चारणी ||२३||
पुढे विस्तार सांगता तरी विस्तारेल
हे वार्ता म्हणोनिया संकळित
कथा जाण तत्त्वता सांगितली ||२४||
या चौवाचेचे एकचि स्थान व्यतिरेकान्वये
केले आपण अध्यात्मज्ञान त्यासी
म्हणणे स्वरूपज्ञान कळावया ।।२५।।
वरकड हो तितुके ज्ञाने ।
धातमात कवित्व बांधणे ।
पुसो जाता अभिमाने
प्रवर् त जाण मुष्टिद्याता ||२६||
परि या ज्ञानाचा सीरम नेथेचि
तो मंदविला मुलती सन्मान
दारेच्या सुरवासु तैशा
जनासी हे न मानत ||२७||
जयासी स्वहितचि करणे ।
तेणे शुद्ध भावार्थ धरणे
करावे अध्यात्मज्ञानाचे शोधन ।
जेणे लाधे निधान परब्रह्म ||२८||
बहेणि म्हणे गुरुकृपा जेथे ।
ज्ञानासी काय उणे तेथे
परी निष्ठाबळ पाहिजे यथार्थे
तेव्हा भगवंत प्राप्त होय ।।२९।।

३९२
चुंबक चालवी लोखंडा प्रत्यक्ष
क्लेश हे तयास जेवी नाही ॥१॥
तेवी आत्मा सर्वं करोनि अकर्ता ।
पाहे तू स्वचित्ता वोळखोनि ||२||
सूर्याांचेनि जेवि भासे मृगजळ
जनक्रिया सकळ सूर्ययोगे ॥३॥
बहेणि म्हणे आत्मा ऐसा जया कळे ।
तयाचा मावळे जन्ममृत्यु ||४||


नाममहात्म्यपर

३९३
नामसंकीर्तन सदा सर्वकाळ ।
अखंड प्रेमळ देह ज्याचे ॥१॥
तयासीच भक्ति म्हणावी निर्धार
जाणती उत्तर ज्ञानवंत ||२||
क्षण एक काळ जाऊ नेदी रिता ।
आवडी हे चित्ता पांडुरंगी ॥३॥
बहेणि म्हणे जीउ जाईल सर्वथा
काळ जाऊ नेदी रिता नामेविण ॥४॥


३९४
उदकेवीण मीना होय प्राण-साठी
जैसे नाम पोटी आवडे ज्या ॥१॥
भक्ति हे तयासी सज्ञान बोलती ।
येर ते जल्पती वाउगेची ॥२॥
तृषाक्रांता जेवी उदकाची आवडी ।
तैसी जया ओढी संकीर्तनी ||३||
बहेणि म्हणे वांझ इच्छी ते बाळक ।
तैसे नामसुख आवडे त्या ॥४॥


३९५
भक्ति नाही हाटी घेईजे विकत
हिंडता वनात सापडे ॥१॥
वित्ताचिये साठी भक्ति हे साधेल
आणिक ते बोल वायाविण ॥२॥
भक्ति नाही पाही जाणिवेचे घरी
धनाढ्यमंदिरी न सापडे ॥३॥
भक्ति नाही राजा प्रधानाच्या घरी
भक्ति नाही पारी चौधरीच्या ॥४॥
बहेणि म्हणे भक्ति साधावया
एक पाहिजे विवेक पूर्ण देही ॥५॥


३९६
भाव तेथे भक्ति, भक्ति तेथे
ज्ञान ज्ञाने समाधान होय चित्ता ॥१॥
मग तू सहज समाधी पावसी ।
चित्त नामापाशी लीन होय ॥२॥
संतसमागमी असोनी श्रवण
सदा सावधान अनुक्रमी ॥३॥
बहेणि म्हणे भक्ति पाहिजे
कारण मग त्या निर्वाणपदप्राप्ती ।।४।।


३९७
भाव शुद्ध तरी मोक्ष तथा शुद्ध
यासी ग्वाही वेद यहा तुम्ही ॥१॥
अशुद्ध भावार्थ की यात सर्व
अंगी बसे गर्व तयाचिया ॥२॥
भक्ति तेचि मोक्ष भक्ति तेचि मुक्ति ।
भक्ति ते विरक्ति सत्य खरी ||३||
बहेणि म्हणे भक्ति पाहिजे
सुदृढ मग तया गूढ कासवाचे ।।४।।


३९८
गुरुमंत्र देव औषध भावार्थे ।
फळे, एक चित्ते पाहे ऐसे ।।१।।
हेचि निघांरूनी भावार्थेसी
भज हृदयीचे गुज सांगितले ॥२॥
पाषाणप्रतिमा भावार्थे भजलीया
इच्छितसे तथा पावे फळ ||३||
बहेणि म्हणे ज्याचा भावार्थ
चोखट तयासी वैकुंठ रोकडेची ||४||


३९९
भावार्थ वाल्मिका आला तो फळासी
जाले सत्य ऋषी भावार्थेची ॥१॥
यालागी भावार्थ असावा साथका
करितसे रंका राज्यनिधी ||२||
कोशिकासी भाव फळा आला सत्य ।
भावार्थ अगत्य पाहिजे तो ।।३।।
बहेणि म्हणे भाव इच्छेचा
फळदानी पावची निर्याणी मोक्षपदा ||४||


४००
भक्तिबळे इच्छा पुरवितो देव
आला अनुभव पुंडलीका ॥१॥
म्हणोनिया भक्ति असावे कारण ।
आहे नारायण भाव तेथे ।।२।।
पक्व तुळसीपत्रा-आत प्रवेशून
तुळेसी तो देव तुका न ये ? ||३||
द्रौपदीची वस्त्रे स्वये जाला देव
पोह्यांसाठी गाव सोनियाचा ||४||
भाजीचिया पाने तृप्त केले
ऋषी भावे गणिकेसी बैकुंठ ते ||५||
बहेणि म्हणे भाव तोचि आम्हा
देव नाही या संदेह अणुमात्र ॥६॥


४०१
भावार्थाचे दावे देवाचिया गळा ।
तयासी मोकळा कोण करी ||१||
विचारिता जन्म सोसी गर्भवास ।
द्वारपाळ त्यास करी बळी ||२||
भावार्थाच्या खुंटी बांधिला हा देव
सोडी ऐसा राव कोण आहे ॥३॥
बहेणि म्हणे भावतंतु कोण सोडी
भावार्थ-परवडी देव जाणे ||४||


४०२
पाचाही विषयांचा समूह
एकत्र होउनी पत्र अंतरले ॥१॥
बालागी संगती उपाय ते भले
आपणही केले तरावया ॥२॥
कुरंग तो जाण नादासी वेधला
प्राणासी मुकला क्षणामाजी ||३||
स्पर्श करोनिया सापडला हस्ती
मारिजे माहोती पहासी तू ।।४।।
पतंग रूपासी भुलोनी दीपकी ।
प्राणे गेला दुःखी होउनिया ॥५॥
रसनेचा लाभ धरोनिया मीन न
लागता क्षण जीवे गेला ॥६॥
भ्रमर गुंतला कमळामाजी गंधे ।
गेला प्राण येथे तत्क्षणी ।।७।।
बहेणि म्हणे पाचा विषय पाचजण
येचुनिया प्राण न सुटती ॥८॥


४०३
नामेविण क्षण जाऊ नेदी पडी ।
चित्तासी आवडी सर्वकाळ ॥१॥
भजन हे तया बोलिजे देवाचे ।
मने कायावाचे समर्पिले ॥२॥
संतसमागमी श्रवणाची आतं ।
चित्ती अखंडित भाव असे ||३||
बहेणि म्हणे मन नेणे विषयसुख ।
नित्य ज्या हरिख नामपाठी ॥४॥


ब्रह्मकर्मपर

४०४
तपाचे सामर्थ्य आहे बहु मोठे
पाहे तू वरिष्ठ मागील ते ।।१।।
विश्वामित्रे सृष्टी केलीसे दुसरी
जाण तपावरी गायत्रीच्या ||२॥
वसिष्ठे धरित्री दर्भाचिये अग्री ।
ठेविली सामुग्री तपाची हे ||३||
सूर्यतेज आले समक्ष साक्षीसी ।
तयाच्या तपासी कोण वर्णी ||४||
अगस्तीने केले आचमन सिंधूचे
तप हे तयाचे महा उग्र ॥५॥
बहेणि म्हणे तप जयापासी
असे तयासी सायास कासवाचे ॥६॥


४०५
वर्णामाजी एक ब्राह्मण वरिष्ठ ।
ऐसे मागे श्रेष्ठ बोलियेले ॥१॥
म्हणोनी ब्राह्मण पूजावे आदरे ।
मोक्ष याचि द्वारे प्राणियासी ॥२॥
ब्राह्मणाचे मुखी सदा वसे वेद ।
जाणती ते भेद अर्थ त्याचा ॥३॥
बहेणि म्हणे देव वाहे ज्याची
लाथ हृदयी विख्यात असे ठावे ||४||


४०६
ब्राह्मणाचे मुखे तृप्त होय देव
पहा अनुभव रोकडा हा ।।१।।
यालागी ब्राह्मण वंदावे मस्तकी
शाखे समस्त की बोलताती ॥२॥
ब्राह्मणाचे मंत्रे पाषाणी प्रतिष्ठा
धरलिया निष्ठा प्रगटे देव ॥३॥
बणि म्हणे देव कलियुगी हेचि ।
ऐसी हे वेदांची असे साक्ष॥४॥


४०७
ब्राह्मणाचे तीर्थ प्राप्त होय जया
पृथ्वीचीही तया पडती तीर्थे ॥१॥
बालागी ब्राह्मण श्रेष्ठ सर्वापरी ।
जयाचिये द्वारी सर्व सिद्धि ॥२॥
ब्राह्मणाची कृपा होय जयावरी
कल्याण तो वरी कल्पकोटि ।।३।।
बहेणि म्हणे ज्याचे दर्शनेचि
पाप जाये आपोआप जळोनिया ॥४॥


४०८
ब्राह्मणाची सेवा घडे एक क्षण
इच्छा होय पूर्ण अंतरीची ॥१॥
म्हणोनी तयासी भजावे पूजावे ।
आदरे घालावे लोटांगण ॥२॥
ब्राह्मणाचे काजी वेचलिया प्राण ।
इंद्रपदी जाण वास तथा ||३||
बहेणि म्हणे ऐसे ब्राह्मण हे थोर
मोक्ष हा किंकर तयापासी ॥४॥


४०९
ब्राह्मणाची आज्ञा देव बंदी शिरी
मुक्ती आज्ञाधारी जयापासी ॥१॥
यालागी ब्राह्मण तारक कलियुगी ।
धन्य तेचि जगी सेविती ते ||२||
ब्राह्मणाचे देही प्रत्यक्ष भगवान
वेद तो आपण मुखी जया ||३||
बहेणि म्हणे त्याचे काय वर्णू एक ।
शरीर विवेकरूप त्याचे ॥४॥


४१०
चहू वर्णामाजी वरिष्ठ ब्राह्मण
समीपता जाण मुक्ती त्यासी ॥१॥
ब्रह्मची ब्राह्मण बोलताती श्रुती ।
वचनासी वंदिती लोकत्रय ॥२॥
ब्राह्मण जालिया नाही अधोगति ।
देव सर्व ध्याती ब्राह्मणासी ॥३॥
बहेणि म्हणे जे हे गायत्रीचे स्थळ
राहावया केवळ देह ज्याचे ||४||


४११
ब्राह्मण कोणासी म्हणावे निश्चित
पहावा हा अर्थ विचारूनी ||१||
मग ते वंदावे भजावे सप्रेमे ।
मोक्षदानी नेमे वेदवाक्य ॥२॥
जीव, देह, जाति, वर्ण, कर्म,
धर्म पहावे हे वर्म शोधूनिया ||३||
बहेणि म्हणे ज्ञान पांडित्य ब्राह्मण ।
विवेके करोनी पहा आधी ॥४॥


४१२
जीव हा ब्राह्मण म्हणावे इत्यर्थ
तरी येथे अर्थ सापडेना ||१||
सर्वांठायी जीव सारिखाच एका
पशु पक्षी देख चांडाळादी ॥२॥
पुढे जीव होती मागे बहु जाले ।
ब्राह्मणत्व आले नाही तथा ।।३।।
बहेणि म्हणे जीव प्राणिमात्री
एक ब्राह्मणत्व देख म्हणो नये ||४||


४१३
देहचि ब्राह्मण म्हणो जरी आता
न घडे तत्त्वता विवेकदृष्टी ॥१॥
विचारूनी आधी ब्राह्मण तो कोण
मग तू भजोन राहे सुखे ।।२।।
देह हे सर्वांचे एकचि जाणिजे
पंचभूते सहजे सर्वांठायी ।।३।।
तारुण्य वार्धक्य बालत्व देहासी
जाणावे जीवासी स्थान तेचि ॥४॥
देह तेथे जीव जीव तेथे देह ।
ब्राह्मण तो काय म्हणो तथा ॥५॥
बहेणि म्हणे सर्व योनींसी शरीरे ।
सारिखीचि वा रे विवचिता ।।६।।


४१४
जरा मृत्यू भय सर्वांसी समान
तरी ते ब्राह्मण केवी म्हणे ।।१।।
यालागी विवेक धरोनी मानसी ।
‘ब्राह्मण’ पदासी वोळखावे ।।२।।
मातापितृव्याचे जाळिलें शरीरा ।
ब्राह्महत्या नरा केवी नोव्हे ॥३॥
बहेणि म्हणे देह ब्राह्मण तो नव्हे ।
विवेक-वैभवें विचारितां ||४||


४१५
आता वर्णं हाची ब्राह्मण म्हणावा
तरी तो अनुभवा नये काही ||१||
ब्राह्मण वेगळा वर्णाही अतीत ।
पाहता निश्चित भासतसे ॥२॥
श्वेत तो ब्राह्मण क्षेत्री तो आरक्त
वैश्य वर्ण पीत नाही ऐसे ||३||
कृष्णवर्ण शूद्र नाही ऐसा भेद
आयुष्याचा नाद सारिखाची ||४||
चणि म्हणे वर्ण ब्राह्मण तो नव्हे
वियंचूनि पाहे मनामाजी ||५||


४१६
आता ‘याती’ लागी म्हणाचे ब्राह्मण
तरी ते निर्वाण नये चित्ता ।।१।।
निरसूनी सर्वही विचारा वेदाते ।
उरे ते आइते वोळखावे ||२||
ऋषी श्रृंगी झाला मृगीचिये पोटी ।
गौतम शेवटी कुशास्तरणी ॥३॥
जंबुक ऋषि तो जन्मला जांभुळी ।
वाल्मीकीची कुळी वारुळी ते ।।४।।
कैवर्तकी-पोटी व्यास तो जन्मला ।
विश्वामित्र जाला क्षेत्रणीचा ॥५॥
वसिष्ठाचा जन्म उर्वशी- उदरी
अगस्ति निर्धारी कलशोद्भव ॥६॥
नारद प्रसिद्ध ठाउका सर्वांसी
दासी हे तयासी प्रसवली ||७||
बहेणि म्हणे जाति नव्हेचि ब्राह्मण
ब्राह्मण्याची खूण वेगळीच ॥८॥


४१७
आता म्हणो जरी ब्राह्मण पंडिता ।
न माने तत्त्वता मना तेही ।।१।।
जाणता विवेक निवडी तो बरा ।
ब्राह्मण तो खरा ज्ञानवंत ॥२॥
क्षेत्री वैश्य शूद्र ब्राह्मणादि सर्व
पांडित्य अपूर्व करिती अवधे ॥३॥
पद- पदार्थांचे करिती विवरण
सर्व वर्ण जाणे काव्य- अर्थ ||४||
अविधादिक ही करिती पांडित्य
ब्राह्मण त्या तथ्य कोण म्हणे ॥५॥
बहेणि म्हणे ऐसे वोळखावे जनी ।
ब्राह्मण निर्वाणी कोण ऐसे ॥६॥


४१८
आता म्हणो जरी कर्म ते ब्राह्मण
चहू वर्णी जाण कर्म असे ||१||
म्हणोनी म्हणावे कर्मिक ब्राह्मण
आहे तेचि खूण वेगळीच ॥२॥
आपुल्याचि कर्मी वर्तताती वर्ण ।
तयासी ब्राह्मण म्हणो नये ||३||
बहेणि म्हणे कर्म विचारिता
पाहे ब्राह्मणत्व नोव्हे कर्मासी ते ||४||


४१९
शास्त्राचे प्रमाण आपुलाले कर्म
वर्णाचा स्वधर्म आचरती ।।१।।
तयासी ब्राह्मण कैसेनि बोलिजे ।
विचार हा कीजे मनामाजी ।।२।।
कोणे वर्णी कर्म शास्त्र न
बोलेचि आज्ञा समर्थांची सर्वावरी ||३||
बहेणि म्हणे वेदाप्रमाणे चालती ।
सर्व त्या बोलती ब्राह्मण केवी ||४||


४२०
आता धर्म यासी म्हणावे ब्राह्मण
तरी हे अप्रमाण दिसतसे ||१||
ब्राह्मण ते भिन्न जाणते जाणती ।
ज्ञानी वोळखती आत्मदृष्टी ॥२॥
ब्राह्मण-क्षेत्री- वैश्यशूद्रादिका जाण ।
धर्म हा प्रमाण सांगितला ||३||
अन्नदान द्रव्य गोदानादि सर्व
चहूवर्णा भाव सारिखाचि ॥४॥
बहेणि म्हणे धर्म नव्हे तो
ब्राह्मण ब्रह्म-परीक्षण वेगळेची ॥५॥


४२१
स्वर्गलोकप्राप्ती होय जया धर्मे
ब्राह्मण उत्तम तेही नव्हती ||१||
‘ब्रह्म’ जाणे तोचि ब्राह्मण बोलिजे ।
येर ते सहजे ब्रह्मबीज ॥२॥


४२२
ब्राह्मण तो एक सांगेन इत्यर्थ ।
जेणे हा वेदार्थ साठविला ||१||
वेदीही प्रमाण तोच असे केला ।
वरिष्ठ तो भला गुरु सर्वा ।।२।।
थोर नाही तुजे ब्राह्मणाचाचीनी
कैवल्य ज्याचेनी प्राप्त होय ||३||
मोक्षासी अधिकार जयाचेनि शब्दे ।
जळती प्रारब्धे दृष्टिमात्रे ॥४॥
ब्रह्म ब्राह्मणासी नसे अणु-भेद ।
साधा हे निद्वैद्व तयापाशी ||५||
बहेणि म्हणे चिह्न कोण त्याचे
जाणे विवेके शहाणे वोळखती ।।६।।


४२३
गुणात असोनी गुणांसी नातले
क्रिसी नाकळे अणुमात्र ।।१।।
तोचि रे ब्राह्मण वोळखावा जनी ।
द्वैत जया स्वप्नी आडळेना ।।२।।
षड़मरहित षड्भावा नातले
दोषांचेनि मेळे सापडेना ॥३॥
बहेणि म्हणे सत्य न संडी
सर्वथा ब्राह्मण तत्त्वता तोचि एक ॥४॥


४२४
निर्विकल्प जया समाधी जोडली ।
चित्तासी अमोली परब्रह्मी ।।१।।
तोचि एक खरा ब्राह्मण वेदार्थे ।
आणिक ती मते पाखंडाची ॥२॥
सर्वाभूती एक आत्मा देखियेला
शांतीचा योतिला मूर्तिमंत ॥३॥
बहेणि म्हणे जैसे आकाश सर्वत्र
तैसा तो एकत्र जगामाजी ||४||


४२५
अंतर्बाह्य एक अखंड अद्वय
प्रत्यक्ष अप्रमेय अनुभवे ।।१।।
तयासीच जाण म्हणावे ब्राह्मण ।
जयाचे निर्वाण परब्रह्मी ||२||
अनपेक्षा जयाचे आंदण हे
जाण करतळ विज्ञान हात- वसे ||३||
बहेणि म्हणे काम क्रोध सर्व
गेले तेथेचि राहिले ब्राह्मणत्व ||४||


४२६
शमदम सर्व साथिले नवगुण
संतोषे संपन्न सर्वदा जो ।।१।।
ब्राह्मण वरिष्ठ श्रेष्ठाचाहि श्रेष्ठ
जयाचेनि भ्रष्ट मोक्ष पावे ॥२॥
तृष्णा मोह दंभ गेला अहंकार ।
वृत्ति निर्विकार सर्व कमीं ॥३॥
बणि म्हणे ज्याची निरसली वासना ।
ब्राह्मण तो जाणा ब्रह्मनिष्ठ ।।४।।


४२७
ब्रह्मभाव देही सदासर्वकाळ ।
ब्राह्मण केवळ तोचि एक ॥१॥
श्रुति स्मृति साक्ष करोनी बोलिले ।
नाही म्या ठेविले गुज काही ||२॥
ब्रह्मीच सर्वदा वर्तती इंद्रिये ।
ब्राह्मण तो होय याचि अर्थ ||३||
बहेणि म्हणे ब्रह्म नांदे तो
ब्राह्मण यातीही प्रमाण नसे तेथे ||४||


४२८
हरिकथा करी म्हणोनि हरिदास
संतवृत्ति त्यास संत म्हणती ॥१॥
क्रियेपाशी नाम आपण ठसावे ।
नलगे सांगावे सकळ लोका ॥२॥
सोन्याचे घडणार सोनार त्या म्हणती
वैद्य तो म्हणती वैद्यकाने ।।३।।
बहेणि म्हणे तैसे ब्रह्म जेथे
ब्रह्मण तो वेदे प्रतिहिला ||४||


४२९
ब्रह्म जाणे तोचि बोलिजे ब्राह्मण
वेदींचे वचन साक्ष यासी ॥१॥
पहा अनुभव आपुलिया देही ।
शाखासीही ग्वाही करोनिया ||२॥
द्वादशकांचे जया अंगी तेज
सूर्य तो सहज न बोलता ||३||
राजचिन्हे अंगी राजा तोचि एक ।
करी जो कनक परीस तो ॥४॥
पुरवील कामना तेचि कामधेनू ।
वारील मरणु अमृत ते ॥५॥
बैणि म्हणे तैसा ब्रह्माचा जाणता ।
ब्राह्मण तत्त्वता तोचि एक ॥६॥


४३०
ज्ञाननिष्ठ सदा लक्षी लक्षयुक्त
चित्त ते विरक्त विषयभोगी ।।१।।
तोचि एक जगी ब्राह्मण निर्धार
पहा चमत्कार मनामाजी ॥२॥
फळाचीच आस नाही जयामाजी
वर्ततो सहजी स्वधर्मेचि ॥३॥
बहेणि म्हणे दुजे न देखे आणिक ।
ब्राह्मण तो एक बोळखावा ||४||


४३१
भक्ति ज्ञान आणि वैराग्य मानसी
जाण वेद ज्यासी प्राप्त जाले ||१||
तोचि रे ब्राह्मण जाण ब्रह्मवेत्ता ।
आणिक तत्त्वत्ता द्विजोत्तम ||२||
विरक्ति हे सत्य जया अंगी भार्या
ज्ञाननि ज्ञानिया सानिक जो ॥३॥
गुरुवचनी सर्व नित्यनैमित्तिक ।
अखंड विवेक आत्मयाचा ॥४॥
शांति क्षमा दया भाव तो निजबोध ।
अपत्ये प्रसिद्ध जया होती ||५||
बहेणि म्हणे ऐसे देखोनिया चिह्न ।
तयासी ब्राह्मण वेद बोले ॥६॥


४३२
सद्गुरुचे वाक्य तेचि अग्निरूप
समिधा ते रूप वासना ते ।।१।।
ऐसा तो सानिक बोलिजे ब्राह्मण ।
विषयांसी हवन शेषभोक्ता ॥२॥
अविद्या अस्मिता काम-क्रोध-मुक्त
होऊनी यथोक्त आश्रमी तो ॥३॥
बहेणि म्हणे ऐस ब्राह्मण ते सत्य
वेदार्थ निश्चित हाचि खरा ।।४।।


४३३
सद्गुरुवचनी ज्ञानामि प्रगटला
हृदयी राहिला जयांचिया ॥१॥
तयासीच जमी ब्राह्मण म्हणावे ।
सांगितले स्वभावे मनासी या ||२||
विषयांचा होम ज्ञानाशीत करी
पूर्णाहुती खरी मनाची ते||
शा अवभृतस्नान केले ज्ञानगंगे ।
शेष ते विभागे सेवियेले ||४||
बहेणि म्हणे ऐसे चिह्नी जे चिह्नित ।
ब्राह्मण निश्चित तेचि एक ॥५॥


४३४
एक ते ज्योतिषी एक ते पाठक ।
अग्निहोत्री एक तीर्थाटनी ।।१॥
परब्रह्म जाणे तोचि की ब्राह्मण ।
देव तो आपण प्रत्यक्षचि ॥२॥
एक ते पंडित वैदिक ते एक
गायत्री नेटक ब्राह्मण ते ।।३।।
बहेणि म्हणे एक वीर्यमात्र द्विज ।
ऐसे ते सहज सांगितले ।।४।।


४३५
पिंड-ब्रह्मांडासी करोनिया ऐक्य
मनी महावाक्य-बोध जाला ॥१॥
तयासी ब्राह्मण बोलिजे साचार ।
ब्रह्मसाक्षात्कार प्रत्यक्ष हा ।।२॥
तत्त्वमसि पदीचा शबलांश सांडिला ।
जीव शिव केला ऐक्य- ज्ञाने ||३||
महाकारणादि देह चार पाहे
शोधोनिया जाये तुर्यपदा ||४||
सोऽहं हंस मंत्र अखंड उच्चार
समाधि साचार अखंडत्व ||५||
बहेणि म्हणे ब्रह्मवेत्ते हे ब्राह्मण
यांचिया दर्शने मुक्ति जोडे ।।६||


४३६
एकाचा निश्चय गुरुवचनी मुक्ति ।
एक ते मांडिती निर्गुणध्यान ||१||
यार आहे मोक्ष वेगळाधि जाण ।
ज्ञानी ते निर्वाण साधिती हो ॥२॥
सगुणचि मोक्ष एकाचिया मते
आकाररहित मोक्ष म्हणती ॥३॥
एक ते भाविती मोक्ष भक्ति ज्ञान
वैराग्य साधन म्हणती मोक्ष ||४||
एक ते सिद्धीते म्हणताती मोक्ष
शाखज्ञाते मोक्ष म्हणती एक||५||
एक ते स्वाचारे मोक्ष प्रतिष्ठिती ।
फलत्यागे भाविती एक मोक्ष ।।६।।
मनोजय एक कल्पिताती मोक्ष ।
ध्यानाचिया पक्षे मुक्ति म्हणती ||७||
एक महत्त्व विचारे स्थापिती ।
मद्यमांस ती मोक्षहेतु ॥८॥
एक ते इंद्रिये आचरती यथेष्ट
तोचि मोक्ष, भ्रष्ट मानिताती ||९||
एक से बेदाचे पठणे म्हणती
मोक्ष एक भाविती प्रपंचाते ।।१०।।
एक जागा दंडिती देहासी
म्हणती मोक्षासी हेतु हाचि ।।११।।
एक ते पंचाग्नि धूम्रपान बनी ।
मोक्ष हाचि जनी भाविताती ।।१२।।
एक ते संन्यासी जटिल तापसी ।
मोक्ष हा तयासी स्थापिती ते ।।१३।।
एक पंचीकरणे पहाती सर्वदा ।
म्हणती मोक्षपदा हेचि मूळ ||१४||
एक मौनी जपी तपी अनुष्ठानी ।
भाविती ते जनी येणे मोक्ष ।।१५।।
एक पंचमुद्रा लाविती आपणा
म्हणती मोक्ष जाणा येणे होय ।।१६।।
एक ते दैवते ध्याती नानापरी
मोक्ष हा अंतरी मानिताती ।।१७।।
बहेणि म्हणे मोक्ष आहे तो वेगळा
जाणती ते कळा ज्ञानवंत ||१८||


४३७
नानापरी जन कल्पिताती मोक्ष
परी तो प्रत्यक्ष नसे कोणा ॥१॥
वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडे ।
तत्त्वमसे जोडे आत्महित ॥२॥
त्वंपद तत्पद ऐक्य होईल
‘असि पदी मूळ सापडेल ||३||
म्हणे वृत्ति होती जै निश्चल ।
ते तुटे पडळ प्रपंचाचे ||४||


४३८
श्रोत्र आणि त्वचा चक्षु जिव्हा
प्राण ज्ञानेंद्रिये जाण पाच ऐसी ||१||
पाहुनी वेगळा आत्मा तो निश्चये ।
अनुभवे तू पाहे मनामाजी ||२||
वाचा पाणि पाद शिश्न आणि गुद ।
कर्मेद्रिये सिद्ध पाच ऐसी ||३||
अंतःकरण मन बुद्धि चित्त चौथे ।
अहंकार येथे पाचवा तो ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस गंध जाण ।
विषय दारुण पाच ते हे ||५||
बहेणि म्हणे ऐसा पंचाविसा
शोध तत्पदींचा बोध करी मना ॥६॥


४३९
पंचकोश आणि ताप जे त्रिविध ।
ईषना प्रसिद्ध हारपल्या ॥१॥
तयासी ब्राह्मण बोलिजेती सत्य
विचारोनी तथ्य सांगितले ||२||
साही उम्र्म्या आणि षड्भाव
देहीचे विचारेही साचे वोसंतिले ||३||
बहेणि म्हणे इच्छेचा निरास हा
जेथ ब्राह्मण तो सत्य ब्रह्मवेत्ता ॥४॥


४४०
याचे लक्ष याचा जया अंगी बोध
‘सत्’ शब्द स्वानंद सापडला ।।१।।
तोचि ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण बोलिजे
विज्ञान सहजे देह त्याचे ॥२॥
ज्ञप्ति अखंडता पूर्णता बाणली
समाधि लागली असंप्रज्ञ ॥३॥
बहेणि म्हणे चिह्न हेचि ब्राह्मणाचे
निश्चये शाखाचे सांगितले ||४||


४४१
तत् शब्दी समर्पी स्वधर्माचे फळ ।
होउनी अढळ ब्रह्मनिष्ठ ।।१।।
तयासी ब्राह्मण आम्ही म्हणो
शुद्ध मोत्र तो प्रसिद्ध भेटी होता ||२||
अहंकार अंगी जयासी न साहे
कर्तेपणी न ये दुजेपण ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे ब्राह्मण भेटता
ब्रह्म-सायुज्यता घरा आले ॥४॥


४४२
देव अंतरला योगही लोपला
भाव दुन्हावला प्राणियासी ॥१॥
काय करावे ते संचित धोख
विषय गोमटे वाटताती ।।२।।
नाम नये मुखा नावडे ते भक्ति ।
जिवासी विरक्ति नवेचि ते ||३||
बहेणि म्हणे संत साधु महानुभाव
नावडे तो हाय पातक्यासी ॥४॥


४४३
जडलेसे चित्त विषयी सर्वदा ।
नये ब्रह्मबोधा आत्मनिष्ठे ।।१।।
जया पे संचित नाही शुद्ध
ज्याचे देह पातकाचे खोतीव ते ।।२॥
अहंकार देही काम क्रोध लोग
आवडे अशुभ कर्म ज्यासी ॥३॥
बहेणि म्हणे श्रेष्ठा न मानी प्रमाण
तेचि एक हीन वोळखावे ||४||


४४४
अंधालागी जेवी उदेजेला भानु
कोल्हिया चंदनु व्यर्थ जैसा ||१||
ज्ञानहीना तेवी आत्मा हा प्रत्यक्ष
न ये मना साक्ष मूर्खपणे ॥२॥
चंद्राचा प्रकाश कावळ्यांसी पाहे ।
वानरांसी कार्य वस्त्रे होती ॥३॥
बहेरियासी काय गीत तानमान
श्वानासी मिष्टात्र जयापरी ||४||
नपुंसका जेवी पचिनी सुंदरा
प्राणेविण नरा भोग जैसा ॥५॥
बहेणि म्हणे तैसा सन्मार्ग मूर्खासी
बोधिता तयासी सिद्ध नाही ॥६॥


४४५
नाही जया हेत प्रीति ते सदबुद्धि ।
वैराग्याचा विधि ठाउकी हे ।।१।।
तथा ज्ञानप्राप्ति न घडे सर्वथा ।
मोक्षाची ते कथा केवी तेथे ||२||
सद्गुरुचा बोध नाही ज्यासी कदा
शास्त्रद्रोही सदा निंद्यधर्मी ॥३॥
बहेणि म्हणे मोह मानसी
अखंड न मानी जो लड वाक्य ||४||


४४६
भावना जयाची जये ठायी जैसी
फळप्राप्ती तैसी होय तया ॥१॥
काय तो संदेह असे या अर्थासी ।
पाहिजे क्रियेसी अंगी बळ ॥२॥
ज्ञानप्राप्तीलागी भजेल जो नर
ज्ञानचि निर्धार होय तथा ||३||
बहेणि म्हणे हेत धरी जैसा भक्त ।
तेणेचि तो मुक्त होय भावे ||४||


४४७
घृतासी तो संग अग्रीचा जालिया
का मीठ घातल्या उदकामाजी ।।१।।
संगाचा स्वभाव लागला जयासी ।
सामर्थ्य ते त्यासी सहज जाण ||२||
लोखंड परिसासी झगटले जेव्हा
किंवा ते माधवा वृक्षवली ।।३।।
बणि म्हणे चंद्र पौर्णिमेसी द्रवे
सिंधूचे हेलावे सहज येती ॥४॥


४४८
हिंगाचिया संगे कापूर नासला ।
लवणे विध्वंसिला क्षीरयोग ।।१।।
म्हणोनिया संग करावा तो करी ।
जो हो सौख्यकारी प्राणियाते ||२||
केशर काजळासी संगत जालिया
काजळाचा तया संग लागे ॥३॥
बहेणि म्हणे संग धरावा तो ऐसा
मोक्ष तो आपैसा होय जेणे ||४||


४४९
चंदनाचा संग जालिया निवासी
चंदनत्व त्यासी ठसावले ॥१॥
तैसा संतसंग कळला हा जाणिजे ।
विवेक हा कीजे मनामाजी ।।२।।
पुष्पाचे संगती तंतूचाही मान
तुलसीसंगे जाण मृत्तिका ते ।।३।।
बहेणि म्हणे संग करी रे नेटका
धरूनिया टेका आत्मनिष्ठे ॥४॥


४५०
ब्रह्मत्वाची खूण जप गायत्रीचा
जो सर्व वेदांचा मूलमंत्र ॥१॥
तयाहून परते आहेसे सांगती
ते जाणावे मतिमंद हीन ॥२॥
गुणसाम्य ऐसी म्हणती मूळमाया
गायत्री ते जया ब्रह्मरूप ||३||
अकार उकार मकाराचे बीज ।
ओंकाराचे निज उन्मनी है ।।४॥
इजपासूनिया जाले वेद्विद ।
गायत्री प्रसिद्ध वेदमाता ॥५॥
बहेणि म्हणे जया गायत्रीचा जप
तो ब्रह्मस्वरूप केवळ जाणा ॥६॥


४५१
वर्णाश्रम धर्म शुद्ध आचरावा ।
भगवंत धरावा एका भावे ।।१।।
ऐसे जो न करी न म्हणावा तो
धर्म-जाणावा अधर्म पापदेही ||२||
आधी स्नानसंध्या गायत्रीचा जप
करावा निष्पाप अष्टोत्तरशे ।।३।।
त्याउपरी मग तर्पण करावे हा
धर्म स्वभावे विप्रालागी ।।४॥
गीता-वेद-नाम जपावे सादर
घेवोनी विचार प्रेमभावे ||५||
मग यथाविधि देवाचे पूजन ।
धूपदीप जाण मंत्रयुक्त ॥६॥
नैवेद्य वाढोनी वैश्वदेव कीजे ।
प्रांतीचे ठेविजे स्विष्टकृत ॥७॥
नैवेद्य करोनी स्विष्टकृत
की शेवटीचे दीजे ।।८।।
साली कोन्ही आला जो अतीत |
जाणावा भगवंत देवरूप ||९||
आधी पूजा त्याची मग त्या इतरांची
त्याउपरी मुक्तीची पंक्ति कीजे ॥१०॥
ग्रासोग्रासी देव आठवावा जाण
असाक्षी करू नये भोजन ते ।।११।।
बहेणि म्हणे येणे कर्मब्रह्मनिष्ठ
रोकडे वैकुंठ प्राप्त त्यासी ।।१२।।


ओव्या- ४५२
वेद तोचि जीवात्मा ।
वेद तोचि परमात्मा ।
ज्याचेनि हा एवढा
महिमा ब्रह्मसुखाचा ||१||
वेदुचि नव्हता जेव्हा ब्रह्मांड
कैचे तेव्हा सुखदुःख भोगणे
या जीवा कासया पाहे ||२||
ॐकारब्रह्मचा बिंदु तेथुनी
उपजला वेदू त्रिगुणेसी
वाढला भेदू ब्रह्मांडाकारे ||३||
ऊर्ध्वमूळ अधोशाखा ।
प्रसवला वेद देखा ।
खांद्या पत्रपुष्प सर्वथा
निर्माण जाल्या ||४||
छंदपदजदाक्रम आरण्य-ब्राह्मण
जाण विस्तारला वेद
आपण ब्रह्मस्वरूप ||५||
कर्म तेचि ब्रह्म जाण ।
ब्रह्म तेचि कर्म आपण
कर्म ब्रह्म नाही रे
मित्र वेदार्थ-बोधे ।।६।।
तत्त्वार्थ वेदींचा अर्थ
वेदान्ताचा मथितार्थ जेणे
निरसे संसार भेदू अद्वयबोधे ॥७॥
अद्वय ऐसे हे वचन
दुसरे ते नव्हेचि जाण ।
स्वसंवेद्य अवघा
आपण सर्वी सर्वत्र ॥८॥
भूतमात्री व्यापक
तोचि तू वर्ततू देख ।
व्यतिरेकान्वये सुख
अनुभवे पाहावे ।।१।।
बहेणि म्हणे वेदान्वये ।
ज्ञान ते निखळ लाहे
वरकड ते मलिन होवे ।
अंधाचे परी ।।१०।।


४५३
कर्माआदि अंती मध्ये ब्रह्मभाव ।
जाणे तो अनुभव ज्ञानियाचा ॥१॥
ऐसिया स्थितीचे ब्राह्मण ते खरे ।
येर ते पामरे वोळखावे ।।१।।
ॐकारे आदरी तत्कारे समर्थी
सत्कारे स्वरूपी ऐक्य करी ॥३॥
बहेि म्हणे तेही ब्रह्मची निभ्रांत
अनुभवोनी तथ्य लीन होय ॥४॥


पंढरीनाथपर

४५४
ब्रह्मांड पंढरी हे आजी जाली
खरी मुखी नाम घेता हे हरिहरी ।।१।।
सुख सुखावले कोणा सांगू गे माये ।
जिकडे पाहे तिकडे हरि भरला आहे ।।२॥
सरली भ्रांति हारपला देहभाव ।
महदामहद नुरे जेथे ठावाठाव ॥३॥
गेले मीपण हारपला भावाभाव ।
बहेणि म्हणे देखियेला पंढरीचा राव ॥४॥


४५५
माझा दीनानाथ दीनबंधु हरि
नांदे भीमातीरी पंढरीये ।।१।।
विटे नीट उभा समचरण साजिरी ।
पाऊले गोजिरी सुकुमार ।।२॥
वैजयंती माळा रुळतसे गळा ।
कासेसी पिवळा पीतांबर ॥३॥
भाळी ऊर्ध्व पुंडू कुंडले गोमटी ।
चंदनाची उटी सर्वागासी ||४||
शिरी टोप साजे रत्नांचा साजिरा ।
काढियेला तुरा मोतियांचा ॥५॥
जैशा हिऱ्याच्या शोभती दंतपंक्ती ।
बहेणि तया ध्याती हृदयामाजी ॥६॥


४५६
जन्मोनिया जोडी जोडिली
संसारी सापडली तीरी चंद्रभागे ।।१।।
घनःश्याम मूर्ति सावळी डोळस
उभी सावकाश विटेवरी ॥२॥
नामरुपातीत चैतन्य शाश्वत
आत्मस्वरूपस्थित प्रगटली ॥३॥
वेदा अगोचर श्रुतीहूनी पर ।
निर्गुण निर्विकार पहाते गे ।।४।।
अखंड चिद्धन दिसे सर्वसाक्षी
बहेणि तथा लक्षी हृदयामाजी ॥५॥


४५७
लाचावले मन नव्हे त्या वेगळे
देखिले सावळे परब्रह्म ।।१।।
जाली तन्मयता हालेना पापणी
घेत असे धणी स्वरूपाची ॥२॥
विसरले मन आपले आपण ।
पडोनि ठेले शून्य मी-तूपणा ।।३॥
नाठवे मीपण पडला विसरू
इंद्रियव्यापारू पारूपला ||४||
राहिली इंद्रिये अचेतन वृत्ती
मना आत्मस्थिति लागलीसे ॥५॥
लागल्या पे वृत्ति खुंटली हे गती ।
बहेणि ते भोगिती आत्मसुख ।।६।।


४५८
चालता पाऊल पंढरीच्या वाटे ।
ब्रह्मसुख भेटे रोकडेचि ।।१।।
पहाता ऐसे सुख नाही त्रिभुवनी
ते पहावे नयनी पंढरीसी ।।२।।
गाता हरिनाम वाजविता टाळी
प्रेमाचे कल्लोळी सुख वाटे ||३||
दिंडीचा गजर होतो जयजयकार
मृदंग सुस्वर वाजताती ||४||
हमामा टिपरी पालिती हुंबडी ।
होवोनिया उघडी विष्णुदास ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा आनंद वाटेचा
कोण तो देवाचा देखे डोळा ॥६॥


४५९
चला झडझडा वोसुंडुनी हे वाट
पंढरी मूळपीठ दूरी आहे ।।१।।
सांडा आडकथा वोसंडा मारग ।
वाट पांडुरंग पहातसे ||२||
स्वहिताची जया असेल तातडी ।
तेणे घडीने घडी काळ साधा ॥३॥
गेलिया दिवस पडेल अंधारी हे
ना तैसी परी थार नाही ||४||
पडो देह राहो, धरावा निर्धार ।
पांडुरंगी भाव सांडू नये ॥५॥
बहेणि म्हणे आजी जाये
वेळोवेळा तरी पर्वकाळासा ||६||


४६०
सर्वांगव्यापिणी भीमेचा महिमा
वर्णावया ब्रह्मा अनिर्वाच्य ॥१॥
धन्य ते देवाचे पंढरीचे लोक ।
घेती प्रेमसुख विठोबाचे ||२||
भीमा-चंद्रभागा संगम जे ठायी ।
वानावा वो काई महिमा तेथे ॥३॥
त्याहीवरी जेथे पंढरीचा देव
काय सांगो भाव क्षेत्रमहिमा ||४||
तिहींचा संगम बसे जये दायी
सांगावा तो काई महिमा त्याचा ॥५॥
ऐसिया क्षेत्राचा महिमा ऐकता ।
पापाची हे वार्ता स्वप्नी नाही ॥६॥
स्नानदान घडे देवाचे दर्शन तेथे
जन्ममरण काय करी ।।७।।
फिरे सुदर्शन सदा सर्वकाळ
काळ आणि वेळ केची तेथे ॥८॥
स्नानालागी देव येताती मिळोनी ।
बैसोनी विमानी माध्याह्रीके ||९||
ऐसा क्षेत्रमहिमा कोण वानी
सीमा नकळे अधमा असोनिया ||१०||
धन्य पुंडलीक धन्य त्याचा भाव ।
क्षेत्राचा अनुभव वाढविला ।।११।।
बहेणि म्हणे पुण्य पाहिजे ते
गाठी व्हावयाते भेटी विठोबाची।।१२।।


४६१
धन्य ते देवाचे वारकरी साचे
अंकित विठोबाचे जन्मोजन्मी ॥१॥
ऐसियांची भेटी करिता हितगोष्टी
सुखाचिया कोटी हेलावती ॥२॥
कोण सांगो पुण्य पंढरीच्या लोका
अखंड श्रीमुखा न्याहाळिती ॥३॥
चंद्रभागे स्नान देवाचे दर्शन
अखंड कीर्तन महाद्वारी ॥४॥
करिती जयजयकार मिरवे दिंडीभार
गर्जे पै अंबर नामघोषे ।।५।।
प्रपंचपरमार्थ अवघा सुखरूप ।
कळिकाळाचे मुख स्वप्नी नाही ॥६॥
तुळसीवृंदावन पद्मरांगोळिया
कुंकमाचे पहा सडे द्वारी ||७||
कामधाम अवघे जाले विठ्ठलरूप
पंढरीचे . लोक विठ्ठल पै ।।८।।
वोखदासी पाप न मिळे पाहता ।
ब्रह्मसायुज्यता पंढरी हे ।।९।।
जीवन्मुक्तदशा पंढरी- पाटणी
ब्रह्म हे गोठणी विठ्ठलवेषे ।।१०।।
पंढरीवरून येती जाती जीव
मुक्तीचा निर्वाह पशुपक्ष्यां ।।११।।
बहेणि म्हणे आम्ही धन्य जालो
सुखी येता नाम मुखी पंढरीचे ।।१२।।


४६२
पंढरीचे सुख काय सांगो आता
जेथे चारी वाचा वोसरल्या ॥१॥
जेथे पुंडलिके केला रहिवास ।
धन्य त्याचा वंश मातापिता ||२||
पंढरीचा महिमा कोण करी
सीमा वर्णावया ब्रह्मा अनिर्वाच्य ॥३॥
बहेणि म्हणे क्षेत्र पंढरीसारिखे
ऐसे हे न देखे भूमंडळी ||४||


४६३
उदंड ऐकिला उदंड गाइला ।
उदंड देखिला क्षेत्रमहिमा ||१||
पंढरीसारिखे नाही क्षेत्र कोठे ।
जरी से वैकुंठ दाखविले ||२||
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर
ऐसा विटेवर देव कोठे ||३||
ऐसे बालुवं ऐसी हरिकथा ।
ठाई ठाई देखा दिंडीभार ||४||
ऐसे हरिदास ऐसे प्रेमसुख ऐसा
नामघोष सांगा कोठे ॥५॥
बहेगि म्हणे आम्हा अनाथाकारण
पंढरी निर्माण केली देवे ॥६॥


४६४
चोविसा-मूर्तीसी आसन मुद्रा ध्यान
हा पांडुरंग जाण निर्गुणरूप ॥१॥
ज्याचे पायी जन्म देवा आणि तीथां ।
ते मूर्ती तत्त्वता विठोबाची ||२||
वेदा आणि शाखा ॐकार हा
मूळ सर्वांचे समूळ पांडुरंग ॥३॥
विटेचा संकेत पाचवी अवस्था
ब्रह्मसायुज्यता निखळरूप ॥४॥
कटी हात दोन्ही खुणाची दाखवी
अनेक एकत्वी पहा कैसे ॥५॥
बहेणि म्हणे तथा लोधले हे मन
धन्य जया खूण कळी आली ॥६॥


४६५
तीर्था तीर्थराव ती एक पंढरी
पाहता पृथ्वीवरी आणिक नाही ।।१।।
धन्य ते देवाचे घेती प्रेमसुख ।
सदा नामघोष मुखी बसे ।।२।।
भीमा चंद्रभागा दोहींचा संगम
नदि मेघश्याम पांडुरंग ॥३॥
पुण्य पुष्पावती तीरी वेणुनाद
सप्रेम गोविंद क्रीडा करी ॥४॥
बैसोनी विमानी बेती देव तिन्ही
काळ हा साधुनी माध्यान्निके ।।५।।
बरह्मन्त्रय-क्षेत्र पंढरी-पाटण
म्हणोनी श्रेष्ठ जाण बहुता गुणे ||६||
कर्मब्रह्म काशी नामब्रह्म पंढरी ।
सर्वब्रह्मगिरी खलुविद ||७||
पंढरीमाझारी ब्रह्मत्रयवास
म्हणोन विशेष पंढरी है ||८||
बहेणि म्हणे पंढरी सर्वांही
वरिष्ठ ऐशा श्रुती स्पष्ट बोलताती ।।९।।


४६६
धन्य धन्य ते पंढरी
जेथे नांदतो श्रीहरी ॥१॥
धन्य धन्य चंद्रभागा
जेथे वास पांडुरंगा ॥२॥
धन्य धन्य ते पचाळ
जेथे राहिले गोपाळ ।।३।।
धन्य धन्य वेणुनाद
क्रीडा करितो गोविंद ॥४॥
धन्य धन्य वाट जेथे
उभा पायी वीट ॥५॥
धन्य धन्य पुंडलीक ।
हरी साधियेला देख ॥६॥
धन्य धन्य पुष्पावती ।
जेथे वृंदा हे श्रीपती ॥७॥
बणि म्हणे धन्य धन्य
पांडुरंगी जे अनन्य||८||


पंढरीमाहात्म्यपर

ओव्या- ४६७
ऐका हरिभक्ताचा महिमा केली पुंडलिके
थोर सीमा गवसणी घातली व्योमा ।
पुरुषी पुरुषोत्तमा साथिले ॥१॥
पुंडलिकाऐसा पतित नसे
त्रिभुवन अपवित्र पितरांची
मर्यादा न पालित गालिप्रदाने समय ॥२॥
पितरे जे सांगाये हैं पुंडलिके
न ऐकावे शिव्यागाळीस द्यावे
आणि संपादाये पापासी ॥३॥
ज्या पितरांचेनि हा संसार
सुखाचे भोगिजे सुखतरु ।
त्या पितरांचे मांडिले चारा ।
ऐसा पुत्र निपजला ||४||
ऐसे करिता किती एक दिवशी
असोनि चालिला वाराणसी सर्व
कर्मभोग घेउनी पुत्र विवशी ।
क्रमित वाट चालिला ॥५॥
तव भाग्योदयकाळ आला
पापाचा संग्रह तुटला ।
उभयांचा भोग सरला
दिवस उदेला पुण्याचा ॥६॥
जेवी गाय सापडे वागा
ते हरी वळे पै गा
अवचट धावणे पावे वेगा तेवी
या उभयवर्गी देव पावला ।।७।।
जेवी पाषाणी फुटे झरा
की वांझ प्रसवली पुत्रा ।
तल्हाति केस अंतरा ।
उपजला मोह पुंडलिका ॥८॥
देखोनि अपवित्राचरण पुंडलिक
त्रास घेत मानून म्हणे
मी घोर पापी गहन ।
चुकलो भजन पितरांचे ।।९।।
कोण पाप होते ताटी ।
पितृव्याशी केली आटाआटी ।
ऐसा कळवळोनी पोटी
पाय कवटाळी पितरांचे ॥१०॥
म्हणे काय करावी वाराणशी ।
मातापितर हेचि माझी काशी ।
मुरडोनी आला मान देशासी
अटक बनासी प्रार्थिले ।।११।।
समोती बारा योजन ।
देखोनि अंती दंडकारण्य
स्वनी येती पक्षी जाण
न पड़े कदा दृष्टीसी ||१२||
अत्यंत वृक्षांची दाटणी झेपावल्या
दिसती गगनी जेथे सूर्याचे
दर्शनी मोकळीक असेचिना ।।१३।।
ऐसे भयानक वन तेते
पुंडलिक राहिला जाण ।
पाहोनी सरोवराचे जीवन
केले नामग्रहण चंद्रभागा ||१४||
तेथ आरंभिली सेवा ।
पुंडलिका उपजला भावा ।
मानित मातापिता देवा ।
जडला सद्भावा चरणी त्यांच्या ।।१५।।
ऐसे जाले कितीएक काळ ।
तब देखिले नारदे एके
वेळ म्हणे हा तो येथे प्रबळ
कोण भक्तराव उदेला ||१६||
देखोनि पुंडलिकाची निष्ठा ।
जडली देहा पूर्ण काष्ठा
दृश्य सारूनिया अनिष्टा नेणो
हृदयस्था भेटी जालो ।।७।।
देखोनिया भरतमुनि ।
जाला हर्षयुक्त अंत:करणी
थोर कौतुक वाटले मनी ।
अश्रु नयनी लोटता ||१८||
नारदे देखोनी निष्ठा ।
त्वरे गेला वैकुंठा म्हणे
नवल देखिले भगवंता
हर्ष चित्ता न समाये ॥१९॥
सप्रेमे दाटला कंठ बोलता
कापती ओठ नवनी होत अश्रुपात
म्हणे भगवंत काय जाले ||२०||
देवे आलंगिला हृदयी ।
नारदासी म्हणे सांग काही
नवल वर्तले लवलाही ते
गुज काही सांग पा ॥२१॥
तंव नारद म्हणे नारायणा ।
मी गेलो होतो भ्रमणा ।
तेथे देखिले नवल जाणा ।
त्या वचना ऐकावे ।।२२॥
मृत्यु-लोकठायी ।
दंडकारण्य नाम पाही
मानदेश अभिधानेही
तेथे ठायी देखिले ||२३||
भ्रमण करिता गेलो तेथे ।
तब अवचिता देखिले नवलाते ।
संतोष वाटला चित्ताते ।
ते तुज हृदयी ठाउके ||२४||
तया अरण्यामाझारी ।
द्विज एक पितृसेवा करी
त्याची देखोनिया भजन- कुसरी
काय वानू थोरी तयाची ||२५||
वायू उफराटा मेववेल हे भूगोल
पालथे घालवेल अमिप्रवेशही करवेल
परी भक्ति-नवल सांगवेना ।।२६।।
विषाचे कवल घेववती सहा
समुद्र कोरडे करवती ।
परी तद्भक्तीची अपार शक्ती ते
चोज तुजप्रती काय सांगो ।।२७।।
वरकड साधन ते काये ।
कोण त्यांचे नवल पाहे
साधनापरीस या पाहे
मज तो नव्हे साध्यता ।।२८।।
त्याची भक्ती देवा पहाता नेणे
पावाल तादात्म्यता की हे ब्रह्मसायुज्यता
आली तत्त्वता रणांगणासी ।।२९।।
ऐकोनी भक्तीचे रहस्य देवाचे
उचंबळले मानस हाती धरुनिया
नारदास गुप्त रूपेसी निघाले ||३०||
सेजी होती रुक्मिणी ।
तीसही साकळण करुनी ।
गरुडासही सोडुनी निघाले
चक्रपाणी नारद ।।३१।।
कहा हा देव, भक्त शिरोमणी
भक्तासाठी चालिला चरणी
उडी घातली वैकुंठाहुनी ।
आला क्षणी मानदेशी ।।३२।।
सवे नारद माझारिया वन
उपवन दावितसे देवराया
अवचित देखिले भक्तराया।
तया पुंडलीकासी ||३३||
देवे देखोनी पुंडलीकासी ।
विस्मित झाला थोर मानसी
पुंडलीक न देखधि तयासी ।
चाड मानसी घरीचना ।।३४।।
मग नारद बोलिला मात ।
पुंडलिका आले रे भगवंत ।
जपासाठी येवढे क्लेशार्थ
तो धावत आला पाहे ।।३५॥
पुंडलीक जाला एकनिष्ठ ।
फिरोनी न करीच दीठ ।
दिली भिरकावुनी वीट ।
तीवर वैकुंठ उभे ठेले ।।३६।।
ठेवोनिया हात कटी ।
ठाकले ब्रह्म विटी
नखाग्री लावुनी दृष्टी ।
ब्रह्म सृष्टी न्याहाळीत ||३७||
नेणो मुद्रा लागली खेचरी
तटस्थता लागली शरीरी
दृष्टी ठेवूनी पुंडलीकावरी ।
जाला अंगभरी श्रीविठ्ठल ।।३८।।
जयाच्या अंतरी प्रवेशे देव
तयासी पुसी संसाराचा ठाव ।
व्यापकपणे नांदे स्वयमेव ।
देखोन सद्भाव भक्तीचा ।।३९।।
पुंडलीकाची देखोन भक्ती
धावोनि आला बैकुंठपति
पुंडलीकाची निजस्थिती
प्रवेशला चित्ती हरी त्याचे ||४०||
देखोन पुंडलिकाचा भावो
वास केला तथा ठायो
वाहविला कीर्तीचा महिमा वो
पंढरी नाम स्थापियले ||४१।।
घेरीकडे वैकुंठभुवनी उठोनी
पाहे जब रुक्मिणी ।
तव न दिसे चक्रपाणी
थोर चिंतनी पडियेली ।।४२।।
गरुडासी जब पाहे तव
तो द्वारीच उभा आहे मग
म्हणे कटकटा माये
काय झाले कळेना ||४३||
कोणीकडे निजे केले ।
नेणो कोणाचे धावणे काढिले
ऐसे कोण सांकडे पडिले
मौनेच गेले श्रीपती ।।४४।।
गरुडासी म्हणे रुक्मिणी ।
आज विपरीत गमते गा
मनी न पुसता गेले चक्रपाणी ।
भक्तशिरोमणी कोण भेटला ।।४५।।
तव जाला हाहाःकार देव मिळाले
सबळ म्हणती थोर जाले
नवल नेणो गोपाळ कोठे गेले ॥४६॥
नित्य-दर्शना पडिले पाणी ।
उदास झाली वैकुंठभुवनी
जैसी विधवा अलंकारोनी ।
कोण जनी मंडिता ।।४७||
देव करिताती रुदन ।
रुक्मिणी आक्रंदती गहन
थोर प्रळय मांडिला जाण न
लगे मार्ग भगवंताचा ।।४८।।
तव अकस्मात नारदमुनी ।
रुक्मिणीने देखिला नयनी
पुसती जाली तयालागुनी ।
दीनवाणी जगन्माता ।।४९।।
वैकुंठीचे सकळ देव ।
हाहाकृत देखिला भाव
मग सांगितला निर्वाह ।
चिंता न करा म्हणतसे ॥५०॥
मृत्युलोकाचे ठायी ।
पुण्यशील देश पाही ।
पुंडलिक नामे द्विज देही ।
करी निर्वाण अनुष्ठान ॥५१॥
महावृक्षांची दाटणी अग्रे
झेपावती गगनी रवी पाहाता
नदी सर्वकाळ अंधा ||५२||
ऐसिया बनाचे ती पुंडलीक ब्राह्मण पाही ।
पितृसेवा निवही चंद्रभागासरोवरी ॥५३॥
त्याचा पहावया भाव
गेला वैकुंठीचा राव ।
देखोनि भक्तिभाव ।
देवाधिदेव रहिवासले ।।५४।।
देखोन पुंडलीकाची निष्ठा ।
नेणो चांगली पूर्ण
काशा उणे आणुनी पैकुंठा
रहिवासले देखा वैकुंठपती ॥५५॥
ऐकोनी नारदाची मात धावोनि
आले देव तेथ विटी देखोनि
भगवंत मौन मंडित राहिले ||५६||
श्रुतिशास्त्रश्रवण करिती ब्रह्मादिक गण
परी हो नारायण अणुमात्र वदेना ॥५७॥
मग म्हणती रे कटकटा ।
कोणी देखिली पुंडलीकनिष्ठा ।
उभे केले.वैकुंठा चमत्कार मोठा भक्तीचा ।।५८।।
नाना उग्र साधने एक
साधिती प्राणापाने ब्रह्मांडी
नेला आत्मा जाणे ।
तेथेही नारायण साधेना ।।५९।।
यावेगळे अनेक करिती
साधने सोसून दु:ख ।
परि भगवंत न सापडे
देख तो कोणे सुखे रातला ॥६०॥
ऐसा करिता विचार ज्ञाने
निवडता सारासार ।
तव सापडला भक्तीचा आगर
सेवा थोर पितरांची ॥६१॥
मग म्हणती हा भक्तिराणा
जाणे ब्रह्मप्राप्तीच्या खुणा
प्रत्यक्ष साधिला वैकुंठराणा ।
खिळून वदन उभा केला ।।६२||
पहा ते मूळ दंडकारण्य
त्याही वरते ब्रह्मारण्य
तीर तरी चंद्रभागा जाण
देखोनि मन आनंदे ।।६३॥
ऐसियावरी हा भक्तराणा
उदेला दिसे रवी जाणा ।
देवे जाणुनी पुंडलीक खुणा
रहिवास जाणा केला सुखे ।।६४।।
ऐसा जाणोनी अंतर्भाव
देवेही केला निर्वाह ।
ठेविले पंढरपूर नाव
वसविले गाव पुंडलीकाचे ।।६५॥
रुक्मिणीसहवर्तमान आले
समस्त ऋषिगण दुजे केले
वैकुंठभुवन केले नामग्रहण भूवैकुंठ ।।६६।।
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर
ऐसे वाटली भक्तवीर ऐसे देव
ऐसे नगर जयजयकार कोठे महाद्वारी ।।६७।।
ऐशा पताका ऐशी निशाणे
शंखभेरी वाजती गहने ।
ढोल दमामे तुरे जाणे टाळ
मृदंग वाजती घरोघरी तुळसीवृंदावन ।
पयांकित रांगोळी जाण
कुंकुमार्चित सडे गहन ।
त्रिकाळ जाण पूजा करिती ।।६९।।
धन्य धन्य तेथीचे लोक
नगर नागरिक देखा पतंग
भृंग पशुपक्ष्यादिक तरुवर धन्य झाले ॥७०॥
क्षेत्रावरुन जाती येती हो का
नर पशु-पक्षि-याती
पंचक्रोशीमाजी जे सापडती ।
त्यासी अधोगति नसेचि ।।७१।।
या पंढरीचा महिमा ऐकता ।
नासे कोटी ब्रह्महत्या या
पंढरीस वास करिता
चिंता तयासी कासयाची ।।७२।।
ऐसी कथा ऐसे निरूपण या
पंढरीचे करिता श्रवण होय
बेचाळीस कुळ-उद्धरण ।
जन्ममरण चुकले त्या ॥७३॥
इतुका पुंडलिकाचा महिमा ।
वाढला भक्तिरसप्रेमा ।
थोर केली भक्तीची सीमा
पुरुषी पुरुषोत्तमा साधिले ||७४||
बहेणिचा निजभाव ।
जाला पंढरीसी निर्वाह ।
पांडुरंगी जडला भाव
जाला ठाव निजपदी ।।७५।।


पतिव्रताधर्मपर

४६८
पतिव्रता धर्म ऐका गे साजणी
धन्य ज्या गर्तिनी पुण्यसीळ ।।१।।
येणेचि श्रवणे मुक्ति होय जीवा ।
पतीविण देवा नाठविजे ॥२॥
आपणा आपण वोळखिले जिने ।
धन्य तेचि जाणे पतिव्रता ||३||
प्रपंच परमार्थ चालवी समान
तिनेचि गगन झेलियेले ||४||
कर्म तेचि ब्रह्म ब्रह्म तेचि कर्म ।
ऐसे जिने वर्म जाणितले ॥५॥
अखंड तो मनी भगवंत सर्वथा ।
तेचि पतिव्रता निकी लोकी ॥६॥
रागद्वेष मनी जाणिवेचा पुंग
न धरिजे संग अधर्माचा ॥७॥
इंद्रियांच्या वृत्ति विधीने
सावरी न दिसे अंतरी भाव ||८||
साधुसंतसेवा पतीचे वचन
पाळी तेचि धन्य पतिव्रता ।।९।।
शांतिक्षमादया पाळी भूतकृपा
जाणोनी स्वरूपा पतीचिया ॥१०॥
पतीचे वचन अमृतासमान
धन्य तिचा जन्म मातापिता ।।११।।
बहेणि म्हणे तिने जिंतिला संसार ।
वैकुंठीची धार केली तिने ।।१२।।


४६९
परपुरुषाचे काय सांगो सुख
हरे सर्व दुःख संसाराचे ।।१।।
म्हणोनिया संग धरावा तयाचा ।
सकळ सुखाचा सुखदाता ।।२।।
परपुरुषाचे देखता चरण
उपरमे मन सुखावोनी ||३॥
परपुरुषाचे देखता स्वरूप
कोटी सूर्यदीप हारपती ॥४॥
परपुरुषाचे सुख लाहे जरी
उत्तरोनी करी सीस घ्यावे ||५||
बहेणि म्हणे कोण न
कळे पुण्य केले सुख
हे लाधले परपुरुषाचे ॥६॥


४७०
पतीचिया बोला सर्वस्वे उदार ।
न भंगी उत्तर जीव जाता ॥१॥
धन्य ते संसारी जाति गोत कुछ ।
वैकुंठीचे मूळ तियेलागी ।।२।।
कायावाचामने पतीसी शरण
तिच्या ब्रह्मज्ञान दारी लोळे ।।३।।
पापपुण्य काही न विचारी मनी
पतीच्या वचनी जीव द्यावा ||४||
विधीचे भजन अखंड शेजारी
जैसी ते कामारी दासी पाहे ॥५॥
बहेणि म्हणे तिने उभयता कुळे ।
तारियेली बळे पतिधर्मे ॥६॥


४७१
ऐका गे साजणी स्वहिताच्या कोन्ही ।
सांगता हे मनी धरा बाई ।।१।।
आपुलिया संसारा काही हित
करा सांगताहे धरा मनोभावे ॥२॥
पाहिजे ते पुण्य सुकृताच्या कोडी
तेव्हा लागे गोडी परपुरुषी ||३||
परपुरुषे रातली संप्रेमे मातली
तिची काय बोली येथे आता ||४||
स्वमुखे रातली जनांत न्हावली ।
निघोनिया गेली लोकाचारी ॥५॥
क्रियानष्ट धर्म आचरो लागली
वाळोनी टाकिली गणगोती ॥६॥
न कळे याति कुळ नाव रूप
कोन्हा गेली पै रिधोन त्याजसवे ॥७॥
तियेचेनि नावे फोडावी घागरी
नाही ते संसारी बणि म्हणे ॥८॥


४७२
ऐसी कोण आहे उदार जीवाची
गोडी घे तयाची मनोभावे ।।१।।
आपुलेनि हाते धरा लावी आगी ।
मग त्याच्या संगी सुख भोगी ॥२॥
जनवाद लोक बोलती अपार ।
न संडी निर्धार संग त्याचा ॥३॥
बहेणि म्हणे कायावाचामनप्राण
परपुरुषालागोन रातलीसे ।।४।।


४७३
सांडियेली लाज लौकिकवेव्हार ।
मांडियेले चार परपुरुषी ।।१।।
आता आम्हासवे काय जना चाड ।
कासयाची भीड धरू बाई ॥२॥
लोकलाज शंका सारिला पडदा
परपुरुषी सदा रळी करू ॥३॥
मान-अपमानी नाही आम्हां काज
एकांतीचे गुज सेवू बाई ||४||
बहणि म्हणे तोंड नलगे दावा
ऐसे केले देवे काय करू ॥५॥


४७४
धन्य त्रिभुवनी वंद्य पतिव्रता
जी आपुल्या निजहिता प्रवर्तली ||१||
ऐसियेची भेटी होताच लैकरी ।
पापाची बोहरी होय तेणे ॥२॥
आपुला स्वपती जिने वोळखिला चित्ती ।
धन्य ती जगती त्रिभुवनी ॥३॥
श्रवणी तोचि ऐके मननी तोचि देखे ।
निजध्यासे सुख घेत असे ||४||
अणुमात्र वृत्ति नव्हे तिची भिन्न ।
सदा समाधान स्वामिसुखे ॥५॥
दृश्य या त्रिमित सारोनिया मागे
सदा उभी संगे स्वामीसेजी ॥६॥
स्वामीचे बोलणे खुणाचि जाणणे ।
मौनेचि करणे विहित धर्म ||७||
बोलता मौन्य अकारणा शून्य
गुण ना निर्गुण वर्ततसे ||८||
जे अद्वैतानिराळे ब्रह्मांडावेगळे
ते सुखसोहळे भोगीतसे ||९||
जीवनाचे जीवन असंगी समाधान
त्रिपुटी विलक्षण नांदतसे ||१०||
ज्ञान राहिले संपन निजानंदघन होउनी ||११।।
होउनी ठेली वृत्ति अवघी पारूपली
तेथे कोण बोली बोलू आता ||१२||
ऐसी स्थिति जया स्त्री अथवा पुरुषा ।
धन्य तेचि देखा पतिव्रता ॥१३॥
बहेणि म्हणे धन्य तेचि जन्मा
आली कीर्ती विस्तारली त्रिभुवनी ॥१४॥


करुणापर

४७५
मोठेपण तुझे घेतले विकत
अजामिले सुत पाचारिता ।।१।।
वर्म हे कळले अकस्मात तुझे ।
नामेच पाविजे तुझे पायी ॥२॥
गणिका ते शुकासी पाचारिता
अंती अहेतुक चित्ती पावलासी ॥३॥
बहेणि म्हणे तुझी किल्ली सापडली
आता व्यर्थ बोली करू नये ||४||


४७६
तुज पावावया मार्ग असंख्यात
घाबरले चित्त होते माझे ।।१।।
नाम निःसंदेह सापडले वर्म
आता माझे प्रेम उच्चाटेना ||२||
कर्माचे कचाट वोसंतील कोण
पहा स्त्रीदेह जाण असे माझा ||३||
योगाच्या अभ्यासे आड येती सिद्धि ।
तयामाजी बुद्धि स्थिर नव्हे ॥४॥
ज्ञान तो अगम्य नयेचि समता ।
तेथे नव्हे चित्ता समाधान ॥५॥
बहेणि म्हणे नाम आम्हा हे सांगाती
याची माझी गति एक जाली ॥६॥


४७७
नामरूप दोन्ही जावळी भावांडे
एकासवे घडे घात एका ॥१॥
पहा तो ‘अनुभव’ जाणोनी अंतरी ।
दिसे अळंकारी सोने जैसे ॥२॥
आकारासी नाव जोडले निश्चित
निराकार तेथ दुजे काई ||३||
बहेणि म्हणे नाम स्वरूप वेगळे
भावी त्या न कळे गुहा गोष्टी ॥४॥


४७८
भीमानिकटदेशी तू
पुंडलिका वर
देसी जडजीवतारक,
परियेसी पांडुरंगा ॥१॥
कटी कर ठेवुनि बचने ।
उद्धरसी जगरचने ।
साधुसंगती धावसी सुचने ।
तू पांडुरंगा ॥२॥
न दिसे योगतपे सहसा ।
मुक्तिपद हरितू विरसा
बणि म्हणे दोनतारका
जगदीशा तुरंगा ॥३॥


४७९
संचिताचे पूरे वाहावले होते ।
नाम हे अवचिते सापडले ।।१।।
धरुनी आधार निघाले बाहेरी ।
जालासी कैवारी पांडुरंगा ॥२॥
अविद्येच्या डोही होते मी बुडाले ।
नाम तुझे जाले तारू मज ||३||
बहेणि म्हणे भ्रम-भवरीया आत
जाता जीव तेथ नाम आले ॥४॥


४८०
भ्रमाचिया सधैं देखिये
मातुर्भुज गारोडिया ।।१।।
पाहतोसी का जीवहत्या सिरी
पडेल निर्धारी पांडुरंगा ।।२॥
विषयापुरे सापडले आत
कामाग्रीही तेथ साथ जाला ॥३॥
ब म्हणे व्याधे करुनी सिद्ध
वाण लाविला निर्वाण पाहू नको ॥४॥


४८१
तुम्ही आम्ही सुखे होतो एके ठायी
कोणते अन्यायी सापडलो ||१||
तुझ्याचि हेताने वाढला संसार
आम्ही का रे दूर अंतरलो ||२||
महत्त्वाचे असे केले आम्हा भक्त
म्हणसी आम्ही मुक्त बद्ध तुम्ही ॥३॥
चणि म्हणे नको आम्हापुढे शब्द
सांगता हा बाद हारविसी ॥४॥


४८२
तुजपासी फार असे चतुराई ।
आम्हापासी का उणी आहे ||१||
तुम्ही आम्ही एक एकाच गावचे
विसरलो त्याचे फळ मागे ||२||
तुझे ठायी ऐसे नसावे सर्वथा
थोरपण वृथा वागविसी ||३||
बहणि म्हणे मूळ आम्हा तो न सांडे ।
नका होऊ बेडे पांडुरंगा ॥४॥


४८३
फार दिवस आम्ही पाहिलेली
वाट होईल बोभाट वियोगाचा ||१||
नाही तुम्हा आस आमुची है जरी
आता आम्ही तरी वाटा घेऊ ।।२।।
उचित है बापा तुझे नव्हें ऐसे
कळोनि मानसे आले येथे ॥३॥
बहेणि म्हणे देवा भेटलियाविण
होय माझा प्राण कासाविस ॥४॥


४८४
पदरासी काही लागो नेदी ढका
भय काही नको धरू पोटी ||१||
असेल आमुचे तेचि मागो हरी ।
भेटी देई भरी क्षणु एक ||२||
माझे चित्त मजसी पुरेल दिधले
परि न घे दिल्हे लक्ष कोटी ||३||
बहेणि म्हणे भेटी देई तू एकदा
कासवासी वादा प्रवर्तसी ॥४॥


४८५
विचारावे मनी न देता जिरेल
कासयासी बोल बोलविता ।।१।।
तुम्ही बुडवाल आम्ही बुडो नेदू ।
‘भेटूनी वेवादू चुकवावा ||२||
वेदशास्त्र गाही दाखवूनी घेऊ
कासयासी जीवू कष्टविसी ।।३।।
बहेणि म्हणे भेट, पळो नको
दूर गावातील हेर सखे माझे ॥४॥


४८६
मला म्हणोनिया टाकिला विश्वासे ।
भेटी ही सायास न देखी गा ।।१।।
धरीन पदरी अकस्मात तुज
जाईल हे लाज जनामध्ये ॥२॥
बहेणि म्हणे तुज ठिकाणी लाविले
भेटी देई बोले आर्त जीवी ॥३॥


४८७
उदंड रडती तुझे नावे देवा ।
बुडविले सर्वां प्राणियांसी ।।१।।
रिणबोड हरी जाणतसो मुळी
तरी तुज निराळी होतो का रे ||२||
भेटीचे कारणे करिते नवस तैसी
नव्हे कास घातली म्या ॥३॥
बहेणि म्हणे भेट न सांगे जनासी ।
माझेचि मजसी देई देवा ||४।।


४८८
ठेवणे मागती वडिलांचे लोक
म्हणडनी भीक मागतोसी ॥१॥
सोंगसंपादणी आहे मन ठाऊकी ।
तुझी म्या पारखी असे केली ॥२॥
ठेवण्याचा लोभ धरूनी अंतरी
अंबऋषीचारी गर्भ दहा ॥३॥
लहण्याची आस धरूनी ध्रुवाला
नेऊनी गोविला अढळपदी ||४||
बहेणि म्हणे एका देऊनिया सिद्धि ।
अंतरीची बुद्धि कुडी खरी ॥५॥


४८९
मागता मागता जन्म गेले तेरा
आता क्षण धीरा नव्हे चित्ता ||१||
दे माझे ठेवणे आण म्या घातली
नको फार बोली करू आता ||२||
देईन मी जीव तुझे पायी आजी
करावी तजविजी होय तैसी ||३||
असोनिया नेदी हेचि दु:ख वाटे
देई न कपाटे महाद्वारी ॥४॥
कोंडीन तुमचा कारभार देवा ।
होईल हा ठेवा अनर्थासी ||५||
बहेणि म्हणे आता करीन भंडाई ।
पांडुरंगा पायी आण माझी ||६||


४९०
मागणे मागता ज्ञानदेव क्लेश
पावला बावीस जन्म जाले ॥१॥
परी तुझे मन ‘देईन’ न म्हणे
बहुता बळे तेणे उगवले ॥२॥
चौदा शते जाली बंदी चांगदेवा ।
तेव्हा त्वा केशवा फेडी केली ||३||
बहेणि म्हणे माझे जन्म गेले तेरा
परी फजितखोरा न देसी तू ||४||


४९१
नामदेवा खेचरा घातला हवाला ।
परि रोख त्याला न देसी तू ॥१॥
ऐसा तू विठ्ठला जालासी रे शठ
करूनि बोभाट देसी जना ||२||
असंख्यात किती सांगावे कष्टती ।
न देसी श्रीपति ज्याचे त्यासी ॥३॥
बणि म्हणे देवा तू होसी समर्थ
आम्ही की अनाथ जीव हो ||४||


४९२
न बोलसी बोल फुकाचा तू एक
पहासी कवतुक काय डोळा ॥१॥
जाईन मी आता घालूनिया धुळी
कासयासी की चादविसी ॥२॥
नाही तरी म्हण आपुलिया
तोंडे किती तुजपुढे बोल ॥३॥
बहेणि म्हणे चाल करू चौघाचार ।
बैसोनी वेव्हार निवडती ते ||४||


४९३
सर्व आम्ही तुज सारखी समान
एका देसी धन भाग त्याचा ।।१।।
त्यासी दिल्हा तसा देई माझ मज
मग कोण तुज बोल ठेवी ॥२॥
जाले जरी श्रेष्ठ माने थोर लेखू
वाटा सर्वा एक सारिखाची ॥३॥
बहेणि म्हणे एका भावा दिल्हा
वाटा मी काय धाकटी सांग मज ॥४॥


४९४
घेतले आपुला विश्वास देउनी
द्यावे ऐसे मनी न ये तुझ्या ।।१।।
ठिकाण आम्हासी न दिसे सर्वथा ।
पाहता पाहता जन्म गेले ||२||
ठेवणे पुरिले कोणतिये भुई
आम्हा देश तोही सापडेना ।।३।।
बहेणि म्हणे बहु पाहिले या
फार अविश्वासे दूर अंतरले ॥४॥


४९५
न देसी ते माझे भांडवल
हरि चेक तरी करी पांडुरंगा ।।१।।
आण वाहूनिया देई मज क्रिया
सोडीना मी पाया मनातूनी ||२||
विश्वासघातकी ऐसे मज वाटे
फासे करी विटेवरी उभा ||३||
बहेणि म्हणे पाचामध्ये घेई आण
मग मी जाईन कळेल तेथे ||४||


४९६
किती एक लोक मागताची मेले
जैसे हे न चाले पांडुरंगा ।।१।।
घेईन निश्चये न सोडी सर्वथा ।
विश्वास हा आता काय तुझा ||२॥
अवचिता येथे पहिलासी दृष्टी
पहाता ये सृष्टी अकस्मात ||३||
आता कोण तुझा धरील विश्वास
बहु हो आयुष्य पुंडलिका ||४||
फार सीण त्याचा घेतला अच्युता ।
त्याच पुण्ये आता देखिलासी ॥५॥
बणि म्हणे लोभ आता सांडी
हरी थोरपणा घरी पांडुरंगा ॥६॥


४९७
अनामिक क्रिया दिसे तुझे अंगी ।
बुडविले संगी सर्व माझे ॥१॥
जीवहत्या तुझे माथा होती फार ।
हत्यारी साचार नाम तुझे ॥२॥
उदंडांची घरे बुडविली वाटोळ्या
किती बाळ्या भोळ्या नागविले ॥३॥
बहेणि म्हणे तुझे नाम निसंतान
होईल जे कोण वाचे गाती ॥४॥


४९८
सत्यभामा ऋण मागता न देसी ।
दिधले द्विजासी दान तिने ॥१॥
परि तू ठेवणे न देसी लोभिष्ठा ।
आइकता मोठा खेद वाटे ॥२॥
देवकी वसुदेव भागले मागता ।
जालासी तत्त्वता पुत्र त्यांचा ॥३॥
बहेणि म्हणे गाई राखिसी नंदाच्या
ठेवणे कोणाच्या हाता न ये ।।४॥


४९९
तुझ्या थोरपणा कोण लावी
हात वाटते मनात धरावेसे ||१||
धरोनीया बंदी द्यावे हृदयात ।
सोडवील तेथे कोण दुजे ॥२॥
विवेक राखण ठेवीन जवळी
हृदयाची टाळी देऊनिया ||३||
बहेणि म्हणे माझे देई भांडवल ।
ऐकोनिया बोल आता तरी ॥४॥


५००
षड्गुण ऐश्वर्ये बोर तू जालासी ।
नावडे आम्हासी काय तैसे ॥१॥
लक्ष्मी यश कीर्ति औदार्य वैराग्य
ज्ञानाने ते सांग सर्व आले ॥२॥
हेचि भांडवल तुझे आहे हाती
याने तू श्रीपती म्हणविसी ॥३॥
करूनि अकर्ता तू जैसा आहेसी
मज काय तैसी कला नये ||४||
तू जैसा व्यापक सर्वांठायी हरी
मी काय बिचारी नव्हे तैसी ||५||
तू जैसा वरिष्ठ त्रैलोक्य नायक ।
मीही तैसी एक काय नोव्हे ॥६॥
परि म्हा सेव्य नव्हे ते भूषण
सेवकत्वे जाण क्रीडा करू ||७||
बहेणि म्हणे काय वाटतसे बरे
भीक मागे पोरे ऐसे हरी ॥८॥


५०१ 
पुरोनिया धन बांधिले
विटाने न निये ठेवणे बोल उन्ही।।१।।
कोण्या उगा राहिलासी नेणो
महाग बोलणे फार जाले ||२||
पन्नासा चिरियाने बांधिले बाचोनी
निघेना म्हणोनी बोल तरी ॥३॥
कारण देहाच्या पडिले अंधारी
निघेना बाहेरी काय काजा ||४||
नाही आराणुक पहावया मज
काही तरी गुज बोल एक ||५||
बहेणि म्हणे नको आता व्यर्थ पीडू
काय जोड जोडू भागलासी ॥६॥


५०२
तुम्हा आम्हा चौघे सांगतील
आता चला पंढरीनाथा उठा वेगी ॥१॥
बहु भीड केली आमुचे उचित
भलेपण येथ कोण पुसे ।।२।।
सा चौघे अठरा सांगू दोघेजण
घातलीसे आण उठा वेगी ॥३॥
बहेणि म्हणे जाणे बाहेर लागले
घरात बुडविले कोण सोसी ॥४॥


५०३ 
थोरपणा आम्ही दिली
तिलांजुळ नळी पाहिजे तो ।।१।।
तुलहुनी घरे आम्ही एकापरी
पहाता विचारी आपुलिया ॥२॥
बद्धमुक्त कोणा न म्हणो सर्वथा ।
तुजपाशी कथा हेचि असे ॥३॥
बणि म्हणे लोक विस्तारणे तुज
आम्ही तो सहज वर्ततसो ॥४॥


५०४ 
भांडणाची रीती आयकिली संती
सोडवील हाती धरूनिया ॥१॥
हा काय देईल विचारी मनासी ।
येणे कोणत्यासी रोख दिल्हे ॥२॥
निवृत्तीचे हाते पावले हे तथा
ज्ञानदेवाचिया सोई पाहे॥ ३॥
वसिष्ठाचे हाते पावले श्रीरामा।
ऐसे काय तुम्हा ठावे नाही॥४॥
नारदाचे हाते दिधले बहुता रोख
नाही देता झाला कोणा ॥५॥
चांगदेवाप्रती मुक्ताईकडून
देवविले जाण ज्याचे त्यासी ||६||
बाबाजीचे हाते तुकोबाचे रिण।
फेडविले जाण येणे खरे।।७।।
ऐसे किती सांगो युगायुगी तुज ।
बोलियेले गुज संतसाधु ।।८।।
बहेणि म्हणे आता त्या तरी
दाविजे येथे रोख माझे फेडावया ॥९॥


५०५ 
असो चिंताग्रस्त प्रेमाचिया आशे
वाढो देव ऐसी कृपा करो।।१।।
प्रवेशोनी अंतरी कोणाचिया तरी
कोण म्हणे घरी कास माझी ॥२॥
नासील हे माझी कोण दरिद्रता
कोण भवव्यथा निवारील ॥३॥
बहेणि म्हणे ऐसी सदा चिंताग्रस्त
काय करी नाथ पंढरीचा ||४||


५०६ 
तुकाराम रुपे प्रत्यक्ष बोलत
होई सावचित्त सावधान ||१||
पाहे परतोनी आपुलिया दिठी।
सांगितली गोठी येक कानी ॥२॥
तयाचा उच्चार करू नये वाचे।
जालेसे चित्ताचे समाधान ||३||
बहेणि म्हणे मना केलासे प्रकाश
आस्तया उदयास ठाव नाही ||४||


५०७ 
ठेवुनी कर माथा उपदेसी
तत्वंपद प्रणवासी ।।१।।
तो म्या साठविला हृदयभुवनी
सद्गुरुकर वरदानी ॥२॥
मायातम नासी क्षण एके।
निरसी शास्त्रविवेके ||३||
तत्सत् रूप याचे मज बोड़ी।
स्वरुपी मानस रोधी ||४||
त्रिगुणी देह व परतंत्रे
बोधित पंचकयंत्रे ||५||
होते जीवधर्मी परदेसी ते
नेले मोक्षपदासी।।६।।
तापत्रयव्यथा मज न बाधी ।
दिधली शांतिसमाधि ।।७।।
बहेणि म्हणे ऐसा गुरु दाता ।
नोसंडी जीव जाता॥८॥


५०८ 
मूखांसी बोलता कोण सुख चित्ता ।
म्हणऊनी वार्ता सांडावी ते।।१।।
असावे आपल्या आनंदी सर्वदा।
करावी गोविंदासवे मात||२||
उचलोनी दगड पाडावा चरणी
तैसी मात जनी घडो नये ||३||
बहेणि म्हणे सदा दावा या दोघांसी
आहे परमार्थासी प्रपंच्याचा ॥४॥


५०९ 
जयासी स्वहित करणे असे मनी ।
तेणे द्यावी जनी पाठी जगा ।।१।।
म्हणो का मग जग वेडे अथवा मूर्ख
आपुले ते सुख सांझे नये ॥२॥
लाजलोकरीपासी श्रीहरि पाहिजेल ॥३॥
म्हणवावे जनी प्रपंची प्रष्टला परी
त्या स्वहिताला सांडू नये ||४||
बहेणि म्हणे जन त्रिविध प्रकार
आपले साचार सांडू नये॥५॥


५१० 
आकाश कडकडी मेरू हा लडबडी
परी ते सुख-गोडी सांडू नये ।।१।।
ऐसीया निर्धाराजवळी आहे देव। न
धरावा संदेह अरे मना ।। २॥
पृथ्वी जरी बुडे डगमगती दिशा
तरी या जगदीशा सोडू नये ॥३॥
शीत उष्ण जरी वरुषे हा पाऊस
तरी कासावीस होऊ नये ||४||
बाबु जरी सुटे ब्रह्मांडही हे आटे
तरी आत्मनिष्ठे भंगू नये ॥५॥
बणि म्हणे तेथे जीव तो कायसा।
ऐसी पूर्ण दशा आचरावी ॥६॥


५११ 
भ्याये जो शरीरा तो शरीर हे मिथ्या
तेथे आता चिंता कासयाची।।१।।
विचारावे मना आपुल्या आपण
धरावे निर्वाण निजरूपी ||२||
जिवासी जो भ्याचे अविनाश दिसे ।
जन्ममरण फासे कोण भोगी ॥३॥
बणि येथे लटिके मीपण करी
जन्ममरण बेरझारा ॥४॥


५१२ 
जिवाचा उदार देहाचा जुझार
तयासी संसार काय करी ॥१॥
परी निर्धार असावा कारण मग
तो नारायण जवळी भेटे ।। २॥
कायावाचामने दृढ जाला जीवे
तयासी आघवे हेचि नव्हते ||३||
बहेणि म्हणे सती उभी सिळेवरी ।
तियेसी माघारी काय खंती ॥४॥


५१३ 
तोवरी ह्या गारा झगमगती सैरा
जबरी नाही हि दृष्टीपुदे।।१।।
मग तो निवास आपोआप कळेल।
जाळावे ते बोल वायावीण ।।२।।
तोवरी ह्या सिंपी दिसती सोज्वळा
जवरी न कळा मोतियांची ॥३॥
बहेणि म्हणे नाही फुकाचे बोलणे
करोनी दाविणे क्रिया तैसी ||४||


५१४
वरवरी सांग सांगाव्या त्या गोष्टी ।
जवरी नाही भेटी आत्मज्ञानी ॥१॥
कासवासी वेष धरी नाना सोंग
थोडी तैसी जगी श्वान खरे ||२||
काय सांगोनिया लांब लांब गोष्टी
जबरी नाही भेटी आत्मत्वाची ॥३॥
बहेणि म्हणे मज दिसती कथन्या
जवरी नाही मना अनुताप ।।४।।


५१५ 
बोलवती बोल फुकाचे प्रबळ ।
परि ते प्रेम-बोल दुर्लभ हे ।।१।।
काय त्या सांगाव्या नुसत्या ज्ञानगोष्टी।
जबरी नाही भेटी स्वानुभवी ॥२॥
ज्ञान सांगवेल ब्रह्म दाखवेल ।
स्वानुभव-बोल दुर्लभ ते ।।३।।
नाना जपतप करिती अनुष्ठान
परि ब्रह्मज्ञान न कळे कोणा ||४||
षड्दर्शनाची दाखविती सोंगे ।
वैराग्यही आगे बोलवेल ||५||
बहेणि म्हणे कळा दावेल ज्ञानाने
परि ते प्रेम खूण वेगळीच ॥६॥


५१६ 
करवेल भगवे वागविती जटा
परी ते आत्मनिष्ठा वेगळीच ।।१।।
ते खूण जाणाया बहु पुण्य पाहिजे
मग घरी साजे बाक्रिया||२||
करवेल मुंडन भोग-त्याग
परिन अंग अनुभवाचे॥३॥
टाकवेल शिखासूत्र घरदार परी
अनुभव साचार अगम्य तो।।४।।
लय लक्ष मुद्रा कळेल आसन परि
अनुभव जाण वेगळाची ||५||
बहेणि म्हणे येथे नलगे परिहार
कळे तो विचार बोलताची।।६।।


५१७
संत म्हणविता लाज नाही चित्ता ।
जवरी आसक्ति विषयांची ||१||
गाढवाचे परी दिसे जिणे त्याचे काय
त्या सोंगाचे घेउनी फळ ||२||
संत म्हणविता घडते पातक।
जवरी भोगी सुख विषयांचे ॥३॥
रोगद्वेषनिंदा भूतांचा मत्सर ।
तेणे न करावा उच्चार संत ऐसा ||४||
लोभ दंभ मान विषयांचा आदर।
तो संत साचार बोलू नये ॥५॥
बहेणि म्हणे वृत्ति नाही जो विराल्या
तो संत-सोहळा अधःपाता। ॥६॥


५१८ 
कीटक-भृंगी न्यावे लागे जे धारणा
तोचि एक जाणा ब्रह्मनिष्ठ ।।१।।
एन्हवी ते बोल बोलावे फुकाचे
काय सांगीवेचे शब्दज्ञान ॥२॥
चकोर चंद्र-न्याये जे होय हे मन
तरी संतपदज्ञान सत्य जाणा ||३||
बणि म्हणे संज्या भेटी पडे
तेव्हा गोष्टी त्याची ॥४॥


५१९ 
शस्त्राचे पै घाय सोसवती सदा
परी हे जननिंदा सोसवेना ||१||
ऐसिया साधने रोकडेचि फळ ।
ब्रह्म हे केवळ प्राप्त होय ||२||
करवती दान तप व्रत स्नान
जननिंदा जाण सोसवेना ॥३॥
योग याग तीर्थ करवेल अनुष्ठान ।
जननिंदा जाण सोसवेना ||४||
बहेणि म्हणे जन निंदोत सकळ।
आत्मत्वी निश्चळ ठेवी मन ॥५॥


५२० 
आमुचे मळणी मिळू नका कोणी
विषय सांगालिनी बाईयांनो ।।१।।
नव्हे तैसे विवेक विचार।
नका करू चार जनामाजी ॥२॥
जवरी आहे तुम्हा मागील बोभाट
तवरी काही नीट होऊ नका ॥३॥
जन-लाज शेष आहे जो मनास
तोवरी उदास होऊ नका ||४||
सासुर माहेर जोवरी आहे तुम्हा
कुंथूनिया प्रेमा आणू नका ||५||
बहेणि म्हणे नका फजिती फुकाची
करू या जीवाची वायावीण॥६॥


५२१ 
मूर्खासवे गुज अधमासी उपकार
स्त्रियांसी विचार सांगो नये ।।१।।
वाळूचियेपरी (न) शिरे पाणी जैसे
दुर्जनासी तैसे उपदेश ||२||
तक्षकासी दूध स्त्रियांसंगे गूज
खडकावरी बीज पेरू नये ||३||
बहेणि म्हणे ऐसे जाणावे चांडाळ
हित त्या केवळ काय कळे ||४||


५२२ 
आणिका उपदेश सांगे बरव्या रीती
आपण तो चित्ती न धरी काही।।१।।
ऐसे ते जाणावे मतिमंद हीन तथा
ब्रह्मज्ञान काय करी ||२||
वरवर लोका सांगे ब्रह्मज्ञान
आपण तसे जाण न धरी चित्ती ॥३॥
बहेणि म्हणे तया नाही आत्मशुद्धि ।
येरा सांगे बुद्धि मूर्खपणे ॥४॥


५२३ 
आम्हा जितेचि मरणे
मेलेपण जीत जाणे ॥।१॥
काय करू ऐसे जाले ।
तुकारामे मज केले ||२||
शब्द आमुचा खुंटला ।
निःशब्दाचा उदयो जाला ||३||
बहेणि म्हणे शक्ती नाही
शक्तीविण वर्त देही ॥४॥


५२४ 
नव्हे करणीची आहाच जीवे
पायी जडलो साच।॥१॥
आता टाकिले करावे।
शरण केशवासी जावे ||२||
देउनी प्रपंचासी काटी।
पाय तुझे धरिले कंठी ॥३॥
वैरी गांजिती छळिती परी हे
तुझे पाय चित्ती ॥४॥
नखी देती जरी सुया तुज
न सोडी देवराया ||५||
जरी केलासी साहाकारी।
बहेणि म्हणे दया करी ॥६॥


५२५ 
भक्तिभाव आम्ही बांधिलासे गाठी ।
तेणे आम्हा तुटी कासयाची ॥१॥
गाऊ नाचू प्रेमे हरिनाम कीर्तनी।
भावोनिया जनी जनार्दन ।।२।।
खाऊ वाटू लुटू उदारासारिखे सरे
ऐसे देखे नाही नाही ||३||
कोणाचिया घरा जावे घ्याया देया
स्वप्नी भोगावया दैन्य नाही ||४||
बहेणि म्हणे भक्ता कासयाची चिंता |
गाठीसी असता पांडुरंग ॥५॥


५२६ 
तू माझी माउली मी तुझे बाळक ।
करितसे कौतुक नामी तुझे ||१||
तू माझी गाउली मी तुझे वासरू।
करितसे हुंकारू नामी तुझे ॥ २॥
तू माझी कुरंगी मी तुझे पाडस
करी रात्रंदिवस ध्यान तुझे ।।३।।
तू माझा चंद्रमा मी तुझा चकोर ।
सदा (मज) हरिख स्मरणी तुझे ||४||
तू माझा मेघुला मी तुझे चातक।
उल्हास हा थोर देखोनिया||५||
तू माझा सजन मी तुझी सांगाती
अखंड हे चित्ती ध्यान तुझे ॥६॥
बहेणि म्हणे माझा तैसा प्राणसखा ।
तुकाराम देखा सर्व धनी ॥७॥


५२७ 
पट्शास्त्र-श्रवण सत्संगसेवन।
देव तयाहून आणिक नाही ॥१॥
शिष्टासी सन्मान शास्त्रांचा अभिमान।
असे तोचि जाण ब्रह्मनिष्ठ ||२||
शांति क्षमा दया उपजे भूतकृपा
तोच एक देखा ब्रह्मनिष्ठ ||३||
बहेणि म्हणे कर्मे ब्रह्म जया माने।
तेचि पे जाणे ब्रह्मरूप ||४||


५२८
धन्य ते गोकुळ धन्य ते गोपाळ ।
धन्य लोकपाळ पुण्यशीळ ॥१॥
धन्य तोचि देश धन्य तोचि वंश
जेथ हृषीकेश अवतरले ॥२॥
धन्य तेचि माता धन्य तोचि पिता ।
जन्म कृष्णनाथा ज्याचे कुशी॥३॥
धन्य त्या गोपिका कृष्णी तन्मयता ।
धन्य ते सरिता कृष्ण पोहे ॥४॥
धन्य वृंदावन धन्य गोवर्धन
चारी नारायण गायी सदा ॥५॥
धन्य तो दिवस धन्य तोचि मास
जन्मला अविनाश कृष्णसखा ||६||
बहेणि म्हणे धन्य नरनारी चाळके
घेती कृष्णसुख सर्वकाळ ॥७॥


५२९ 
बाटविले तुया अवघे गोकुळ ।
क्रिया हे आकळ तुझी देवा ।।१।।
ऐसा तू लाघवी क्रियानष्ट जाण
ब्रह्म तुज ऐसिया म्हणती जन||२||
चोरटा खाणोरी देहाचा पाईक
शिंदळांचा नाईक क्रिया तुझी ॥३॥
निलाजिरे जिणे हेडसाविती नारी न
संडी हे खोडी तुझी देवा ||४||
संपादिसी मुखे झाकिसी अक्रिया।
लटिके करिसी तथा साक्षीभूत ||५||
बहेणि म्हणे हरी न कळे तुझी लीला।
ऐसा तू गोपाळा अनाचारी ॥६॥


५३० 
आघवी कुळकोटी आहे मज ठावी
विश्वाचा गोसावी कोण शोभा ।।१॥
न बोलावे आता है लाज आपणासी
अगा हृषीकेशी मायबापा ॥२॥
आवघी परंपरा जाणवली मज
वाया योगिराज म्हणवितोसी ।।३।।
मुळीचा गोवळ गोवळ्यांची क्रिया ।
भजे तुज ऐसिया कोण साजे ||४||
घुरटे घाणेरे बोंगळे गोवळी।
खासी उष्टावळी मुखीची त्यांच्या ॥५॥
बणि म्हणे देवा न बोलावे
सांगता मुझे धर्म लाज वाटे॥६॥


५३१ 
प्रसंगासारिखे बोलवितो देव।
देखोनिया भाव जना ऐसा ॥१॥
काय करू वासी दुर्बुद्धीचे कोडे
भोगणे हे पुढे आहे पाप ॥२॥
ब्राह्मण म्हणविती मद्यमांस घेतीखाती
मेसाई पूजिती वश्य कर्मी ॥३॥
जारण मारण स्तंभन मोहन
जीवहिंसा करणे विषयालागी ॥४॥
आपुला स्वधर्म सांडोनिया मागे।
सेवेलागी-रांगे अधर्माचे ॥१५॥
संकर करिती गुरुकृपा म्हणती
पाप न मानती परद्वारी ॥६॥
ज्याचे खाती तथा आंगोठा दाविती ।
शंका न धरिती स्वामियाची।।७।।
बहेणि म्हणे ऐसे न पडावे दृष्टी
ज्याच्याने हे सृष्टी सर्व बुडे ||८||


५३२ 
अवतारांच्या पंगती है लीला कपणाची
जानती हे साची स्वानुभवी॥१॥
आणिकांसी न क जाले थोर थोर
पाहिजे तो शूर ज्ञानवंत ||२||
सावीस काय उन्मनी बोलती प्रेम
आहे म्हणती कोणा सांगो ||३||
मूळमाया निवृत्ति गुणसाम्य प्रकृति
कोणासी म्हणती सांग कैसे ॥४॥
अय जे होते तासी आणिले ।
हे कोणाचेनि आले जाणावया ||५||
एकी हा अनेक अनेकी हा एक
अन्वय व्यतिरेक कैसा सांग ॥६॥
बणि म्हणे याची केली ब्रह्मकता
म्हणोनि अंबेला शरणांगत ||७||


५३३ 
देहयंत्र वाहे हरी निजसते
वाजवी कुसरी॥१॥
वाचा तारा लाविल्या हारी
येके स्वरे वाजवी चारी ॥२॥
इंद्रियरंध्रे केली प्रगट
मनसारी लाउनी नीट ।।३॥
ॐकारध्वनि सूक्ष्मनाद।
मातृका पिळोनी शुद्ध ||४||
बहेणि म्हणे अनुभव घ्यावा
वाजवी कोण तो पहावा ॥५॥


५३४ 
निंदक हरिभक्त हे माझे सांगाती
जीवाहूनी प्रीती भेटी होता ॥१॥
तयांचा संभ्रम होतसे मज घरी
वैकुंठ – पायरी वेंधावया ॥२॥
जैसेचि आतिथ्य हरिभक्ता करावे।
तैसेचि स्वभावे निंदकासी ||३||
बहेणि म्हणे माझे दोघेही जिवलग
कर्मयोगे भोग वाटा आला ॥४॥


५३५ 
हरिभक्त तेचि जाणावे पा तुम्ही
जे का भागवतधर्मी विधियुक्त।।१।।
वेदविधिमार्गाती सर्वथा अखंड
हे आस्था भूतमात्री ||२||
कर्म वोसंतिती देहाचेनि छंदे
अखंड आनंदे क्रीडताती ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे जिवलग ते
माझे भेटता सहजे सुख होय ॥४॥


५३६ 
निंदक भेटता दुणावे हरिख।
भक्ताही विशेष सुख वाटे ।।१।।
निंदक सांगाती येणेपरी बापा ।
करिती निष्पापा गुरुभक्ता ||२||
सुवर्णाचा मळ काढिताथि पुटी
पडियेली तुटी हीणा जेवी ॥३॥
आरसा उजाळ करिताती देख
मळ तो निःशेष जाय जेवी ||४||
निंदके निंदिता कर्ताकर्म जळे
आम्हासि आकळे परब्रह्म ||५||
बहेणि म्हणे निंदक देखे जेव्हा
डोळा आनंद सोहळा करितसे ||६||


५३७
हरिभक्त निंदक जन्मले एके ठायी
वाटा तथा पाही भागा आला ॥१॥
ज्याचे कर्म त्याने केलेचि पाहिजे।
न करिता सहजे दोष होती||२||
म्हणोनि निंदके निंदाचि करावी
तयासी तोचि जीवी आतो असे ||३||
हरिभक्ते भजन करावे आदरे।
संतांची सादरे पूजा कीजे ॥४॥
कावळ्याचा धर्म टोचावे ढोपरा ।
मौक्तिकाचा चारा काय त्यासी ॥५॥
श्वानाचा स्वभाव गुरगुर करावी
पिसाळल्या जीवी प्राण घ्यावा ॥६॥
हंसाचा स्वभाव पय-पाणी निवडी
विष्ठा तो चिवडी काय घडे ॥७॥
बहेणि म्हणे तैसे ज्याचे कर्म तेथे।
करावे म्हणणे न लगे तथा ॥८॥


५३८ 
हरिभक्ता सन्मार्ग दिधला हा वाटा
निजभक्ता निष्ठा पुण्यवंत।॥१॥
दया हे करावी भक्ति- पुरस्करे।
रामनाम त्वरे मुखी गावे ।।२।।
संतांचे पूजन शास्त्रांसी सन्मान
अखंड अर्चन ब्रह्मपूजा ||३||
गंगा गोदावरी काशी तीर्थयात्रा
तेथेचि पवित्रा देह करी ॥४॥
भूतमात्री भाव सांडोनी मीपण
आठवी चरण राघवाचे।।५।।
बहेणि म्हणे हेचि कर्म भागा
आले दुसरा न चले उपाय हा ।।६।।


५३९ 
रासभासी कळा शिकविले ज्ञान।
स्वधर्माचरण काय सांडी ॥१॥
तैसा जो स्वभाव निंदका हरिभक्ता ।
सांडी तो हे वार्ता स्वप्ना न ये ।। २।।
मर्कटासी जरी सुखासन दिधले
तरि काय सोहळे होती तथा।।३।।
श्वानाचिया अंगा लाविला चंदन
उकिरडा शयन न करी काई ॥४॥
घुसी उंदरांसी वाडनी मंचकी ।
काय उकीर सेखी न काढिती ।।५।।
सर्पा- विचवासी शर्करादि दूध
काय ते पा शुद्ध विष नोहे ॥६॥
वाघुळासी घरी आणुनि ठेविले
उफराटे टांगिले न सोडी ते ||७||
बहेणि म्हणे तैसे अभक्तांचे स्वभाव।
शिकविल्या ठाव न सांडिती ।।८।।


५४० 
तैसी अभक्तासी गुरुकृपा जाली
सेखी व्यर्थ गेली फळेचिना ॥१॥
निंदाचि करिता वाचा आरायणा ।
तेथे नारायणा कोण स्मरे ।।२।।
श्वानाचे शेपूट शतवर्षे नलिके।
घालिता न चुके वक्रदशा ।।३।।
गर्ने करोनिया मस्तक लवेना।
तो संतचरणा केवी लागे ||४||
लोकांची अकमें विचारी मानसी
तेथे भगवंतासी कोण चिंती ||५||
ऐसा परोपरी अकर्माचि लागी
वाढलासे जगी द्वेषासाठी ।।६।।
बहेणि म्हणे ज्याचे कर्म तोचि
करी तयासी श्रीहरी काय करी ॥७॥


५४१ 
भक्ताचे आचरित आपणचि होय।
भगवंताची सोय सारीच ना।।१।।
कीर्तनी आदर शांति क्षमा बसे।
देह जाता कैसे दंडळेना ||२||
भक्ति आणि ज्ञान वैराग्य बोतले।
प्रेम वोसंडले सर्वकाळ ॥३॥
क्रिया कर्म जे जे अर्धी ईश्वरासी ।
अखंड वाचेसी रामराम ||४||
अर्वाचक बोल नयेचि मुखासी केवी
पतिव्रतेसी परपुरुष सीवे ॥५॥
सर्वाभूती भाव संततची धरी ।
नमस्कार करी भूतमात्रा ||६||
अगर्वता मनी संता लोटांगण |
आठवी चरण श्रीगुरूचे॥७॥
यणि म्हणे ऐसे भक्त आचरित
तयासी भगवंत जवळी असे॥८॥


५४२ 
भक्ता अभक्तांसी कोण गती होय।
आइका उपाय तोही एक ॥१॥
कर्तृत्वासारिखे प्राप्त होय फळ ।
देतसे कृपाळ पाहोनिया ॥ २॥
येणे क्रमे भक्त आचरे जरी हा
तरी तथा पहा विष्णुपद ॥३॥
देहीच असता विदेही तो जाणा ।
सत्य सत्य खुणा वेदमते ||४||
भक्ता भवपाश बांधू न शकती।
तयांसी श्रीपति रक्षितसे ॥५॥
बहेणि म्हणे भक्त तेचि जाण मुक्त।
तयांसी भगवंत प्राप्त जाला ॥६॥


५४३ 
निंदक तेही फळ घेती कर्तृत्वेसी ।
निंदिता संतांसी नानापरी ॥१॥
नसता अपराध संतजन निंदी।
सहस्र गाई-वधी दोष थोडा ॥२॥
संतांसी मत्सर करी सर्व काळ
दोष ते सबळ आले अंगी ॥३॥
असेल अपराध संता – अंगी घोर
तो बोलता अपार दोष होती ॥४॥
असता अपराध नये आणू मुखा ।
वदता त्रिदोखा पान झाले ||५||
एवढे अपराध थोर जरी जाले
भला जो बोले दोषी खरा॥६॥
संतांचे महिमान न कळे कोणासी ।
म्हणोनि दोषासी नारोपावे ।।७।।
बहेणि म्हणे असे दोषी तोचि नर।
लटिके संतांवर घाली दोष॥ ॥८॥


५४४ 
लटिके दोष जरी संतांसी आरोपी
जाणावा तो पापी कुष्टी होय ।।१।।
तयाचिया कुष्टा नाहीच निवृत्ति।
चंद्र-सूर्य फिरती जोवरी पाहे ॥२॥
नसतीचि संतांची छळना जो करी
जाणावा तो वैरी श्रीहरीचा ॥३॥
देखवेना डोळा उत्कृष्ट हे पाहे
रचितो उपाय नानापरी ॥४॥
निंदा वाद भेद वाढवी मत्सर ।
सदा करकर संतांसवे ||५||
बहेणि म्हणे ऐसे अभक्तांचे गुण
सहजचि जाण उमटती ॥६॥


५४५ 
नसतेचि दोष आरोपिती संतां
जाती अधःपाता रौरवासी।।१।।
जन्मोजन्मी किडे विष्ठेतील होती।
क्षण एक विश्रांती नाही जीवा ॥२॥
कन्याविक्रयाचा दोष तोही थोडा
करिती जे पीडा साधकांसी ||३||
सहस्र वधिता गाई तेही पाप थोडे।
निंदा संती जोडे अगणित ॥४॥
पिता-माता वध करू बापा सुखे।
दोष हे विशेष संतनिंदे ||५||
देउळे मोडिती अग्रहारे जाळिती ।
तेही दोष जाती क्षणमात्रे ॥६॥
परी संतनिंदा दोष न जाय सर्वथा
मेतो अधःपाता ब्रह्मादिका ॥७॥
बहेणि म्हणे संतनिंदेने अभक्ता
रविशसी भ्रमत तोवरी पीडा ॥८॥


५४६ 
स्वधर्मे आपुल्या असता स्वगृही
कोन्ही निंदा पाही करू नये ||१||
निंदिता तयाचा शस्त्राविण वध
केला हा वेवाद वेदमुखे ॥२॥
जेणे वाचे निंदा करावी संतांची।
तये वाचे यमाची सुरी वाहे ॥३॥
जये वाचे निंदा वाकुल्या दाखवी
ते वाचा रौरवी पचे खरी ॥४॥
जया मुखे शिव्या द्याव्या संतवृंदा।
तथा वाचे आपदा नानापरी ||५||
बहेणि म्हणे यासी नव्हे अप्रमाण
वेदाची हे खूण सत्य बापा ॥६॥


५४७ 
विठो माझा लेकुरवाळा
संगे लेकुरांचा पाला।।१।।
तुकोबा तो करी नामा
करांगुली धरी ।।२।।
एकनाथ खांद्यावरी
कबीराचा हात धरी ॥३॥
गोरा कुंभार मांडीवरी
चोखा जीवा बरोबरी ॥४॥
पुढे चाले ज्ञानेश्वर
मागे मुक्ताई सुंदर ||५||
बहेणि म्हणे वा गोपाळा ।
करिसी भक्तांचा सोहळा ॥६॥


५४८ 
पूजावे कशाने जेथे जेथे तू देवा ।
अत्रगंध पुष्प धूपदीपादी सर्वा ॥१॥
पूज्य पूजक जगदाभास जाला सगुणी
म्हणोनिया तूते भजो कोदंडपाणी ||२||
दुजे तुजविण देखो तरीच अर्पावे।
सर्वांठायी वोतप्रोत व्यापिले देवे ॥३॥
बहेणि म्हणे तुझे तुज अर्पिता लाज
वाटे रामा परी तुझे राखावे गूज ॥४॥


५४९ 
मुक्तचि शरीर दग्धपट जैसा
उरला तो तैसा देह संगे ॥१॥
ऐसे साधुसंत वोळखावे कैसे।
अखंडित पिसे नामी जाले ॥२॥
जनाहिसारिखे वर्तती वेवहारी
असोनी संसारी देहातीत ॥३॥
बहेणि म्हणे नामी अखंडित लीन।
देह हे भूषण कधी नेणे ||४||


५५० 
रामा तू माझा जिवलग सांगाती
झणी मज अंती अंतरसी ।।१॥
ऐसीये संकटी पावसी न पाहे
तरी देह जाये तुझ्या माथा ||२||
रायाचे लेकरु रंकाने गांजावे हे
तो स्वभावे नवल वाटे ||३||
बहेणि म्हणे तुझे ब्रीद काय झाले।
सांग कोणी नेले हिरोनिया ||४||


५५१ 
कवणे ठायी असे कवणे ठायी
नसे ऐसे तो मानसे चोजवेना ॥१॥
पालागी सद्गुरू बोलती जे भावे ।
आत्मा तो स्वभावे कळावया ॥२॥
कोण याचा ठाव कोण याचे गाव
नकळे स्वयमेव काय धरू॥३॥
कोण याचे कूळ कोण यांचे स्थळ
कवण याची बळ कळेचिना ॥४॥
कवण याची माता कवण याचा पिता ।
अमुकची तत्त्वतां कवण जाणे ॥५॥
बहेणि म्हणे कोणा पुसूं याची कथा ।
ऐसें विवंचितां कल्प गेले ॥६॥


५५२ 
गुरुवर्णन करिता बोले।
सभा देखोनी मुलेबाळे ॥१॥
नाही भेटला सद्गुरु।
लोकाचारे उपदेश करु ॥२॥
नाना मते सांगे गोष्टी
तत्त्वज्ञान बोले नेटी ॥३॥
परि अनुभवते बोल तेथे
राहिले सकळ ॥४॥
उपदेश करी जना।
“गुरु न करी स्त्रीजना” ॥५॥
शूद्र अथवा स्त्रीविरहित जाती ।
जो मानी गुरुस्थिती ॥६॥
“तो जाणावा राक्षस जो
घेत स्त्रीउपदेश” ।।७।।
सभेमाजी ऐसे बोले सभा
देखोनी मिथ्या जळे ||८||
जेथे विकल्प तुटला ।
तेथे वर्णभेद मिथ्या बोला।।९।।
बहेणि म्हणे ऐशा जना। स्वप्नी
न करा संभाषणा ।। १० ।।


५५३ 
काळभये लंकापती सागरी दुर्ग रचुनी वसे चक्र
फिरे भवते दिनरात्री तो मग यमा गवसे ।।१।।
ज्यासी पराक्रम, देव बंदी घालुनी हासतसे तो
मरणाप्रती सापडला अरे प्रयत्न वृथाचि असे ||२||
होईल मग ते शेवटचे पाहूनी स्वानुभवो साध्य
असो की असाध्य हो परी प्राक्तन दोहीसरिसे ।।३।।
बहेणि म्हणे न चुकेल विधीचे लेखन पूर्वील हो।
प्रयत्न वृथा, परी कीजे पुरुषे प्रयत्न पराक्रम हो ॥४॥


५५४ 
कोठे गेला हा स्वामी काय करु।
गरुडा न दिसे कृष्ण विचार।
हाहाकार जाला थोरु।
प्रीतिकारु सांडिला निजवारु ।।१।।
तुजविण रे गोविंदा देह पाहे ।
वियोगे प्राण हा कोण वाहे |
धीर नोहे मज पाहे मग
धाय टाकुनी रहे माये ॥२॥
अहो सखिये तिमिर आले डोळा।
तेणे योगे शेजारी निद्राला
कोठे गेला घननीळ हा
पुष्पमाळा टाकिली मज गळा ॥३॥
करी माळा घेऊनि रहे बाळा
कृष्ण झाला सांग हो काय
वहिला वास जाला काय माळा ।
मनी पाहता विवेक कृष्णे नेला ॥४॥
बहेणि म्हणे चुंबन देता माळे।
तव तदृता बांधिले पुष्प गळे।।
परिमळ कृष्ण कळे नेला बोले।
शरीर टाकी बळे||५||


५५५ 
लाज नाही येथे येऊनि संसारा।
नरकाचा धारा भोगावया ॥१॥
किती मरमर सोसणे अघोर
नेथे तो विचार स्वहिताचा॥२॥
कासया संपत्ती जळो जळो
जिणे दिसे लाजिरवाणे एकाविणे॥३॥
हत्ती घोडे दासी छत्री शेषासन
जळो हे भूषण एकाविण ॥४॥
सोयरे धायरे जळो इष्टमित्र
अवधे अपवित्र एकाविण ॥५॥
बहेणि म्हणे तनु अवधी हे चांगली
एकाविण गेली जन्म वाया ॥ ६॥


५५६ 
विषय ब्रह्मरूप तेव्हा सत्य होती
जे लाहे आत्मस्थिति स्वस्वरूपी ||१||
तेव्हा तो जाणावा ब्रह्मनिष्ठ खरा ।
नातळे विकारा देहबुद्धि ।। २॥
इच्छा मावळेल अहंता गळेल।
वासना विरेल स्वस्वरूपी ॥३॥
जिव्हा उपस्थाचा पडे ज्या विसरू
इंद्रियव्यापारू पारुषेल ||४||
बहेणि म्हणे वृत्ति से पावेल निवृत्ति ।
विषय तेव्हा होती ब्रह्मरूप ॥५॥


५५७ 
पृथ्वी ही गिळली उदकाने पाही
तेजे उदक नाही ऐसे केले।।१।।
पहा विपरीत मांडिला ब्रह्माग्नि
लागला ब्रह्मत्वासी ॥२॥
वायूने तेज गिळिले एकसरा
ब्रह्मांड पसारा शुकशुकाट ।।३।।
मग त्या आकाशे गिळियला वायो।
ऐसा हा प्रळयो थोर जाला ।।४।।
यासी तो प्रळयो बोलिजे निश्चयो
महाप्रळय भये पुढे आहे ||५||
आकाश मिळले विष्णुमहद्भूते
कैसे विपरीत जाले देखा ॥६॥
विष्णु म्हणावासी जो कोणी उरला ।
तयाचीया बोला ठाव नाही ||७||
ऐसा अवघा परी होऊन आभास
पूर्ण सावकाश नांदतसे ||८||
नित्य आनंदपन दाटे परिपूर्ण
बोले खंब्रह्म वेदवाणी ॥१॥
बहेणि म्हणे कैसे विपरीत केले
दुःख तेचि जाले सुखरूप ॥ १०॥


५५८ 
रकारासी दीजे काना
व्यंजनाने उच्चारणा ॥१॥
म्हणे मंत्र बीजयुक्ता जे
का शंकराचे उक्त॥२॥
पुढे काना रकाराने करू
मुखी उच्चारणे ॥३॥
तयावरी मकारासी देई
काना उच्चारासी ॥४॥
याला देऊनी व्यंजन
मग करी उच्चारण॥५॥
मन उफराटे अंती
सौर अक्षरी विश्रांती ॥६॥
बहेणि म्हणे न सांगता
मंत्र सांगितला आता ॥७॥


५५९ 
कापुराचे जैसे अंतर्बाह्य शुद्ध
किंवा ते प्रसिद्ध रत्न जैसे ॥१॥
तैसे ज्याचे चित्त सारिखे सर्वदा।
संत तथा वदा सर्वभावे ||२||
सूर्याचिया आंगी जैसा नाही मळ
चंदनी निश्चळ दृती जैसी ||३||
बहेणि म्हणे पूर्ण ब्रह्म निर्विकार ।
तेचि हे साकार संत जाणा ॥४॥


५६० 
दुसरियाचे दुःखे शिणे ज्याचे चित्त ।
तोचि एक संत वोळखावा ।।१।।
तयासी पुसता हरील तो शीन
दुःख ये हिरोन रोकडेची ||२||
परोपकार जया आलासे विभागी
शांती हे सर्वांगी डोलतसे ॥३॥
बहेणि म्हणे नाही आपुले पारिखे।
वर्ततो विवेके ज्ञानदृष्टि ||४||


५६१ 

सराफापासी घेतले सोने।
न व्हावे कोणे भिडे त्याचे ।।१।।
जोखून पहावे कसोटीसी घ्यावे
कसी आगळे ते ||२||
जयाने घेतले त्याचे भिडे
नागवण घडे झाकिलिया ||३||
कसी कसोटीच्या आले।
जाणावे ते वरच्या मोले ||४||
टांकसाळी कसिले नाणे बहेणि
म्हणे तेचि खरे ||५||


५६२ 
तया म्हणू भाग्यवंत।
जया खंत विठ्ठलाची।।१।।
नामधन जयागाठी ।
तोचि कोटी-नारायण ॥२॥
तोचि जाणा छत्रपती ।
ध्यास चित्ती विठोबाचा ||३||
तरती दर्शने त्याच्या जीव।
तोचि देव मुमुक्षूंचा ॥४॥
वहेणि म्हणे काळशास्ता।
तोचि नाम गाता मुखी सदा ||५||


५६३
देवकी कहे सुन बात प्रतारो
सुनिके आये कंस है।
जानि मनमें लेकर हाती
श्रीधर नई जसदा पास रे।।१।।
झबके जावोजी तुम वसुदेवा
आयेंगे कंसविखार।
खविखें प्राण लेवे सबके,
कहा करो विचार||२||
आधी रात भरी है जमुना आये
मेघ तुसार पाव में बेरी कुलुपो
कुलुपो कैसे जाना नंद के बार॥३॥
वली बली बारो राखते हैं अब
कहा करे अविनाश रे।
देखे कंस तो मोरसिस
प्राणक अविनाश ॥४॥
अपने कर हरि लेकर
देवकी देत प्रतारो हात रे।
बेरी तबही तूटि परी है
बंधन लूटो रात रे||५||
बहेणि कहे जिसे कृष्णकृपा
उसे कहा करे जमपास रे।
बेरी कुलुपो आपही खोलत
जावत है अविनाश रे ||६||


५६४ 
ये गोकुल चल हो कहत मुहारी मेघतुसार
निवारे फनिधर सेवा करे बलहारी ॥१॥
बसुवा अपने कर दोन्ही पालख योंही कीन्हों।
जमुना के तट आपके देखें पूरन नीर जानो॥२॥
पूरन रूप यों देखें जमुना जानिके सबही भाव।
दोही ठोर भई जमुना-नीर तब जानत यों हरिभाव॥३॥
जैसो परवत बैसो नीर हवो जानिके आस पाव
लगे जमु कहे माकु जायगे सब दोस ||४||
जिस चरन को तीरथ शंकर माथा रखिया नीर।
वो अब चरना प्राप्त भये होवे जान उधार ||५||
बहेणि कहे जिसकू हरि भावे ताकू कालही धाके।
बसुदेवाकर आपही मुरारि काहेकु संकट वाके॥६॥


५६५
बसुदेवा तब बारन आवे सोवे गोकुल नंद
दरवाजा आपे खोलत है रे आवत है गोविंद।।१।।
जिस दरवाजे लोहे साल कुलुप तोडि रखाये सब
जन सेवक सोधे तबही बसुदेवा घर जाये ||२||
तब ये – माया प्रगट भई है जसोदा प्रसुत
भई है और सोवे माया टोर धरी है।।३।।
जसोदा कू जहाँ निद्रा लगी है।
जानिके गोकुलनाथ।
आवे घर के बसुदेवा
ताहाँ माया लीनी हाथ ||४||
धाकत है मन, कापत है तन;
फेर चले मथुराकू।
निकसे तब या देखत
सब कुलुपी होवत वाकू ॥५॥
बहेणि कहे तब माया
लेकर आया फेर मथुरा।
देवकी कर लेकर दीन्ही
दरवाजे रखे फेरा ॥६॥


५६६ 
बसुदेवा जब देखे हरिकू चार मुजा श्रीमुरारी कहते
है श्याम तुमारो दरशन वांच्छित है दिन सारी।।१।।
तमकू बचन सुनावे दारो सेवक सोवा तुम रूप
छोड़ो देवा हमसे कंसकु है दावा ||२||
अबही सुनो गोपाल भयोजी अब भारत कंस सवही
लरके मारे हो जानो रोवत है हरि पास।।३।।
चार भुजा तुमको गोविंद चक्र गदा और शंख
पग्रहि कौस्तुभ देख तब तो मारेगा छोरो भेख ॥४॥
जय कृष्ण कृपाल स्वामी वचन सुनोजी हमारो उस
रूपो जब देखे कंसा प्राणसु लेवे तेरो ||५||
बहेणि कहे हरि प्रगट भयो है, उदरमें कारण कौन।
पुण्यकी बेला प्रगट भई है वोही कारण जान ॥६॥


५६७ 
जय जय कृष्ण कृपाल भयोजी नहीं किये जप तप दान
जे गृहि ब्राह्मणपूजन नहिं रे भूमि नहीं गोदान ।।१।।
तुम क्यो प्रगट भयो कहा जानो। अर्चन वंदन
नहिं कछु पालो होय अचंबा मान ||२||
अन दियो ग्यारसि नहिं रे देव न पूजो भाव तीरथ
यात्रा नहीं कछु जोडी कहाँ भयो नवलाव ॥३॥
बनधारी और निरबानो है पत्रहि खावत जान
नंगे पाँव नंगा देह बन बन जावत रान।।४।।
परबतमाहे जोगी होकर छोड़ दियो संसार
धूमरपाने पंचात्रि-साधने बैठे जलकी धार||५||
बहेणि कहे कहाँ जनमको संचित प्राप्त भयो इस बेला
चारभुजा हरि मुजको दिखाया येही कहो घननीला।।६।।


५६८ 

सुनो कहत है श्याम सुजानो पुण्य बिना नहीं कोई।
जिसके पल्लो जप तप दान पावै दरसन वोही ||१||
तुम सब बात सुनोजी चित्तकु ठोर धरोजी
हरिके आयो पेटे येही बात कहोजी ॥२॥
फूल बिना फल, जल बिना अंकुर, बिनपुरुष नहीं छाया ।
जलबिन कमलिनि, रविविन तेज, आगे तहाँ सब आया॥३॥
तरु तहाँ बीज बीज नहीं तरू, है दीपके पास प्रकाश नर
तोही नारी, जल तोही बल है, पुण्य ताहाँ अविनाश ||४||
बहेणि कहे जिसकू हरि आये बोहि है पुण्य की रास
शांती क्षमा उसके पर सोवे सबही संपत्ति दास ॥५॥


५६९ 
ये गोविंद प्राप्त भयो कहा काज व्रत नहि
जानूं तप नहि जाने कारागृहमें बिराज ||१||
पूरब जनम तप करत है तब बरद मिलो बनमाली ।
मेरे पेटमें प्रगटो निरगुन येही माँगत बाली ||२||
बहुतहि निकट मांडी तब हरि करुनाकर कहे जान
तीन जनममें मेरे उदरमें आऊं वरद दियो उस रात ॥३॥
उस तप के लीये उदर सु आवे जनम गये पीछे दोन
तीजो जनम यो कृष्ण भयो है वोही तपके कारन ।।४।।
तपव्रतदान बिन बिहिन सेवा कृष्ण न आवे संग संग
बिना नहि मुक्ति जिवाकूं येही कहत श्रीरंग॥५॥
बहेणि कहे उस वसुदेव-देवकीकु देव मुक्ति
वयसों तप बिन प्राप्त नाहीं वो साधूकी संगती ॥६॥


५७० 
ये अजब बात सुनाई भाई।
गरुडको पांख हिराये कागा
लक्ष्मी काहे चोरन गाई।।१।।
ये सूरज को बिंब अंधारे सोये
चंदर आग जलावे राहु मिन्हो भोगी
कहा रे अमृत से मर जाये ||२||
कुबेर रोये धनके आस हनुमान
जोरू मंगावे वैसो सबही झूठा
है निंदाकी बात सुनावे||३||
सुमींदर तान्ही पीरत कैसो
साधू मांगे दान चहेणि कहे जन
निंदक है रे वाको साथ न मान॥४॥


५७१ 
सब ब्रजनारी सुनो हरि जनमो
नंद-जसोदा पेट चलवो चल उस
हरिकु देखें मिल निकलत है थाट ।।१।।
नारी आरती कर लें गावत नाम
संगसे लागा छंद हलदिर तेल लिये
करमाहे मिलने चलत गोविंद ||२||
अपने अपने घर तोरन गुरिया
धरत है जनमे सुत।
नंद का भाग कोई न
जाने भेटी होवे अनंत ।।३।।
घर घर गावत राग रागिनी
ठोर ठोर भयी भार वो सुख
कहाँ कहूँ अपने मुखसे
आवे न जाने पार||४||
द्विज जन नारी मंगल गावत
चीर लुटावे भाटा गौ,
धरति और सुन्ना दान
करत है बाट ही बाट ||५||
कुंकुम केसर चोवा-चंदन फूल
गुलालकी शोभा देखत इंद्र फर्णेद्र
महेंद्र गावत हैं सब रंभा ॥६॥
नाद न भेरी तालही जब घट नादमें
अंबर गाजे नाना सूर बजावत छंदे
ढोल दमामें बाजे ॥ ७॥ बहेणि कहे
हरिजनम को सुख कहा कहूँ हरि जाने।
छंद प्रबंध सुनावत नारी देहभाव नहीं जाने ||८||


५७२ 
कंटक को मलमर्द दैतन को सिर छेद।
सुत तेरो नंद कृष्ण। सोही जानी है।।१।।
गोपिकाको प्राणनाथ। भक्तन कु करे
सनाथ शास्तर की ऐसी बात संत जानी है॥२॥
धर्मकु रक्षण आयो। पापकु सब डारि दियो है।
वोही कृष्ण सुत भयो। बात ये सत्य मानी है ।।३।।
सुत मत कहो नंत। ब्रह्म सो येहि गोविंद है।
बहेणि भाट का प्रबंध सत्य सुजानि है ।।४।।


५७३ 
जिस आस जोगी जग जिस आस छोड़ भाग
जिस आस ले बैराग बनवास जात है ॥१॥
जिस आस पान खावे। जिस आस नंगे जावे।
जिस आस धरती सोवे जपतपही करतु है।।२।।
जिस आस सिर मुंडे। जिस आस मूँछ खांडे।
जिस आस होत रंडे जलमें वसतु है।।३।।
वोही सत्य जान नंद प्रगट भयो है गोविंदा
पुण्यही तेरो अगाध बहेणि ये कहत है ॥४॥


५७४ 
जमुनाके तट धेनु चरावत गावत है
गोवाल री गीत प्रबंध हास्य विनोद ।
नाचत है श्रीहरि ॥१॥ माय री, देखत
मै नंदलाल कासे पीत बसन है
झलाल कानों में कुंडल देती डाल।
सिरपर मोरपिसा चंदलाल ||२||
अबीर गुलाल सबके माथा हार सुवास पिनाये।
जाई जुई चंपति कोमल चंदन चंपक लाये॥३॥
छंद धीमा धीमा सुनावत है।
हरि बंध गयो मेरे प्राण।
बहेणि कहे सब भूल गये।
मेरा हरिसुं लगा है मन ||४||


५७५ 
मरनसो हक है रे बाबा
मनसो हक है।।५।।
काहे डाव मोहे बाबा उपजे सो मर जाये
भाई मरन- धर सा कोई बाबा ||१॥
जनन मरन ये दोनो भाई, मोकले तन के साथ
मोति पुरे सो आपही मरेंगे बदलाम की झूटी बात ॥२॥
जैसाहि करना वैसाहि भरना संचित येहि प्रमाण
तारनहार तो न्यारा है रे हाकिम वो रहिमान ॥३॥
बहेणि कहे वो अपनी वाता काहे करे डोर (गौर)।
ग्वानी होवे तो समज लेवे मरन करे आप दूर ||४|


५७६ 
सच्चा साहेब तू येक मेरा काहे
मुझे फिकिर महाल मुलुख परवा
नहीं क्या करूँ पील पक्षी ॥१॥
गोबिंद चाकरी पकरी,
पकरी पकरी तेरी।।धृ।।
साहेब तेरी जिकिर करते
माया-परदा हुवा दूर।
चारो दिल भाई पीछे रहते
हैं बंदा हुजूर ||२||
मेरा भीपन सटकर साहेब
पकरे तेरे पाय बहेणि कहे तुमसे
गोबिंद तेरे पर बलि जाय ॥३॥


५७७ 
देव करे सो कहाँ न होने सुन रे मूढो अंधा
सीला मनुख भई जिस पायो का फुट ॥१॥
वैसी राम बढाई तुम सब जानो भाई ।।धृ।।
रावण मारके बिभीखन लंका थपाई राज्य कमाई।
राक्षसकू अमराई दीन्ही ये वैसी राम नवाई ||२||
पहरादों बिख समिंदर चुरना परबत लोट दिया है।
आगी जलावे पिता उसका सत्त्वसु राम रखावे ||३||
पानी माहे गजकू छोडे सावज मारन भाई। उसको
राख्यो कुटनी मुक्त करता राम सो वोही ||४||
मीराको बिख अमृत किया पत्थरकू दूध पिलाया।
स्वामी बिख चढे तब रामराम ऐसो बिरद पढाया ॥५॥
शनि को रूप लिया राम राखो भक्त को सीस।
ब्रह्मन सुदामा सुनेकी नगरी वैसे करे जगदीश॥६॥
वैसे भगत बहुत रखे तुम कहा कहुजी बढाई।
बहेणि कहे तुम भगत कृपाल हो जो करे सो सब होई ||७||


५७८
सांगितले करी रे सुमना
सांगितले करी रे।।धृ।।
शांति मनी धरी ।
क्रोध दूरी करी।
वासना विवरी, मेरे सुमना ||१||
देव सखा करी भाव मनी धरी।
भक्तिसी तू घरी रे सुमना ||१||
बहेणि म्हणे जरी नायकसी तरी
पडसील तू दुरी रे सुमना ॥३॥


५७९ 
भवभ्रम निरसी रे बापा।
भवभ्रम निरसी रे।।धृ.॥
काय करू इतरे। बहु ज्ञाने।
चित्त भयातुर बापा।।१।।
सिद्धि अनेका नाना परिच्या येथे ते न सरे बापा।
शास्त्र प्रसिद्धा कामिक बुद्धि ।
येणे काय रे तरे रे बापा ॥२॥
पाचही मुद्रा लाविती नेत्री
भाळ विलोकिति रे बापा।
दशनादी प्राण गोवुनी राहति ।
तेथे चित्त विरे रे बापा||३||
बहेणि म्हणे तुज सद्गुरु वरदा- विण
ते दुर्जय रे बापा ते सुख साधुनि ।
घे नरदेही ।
पुढील धाव पुरे रे बापा ॥४॥


५८० 
अरे चित्ता चिंतन तेचि कीजे ।
व्यास पराशर चिंतुनि गेले
ते हृदयी स्मरिजे ॥धृ॥
भृंगीचे करी चिंतन
आळी तद्रुप ते रमिजे ।
चिंतुनिया हरी चिन्मय
होशिल हेचि मला उमजे ।।१।।
दैत्यसुते हरी चिंतियला तरी
रक्षियेला परी जे द्रौपदीचे अती
संकट वारुनी काय तुला नुमजे ॥२॥
बहेणि म्हणे किती सांगो मना तुज
हित से मनी धरिजे चिंतन-भक्ती
वरिष्ठची आहे सांग बरे समजे ॥३॥


५८१ 
जटा न कंथा सिंगी न शंख अलख भेख हमारा बाबू।
झोली न पत्र न कानमें मुद्रा गगनपर देख थारा ।।१।।
बाबा हम तो निरंजनवासी साधुसंत योगी
जान लो हम क्या जाने घरवासी।।धृ।।
माता न पिता, बंधु न भगिनी।
गण गोत ओ सब न्यारा।।
काया न माया, रूप न रेखा
उलटा पंथ हमारा बाबा ॥२॥
धोती न पोथी, जाति न कुल
सहजी सहज भेख पाया।
अनुभव पत्रिसी सिद्ध की खाही ।
लगाया ॥३॥
बोध बलपर बैठा भाई देखत
है तिन्हु लोक उनकी उलटी पाती ह
उन्मनी ध्यान लगाया ॥13॥
योग बलपर बैठा भाई देखत
है बिन्दु लोका उनकी उलटी
पाती जहाँ प्रकाश आनंद कोटी॥४॥
भाव भगत माँगत भिक्षा तेरा
मोक्ष कीर रहा दिखाई।
बहेनी कहे में दासी संतनकी।
तेरे पर बलि जाऊं ॥५॥


५८२

देखोनिया स्वरूप सुखावले मन
पहाता ( चि) जाले समाधान।।धृ।।
श्यामसुंदर कांती सर्वांगी विभूती
नाम जयाचे उमापती ॥१॥
माथा जटाभार वाहे गंगेचे
नीरा (स्व) रूप जयाचे अगोचर॥२॥
मस्तकी (ही) डोळा भाळी चंद्रकळा
अर्धांगी शोभे शैल्यबाळा ॥३॥
रुंडमाळा गळा त्रिपुंड पिवळा |
(श्री) मुख साजिरे रविकळा ||४||
वहन वृषभ साजे त्रिशुळ डमरु
गाजे शोभती कैसे योगिराजे ||५||
सिंगी स्फुरण करी। साजे मेखळा
वरी स्मशानवारु तयापरी ।।६।।
बहेणिचा स्वामी एक त्रैलोक्यनायक।
वसे सदा हृदयी देख ||७||


५८३ 

“स्थानमानातीता रूप वर्णापरता
वर्तवी स्वसत्ता हरिहर हरि रे।
त्रिगुणी नाकळसी मोहना
श्रीदेवा शेषादिका न वर्णवे रे।।
परत वाचा जेथे रिपु नव्हे
वेदाचा अगुणरूपधारी तृषि वा रे।
तो तू आम्हा कैसे निजरूप
दाखविसी धन्य तुझा महिमा हरि रे ।।१।।
तुज नमो निश्चिता] ब्रह्मबोधा
न कळस मनबुद्धि भेदा।
गुरुवाक्य अनुभवी जाणवी जो।
खुणे तयासी न दिसे आपदा ।।धृ।।
सप्तही पाताळे दशदिशा मंडळे |
चंद्रसूर्य तुझे उदरी ।।
ताराग्रह वरुणादिक रीवावळी
देख सामाविली तुवा श्रीहरी ।।
विराटस्वरुपा अनुपा न कळसी
निजरूपा दाखविसी नयनी कुसरी ।।
चतुर्भुज कैसा नयनी दाखविसी ।
काय वर्णू तुझी थोरी||२||
सहजसिद्धा सच्चिदानंदकंदा
विश्यतारका स्वामी तू हरि रे।
काय पुण्य केले। न कळे कवणे।
जन्मी लाधलो आम्ही तुज रे।।
केवी आम्हा तू लाधसी कृपाळा ।
कंस आहे तुज शत्रु रे।।
मारिली बालके ज्येष्ठे तुजहुनी
ते लोपी चतुर्भुज रूप रे||३||
देवहीना कायेची मागणी
होय अभागीया राज्यपद है।
कामधेनु काय साधे
दारिद्र्यासी मिष्टान्न रोगीया पाहे।
कल्पतरुतळी काय असोनिया।
देव जय साह्य नोहे।
ऐसे आम्हा तू केवी होसी
प्राप्त माझे मज कळले हे ” ॥४॥
ऐकोनिया स्तवन दोघांचे पै।
कैसा संतोषला कृष्णराणा।।
“तपसामुग्रीने तुम्ही मागितले
मजला, होईल नारायणा ।।
मग मी तीन वेळा पुत्र झालो
तुमचा तिसरा मे हाचि जाणा ।।”
म्हणोनिया रूप दाखविले चतुर्भुज।
बहेणि जाणे त्याची खुणा ॥५॥


५८४
दो दिनकी है दुनिया रे बाबा।
दो दिनकी है दुनिया।।धृ।।
ले अल्लाका नाम कुछ घरो
ध्यान बंदे ना होना गुंग ।।१।।
नर-तन येही सार नई आवेगा
दूजे बार वेगी करो है फिकिर
करो अल्लाकी जिकिर ||२||
करो अल्लाकी फिकिर ।
तब मिलेगा गामील पीर
बहेणि कहे तुझे पुकार
कृष्ण नाम तमे हुसीयार ॥३॥


५८५
भावना जयाची जये ठायीं जैसी
फळप्राप्ति तैसी होय तथा॥१॥
काय तो संदेह असे या अर्थासी ।
पाहिजे क्रियेसी अंगी बळ ॥२॥
ज्ञानप्राप्तीलागीं भजेल जो नर
ज्ञानचि निर्धार होय तया ||३||
बहेणि म्हणे हेत धरी जैसा भक्त।
तेर्णेचि तो मुक्त होय भावें ||४||


५८६
मनमोहना कृष्णा कान्हा ।
यादवकुळभूषणा गोकुळमंडणा
देवकीनंदना मुनिमानसमोहना ।
त्रिभुवन सदना आनंदवदना ।
गोपीमनरंजना संकटभंजना
अरिकुळदहना गुणांच्या निधाना।।१।।
कृष्णा नाच रे वेल्हाळा म्हणती गोपी
बाळा थे थे ताल या तोडिती
मिळोनिया सकळा छंदे नाचती।
वाजविती घागरिया पुळका नवल
करीते यशोदा म्हणती भला भला।।धृ।।
हरि जगजीवना करुणाघना!
यमुनाजलखंडणा गोवर्धना।
गोकुळरक्षणा दाना गोपीप्रियकान्हा।
मधुसूदना पूर्णकामनिधाना। अकळनिर्गुणा।
चैतन्यधना । स्तविती गोपांगना ॥२॥
आनंदवना पूतना शोषण राम्ररसना भवमोचना!
गुणागुणविहीना। योगीजनपाळणा धर्मरक्षणा।
पापछेदना भक्तजनजीवना मदनमोहना।
त्रिपुटीभेदना | न करवे वर्णना ||३||
हरि गोविंदा । परमानंदा नरनारीवेधका ।
नित्यानंदा बालमुकुंदा मोक्षपददायका
सच्चिदानंदा आनंदकंदा वैकुंठनायका ।
हरिगुणभरिता देवकीसुता।
पांडवप्रतिपाळका ॥४॥
कृष्णरामा । मेघश्यामा |
पुरुषी पुरुषी पुरुषोत्तमा।
आत्मारामा पूर्णकामा योगीजनविश्रामा
व्यापकव्योमा नकळे महिमा वर्णिता
हा ब्रह्मा हरिनिजधामा जय परब्रह्मा
काय वर्णू तुझा महिमा ||५||
ऐशा गौळणीबाळा मिळुनी सकळा ।
खेळविती गोपाळा । भक्तिजिव्हाळा ।
दाविती कळा । नाचविती सावळा थे थे ताला।
हरिगुण बाळा करिती स्तुति तो
सुखसोहना पाहती डोला बगिया गोवा ||६||


५८७
जय जय कृष्ण कृपाल
भयोजी नहीं किया जप तप दान
जैस गृहि बानपूजन
नहिं रे भूमि नहीं गोदान ॥१॥
तुम यो प्रगट भयो
कहा जानो। अर्चन वंदन
नहिं कछु पालो होय
अचंबा मान ||२||
अन्न दियो ग्यारसि
नहिं रे देव न पूजो भाव
तीरथ यात्रा नहिं कुछ
जोड़ी कहाँ भयो नवलाव ॥३॥
बनधारी और निरबानो
है पत्र लिखावत जान
नंगे पाँव नंगा देह बन
बन जावत रान॥४॥|
परबतमाहै जोगी
होकर छोड दियो संसार।
धूमरपानें पंचाग्नि-साधन
बैठे जलकी धार||५||
बहेणि कहे कहा जनमको
संचित प्राप्त भयो इस बेला ।
चारभुजा हरि मुजको
दिखाया येही कहो घनलीला ॥६॥


५८८
जो जो रे जो जो बाळा ।
प्रिये घाली वेल्हाळा ।
उन्मनी नीज लागो डोळा।
हळू हळू घाली ज्ञानकळा।।धृ।।
प्रपंच नाशवंत याचा नाही
रे भरंवसा कन्यापुत्रगृहदारा हा
तव भवबंधकासा दृश्य हे मायाजाळ
हा तव काळाचा वळसा सावध
होई बाळा परतोनी पाहे कैसा ॥१॥


स्थूळदेह
प्रथम स्थूळ देह ऐक तुज
सांगता पृथ्वी आप तेज वायु
नभ पांच तत्वता। पंचभूते ही
स्थूल पाचा गुणांची पाहता ।
पाहे हे तरी तू नव्हेसी,
वा यावेगळा समस्ता ||२||
ऐसे हे स्थूल देह पाचा भूतांचे जाण।
एक भूत पाचा ठायी क्रमी पंचवीस
गुण मेळवुनी वाटियली गुणसाम्यता
करून ऐक आता वेगळाली
सांगे भिन्न भिन्न ॥३॥
आकाशाचे गुण पाच काम
क्रोध लोभ मोह भय हे पाचवे
रे, हे तू. जाणसी निःसंदेह हे
तरी तू नव्हेसी तू तव
अनामीक पाहे सांडी हा
भ्रांतिवेश सद्गुरुवचनी राहे ॥४॥
आकाशावाचून (पोटी) वायु जन्मला जाण ।
वायूचे पाच गुण ऐक तुज सांगेन ।
चलन चलन आकुंचन प्रसरण धावन
हे तरी तू नव्हेसी, तू यावेगळा जाण ।।५।।
वायूपोटी पाहे तेज जन्मले आपण ।
तेहि रे पाचा गुणी आधिले जाण ।
क्षुधा, तृषा, आळस, निद्रा, मैथुन
पाचवा गुण हे तरि तू नव्हेसी, तू यावेगळा जाण ॥ ६॥
तेजापोटी आप पाहे आपाचेही पाच
गुण शुक्र शोणित लाळ मूत्र स्वेद पाच
जाण ऐसे हे कळसूत्र देह-पंचक जाण हे
तरी तू नव्हेसी याचा साक्षी अनुभविसी ॥७॥
आपापोटी पृथ्वी जाली पाचा गुणी
विस्तारली अस्थीमांसत्वचानाडी रोम
पाचवी केली या गुणे तू आथिलासी
घेवुनी मीपणाची खोली हे तरी
तू नव्हेसी ऐसी जाण ज्ञान किसी॥८॥
ऐसे हे पंचक जा तू या पंचागा नाही
ज नाम रूप, देह पंचकी लाधला तू
तव वासी साक्षीभूत तू तथा अलक्ष सकळा।
ऐसे वा रूप तुझे निजी नीज लागो डोळा ।।९।।
ऐसे हे स्थूल देह आणिक तीन आहेत।
लिंग कारण महाकारण ऐक यांचा वृत्तांत ।
सांगता तू सावधान दृढ देई बाळा चित्त ।
जेणे तुज नीज लागे हरे चौऱ्यांशीचा खेद ।।१०।।


लिंगदेह
आता लिंगदेहे जेणे संसृती धरिले
अंत:करण चतुष्टय चौहु वृत्तीसी
वरिले इंद्रिय- दशक जाण पंचप्राण आथिले।
पाचही विषय जाण तुझे रूप यावेगळे ।। ११ ।।
प्रथम निर्विकल्प कैसा विषय आठवे ।
ते तुझे अंतःकरण ध्यानआधारे उद्भवे।
श्रोत्रद्वारे वाचा प्रवेशे स्वभावे ।
शब्द कुणी आकाश यासी
तो लिंगदेह स्वभावे ।। १२ ।।
संकल्प विकल्प मना व्यान वायोची
जाण ज्ञान त्वचा इंद्रियासी पुरुष
विषय संघर्षण पाणी हे इंद्रिय
तेथे कर्म चाळितसे जाण हे तरी तू
नव्हेसी याही वेगळा सुजाण ।।१३।।
कल्पाकल्पित द्वैत मन या निश्चयासी
येणे ते तुझिया बुद्धि पाहे उदान वायोची
गुणे इंद्रिय चक्षुद्वारे पाद इंद्रिया चलन।
रूप विषयो तेजी मुरे याही वेगळा तू जाण ।।१४।।
निश्चयासी विसर नोव्हे तेचि जाण तव चित्त ।
प्राणवायोसंगे जिव्हा इंद्रियांचे सहित
शिस्न या इंद्रिय द्वारे रसगुण ओपी निर्मून
हेही बा तू नव्हेसी तू या वेगळा निश्चित ।।१५।।
मीपण सृजवी जो तोचि तुझा अहंकार
अपान वायोचेनी योगे प्राणेंद्रिये निर्धार
इंद्रिय गुद द्वारे गंध गुण क्षिति स्थिर हा
तू नव्हेस तू या वेगळा निर्धार।।१६।।
ऐस है लिंगदेह एका जीवात्मयाचे सूक्ष्म
पंचभूत पंचवीस कळांचे भवसिंधु
तारावया गुरु साध्य आमुचे।
तुकाराम-कृपादाने तारियले साचे।।१७।।
ऐसे हे देहद्वय तुझे तूच वा जाणसी ।
तरी तू आपणासी कोण मी ऐसा नेणसी।


कारणदेह
ते तुझे तिसरे देह नाम “कारण” त्यासी ।
हेही वा तू नव्हेसी तू या वेगळा अससी।।१८।।
अंत:करणी स्फूर्ती राहे निवांत समान वायूसंगे ।
व्यापोनि नाभिस्थान श्रवणद्वारे तेणे भंगे।
नायकती शब्द कान निःस्तब्धता होय वेगे
हा तुझा कारणदेह याचा साक्षी तू अनुरागे ।।१९।।
संकल्प विकल्प राहे होय निवांत मन सर्वांगी हा
व्यान वायो व्यापुनी होय तल्लीन त्वचा हात
निवांत होय स्पर्श विषयो ग्रासून हे तरी
तू नव्हेसी तू वेगळा जाण ।।२०।।
ते वेळी निश्चयासी बुद्धी तुझी न स्फुरे
कंठस्थानी उदान वायू गिळीउलटी वसरे।
चक्षु पाद निवांत होती रूप विषय तेजी
मुरे याचा तू साक्षीभूत तू या सहज वेगळा रे।।
रा जे वेळी अनुसंधान धरूनी विसरे चित्त प्राण
वायू हृदयस्थानी मलमूत्रा
कोंडित जिव्हा शिस्न निवांत रहे।
रसविषयो ग्रासित। हे तरी तू
नव्हेसी तू यावेगळा निश्चित ||२२||
ते वेळी अहंकार देही मीपण
सांडी। अपान वायो गुदस्थानी।
नाशिक (नासिका) आकाशी
परवडी प्राणमुद
निवांत राहे विसरे गंध-विषय गोडी ।
ऐसे हे तीन देह तुझा तूंचि वा निवडी ||२३||
ऐसे हे अज्ञान जाण तुझा तिसरा देह
‘कारण’ नाम याचे हे तव भवदायक।
जाणते, जाणते रे, याचे
भोगिताती दु:ख।
तुकाराम खास आला,
हरिय जन्मदुःख ||२४||
महाकारण देह आता हा चौथा देह।
महाकारण जाण । तेथिचि
स्थिति कैसी ते तू बुझे
आपण ही खूण विरळा जाणे
ब्रह्मास्मि होय स्फुरण
स्वानंदसोहळा जेथे गुरुखूणचि प्रमाण ||२५||
स्थूलदेह जागृती तेथे “विश्व” अभिमानी।
रजोगुण नेत्रस्थानी युक्त भोग ज्यालागुनी ।
षड्गुण आकार तब ते तुज दृश्य म्हणवूनी
प्रणवाचा पहिला चरण तू तव तेथीचा जाण ।। २६ ।।
लिंगदेह स्वप्नावस्था तेथे “तेजस” अभिमानी ।
सत्वगुण कंठस्थान प्रयुक्त भोग त्यागुनी ।
षड्गुण उकारवंत तू या वेगळा जाण ।
प्रणवाचा दुसरा चरण राहे ऐसा ओळखून ।।२७।।
आता हा कारण देह याची
सुषुप्ति अवस्था अभिमानी “प्राज्ञ”
जाण तमोगुण हृदयस्थान आनंद
हा भोग जेथे षड्गुण विकार
आपण प्रणवाचा विसरा
चरण तू तरी तियेचा जाण ।।२८।।
आता हा (महा) कारण
देह याचा सांगता भाव।
अनिर्वाच्य महिमा जेथे
बोलावासी नाही ठाव ।
बोलता राग येती संतप्त
मानुभाव (महानुभाव)
म्हणवुनी गुप्त केले येथे
गुरूचा अनुभव ।।२९।।
प्रथम सरस स्वरूपी जे
वा सन्मुख स्फुरे ।
तेचि रे जीवनकळा
निजस्वरूप तुझे रे।
निमाल्या पाचही अवस्था
तेचि स्वरूप तू रे ।
हे स्थित लागो तुज ।
जेवी सरिता सागरी विरे ||३०||
ऐसा हा पाळणा रे।
निज मायेच्या उपाये|
हलवी सोऽहं दोरी।
‘तत्त्वमसि’ गीती गाये।
निज रे निज वाला सद्गुरुवचनी आहे
तुकारामे निजविले बहिणी प्रेमे डोलताहे ।।३१॥


५८९ 
निज रे निज तान्ह्या बाळा निज रे
जीवींच्या जिव्हाळा निज रे निज कान्हा
वेल्हाळा निज रे निज त्रैलोक्यपाळा।।धृ।।
करी धरुनी दोरू देती स्नेह-झोलू
हलवी हळुहळू यशोदा वेल्हाळा ।।१।।
जो जो जो जो करी त्याते।
“हा हा हा हा आला येथे जोगी”,
सांगे बालकाते यशोदा वेल्हाळा ||२||
निजासी ‘नीज’ म्हणे कोण ते स्वरूप
नेणे मायेच्या भुललेपणे
निजवी गोपाळा ||३||
हळुहळू पै कर मुखे।
हलवी तेणे सुखे।
रुदना करी तो देखे।
गोविंद सावळा ||४||
म्हणे माता, “अवधारी
जोगी आला बाहेरी ।
त्रिशूल डमरु करी दिसतो विशाळा ॥५॥
विभूतीचे विलेपन मस्तकी
जटा जाण मेधा तिसरा नयन |
पाहे गोपाळा ॥६॥
ठंड माळा गळा व्याघ्रांबर मेखला ।
मस्तकी झुळझुळा वाहतसे बाळा ||७||
कपाळी अर्धचंद्र ।
कानी मुद्रा सुंदर न
कळे तयाचा पार ब्रह्मादिकाला ” ||८||
इतुके ऐकोनी कानी। बाळ वैसे उठोनी।
म्हणे “माते नयनी दाखवी त्याला ” ||९||
काळाचा जो काळ
व्यापक त्रैलोक्यपाळ।
जोग्याचे दावोनी खुळ नवल गोपाळा ||१०||
बहेणि गाई चक्रपाणी
करुनी नाटक-वाणी ।
रामकृष्ण स्मरणीती सोह ||९९॥


फुगडी (१)

५९०
फुगडी घालिता नव्हे
तुझा संग जोवरी आहे देही
तुझ्या विषयांचा रंग
कामक्रोधलोभ यांचा नाही
जब त्याग तोवरी वाया अ
वघे फुगडीचे सोंग ।।१।।
फुगडी घे विवेक घरी
गे पाहे परतोनी मागे।
मग तूची हरी गे॥धृ॥
अहंकार दंभ मान धरू नको बाई।
लोक-लाज भीड यासी देसवटा देई
कायावाचामनबुद्धि एकवटे होई।
फुगडी घालिता मग देव तूचि पाही ।।२॥
परनिंदा द्वेष याचा नको करु साठा
धन विद्या पुत्र यांचा धरु नको ताठा
अवधे मोडूनि धरी एकभाव निष्ठा
बहिणी म्हणे तरीच तुज भेटी भगवंता ॥३॥


फुगडी (२)

५९१
फुगडी फू।
उघडी हो न होसी उघडी
तरी मग धगडी तू।।धृ।।
भूमिवरी झाडी ।
अंतरीचा कामक्रोध कादी सांडी माया ओदी।
मग होय भावा गडी ॥१॥
या वासनेचे ओचे खोवी आधी साचे।
निरोध इंद्रियांते मग हरिरंगी नाचे॥२॥
दोही पदावरी एक भाव
करी अशिपदीवरी मग तूच पाहे हरी ॥३॥
बद्ध सबळ भुजा आधी सारी ओजा ।
जाण निजगुजा मग
फुगडी घाली ओजा ॥४॥
दृश्य भाव सांडी।
एक भाव जोडी प्रेमे घाली फुगडी ।
स्वानंदाची गोडी ॥१५॥
ऐसी बहिणी फुगडी घाली ।
अवघ्या आणिल्या हारी।
पांगविल्या पोरी न येती बरोबरी ॥६॥


पिंगा

५९२
आपली मांडी उघडिता लाज
शिकवितो राग काय तुज।
न धरिसी सोय काही विवेकाचे
गुजान लाजसी तू होता भावा बापाची भाज॥१॥
घाल पिंगा ऐसा सांगतसे तैसा काया
वाचा मने शरण रिघे जगदीशा ।।धृ।।
इच्छेचिया संगे नको फिरु रानोरान सांडी
सांडी अभिमान नको वाया करू शीण ।
इंद्रियांच्या वृत्ती अवघ्या घरी सावरून
परंपरा हेचि गेले संत आचरून॥२॥
वासना कुरण इचा नको करू पांग
आशा तृष्णा मोह यांचा आधी सांडी
संग काम क्रोध लोभ यांचा करी मनोभंग
गुणातीत स्वामी माझा ध्याई पांडुरंग ॥३॥
भक्ति आणि ज्ञान येथे धरी शुद्धभाव ।
दया क्षमा शांति हाचि जाण पूर्ण देव ।
अनुताप चरवा मनी असो सावयव मिथ्या
द्वेष त्यजुनी पाहे देही देव ||४||
ठेवुनिया हात कटी नीट उभी राहे।
सारूनिया दृश्य बाई एकाएकी पाहे
जनवाद लोक बाई सांडी यांचे भय
प्रेमे अंतरंगी नाचे सुखाचिया सोये ॥५॥
जाणिवेचा पिंगा वाया नको धरु देही।
साहंग संपादणी यासी बानिसी तू कायी।
स्तुति बाद भेद याचा मान नको देही।
सर्व निरंतर समभाव घरी बाई ।।६॥
बहिणी म्हणे पिंगा याची जाण कला
ऐसी साधुनी या वेळी पुढे सिद्धमुनी
ऋषी ज्ञानाचे अंग हेचि जाण सर्वाविषी
तुकारामकृपे सुखे नांदो अहर्निशी ॥७॥


झिंपा

५९३ 
पिटूनिया बाहे गे ।
नीट उभी राहे बेडकीचे
परी तोंड हालविसी काये ।।१।।
झिंपा गे झिपा रामचरण झिंपा।
विषयांचे गोडी वाया नको करू खेपा ।।धृ।।
करुणेचे बोल माझे नको करू फोल।
घरी भक्तिभाव जेणे वसे ज्ञानबोल ||१२||
नाच संतसंगे सखये अति प्रेमरंगे।
जेणे तुज कृपा कीजे प्रीती पांडुरंगे ॥३॥
पंढरीचे पेठे सखये सुख आहे मोठे
धाउनीया जाय बाई सर्व पांग फिटे ||४||
नका करू फेरे बाई चौन्यांशीचे घेरे
धरा एकभाव जेणे भव सोडवी रे।।५।।
मुखी नाम बोले बाई प्रेमभक्ति डोले ।
सुखानंद रसे बाई स्वानुभवे बोले ।।६।।
मध्यमेचे पारी सखये मेळवोनी पोरी
सदा अंतरंग खेळा उन्मनीच्या भरी ||७||
बहिणी पाली झिंपा करुनी सद्गुरुकृपा
संतचरणी विनटली मिळुनी ज्ञानदीपा ||८||


हमामा (१)

५९४
तुज मज वार येथे कोण म्हणे किर।
ऐके सोसे सरसे मागे
का बोलसी फार ।।१।।
हमामा रे पोरा हुंबरी रे।
ऐसे करिता किती पांगली रे।।५।।
अहं सोहं स्वर सारुनी मिळू
एक घाई स्वानुभवाचे
सुख तेथे सांगू आता काई ||२||
क्षरनाक्षर वाजे अनुहात ध्वनी।
पडिला विसरू झाली तन्मयता ध्यानी ॥३॥
बहिणी घाली वार। अवध्या म्हणविले किर।
परतली वृत्ती झाली निजानंदी स्थिर ||४||


हमामा (२)

५९५
हमामा पोरा हमामा बाजे सवाई
दमामा दमाम्याची थोर पाई।
पोरा मेली तुझी आई ।।१।।
सांडी इंचा चाळा पोरा
लावी ऊर्ध्व डोळा ॥२॥
रहोन आता काई
मी सवे तुझी आई ||३||
बार धरी नेटे।
समान करी बोटे ॥४॥
नाम हुंबरी छंदे उडवू नको बंडे ||५||
बाई घेई पोरा बांधून हाती दोरा।।६।।
हुंबरी घाली नेटे।
घेवून हाती काटे।।७।।
खेळ नव्हे फुका चुकवी जन थुंका॥८॥
हुंबरी उत्तरी घाई।
विवसी ठाई ठाई ।।९।।
हुंबरी घालिता सोसे।
मग पाहे ते सुख कैसे ।।१०॥
बहिणी सुखे थाली ।
अनुपम हुंबरी पाली ।।११।।


हुंबरी

५९६
ऐका यमुने घोषा उडाला पेंद्या कैसा ||१||
भरले अंगी वारे हसती कैसी पोरे ॥२॥
ठेवुनि तीरी झारी आली न म्हणे पोरी ॥३॥
बाहे पिटी मांडी वरी सोस धरी तोंडी ॥४॥
घेवुनि हाती काटे। हुंबरी घाली नेटे ॥५॥
मज पेंद्याचा वार येथे कोण धरी धीर ॥६॥
आली म्हणे पोरी। करीन तुज नवरी ॥७॥
लाविला मज चाळा फोडीन तुझा डोळा ॥८॥
घाली पेंद्या बार यमुना नव्हे स्थिर ||९||
उडत कसा फोडी खरेसी आली जोडी ।।१०।।
सोस कंठी राहे हुंकार न सांडी पाहे ।।११।।
यमुना नव्हे स्थिर पडिला धरणीवर | १२||
धांवोनी आला हरी। पेंद्या धरिला दो करी ।।१३।।
यमुना केली स्थिर म्हण म्हणे आता किरं । ।१४।।
घेतली आळी मोठी यमुना जाली खोटी ।।१५।।
राहिला यमुनेचा घोष सोडिला पेंद्याने सोस ।।१६।।
आली म्हणे पोरी धोपटी कैसा टिरी ।।१७।।
बहिणी हुंबरी गाय नाचत पंढरीराय ||१८|


वासुदेव

५९७
हरी वासुदेव द्वारासी आला
कोणी तरी भिक्षा त्यासी घाला गा।।धृ।।
कर्म करुनि फळ अल्पयी ।
अहंभावासी येवून द्यावे मूळ नासता
ते ऋणी त्याचे सर्व संचित पायी लावा गा ॥१॥
फावे लक्ष अलक्ष याही वेगळे ध्याये ध्यानाहुनी
निराळे दृश्य द्रष्टा दर्शन येथे
गेले तेचि दाता दिले पाहिजे गा ।।२॥
बहिणी म्हणे सरले द्वैत
सच्चिद्यने आनंद भरित
जेथे वेदाचा न कळे प्रांत
तथा दानाचे आम्ही अंकित गा ॥३॥


खेळिया

५९८
एका खांबावरी दुखांबाची
माडी तयावरी तीखण
आहे तथा पाच उभविली
घरे तथा नवद्वारे पाहे रे ।।१।।
सांग रे खेळिया याचे नाव कायी ।
हे कोणी रचिले माझा
भाई कोठून झाले कोण
यासी व्याले याचा धनी
आहे कवण्या ठायी रे ।।धृ।।
पंचवीस खांब त्यासी
बहात्तर कोठड्या बावन
खिळे पाही पंधराजण
त्यामधी निघ निघ करिती।
चौघे राखिती ठाई ठाई रे ।।२।।
सातही बाजारी दिसती हरी ।
तेथे घडामोड होते
नानापरी साधूनिया
चौक चावडी त्यांचे सहा कारभारी ।।३।।
अठरा कोतवाल फिरती दिनराती ।
अहं ब्रह्मास्मि ऐसे जागविती
बहेणि म्हणे तेथे ओंकार
ध्वनी उठोनी कोठे सामावते ||४||


खेळिया

५९९
मेरूचे शिखरी पडियेली खाण तेथे लोभ्याने
काढिली धावण एकी बोंबे त्रिभुवन गाजले।
तेणे डगमगले शेषासन ।।१।।
सांग रे खेळिया अनुभव
याचा हा तुझा तुजपासी
आहे न कळे तरी हा तिचे गुरुमुखे वा रे पाहे ॥धृ॥
अंधे बोटे पांगले बहिरे येणे
काढिले व एकापुढे एक
घेतात लाग। ते पायाविण चालती गगन ||२||
आंधळा मार्ग काढीत
चालला त्याचा पांगुळे घेतला लाग।
थाने धरिता शस्त्र ते पोरांसी
मारिली कैसा गा ।।३॥
वेद पंडित महानुभावी योगी
हा तयांचा अनुभव आहे हेणि
म्हणे हा अगम्य सर्वा कुरुकृपेविण न कले पाहे॥४॥


दादल्या

६००
त्रिकुट शिखरी नांदे एक
नारी त्रिभुवन तिचे उदरी
नातू पणतू हरिहर ब्रह्मादिक
ते पुरुषेविण नांदे घरी ।।१।।
नवल सांगता नये ते
दादुल्यासी म्हणे बाप माये।
शेखी बापासीच माळ घालून तिने।
प्रपंच रचिला आहे।।धृ।।
वांझीच ते व्याली बाळ
तियेपासून तिन्ही बाळ।
उत्पत्तिस्थितिप्रलय समयी।
आपली आपण खाव बाळ ।।२॥
पाहता शेंडा ना मूळ परि तिचेच
बेवढे खेळ एकाचे पंचवीस करून ।
तिने रचिले ब्रह्मांड गोळ॥३॥
बापाची लेकीच नवल व्याली कैसे जगी।
ऐसे जाणून खेळू खेळे ।
कैसा तोचि एक जाणिजे भोगी (योगी) ।।४।।
ऐसी ते नारी वर्ते एक
चराचरी कळे तियेची थोरी बहेणि
म्हणे ते अगम्य सर्वा
आहे तुम्हा आम्हा माझा हरी ॥५॥


डोहो- ६०१
डोहो रे कान्हा डोहो।।धृ।।
निजभाव घरी डोहो।
भक्ती अंगिकारी डोहो।
होई निर्विकारी डोहो।
कल्पना वारी डोहो ॥१॥
श्रवण करी डोहो।
मनन घरी डोहो।
निजध्यानी विवर डोहो।
तोचि धरी हे साक्षात्कारी डोहो ॥ २॥
डोहो डोहो डोहो डाही
डोहो घालता जडाला भावो
बहेणिसी फावला प्रेमभावी
तुकाराम स्मरणे हाचि लाहो॥३॥

सौरी (१) ६०२
काजळकुंका भुलसी वेड्या
सौरियांच्या वेशा मुळी कामा पडिला चिरा ।
म्हणोनि नाची ऐशा ||१||
निलाजिन्या जाय बोलसी तू काये।
लटिक्यामागे हिंडोनी तुज हाता येते काये || २ ||
विषयाचा धूमस पेऊनी हिंडस आम्हामागे मुलीचा
तो ठाय रिता विनोद कोणासंगे ॥३॥
बनि म्हणे सवरीपुढे झाकणे ते काचे
खरे खोटे अवधे तुझे कले आंतरबाह्य ॥४॥

सौरी (२) ६०३
पुरुष व्याली कन्या झाली नवल सांगू काये।
कन्ये बापू गरव्हार केला
तो घेतो आपुली माये ॥१॥
उगवा माझे कोडे सौरी
नाचे पुढे पहा वेदशास्त्र याचे गुज आहे थोडे ।। २।।
नर नव्हे नारी नव्हे काहीच ते फेरी असे
नव्हे तसे बाई डीर आला करी ||३||
बहेणि घाली साद अवघा तोडुनि वेवाद।
सौरीयाच्या वर्षे नाचे सारूनि भेदाभेद ||४||

सौरी (३) ६०४ 
मुळीच काही व्यसन नाही
कैचा संसार लटिकी
भ्रांती पडिली होती
कैचा भव सार ।। १ ।।
चाल माझ्या रामा गाईन
तुझ्या नामा मने मुळा
घेतली धाव म्हणउनि नाचे प्रेमा। २॥
सोडिली लाज जाले निर्लज्ज
डौर घेतला हाती
प्रेमभरे नाचती पुढे
अविद्या-साउले करुनी परती ॥३॥
अविद्याविध सारुनी सिद्ध
झाले निःसंग सौरी स्वरूपाचे
जन्मस्थान दावी घरोघरी ||४||
विधिनिषेध कैचा आम्हा
सौरीयाचे पाती।
बणि म्हणे भाव घेउनी
दौर ऊर्ध्वमुखे गाती ॥५॥

डोर (१) ६०५
कुडपियला देस आता नका करू बळ झाले
रामराज्य तुमचे बोसरले बोल।।धृ।।
धरा बाई लाज काही म्हणा
रामराम साहेबाचे देणे तेणे झाले पूर्णकाम ।।१।।
साहेबाचे देणे तेणे मोकळे केले आम्हा गुरुकृपा
जाणती संत काय कळे तुम्हा ।। २।
रुक्यासाठी फोडू डोई हिजडी नाम
आम्हा निजभावाचा घेउनि डोर हिंडू चारीधामा ॥३॥
जाति कर्म कूळ नाही सौरियेच्या वेषा।
बहेणि म्हणे नि:शंकपणे हिंडो दाही दिशा ॥४॥

डोर (२) ६०६ 
काजळकुंकू धरा तेलफणी करा
उगवला दिनराज वाण
आले चौबारा।।धृ।। चला झडकरी नाचू प्रेमभरी।
बुडेल दिनराज मग मरो येरझारी ।।१।।
नर नव्हे नारी, नारी नव्हे सौरी असे
नव्हे तसे नव्हे डौर आम्हा करी ||२||
एकावरी एक पुढे त्याही वरी एक भरले
दिवाण टक्कासाहेब माझा देख ||३|| ब
हेणि घाली साद अवघा तोडुनि वेवाद।
सौरीयाच्या वेषे नाचे सारूनि भेदाभेद ||४||

डौर (३) ६०७
देव आठवा संसार आटवा पांग
फिटवा तेव्हा सद्गुरुकृपा ||१||
ज्ञान करावे वैराग्य धरावे।
स्वरूपा बारावे तेव्हा सद्गुरुकृपा ||२||
वृत्ती सोडावी निजवृत्ती जडावी
अखंडता घडावी तेव्हा सद्गुरुकृपा।।३।।
मनासी दंडावे मायेसी भंडावे ।
द्वैतासी खंडावे तेव्हा सद्गुरुकृपा ||४||
भक्ति करावी समता धरावी।
जाणीव सारावी तेव्हा सद्गुरुकृपा ||५||
असत्य त्यजावे सत्यासी भजावे।
संतांसी पुजावे तेव्हा सद्गुरुकृपा।।६।।
बहेणि म्हणे ऐशा निर्धारा
करणे तरीच वरणे सद्गुरुकृपा ||७||

मुंढा (१) ६०८
मुदा तोचि मुंडा अवघा लुंडा
करी इंद्रियांचा मन जिंकोन करील
त्याग अवधा वासनेचा ||१||
तरीच बरोबरी होईल समसरी
नाही तरी जाय अधोमुख करी ॥१॥
मनपणी मना कोठे घेऊनिया वाय
पूर्णपणी पाही अवघा आत्मदेव ॥३॥
सुखस्थिती अनुभव विज्ञानेसी लाहे ।
बहेणि तोचि सुंदा अंतर्बाहा पाहे॥

मुंढा (२) ६०९
बडा भेख शिर मुंडावा
कफनी गलेमें है।
वस्तादकी खूण पाया तोवरी
किया क्या है।।धृ।।
आपकु पछान देख दाई मकान।
पकड रहिमान क्यों हुआ है हैरान।।१।।
पटपटकर क्या किया। जिकीर
नहीं प्यारी वस्ताद तुझे क्या करे
किये पेटकी कामगिरी ||२||
पाच बखत निमाज करते हैं।
किसे पुकारता है? कहा
अल्ला किधर गया। ऊपर देखता क्या ॥३॥
बहेनी कहे नहीं करार दिलमें पडी चुकी।
वस्ताद तुझे क्या करे ? पेटमें वासना भूखी ||४

मुंढा (३) ६१०
मुंडा मुंडा सब कहते।
दिलका कहीं कोबी ऊपर तलखी चौघी
भूजो आप पछाने – ओही ॥५॥
काय लीया अाकू फिर देख
मनसा मुंडी न फिरे तो गांड मारु मेख ||१||
बगलम्याने तबल लेकर फिरते दारोदार।
पेटके खातिर काटते मासा दिलकी नहीं खबर ||२||
छुटी माया तेरी । काहेकू पकडे उसके
साथ ढुंगसे ढुंग घसना। मुंढे क्या कीया शाहामत।।३।।
बहेनी कहे मर थे। मुंढे झूटा तेरा सोंग।
वासना मुंडी नहीं काफीर तो काहेकू नाडते जग ||४||

 श्रोता- गाणे- ६११
श्रोत्याविण जे गायन । गात्याविर श्रोता
जाण त्याची सांगेन ते खूण आइकावी ॥। १॥
अन्न सुरस निपजले नेउनी रोग्या योगरिले
तसे व्यर्थ गाणे केले श्रोत्याविणे॥२॥
गाणे होतसे सुस्वर श्रुती लावून मधुर ।
राजा श्रवणी बधिर तरी ते व्यर्थ ||३||
अति सुंदर पद्मिनी। रंभा मृगनयनी ।
पती नपुंसक गौणी तरी ते व्यर्थ ||४||
अश्व सुंदर नाचत। नाना
कलाही दावित बसणार नाही तेथ।
तरी ते व्यर्थ ||५||
देह सुंदर चांगले परी प्राणची
ओसरले जीव स्वग्रामी
गेले तरी ते व्यर्थ ॥६॥ विप्र सुंदर नेटका ।
परी कोड मुखी देखा।
तरी तो जाणावा
आवांका । सर्व व्यर्थ ||७||
कर्म करी द्विज सांग परी
गायत्रीचे नेणे अंग तरी
ते सर्व सांगोपांग
अवघेचि व्यर्थ ||८||
भागीरथी गंगाजळ उत्तम हे सुशीतळ ।
परी ते अमंगळ स्थळ ।
तरी ते व्यर्थ ।।९।।
तैसे श्रोतेविण गाणे।
ते तव लाजिरवाणे म्हणून
सावध ऐकणे। हरिकथा ।।१०।।
तुम्ही श्रोते आम्हा कैसे।
राया परीक्षिती ऐसे बहेणि
म्हणे त्या मानेसे नाम गावे ।। ११।।

डफगाणे- ६१२
अरे गलबला करू नका माझे
उगेचि ऐका तुम्ही आम्ही जाऊ लोका।
देवाचिया । । १ ।।
तम्ही भावे जरी ऐकाना तरी मी
पद गायीना मज पडे हे मौना कथेमध्ये ॥२॥
तुम्ही श्रोते सावधान | ऐका बोबडे भाषण तुम्ही
कृपा जी करून परिसावे||३||
मी तरी शिवरीची गाण। तुम्ही येथीलचि जाण ।
तुम्हा आम्हा आजि लगन । लागले असे ||४||
जैसा पडिला कपाळी । तोचि पूजावा त्रिकाळी
म्हणवुनी तुम्हाजवळी। मागतसे।।५॥
जरी ऐकाल सादरे। तरी स्मरती उत्तरे
नाही तरी व्यर्थ का रे। पीडा आम्हा ||६||
मन तुमचे गुडगुडी येथे हरिदास बडबडी ।
तरी झाली घरबुडी । श्रोत्यावक्त्या ।।७।।
तुम्ही घेत असा विडे । माझे मागे कुणीकडे ।
जैसे प्रेतापुढे रहे। तैशापरी ||८||
मन तुमचे दोघरी क्रीडतसे बाजेवरी
गळासीये धरी । देह येथे।।९।।
तुम्हा चढलासे उबागी हरिदास गाय रंगी।
दोघा नागवण वेगी । घरा आली ।।१०।।
यांचे चित्त मोच्यापाशी । कथा नयेचि मनासी ।
तरी कासवा कथेसी अडचणी ।।११।।
ऐसे उदंड बोलता । व्यर्थ चावटी सर्वथा ।
अवधे ऐका जी कथा मनोभावे ।। १२॥
असो सिद्ध महामुनी संन्यासीही असो
कोणी ऐका सादरे श्रवणी हरिकथा ।।१३।।
जपी तपी असो सोमपी असो अश्वमिनी पापी परी
देवाचे स्वरूपी चित्त दीजे ॥ १४॥
असो पंडित वेदांती मीमांसादि हे व्युत्पत्ती
परी कथा अतिप्रीती ऐकावी ||१५||
असो सिद्ध वा साधक । असो राजा
अथवा रंक कथा आधी आवश्यक परिसावी ॥१६॥
असो ब्रह्मज्ञानी थोर । अतिव्युत्पत्ति चतुर ।
परि कधेसि तत्पर । चित्त दीजे ||१७||
ऐसी नामे मज घेता फार वाढेल
पै कथा पुढे हरिकीर्तिकथा आहे गावी ।।१८।।
हेचि सकला प्रार्थना करितसेभावे जाणा।
कथा ऐकोनिया मना ।विवंचिजे ।।१९।।
जरी इतुके न ऐका तरि घरासी जाना का?
नाही वाटे काही धोका! अंधारीचा।।२०।।
बहेणि म्हणे स्वानुभव ऐका धरुनिया भाव ।
तेणे भावे तुम्हा देव जवळी होय ||२१||

नवल- ६१३
नवल नवल नवल ऐक देखिले
साजणी जेथे अनुहात वाजती ध्वनी॥धृ॥
गे गे आनंद जीवासी जाला ।
परमात्मा हरी देखिला ।। १ ।।
नानापरिचे दशनाद उठती
घेउनी छंद गीती गाती हरि गोविंद गे ||२||
बहेणि म्हणे शेवटीचा नाद तो निःशब्द
साचा आळवितो नंद नंदाचा गे ||३||

संचित – ६१४
संचिते आणिले भागा। यासी काय
करू सांगा । आत्मा आत्मी नुरोनि
जागा ब्रह्मचि जाले ।।१।।
यासी यासी काय करणे
शिकविता ने घे मने। देखोनी
अखंड चिद्घने स्वरूप डोळा ||२||
तेथे न देखे जातीकुळ । वर्णावर्ण
भ्रमजाळ स्वरूपी राहिले
अढळ मन हे माझे ।।३।।
आता हे न चले काही ।
उपाव सांगता देही।
उपदेश महावाक्य पाही ।
सर्वत्र जाले ||४||
बहेणिसी भेटला तुका ।
महावाक्य जाहले फुका ऐकती घोकती
ते परलोका धावत जाती ॥५॥

सोंग (१) – ६१५
सांडावे ते काय आता सर्वही
सवेचि आहे जावे आता
कोठे सारे मायावेष्टित दिसे ।
वैराग्य घेउनी त्यजू भवासी ते तव पुढेचि भासे ।
यासी यासी काय करणे मन स्थिर नसे ॥१॥
ठायीच्या ठायी बरे रे असे मोकळ्या वृत्ति।
विटंबूनी कायास्थिति आता हिंडावे किती
घरीच्या घरी बरखा पाहे विवेकबुद्धि।
येणेच जोडेल तुज आत्माराम त्रिशुद्धी ।।२।।
घर जरी त्यजू पाहसी तरी तुझे शरीर सवे।
भोजनी क्रूरता धरिसी तरी कल्पना सवे
कन्यापुत्र त्यजिसी जरी तरी इंद्रिये सवे शरीरसंबंध
तुझा ज्ञाने करू तुटे स्वभावे ||३||
सांडावे जे आता काय नव्हे वासना त्याग।
सांगावे ते सर्व दिसे जिव्हा उपस्थ सांग।
जयासाठी केला विटंबू ते तव न संडी पाठी।
बहेणि म्हणे मिथ्या सोंग तुमच्या फोल या गोष्टी ।।४।

सोंग (२) – ६१६
सोंगसंपादणी केली आश्रमाची
नाही स्वरूपाची खूण-मुद्रा ।।१।।
ठकवूनी जना भरितसे पोट मी
नाही वीट वासनेचा ॥२॥
बणि म्हणे कैसे केले जन
हे दावी सॉंग कुठे पोट भरी॥३॥

संन्यास – ६१७
ज्या नाव संन्यास षड्उर्मी जिंकी।
स्वानुभवे सुखी निर्विकार ।। १ ।।
मानू आम्ही तया संन्यासी केवळ
येर ते खळ पोटासाठी ||२॥
तिही आश्रमींची क्रिया ठसावेल
शांति ही लोळेल सर्वदेही ||३||
त्रिकाळाचे ज्ञान विधीचे पालन।
ध्यास नारायण चित्तामाजी ।।४।।
निर्वैर अंतरी नुरे ज्या अहंता ।
संन्यासी तत्वता बहेणि म्हणे ||५||

भाट (१) – ६१८
नंदजी आसिस भाट
भट भाटको आसिस है।
चिरकाल सुत तेरो
सत्य जाण बात है।
गज दासी घोडे।
वस्त्र शस्त्र दान देत है।
कृष्णको प्रताप भाट
बहेनी मूसे गात है।

भाट (२) – ६१९
जसोदाका पुण्य फलो नंदजी तेरो भलो।
कृष्णजीकी आस डारो मायामोह नंदजी ।।१।।
योही ससर ब्रह्म निर्गुणही वाको नाम
कृष्णजी स्वरुपधाम। वैकुंठको जाणजी ||२||
कूर्म नरसिंह रूप। फरश वामनरूप |
मत्स्यहि वराहरूप। योही कृष्ण सत्यजी ||३||
छोडा मायापूर वैसी यो यो सत्य इषीकेशी ।
उसको दर्शन दोजी पाप जावे बहेनीका जी ॥४॥

भूत पद- ६२०
कैसे एक नवल वर्तले।
सांगता न ये ऐसे वो देखिले ।
मन माझे चकित मे झाले विवेकासी
गूढ वो पडिले।।धृ।।
बुद्धीचा पे निश्चयो राहिला ।
चित्ताचा हेतुचि तुटला ।
अहंकार हा समूळी निमाला।
नवलावो सखिये जहाला।।१।।
जागृतीच्या जागण्यामाजी वो।
जागताचि देखिले चोज वो
नेणो कैची आली हे दूती
वो खुणावुनी खूण हे दावी वो शब्देविण
लक्ष ते लागले। लक्षी लक्ष लागता भेदले ।
तेणे देह व्याकूळ पडियेले।
अंतर्बाह्य स्वरूप कोंदले ॥२॥
रूप त्याचे सांगता अपार षड्वर्णारहित सुंदर
नखी शोभा कोटी दिनकर।
वर्णावया भागला फणिवर ऐसे रूप
न देखे मी डोळा तिन्ही लोक धुंडिता भूगोळा ।
देखोनिया अंतरी कळवळा
बोलता है कुंठित रसाळा ||३||
एकाएकी वो पडियेली गाठी ।
देखोनिया मन हे वो तुटी ।
अखंडता लागली हे दृष्टी
परमानंदी पडली वो मिठी
निमाल्या वैखरी आदि वाचा
जाला न्यास चतुष्ट्यदेहाचा।
प्रकाश हा थोर उन्मनीचा
काय सांगो महिमा तियेचा ॥४॥
अवस्था हे लागता उन्मनी। ब्रह्मरूप
दिसे जनी वनी। येकायेकी जड़ली नयनी
दुजेपण न दिसे साजणी
झाडिता हा न झडेचि कैसा ।
पहाता गे सर्व देहीं ठसा ।
पृथ्वी आप तेज या आकाशा
व्यापक हा दिसे दाही दिशा ।।५।।
आता काय करू गे साजणी ।
कैसी याची जाली झडपणी
भेटे वो ऐसा कोन्ही गुणी दैवत
हे काढील क्षणी सहा चारी अठरा
भागले। काही केल्या सर्वथा मुखळे।
बहेणि म्हणे अधिकचि ते जडले
कोण भूत लागले न कळे ॥६॥

भैरव (जोगी) ६२१
विवेक जालारे बहिरव हाती घेउनी डौर भाव ।।१।।
फेरा घालितो या नगरा। क्षेत्र काबा- कासीपुरा ||२||
गाय सोनारीचा राजा जया अनंत पादभुजा ||३||
महा स्मशानीचा वास अखंड उन्मनीचा
ध्यास ।।४।। हाती ‘डमरू’ निजबोधाचा
त्रिशूळ भक्तिज्ञान वैराग्याचा॥५॥
शांति विभूतीचे लेणे। बरवे दावी सुदर्शने ॥६॥
कानी योग तेची मुद्रा भाळी शोभे अर्धचंद्रा ||७||
माथा केयूराचा भार । निजवृत्ति निर्विकार ||८||
अनुहात सिंगी वाजे । तेणे विधिगोळ हा गाजे ||९||
नकळे योगीयाची लीळा । अंगी नवखंड मेखळा ।।१०।।
काखे ब्रह्मांडाची झोळी पृथ्वीपात्र करतळी ।।११।।
अष्टभैरवांचा राव। देही आत्मा सदाशिव ।।
१२॥ डमरे बोध करी जना। त्रिशुळे गुण छेदी जाणा ।।१३।।
ऐसा योगी भक्तराव पुसी अभक्तांचा ठाव ।।१४।।
जिकडे घाली भावे फेरा मोडी पातकांचा धारा ।।१५।।
नाम जगजोगी गाये। हिंडोनी जनी भाव पाहे ।।१६।।
जेथे देखे भाव मनी। तेथे करी सिंगी ध्वनी ॥१७॥
सिंगी महावाक्य जाणा ।तेणे सावध करी जना||१८||
मी तब सांगे जगजोगी देव आहे तुमचे संगी ।।१९।।
का रे वोळखाना देवा।देही आत्मा सदाशिवा ||२०||
नका घालू वेरझारा हा तो शेवटीचा फेरा ॥२१॥
काही करा कोन्ही दान उभे केले का अझुन ।। २२।।
लक्ष चौऱ्यांशीचे फेरे। का रे घालितसा घेरे।।२३||
नका घेऊ भार माथा। भावे अर्पा भगवंता ||२४||
विवेक बहेणि सांगे लोका। सद्गुरु माझा रामतुक ।। २५ ।।
जगा जागविले तेथे आता नाही येणे जाणे ।। २६ ।।
बहेणि गाय जगजोगी अखंड निजसुख भोगी ।। २७ ।।

आरत्या आरती रामाची- ६२२
आरती रामराजा दशरथ-आत्मजा
जानकी वामभागी।
जय लक्ष्मण अग्रजा ।।धृ।।
सन्मुख मारुती तो पी अखंड दृष्टी
चामरे छत्रधारी उभा भरत पृष्ठी ।।१।।
टाकुनी वेळ येती । देव तेहेतीस कोटी।
श्रीरामनाम शब्द होय गर्जना मोठी ॥२॥
अंबरी पुष्पवृष्टि होय आनंद मोठा
धन्य हा मृत्युलोक। उणे केले वैकुंठा ॥३॥
ब्रह्मादि देव तीन्ही सुख पाहाती डोळा।
घोटीती लाळ तेही ऐसी चुकलो वेळा ॥१४॥
सुस्वर शब्दनाद। गाय रामनाम नारद तुंबर नाचताती ।
देवा जाणविती भेद ||५||
तेहेतीस देवकोटी पुढे उभे निष्ठती।
श्रीरामनाम शब्द- नाद दाटला नभी||६|
वाजती दिव्वाद्ये शंखमेरी अनेका
बहेणि तिष्ठता हाती घेऊनी पादुका ॥७॥
आरती चित्सूर्याची-६२३
न कळसी वेदा विबुधा शाखा श्रवणान
न डसी ठाई अनेक परिच्या मननाने
नेणति योगीजन ते इंद्रियदमनाने
ऐसे तव रूप बोधत सद्गुरुवचनाने ||१||
जयदेव जयदेव जयजी चित्सूर्या
प्रकाशधन हृद्भवनी निजसाक्षी तुर्या ||
शेषहि अमला स्तविता जिल्हा हे चिरली ।
ब्रह्मा वदता वाणी बुद्धि बोसरली।
ध्याने शंकर श्रमला मग गंगा धरिली अपार महिमा
 न कळे हे कीर्ति उरली ||२॥
शब्दे न पडसी ठाई लक्षातित लक्षू
हेही न घडे अतीत वर्तसि निजचक्षु ।
 उत्तम पुरुषा लक्षुनि टाकियला वृक्षु
बहेणि उदय चरणी उत्तम हा पक्षू ॥३॥
आरती आत्मारामाची- ६२४
हद्विकसित पग्री तू विलससि सर्वेशा
रविशशि लोपति तेजे अज तू अमरेश
अचला अमला अरुपा अगुणा गगनेश
तुजविण महिमा नेणेचि परेशा ||१|
जयदेव जयदेव जय अंतरसाक्षी ।
दीपवत् विश्वी वर्तसि जिवशिव दो पक्षी।।ध्रु।।
षड्विध चक्रे शोधुनि रोधुनिया चित्ता ।
बोधुनि कर्णी त्यागुनि शरिराची ममता
जवही नादा अनुभवी अनुभव त्यापरता
भेदुनि काकीमुख जे देही ये समता।।२।। जय ।।
अकार उकार मकार निमती ते तर्या
बिंदुस्थानी उन्मनी अनुभवि जे चर्या।
अक्षरही सक्षर तू उत्तम गुणवर्या
बहेणि म्हणता वाणी न धरी मम धैर्या ॥ ३॥ जय.।।

आरतीची (१)-६२५
सद्भावाचे आसन हृदयी अभेदबुद्धीनं
आनंदाच्या उदके केले चरण- क्षालन।
दृश्यद्रष्टादर्शन यांचे दिधले आचमन
निर्हेतुक मन केले भाली तोचि चंदन ॥१
जयदेव जयदेव जय सद्गुरु-माहेरा
आरति तुज ओवाळू अभयकर वरदातारा।।धृ।
बोधाच्या अक्षता रंगविल्या श्रवणाने ।
समर्पिली उत्तम अष्टही भावांची
सुमने अहं हे निरसुनिया धूप जाळुनिया करणे
ज्ञानाच्या प्रका बुद्धिदीप उजळणे ||२||
अनुभवाचे ताटी वादियेला नैवेद्य सद्गुरु जाणती
भोजनाचा सुस्वाद सत्रावीचे तोय मध्ये पान
ते शुद्ध करोद्वर्तन तेचि सारूनि विषय पंचविथ ॥३॥
पूगीफल फोडुनिया फलेच्छेचा निजत्याग।
रंगली इंद्रिये रसने रंगविला रंग।
दक्षिणा त्वंपदी तत्पद दोहीचा भंग
मंत्रपुष्प सोहं याचा ज्ञानी विनियोग ||४||
निरांजन निधरि मानस साधने सरली।
अभेद प्रदक्षिणा तेथे वाचा निवर्तली ।
ऐसी या हृद्भुवनी पूजा सद्गुरूची केली
बहेणि आनंदाने शेष सेवुनिया घाली ।।५।।

आरती सद्गुरूंची (२)-६२६
सकळहि तीर्थे मज्जन करिती
तव पावी हरिहर ब्रह्मादि देही ध्याती लवलाही ।
निगमागम गुण स्तविता न कळसी शेषाही
पाहता श्रुति उपरमल्या वर्णू मी काई ।।१।।
जयदेव जयदेव जय सद्गुरुराया
पंचप्राणे आरति कुरवंदिन काया।।धृ।।
उपमारहिता अद्वय सुखसागर भरिता।
दृश्यद्रष्टादर्शन याही तू परता ।
सच्चिदानंदरूप याही तू वरता।
मोक्षादिक तव वचने वर्तति सादरता ।।२।।
निर्गुण सगुणा अगुणा असिपद ज्ञानाब्धि
तुझिया वचने घडती आणिमादिक
सिद्धी अपांगपात स्वरूपी राहे स्थिर
बुद्धी बणि अवबोधे चरणद्वय बंदी ॥२॥

आरती विठ्ठलाची- ६२७
विश्वव्यापक होसी विश्वी विश्वात्मक विरहिता रे।
विविधाकारे धरुनी रूप तू विधिगौरव पाळिता रे।
विकार सांडुनी सर्वही विपरीत भावनेविरहिता रे।
विधि अणु नेणे महिमा काय जाणवेल प्राकृता ।।१।।
जयदेव जयदेव जय श्रीविठ्ठला ।
तुझिये चरणी अद्वय हेत हा गुंफला रे।।।।
उकली वृद्धि जनांची म्हणुनी संसारी गोविसी है।
उसेचिना निजहृदयी निश्चि गुंतती यमपाशी रे।
ठकारलेसे ब्रह्म सर्वही पाहता विठ्ठलवेषी रे।
ठमकत गर्जति गोपी दुसरेनाही या उपमेसी रे||२||
लक्षालक्ष निमाले अद्वय म्हणणे हे खुंटले है।
लय साही दर्शना ओंकारा अतीत केले
रे लाजुनि श्रुति परतल्या तेथे वर्ण कवण्या बोले रे।
विठ्ठल विठ्ठल म्हणता तेथे बहेणीपण बोसरले रे||३||

आरती तुळसीची ६२८
वृंदावनभुवनी तुळसीचे
बन तेथे क्रीडा की कृष्ण
आपण रात्रंदिवस तुळसीचे ध्यान।
सत्यभामा नारी करी पूजन ||१||
जयदेवी जयदेवी जय तुळसी सुंदरी
अखंड विष्णु तुजला मस्तकी धरी ।।धृ।।
सहज सावळा कृष्ण हा बरवा। कंठी
शोभताती तुळसीच्या माळा ।
वृंदावनभुवनी गोपिका सकळा।
तुळसीपूजन करिती बाळा वेल्हाळा ||२||
कार्तिक मासी तुळसीची भक्ती राधादामोदर
वृंदावनी येती शंख चक्र गदा पद्मे
काढिती लावुनि उत्तमदीप लाउनि
कर्पूरदीप पंचारति करिती ॥३॥
उठोनि प्रातःकाळी करिती
स्मरण श्रीकृष्णाचे मनी तुळसीचे
ध्यान त्याची भक्ती करी बहेणि आपण |
द्यावे प्रेमभावे मज मूढा ज्ञान ॥४॥

आरती श्रीभगवद्गीतेची- ६२९
गीता गीता ऐसे बदता पै वाणी।
विश्वंभर निजरूप तो होइल पे प्राणी ।
संग्रह करिता गीता, “जन्मांतर खाणी नाही”
ऐसे बदला व्यासहि निर्वाणी ॥१॥
जयदेवी जयदेवी जय भगवद्गीते।
ऐसे वद तू रसने भगवदुपजीविते।।धृ।।
श्रवणे गीता अथवा पाठांतर गीता
झाली तर साची हरि विक्रित निजभक्ता ।
विशेष अर्थान्वय जरि सांगे मुखे वक्ता ।
तोचि हरीरूप जाणा देहचारी असता ||२||
जन्मांतरी अतिदोषी गीता म्हणता ते
तरले अगणित नेणो झाले हरिरुपी ते
गीता तारक कलियुगी जाणती अनुभवी ते।
गीता पाठक होती हरीरूप जाणा ते ।।३।।
गंगा म्हणता गीता, गंगा सरी न पावे।
अवले पोहता बुडती म्हणवुनी सरी
न सामावे गीता गीता म्हणता
मूर्खहि तरती स्वभावे म्हणवुनि
गीता तारक केली हे देवे ॥४॥
उदार गंभीर गीता सकला फलदाती।
माता उपमा न पवे उदार अतिकीर्ति ॥५॥
पठणे श्रवणे सकला एकचि फलप्राप्ती ।
बहेणि अनुदिन हृदयी ध्याते निजभक्ती ।।६।।
आरती श्रीरामाची (शेजारती)- ६३०
हनुमंत जांबुवंत पुढे उभे राहाती।
जोडुनि पाणी दोन्हीरामस्तुति करिती।
श्रीराम शेजी पहुडले सीता मंचक
सावरी उभी जनकवाळा आरती घेवुनी करी।।धृ।।
कर्पूर उजळती रत्नदीप शोभती।
आणिक दीपावली सुगंधी लाविती ।
सुगंध बहु फार दशांग लाविला ।
भरत शत्रुघ्न पुढे लक्ष्मण उभा राहिला ॥२॥
उधरण रंगी आणि द्राक्षफले बहुता प्रकारे
रामापुढे ठेविताती सकळिक पात्रे सारे।।३॥
सीतादेवी दे तांबूल त्रयोदशगुणी उपचार
किसी बानू शिणली व्यासवाणी।
राघवे निद्रा केली आता सकलांसी
दिली सीतादेवी चरणी स्थिरली
पाहूनी बहेलि आनंदली ||४||

आरती श्रीकृष्णाची- ६३१
जयदेव जयदेव जय राजिवनेत्रा
देवकीसुत नामोचित यादवकुळयात्रा ।।धृ।।
लौकिक वचने वदती, “श्रीपति हा योनी
द्वारे जन्मत” अच्युत देखियला नयनी परि तो
अयोनिसंभव अनुभवज्ञानी। जाणति
सज्जन विरहित-जन्मांतर योनी ॥१॥
अंबीच्या गर्भालागुनि अवतारी बळिरामचि
हा झाला रोहिणिच्या उदरी तू तव
योनीसंभव न होसि निर्धारी
धन्य तव रूप-महिमा गोवर्धनधारी॥२॥
अद्भुत बालक देवकी देखुनी ती
बंदी आनंदती पै दोघे नाचति निजनंदी
युग परिमित पै भुजा दिसती गोविंदी ।
दशअवतारातीत हरि (हा) देखियला बंदी ||३||
कर सर्वा वहिले हरि संकट जनसे (अपूर्ण)
आरती चंद्राची ६३२ प्रकाश निर्मल कोमल
कमलोद्भव देखुनि रमला तेथे भ्रमराचा भाव
ऐसा प्रेमळ सीतळ तारापति देव अनुभव-सिद्धा
देतो मुक्तीचा ठाव ॥१॥ जयदेव जयदेव
जय रजनीकांता। दर्शनमात्रे निवविसि भवतापव्यथा।।धृ।।
प्रतिमासा अंती द्वितिया येती जन्माची राका
येता प्रतिमा पूर्ण बिंबाची। चतुर्थीची पूजा
भाविक भक्ताची गोपाळाते छाया करिसी कृपेची ||२||
नव रत्नाहूनी रत्न शास्त्राचा विवेक ।
उपमे तुजसी तुळिता तुझा तूचि एक
शिवमौळीचे भूषण लुब्ध चकोर भक्ती
भजता सिद्ध साधी पद पहिला पदक (अपूर्ण) ।।३।।

आरती ज्ञानेश्वरांची- ६३३
जय माय ज्ञानदेवी शब्द-रत्न
जाह्रवी प्राशिता तो मुझे सुख होतसे जीवी ।।धृ।। ।।१।।
अनर्घ्य सार-रत्ले सिंधू मथुनी गीता
काढिली भूषणासी वैराग्यभाग्यवंता । जय ॥२॥
अमृतसार बोवी शुद्ध सेविता जीवी जीवचि
ब्रह्म होती अर्थ ऐकता तेही ।। जय ॥३॥
नव्हती अक्षरे ही। निजनिर्गुणभूजा ।
बहेण क्षेम देती। अर्थ ऐकता बोजा । जय ॥४॥

आरती सद्गुरूंची (१) ६३४
जय सद्गुरुराया माझी निस्सी
माया ठेवितसे मस्तक तव चरणी ।
नश्वर संपत्ति जाया।।धृ।।
नसते मीपण घेउनिया देहे
केले सर्वही जाया। दृश्य पदार्थ
अमित प्रमास्तव अंतरले गुण गाया ||१||
जन्मजराभय दुस्तर वारुनी सांग
तु मोक्ष-उपाया। पुत्रकलत्र विचित्र
मनी सुख जाइल सर्वही वाया॥२॥
बहेणि म्हणे गुरुपदांबुज इच्छितसे
वर द्याया जय सद्गुरुराया
माझी निरसी माया ॥३॥
आरती सद्गुरूंची ६३५
जयजय सद्गुरुराया मजला
उत्तम देवराया ||धृ||
बुद्धि अखंडित आत्मरुपस्थित
 भेद ज्यातुनि गमाया ||१||
 शांति सदा समभाव दयानिधे
 नेमक देव भजावा ||२||
 धैर्य कदापि न सोडुनिया मन
 चिन्मयचरणि जडाया ||३||
 निश्चळ जाण विरक्तिसी भक्ती
 सर्व त्यागुनिया माया ॥४॥
 बहेणि म्हण मन निश्चळ होऊनि ।
 चिद्रूपी ध्यान जडाया ||५||
आरती श्रीकृष्णाची (१)- ६३६
जय जय कृष्ण कृपाळा
मोहनमानस दीनदयाळा ।।धृ।।
मंजुळ वेणू सुस्वर वाजत।
मोहियल्या व्रजबाला ||१॥
यमुनाजळ अतिनिर्मळ वाहत ।
तन्मय गोधनमेळा ||२||
रविशशिमृग अहि जीवतरुतृण ।
भूली पडे सकळाला ॥३॥
नेणती देह, ध्वनी श्रवणी,
नयनी पहाती, हो हरिलीला ||४||
बहेणि म्हणे जी नेणती हे याती
जातनती भेद लयाला ॥५॥

आरती श्रीकृष्णाची (२) – ६३७
जयजय परमानंदा। राजीवलोचना मुकुंदा
रत्नखचित शिरी मुकुट विराजित |
कंठी माला सुगंधा ॥१॥
पीतवसन पीतगंध-विलेपन
मानस भूलत धंदा ||२||
चंदनचर्चित अंगविलेप
देखुनिया सुख नंदा ॥३॥
पाचही जाण आयुधे शोभती
गायन करी निज छंदा ||४||
बहेणि म्हणे मन तो देखुनि ते
रूप मस्तकी बंदा ||५||
आरती आत्मारामाची- ६३८
सर्वांठायी देव एकचि अनेक
विस्तारले नाना सुंदर कौतुक
सर्व क्षेत्रे तीर्थे अंती गतिदायक।
भिन्न बघता पिंडी ब्रह्मांडी एक ॥१॥
जयदेव जयदेव जय चित्सुखधामा।
जय आत्मारामा । आरती पोळ
निहित विश्रामा ।।५।।
हरिहर ब्रह्मादिक चिन्मात्रे तुचि।
आगमानिगमा सीमा नक गणनेची
पूर्वापूर्व आत्मारामा मूळरूप तू
हेच तुजविण बघता दुसरे अन्यहि नाहीच ||२||
तारक नाम तुझे ब्रह्म है गाजे
अर्धचंद्र उदय होऊनि विराजे तेथे
आत्मज्योती विश्व हे साजे तो तू
गुरु भवहारक वंदित बणि गजे॥३॥

आरती संत बहेणाईंची (चिरंजीव विठ्ठलकृत) (१) – ६३९
त्वंपद तू तत्पद तू असिपद तू जगदंबे
स्थूळ तू सूक्ष्म कारण तू सकळारंभे
हरि तू शिव तू ब्रह्मादिक तू गुणस्तंभे
महत् तु महदादिक तू सर्वातरगर्भे ।।१।।
जयदेव जयदेव जय माये तुयें।
बहेणाबाई पंचाक्षर गुणचातुर्ये ॥धृ॥
रवि शशि ताराग्रह तू गण तू गुणवंते ।
मन तू मानस तू जन विजन समशांते ।
क्षिति तू जळ तू नळ तू अनिळे नभवंते ।
सुख तू सुखदायक तू अद्वय एकांते ।।२।।
शम तू दम तू यम तू साधन तू
जननी जनिता जननी गुरु तू मज
तारक तू भजनी मीपण तूपण जीवभावांतक करणी।
द्वय तू अद्वय विठ्ठल जडला निजचरणी ॥३॥

आरती संत बहेणाईची (चिरंजीव विठ्ठलकृत) (२) – ६४०
सांगसि सकळा मृत्यु पाचा
दिवसांचा प्रायश्चित्तविधि सारुनि
द्विज पुजिले हरि वाचा ।।
सकळा आशीर्वचने देउनि, गीतेचा (च्या) ।
स्मरणी तत्पर होउनि अष्टादश वाचा ||१||
जयदेवी जयदेवी जय बहेणाबाई
अंती आरति उजळुनि मानस तब पायी ॥धृ॥
ज्ञानेश्वरिचे करिसी पारायण अंती
दिननिशी सावध करणे लावुनि निजपंथी।
रामस्मरणी तत्पर वाचा रुपर्वती।
न कळे तव रुपमहिमा जाणितला संती ॥२॥
दशनादाचे ध्वनी तू सांगसी
का वैष्णव जयजयकारे तुळसीच्या
माळा आले हरिहरब्रह्मादिक जन ऋषिमेळा
न कळे पामर जन या भगवत्पथलीळा ॥३॥
धन्य शतषोडशवर द्वाविंशतकाळी धन्य
अश्विन शुद्ध प्रतिपदा बुधमेळी
सद्गुरु भजनी सावध राहुनि ते
काळी त्यागुनि देहा
निजपद पावसि वनमाळी ||४||
धन्य घटिका धन्य पळ लब ते जाणा ।
धन्य धन्य जनते देखति तव निधना ।।
धन्य प्रणितातीर्थं शिवपुर निजस्थाना।
तेथे तू स्थिर राहुनि करिसी गुरुध्याना।।५।।
आरती बाचि थाटे गायन जन करिती।
रामस्मरणे सर्वहि आनंदे वदती ।।
नेणो स्वर्गीहुन त्या देवांच्या पंगती।
आल्या मज्जनवेळे त्या प्रणितातीर्थी ॥ ६ ॥
मृदंग वाद्य नानापरिच्या गजराने
तुलसी बुक्का उधळुनि मिरवत नगराने।।
गर्जत हरिनामाच्या श्रेणी अधराने
प्रणितातीर्थी मज्जन केले मग ध्याने||७||
पूर्वे हनुमंत शोभे सहित अश्वत्थे
पश्चिमभागी सुस्थळ रामेश्वर जेथे
उत्तरभागी सत्रिय है प्रणितातीर्थ
दक्षिणभागी भगवती दुर्गा माता ते||८||
ऐसे स्थळ अति उत्तम शिवपुर ते
स्थानी समाधि घेउनि राहसि तू देह-
अवसानी त्रिकाळ आरती पुजने
इच्छित फलदानी पावती तय कर
रहे सुत विठ्ठलचरणी ।।९।।

संत निळोबाकृत श्लोक- ६४१
स्त्रीवेष अग्रवर्णी वाळदशा क्रमियेली
जालीया पाणिग्रहण पतिव्रता आचरणीं ॥१॥
जय माय बहेणाबाई मूळ ब्रह्मरूपिणी|
आरती ओवाळीन भक्तिप्रेम अंतरीं।
संचित पूर्वपुण्य तुकारामदर्शन मस्तकी
ठेवुनि कर सांगे भक्ति निर्विकार । जय ॥२॥
प्रसाद लक्ष चौपन यज्ञपूर्ति करि पूर्ण वर्षवी अमृत
वाणी करि त्रैलोक्य पावन ॥ जय ॥३॥
अखंड देही स्मरन निजवृति निमग्न।
चरणी निळा जाण आला भावे शरण ।। जय ॥४॥

६४२
गणश पूजोनिया विधीनें प्रवर्तला
सृष्टिकर्मा विधाने वालागि मी बंदि
श्रीमोरयासी छेदीन मी मीपण संशयासी ॥१॥

६४३
वंदूनियां जाण सरस्वतीला
देईल ते सिद्ध-महामतीला तेणे
गुणे वर्णिन देवराया बुद्धीसि
जो बोधक, दे वरा या||

६४४
यानंतरे सद्गुरुराज बंटू जो हा
स्वबोध जिज्ञानसिंधू पूजीन भी
मानसपूजनाते त्रैलोक्यची अर्थ रू मना॥३॥
नमोनिया श्रीकुलअंबिकेते ||५||

६४५
आता नमो सज्जन श्रोतयांसी असा
तुम्ही सावध मी जयासी पावेन
मी ते तुम्हा समाने यालागि

६४६
यानंतरे संतमहंतसाधू।
सजूनिया वर्तति जे विषादू।
तया नमो अद्वय निश्चयाने
ज्याच्या वरे जोडति मोक्षयाने ॥४॥

६४७
आता नमो जाग फुलांबिकेला
जीच्या पर सन्मतिला केला
अखंड है हत होय
माते मी प्रार्थितसे क्रमाने ॥६॥

६४८
डोलेल जे मस्तक श्रोतयाचा
पावेन ते भाव महाजनाचा
बहेणि म्हणे प्रार्थित याचिलागीं ।
अगंडता ध्यानियां प्रसंगी ।।७।।

६४९
नमो लक्षलक्ष्यातिता वेदवेद्या
नमो ध्येयध्यानातिता नित्यनित्या
नमो सर्वसाक्षी नमो सर्वकुक्षी।
नमो बहेणि- गंगाधरा मोक्षपक्षी ॥८॥

६५०
नमो भेदभेदातिते वेदगर्भे ।
नमो अंबिके अंबिके वो स्वयंमे ।
नमो व्यंजने शांतिरूपे अमूपे
नमोः बहेणि गंगाधरा शांतिरूपे ।।९।।

आर्या- ६५१
बहेणीने अवलंबुनी श्रीरामस्मरण
मानसी धरिले गंगाधर-वंशीच्या
येकोत्तरशत कुळासि उद्धरिले ।।

६५२
वाया का भ्रमसी उपास करिसी
कंदेमुळे सेविसी भस्मा उद्धरिसी
कपाटि रिघसी पंचात्रि पे साथिसी ।
भूमीसी निजसी बनी विचरसी
मिथ्या तनू आटिसी आत्मा
नोळखिसी म्हणे रे
बहेणि मोक्षासि के पावसी।।

श्लोक- ६५३
गुरुकृपा जरि पूर्ण असे
जया शरण त्या श्रुतिशास्त्रकथा तथा
हरिहरादिक किंकर दास है।
म्हणतसे बहेणि कवतुक है ।। १॥

६५४
असे ते गुरू रे मना वोळखावे।
अशांचे बरे दास्य भावे करावे जेणे
ज्ञानतत्त्वार्थ साधे स्वभावे ।
म्हणे बहेणि त्या सद्गुरु शरण जावे ।।२।।

६५५
गुरू तो खरा जो बरा ज्ञाननिष्ठ
स्वधर्म-क्रिया पाळी जो वेदनिष्ठ
जया ज्ञानतत्त्वार्थं शुद्ध प्रकाशे।
म्हणे बहेणि ज्या ब्रह्म सर्वत्र भासे ॥३॥

६५६
गुरु गुरु करिताति कलीवरे ।
विषयसंभरणी बहु आस रे।
उकिरडा फिरती जशि सू करे
म्हणतसे बहेणि ब्रिमिरा भरे ||४॥

६५७
जेथे ज्ञानवैराग्य भक्ती उसावे
क्षमा शांति देही दया
है विसाये दिसे ब्रह्मचर्य स्व-आंगास आले
म्हणे बणि तो सद्गुरू स्वभावे ||५||

६५८
निजगुरु निजदाता भेटता कोण
चिंता भवतमशमकर्ता शोकसंत
त्रिभुवनसुखदानी भक्तदासाभिमानी
म्हणतसे बहेणि तो रामतूका निदानी ॥६॥

६५९
सांडा सांडा सांडा रजतमभजने
भेद पाषांड सांडा मंडा मंडा
विभंडा अतिकुटिल जगी वासना है विभंडा।
दंडा दंडा दंदा अति मना
वृति एक मांडा शरण जा देवा,
दंडा म्हणतसे बि मृत्युसंसार खंडा।।

६६०
गृहस्थाश्रमी तू सुखे नांद पा रे
स्वरूपस्थितीसी बरे राहि पा रे।।
जेणे ज्ञानवैराग्य ते आंदणी रे।
असे धर्म ते बहेणिसी फावले रे।।

६६१
शेषाचे शिखरी विराट नगरी
नांदे मही सुंदरी से गर्मी मकरी
सुधामृत-झरी चंद्रावती दूस तीच्या पैलतिरी
उभा विटेवरी ब्रह्मांड संस्था भरी ऐसी
पुण्यपुरी नसेल दुसरी ते पंढरी भूवरी।।

६६२
श्रुतिपथ पडले हो पाहसी सर्व
काळी विविध भजन
मार्गी कासया देह जाळी ।।
गुरुपदभजनाचा हेत हा हो जयासी
म्हणत बहेणि नेत्री देखसी आत्मयासी ॥१॥

६६३
सकळ विषय जैसे चाटती वीष जैसे
परधनपरदारा त्याग त्यांचा विशेषे
श्रवणमनन साथसंगती नित्य
कीजे म्हणत बहेणि येणे आत्मयाते वरीजे।।

६६४
वेदार्थ हा पाहुनि वर्तती जे वर्णाश्रमी
आश्रम त्यासि साजे मोक्षासि हा
कारण प्राणियासी
बहेि म्हणे वेद मना उपासी ॥१॥

६६५
वेदाचा अर्थ घेई तदुपरि दुसरे त्याच
मार्गे प्रवाही जाणे वस्तूसि
देही निरखुनी मग नही
हिंदू तू सर्व पाही ।।
भावार्थे नाम गाई गुरुपद
हृदयी सर्वदा त्यासि ध्याई
नाही ते वस्तु ठायी
बणि म्हणतसे सीरसे तेथ जाई ||१||

६६६
रविसि उदय होता वर्तती लोक करें।
करि सकळ जनांची पुण्यपापे
कुकमें न लगती परि
सूर्या जाण कर्मे तयांची
म्हणत बहेणि तेसी या स्थिती आत्मयाची ॥

६६७
या रे पंढरिसारिखे क्षितिवरी
आणीक सांगा दुजे
मुक्तीमोक्ष मुमुक्षु
तीर्थंगण हे संसृत्य ज्याचेनि जे।।
वाजे साट सदा कसा यम-शिरी
आनंद वाटे जना।
ऐसे क्षेत्र तपोवळी अकल
है ये ना कदा वर्णना ।।

६६८
अशी चंद्रभागा अशी भीमगंगा
असा गरुड ऊभा पुढे पांडुरंगा।
विटी नोट ऐसा उभा देवराणा ।
दुजे क्षेत्र ऐसे जगी नान्य जाणा ।।

६६९
असा पुंडलीक असे वाळवंट
असे पद्मतीर्थ महामुक्तिपंथ
सदा गर्जना नाचती प्रेमचंदे ।
बहेणि वदे देव कोटी विनोदे

६७०
काळासी दपटी भवासि निवटी
मृत्यूसि धाके पिटी शत्रूच्या कपटी
अधासि तगटी जन्मासि पाडी तुटी ।
ठेला पैल तटी पहा कर कटी कांती दिसे गोमटी।
बहेणिचा किरिटी स्मरा हृद्घटी तारील तो संकटी ॥

६७१
कली पापरुपी कळोनी हरीसी ।
म्हणोनी घरी वास या पंढरीसी ।
अनाथे दिने पापभारे बुडाली।
तयाकारणे मूर्ति निर्माण झाली ।।

६७२
निराकार हे रूप साकारलेसे
पहा कोंदणी रत्न जैसे प्रकाशे कशी
दिव्य शोभा रखीकोटि भासे ।
दिशा व्यापुनी अंबरीला

६७३
उभा नीट वीटी तटी चंद्रभागा
कटी हात ठेवूनिया दिव्य गाभा ।
पहा पुंडलीकी कशी एक दृष्टी।
असा देखता ही सुखी होय सृष्टी ।

६७४
गुणातीत हे रूप ज्याचे विराजे
असे पंडरी आणि ते रूप साजे ।।
विठो नाम हे धाम वैकुंठवासी।
बहेणिसखा अंतरात्मानिवासी।।

६७५
कळेना कसा कोण हा वेषधारी
गमेना मना वर्णिता वेद चारी ।।
पहाता जया नेत्र तटस्थ होती।
प्रभा दिव्य ऐसी असे कोण मूर्ती।।

६७६
न हाले न चाले न बोले न
पाहे न नेघे न नेदी उभा तिष्ठताहे ।।
दिसे योगमुद्रा महा दिव्यराशी
मना नेणवे भ्रांति वाटे मनासी ।।

६७७
लिलाविग्रही रूप हे जाणवेना।
मना आणिक सर्वथा चोजवेना ।।
असे रूप हे वेगळे कोण आहे ।
सखे सांग गे कोण आता उपाये ।।

६७८
रुपाची मना लागली खंति
भारी असा कोण आहे कुशंका निवारी
करू काय आता जिवा राहवेना ।
 पुसावे जना तत्त्व ते सांगवेना ।।

६७९
उभा नीट वीटी कटी हात
दोन्ही हिरे साजती कुंडले दोहि कर्णी।।
ममे पाडिले दृष्टि पै नासिकाग्री।
असा ना दिसे पाहता वेदशास्त्री।।

६८०
गुणातीत क्रीया विराजे शरीरी करोनी
अकर्तेपणाची उभारी दिसे ज्ञानवैराग्य
भक्तीसमेत मनी बैसला सांडिना त्यासि चित्त ।।

६८१
सूर्याचे निजतेज सार श्रुतिचे जे गूढ या
सृष्टिचे ज्ञानी पंडित मानभाव
तपसी तत्त्वार्थ या जीविचे।।
ब्रह्मा शंकर आदि ध्यान करिती सारैक या राशिचे
ती ही मूर्ति भिमातिरी
प्रगटली जे बीज वेदांतिचे ।।

६८२
निरखित कशि बाला दृष्टि लावोनि
भाला उलदुनि नयनाते लक्षि
त्या विश्वपाला वदनि स्तवित वाचा मौन
आले श्रुतीला अनुपम बहेणिसी लाधला सौख्यगोळा ।।

६८३
गुरूने मुझे ग्यानप्याला पिलाया।
हुवा मस्त बंदा अन्य कू जलाया।
किया एकतारी दिनानाथ जीमू।
रहे खेलता दील राजी उसी

६८४
ज्याचा कंठ निळा त्रिपुंडू
पिवळा रुंडादि माळा गळा ।
भस्माचा उधळा कडेसि
अबला व्याघ्रांबरी मेखला ।।
बाले हा ढवळा शिरी शशिकळा माथा
जटा सोज्वळा बहेणि त्या
अचला स्मरे अवलिला ब्रह्मांड ज्याची कळा ।।

६८५
त्रिशुलडमरूधारी भूतप्रेतासि वारी
अरिकुलदलमारी विश्वलोकांसि तारी।
भवतम परिहारी शंभु हा योगधारी
अभिनव निजज्ञाने बहेणिचा अंगिकारी।।

६८६
शिव शिव शिव काशी नाम
हे पापनाशी हृदयकमलकोशी साठवा रे
प्रितीसी अळस दुरि करा
मेरे शीव ऐसे म्हणावे। अभिनव
सुख घ्यावे शेष बहेणिस द्यावे ।।

६८७
मुक्तीची नगरी नसेल दुसरी या ऐसि
पृथ्वीवरी सेवायासि बरी अपाय
न करी काशीच पावे सरी ।
पापे सर्व हरी पतीत उत्तरी रक्षोनि नानापरी
अंती मुक्त करी म्हणोनि
बहेणि सेवा म्हणे पंढरी।

६८८
सांगा का सोमयागादि मा करिता
व्यर्थ जाता प्रयागा। उद्धारी तेचि गंगा
अधिक कलियुगी आजि ही चंद्रभागा येथे
येता न भागा त्वरितहर जगा तीर्थ आले
उपेगा बंदा या पांडुरंगा म्हणताह
बहेणि मुक्तिभोगार्थ मागा ।।

६८९
परब्रह्म हे लक्षिता लक्षवेना
स्वसंवेद्य हे शास्त्र श्रुती साहवेना।।
करू काय हो अर्थ कैसेनि साधे।
बहेणि म्हणे भाव हा त्यासि बाधे ।।

६९०
मौन्येचि जाण स्तविता तयासी ।
नसोनिया सत्रिध सिद्ध पासी
दावील नेत्रेच न रूप डोळा ।
बहेणि म्हणे येथिला हाचि भोळा ।।

पद- ६९१
भाव शुद्ध रे शुद्ध रे बरवा धरावा ।
ब्रह्मनिष्ठ रे निष्ठ रे गुरु तो करावा ।।
मायामळ रे मळ रे सांडोनिया द्यावा ।
स्वस्वरूपी रे स्वरूपी रे ध्यास असू द्यावा ।।१।।

६९२
ऐक ऐक रे तू मना माझिया जीवना
चुकवी चुकवी रे या जना
चौऱ्याययसी यातना ।।
अथ ऊर्ध्व हा सौर सारी
भववेदना म्हणुनि करितसे
जोडुनि दोन्ही कर प्रार्थना ॥२॥

६९३
सतसंग रे संग रे निःसंग असावा ।
अंतरंग रे रंग रे प्रेमा तो धरावा ।।
शांति क्षमेसी क्षमेसी ठाव देही द्यावा ।
विवेक विचार विचार या मनासी करावा ॥३॥

६९४
स्थूळ धराये धरावे क्षेत्र की क्षेत्रज्ञ
भावे भजावे भजावे सगुण की
निर्गुण निष्ठा रहावे रहावे एक
अनेकपण डोळा पहावे पहावे ब्रह्म परिपूर्ण ॥४॥

६९५
ग्रंथ पहावे पहावे गीता की भागवत मार्ग
धरावे धराचे कर्मब्रह्मनिष्ठायुक्त।
मने सांडावा सांडावा जाणिवेचा तंत।
बणि म्हणे रे म्हणे रे बरवा ऐसा संतसंग ॥५॥

पदे- ६९६
पहा किरीट झकमके जसि
विद्युलता गगनी चमके।
दिसतसे चिमणी रमणी कसि
चालत हंसगती उगी ठाके ।।
मोडित नेत्र हे हास्य वक्त्र विचित्र चरित्र
अगम्य जियेचे विठ्ठली लाघव लावुनिया
प्रीति बोलत बहेणि सुख मनिचे ।।

प्रार्थना- ६९७
ऊठ सत्वर विठ्ठला भेट देई रे
आम्हाला वाट पाहाती सकळा।
सखिया तटस्थ नयनी॥१॥
वाटसी नयनी पाहावा
जन्मोजन्मी विठ्ठल व्हावा ।
म्हणोनी वाट पाहाती भाषा
भेटी दे रे विठ्ठला || २ ||
नयना आस थोर आहे।
के भेटेल विठ्ठल माये ।
काया बहु इच्छित पाहे
क्षेम दे रे झडकरी ||३||
हात ठेवोनिया कटी के हा देखेन
विठ्ठल दिठी डोळेभरी
जगजेठी हृदय-पेटी सांठवीन ॥४॥
विठ्ठल जपता मानसी (अपूर्ण)

अभंग- ६९८
त्रिकाळ आरती करू देवाधिदेवा गाऊ नाचू नित्य कथा करू केशवा।।धृ।।
दिननिसी छंद लागो हाचि मानसी रामा रामा कृष्णा गाऊ गीतेसी ।।१।।
सारासार विचार करू नित्य विवेक तत्त्वमसि गुरुमुख पाहू सकळीक ||२||
संतसंग करू आम्ही भावार्थबले बहेणि म्हणे येणे तुटती जन्म-मुळे॥३॥

परिशिष्ट ‘अ’
करुणापर (देवाशी भांडण)
६९९
कोणे तुशी संबोधिले काय पुरले त्याचे केले।।१।।
म्हणितले तुजला देथा । कृपासिंधू कृपार्णवा ||२||
काय केली कृपा तुम्ही सांगा झणी उच्चारोनी ॥३॥
बहेणि म्हणे कळला कावा। तुझा देवा आम्हा ||४|

७००
कैसा झाला कृपावंत भक्त अंत पाहोनी ।।१।।
काय केली फुकी सांगा एकी कोणावरी ||२||
न देसी घेतल्याविना । कैसी करुणा ऐसी तरी ||३||
बहेणि म्हणे वृथा देवा । करुणार्णवा झालासी ||४||

७०१
कोणे दिला उदारपणा |नारायणा तुजलागी ॥१॥
कृपणाहुनी तू कृपण कृपण पूर्ण करणीचा ||२||
काय दिधले भक्तालागी सांगा वेगी भगवंता ||३||
बहेणि म्हणे भक्त-आते नाही पूर्त केले तुवा ||४||

७०२
तुज ऐसा देव लुच्चा नाही सच्चा पाहियेला ||१||
निवृत्ति ज्ञानदेवा ।बहुत तुवा शिणवीले ||२||
गोऱ्या कुंभाराचे हात तोडिसी भगवंत करणी ऐसी ||३||
भोळा भक्त चोखा मेळा पाहासी सुळा देऊ तया ||४||
बहेणि म्हणे ऐसी करणी चक्रपाणी उदाराची ॥५॥

७०३
म्हणती तुला दयाघना दयाघना परि कोरडी ।।१।।
हरिश्चंद्र तारामती केली माती संसाराची ॥२॥
गोपीचंद राजा भोळा बोस केला गाव त्याचा ||३||
एकनिष्ठ भक्त वळी तुवा घातिला पाताळी ||४||
बहेणि म्हणे बरे केले नाही आले अनुभवा ।।५।।

७०४
काय दिले नावा ऐसे कोणा कैसे कळेना ।।१।।
संत थोर तुकारामा घेता नामा छळिले तुवा ||२||
ऐसी कैसी तुझी थोरी न पुरे बोरी मिट्टीची ||३||
कैसा तुझा बडिवार ध्रुवा केले निराधार|४||
बहेणि म्हणे घेऊ जाणे देऊ जाणे नेणसी तू।।५।।

७०५
तुजऐसा नाही देखिला उदार ।
श्रतिशास्त्री फार वर्णियेला ।।१।।
तोचि का हा देव विटेवरी उभा ।
चैतन्याचा गाभा पूर्ण दिसे ॥ २॥
मिटोनी लोचन कर कटेवरी
दृष्टि हितावरी ठेवोनिया||३||
बहिणी म्हणे देवा ओळखिले
पूर्ण अंतरीचा वर्ण हाचि असे ॥४॥

७०६
आलासी कोठोनी अरे मुशाफरा
कोणी तुज थारा दिला येथे ।।१।।
चावोनी चपाट केले भक्त भोळे
अव्यक्त ठेविले निजप्रेम ॥२॥
मोठे घर परी पोकळचि वासा
तैसी इषीकेशा करणी तुझी ॥३॥
बहेणि म्हणे लुच्चा धरिला वैकुंठीचा
आता कैशी वाचा बंद झाली ॥४॥

७०७
धरिला भोरपियाचा वेश माया लेशभर नाही।।१।।
त्यागिलेही लक्ष्मीसी परी म्हणविसी कृपावंत ||२||
म्हणविशी कृपाधन ।अंगी अभिमान दाटला ||३||
बहेणि म्हणे सोडा देवा घ्यावी सेवा भावशुद्ध ॥४॥

७०८
कोठे गुंतलासी कोठे लपालासी
कपटकृती ऐसी तुझी देवा ॥१॥
काय शेषसेजी सुखनिद्रा घेसी।
अथवा खेळसी रासक्रीडा ॥२॥
काय गोपाळांच्या मेळी विहरसी।
वेणू वाजविसी वृंदावनी ||३||
बहेणि म्हणे तुझ्या बापाचे गाठोडे ।
वेचे का रोकडे भेटी देता ||४||

७०९
सांडियली लाज, लौकिक व्यवहार
नाही लेशभर तुज देवा ||१||
तुला देवपणा आला कोण काजा । |
बरे केशिराजा बोल आता।।२।।
नाही चाड तुला संत सज्जनांची
थोरवी फुकाची मिरविशी।।३।।
बडवार कोण येणे तुझा वाणी
पडसील पाणी अभक्तांच्या ॥४॥
बहेणि म्हणे उगे केले आम्हा
वेडे आपले पोवाडे गावयाते॥॥५॥

७१०
गणिकेच्या काय देखिले अधिकारा।
निजपायी थारा दिला तिशी ।। १ ।।
जन्मजन्मांतरीचा अजामेळ पापी ।
तयासी स्वरूपी मेळविले ॥२॥
चांडाळ पातकी वाल्ह्या कोळी चोरा।
यशाचा डांगोरा केला त्याच्या॥३॥
गजेंद्रे आकांती काय केला धांवा ।
तेथे तू केशवा धावलासी ॥४॥
बहेणि म्हणे तुझ्या जरी आले मना ।
पहासी न गुणा तया दोषा । ॥५॥

७११
तुज ऐसा देव नाही तीन्ही
सृष्टी तेहतीस कोटी देवांमाजी ॥१॥
भोळ्या भाविकांसी दिससी भाविका
जैसा योगी बक जलामाजी ॥२॥
काय धोरपण जगा नागवण
काय हे भूषण तुज साजे |३||
तुझे चोरपण तुजलाच साजे पेरी अहो देवा
हे तुझ्या करणीची था वृथा भूषणाची मनी कांधा

७१२
अनंत नयने म्हणताती तुला आता का आंधळा जाहलासी ॥१॥
काय माझे हाल न दिसे तव डोळा। होसी या आंधळा देखोनिया ||२॥
द्रौपदीची लजा जाता देखोनीया वस्त्रे नेसवाया धावलासी ॥३॥
तुकारामवेद बुडता जो देखसी जली ठाकलासी देखोनिया ||४||
बहेणि म्हणे तेव्हा डोळस होतासी । आता सहस्राक्षी दिसेना का ॥५॥

७१३
तुज असता अनंत कर्णे नये गान्हाणे कानी कैसे ॥१॥
काय झाला परिसुनी बधीर द्रौपदीचा आर्तस्वर ||२||
गजेंद्रधावा ऐकू आला बहिरे झाला काय आजी ॥ ३॥
कान्होपात्रेची विनवणी । कैसी कानी पडियेली ॥४॥
बहेणि म्हणे घेता सोंग। निद्राभंग नोहे कधी ॥५॥

७१४
कसी घातीयली उडी हाक ऐकुनि स्तंभ फोडी।।१।।
हाक फोडोनी सैराट । दुष्टपोट विदारिले ।।२।।
कैसी करुणा आली तेव्हा नये देवा का हो आता ||३||
काय वाटे जडभारी तुम्हा हरी भेटावया ||४||
बहेणि म्हणे वनमाळी करी न रळी भेटीसाठी॥५॥

७१५
थोरली हे तुझी सखी मेहुणी ती असोनि लक्ष्मीपती दरिद्री का ।।१।।
शंख मेहुणा तो अक्षयी कोरहा। भूषण तव गाढ़ा काय काज||२||

७१८
काय वेथे सांग भेटी देता तुझे। म्हणोनिया ओझे तुज वाटे।।१।।
काय तुझे रूप नेईन चोरोनी भये चक्रपाणि लपालासी ॥२॥
काय तुज तोटा येईल बोलता । अगा दीनानाथा पांडुरंगा ॥३॥
काय काज आम्हा तुझीये वैभवा। आस ही केशवा भेटीची गा||४||
बहेणि म्हणे आम्हा नलगे तुझे काही भेटीवीण पाही दीनबंधो॥५॥

७१९
कोणे संबोधीले तुम्हा पतीतपावन नारायणा ।।१।।
पावनास्तव आले येथ। न करिसी सत्य जाते घरी ॥२॥
कोणे बांधिला सादर । पायी ब्रीदाचा तोडर । ॥३॥
तुज ऐसा त्रिभुवनी । कृपण नाही चक्रपाणी ।।४।।
बहेणि म्हणे खळा केला बोध, कोणा कामा आला ॥५॥

७२०
तुज ऐसे करणे होते। तरि का माते जन्म दिला ।।१।।
तुझ्या भेटीची मज आस होती निरास केले का वा ? ||२||
काय म्हूण आडलासी दयावंता हृषीकेशी ||३||
देई चरणसेवा नुपेक्षी सर्वसाक्षी नारायणा ||४||
बहेणि म्हणे जन्म व्यर्थ। पंढरिनाथ न भेटता ॥५॥

७२१
ऐसे वाटे जाळो काया।
कोण उपाया देव भेटे ।। १ ।।
गृहा सोडुनि जाऊ बना।
नंदराणा पहावया ||२||
करू काय न धरवे धीर।
शारङ्गधर भेटे न हा ||३||
लागे आयुष्या आहोटी ।
जगजेठी भेटसी कै।।४।।
बहेणि म्हणे काही मनी
गुप्त कानी सांगा देवा ॥५॥

७२२
काय करू आटाआटी भेटीसाठी तुझे देवा ।।१।।
बैसलासी कोणे देशी सांगा मशी येई तेथे ॥ २ ॥
करू कठिण यत्न सोपा जेणे कृपा करिसी तू।।३।।
बहेणि म्हणे खंती । वाटे, चित्ती निर्दय झाला ॥४॥

७२३
वास तुझा कोठे नाही।
विश्वी काही ऐसे नसे ।।१।।
बोलू गेले साधुसंत सर्वांआत अससी तू ॥२॥
भाव ऐसा धरूनिया।
शरण पाया आले असे ॥ ३॥
दासीलागी भेटू कैसा
विचार ऐसा करू नका ||४||
बहेणि म्हणे तुझे पाया।
जीव काया कुरवंडीन॥५॥

७२४
काय तुज वाटे मज भेटी देता कोण भय चिंता सांग उपजे ।।१।।
काय तुझे स्वरूपा पडे माझी दृष्टी लपसी जगजेठी तया भेणे ||२||
तुझीया गोवळ्या करंट्या कपाळा। सांग माझा डोळा केवी लागे ||३||
काळ्या काजळाच्या काळाही सरसा। पांढऱ्या परिसा दृष्टि के हो ||४||
बहेणि म्हणे नको प्रसंग निर्वाणी बन्या बोला झणी भेटी देई ||

७२५
रत्नजडित तव कौस्तुभ ।
नलगे लाभ मज त्याचा ॥१॥
न लगे तुझी वैजयंती
भेटी चिंती चित्त तुझी ॥२॥
नलगे माणिक मुक्कामाला
भेटी डोळा तुझी पुरे ।। ३॥
नलगे मुगुट हार कंठी
सुख वैकुंठीचे नको ॥१४॥
बणि म्हणे कृपावंता
आस चित्ता भेटीची ॥५॥

७२६
नलगे तुझी चंदन उटी व्हावी
भेटी एकी हेळा ॥१॥
नलगे बंडी उंची शेला
तुझे बोला इच्छितसे ॥२॥
नलगे तुझे शंख चक्र।
छत्र चामर नको तुझे ||३||
बहेणि म्हणे सौख्य गाढे।
भेटी पुढे तुच्छ तुझ्या ||४||

७२७
सुखे घाली तू वैजयंती। मज
खंती नसे त्याची माणिक मोती घाली गळा ।
तुळसीमाळा पुरे आम्हा ||२||
केशरकस्तुरीचा तुला टिळा
आम्हा भाळा नाममुद्रा ||३||
थोर आयुधे तुझे हाती
आम्हा हाती टाळ दिंडी ||४||
बहेणि म्हणे एणे आम्हा
सौख्यप्रेमा वाटतसे ॥ ५ ॥

७२८
शिरापुरी तू खा लाडू।
भेटी गोडू आम्हासी ॥१॥
नलगे काही तुमचे
आन भेटीवीण विठो एका ॥२॥
पुरवा भेटीची गा आस।
दुजे तुम्हास न मागे काही ||३||
बहेणि म्हणे लवलाहे
भेटी द्या हे दासीसी ॥४॥

७२९
भेटी देता मज समाधान होये ।
तुझे काय जाये तयामाजी ।।१।।
देखवे न का तुज माझे समाधान।
न देसी म्हणोन भेटी मज॥२॥
भेटीचीही आस न ये पुरविता।
ऐसा कैसा दाता विठ्ठला तू।।३॥
रीती उदाराची ऐसीच का असे।
कल्याण जगाचे देखवेना ।।४।।
बहेणि म्हणे तोंड कृपणाचे
पुढे बॅगाडिता कोडे पुरे काय ॥५॥

७३०
यालागी कैसा आलासी धायोनी
काय भक्ति पाहूनी भुललासी ॥१॥
काय केली ऐसी त थोर
भक्ती मानली श्रीपती तुम्हालागी ॥२॥
ब्रह्मरूप तया दाखविले डोळा।
ऐसा काय भोळा होता पुंड्या ॥३॥
बणि म्हणे तुझ्या पाहोन ब्रह्मरूपा
विटेवरी देखा उभे केले ||४||

७३१
केली संसाराची माती ।
भेटीसाठी तुझ्या देवा ।।१।।
हिंडतसे रानी बनी।
नये ध्यानी हे का तुझे ||२||
तय रूपी लागली गोडी
भाव जोडी मेळविली ।।३।।
बहेणि म्हणे झाले बेड़े माझे कोडे पुरवी गा।

७३२
तुझे यश गाता शेष स्तब्ध झाला ।
परी नाही कळला पार तथा ॥१॥
तेथ माझा पाड काय वर्णी गुण।
अवघाचि शीण होईल पै ॥२॥
इंद्रादि सुरगण वंदिती जयाला
तो हरी सापडला पुंडलीका ||३||
बणि म्हणे रूप से देखलिया डोळा
धाक कलिकादिका पडे ॥४॥

७३३
अजुनी का न ये तुमचिये ध्यानी
किती विनवणी करु देवा ।।१।।
कृपाळूपणाची ख्याती ।
म्हणोन का श्रीपती कंटाळला ॥२॥
भक्त झाले फार आला का कंटाळा ।
द्रौपदीवेल्हाळा सांगा तरी ॥३॥
बहेणि म्हणे कीर्ति आयकीयेली कानी।
चालत चरणी आले येथे ||४||

७३४
गोपगोपींसंगे खेळलासी भारी
थकलासी हरी काय आता।।१॥
स्वर्गीय देवांसी केले का भांडण ।
पुंडलिका लागून आला येथे ॥२॥
काय असे याचे वर्म सांगा
आम्हा वारंवार बहेणि
म्हणे जरी सत्य ना सांगाल ।
तरी मग बोल तुम्हावरी ||४||

७३५
तुमचे गुण गाता नावडती तुम्हा
काय ठावे आम्हा ऐसे आहे ।।१।।
गोडी स्वरूपाची लागलीसे फार
वरी प्रेमभर पडियेला ॥२॥
म्हणोनी जाहाले मन आजी येडे
तुम्हासी सांकडे पातीयेले ॥३॥
बहेणि म्हणे तरी न करा
उपेक्षा पुरवा अपेक्षा भेटीची गा ||४||

७३६
मूर्खपणे तुम्हा छळियेले भारी ।
तरी तू श्रीहरि माय माझी ॥१॥
लेकुरे बोलिले काय त्याचा खेद ।
जननी आल्हाद मानी त्याचा ॥२॥
अपराधाची क्षमा मागता मातेसी
प्रेमपान्हा तिजसी काय नुपजे ||३||
बणि म्हणे ऐसी गोठी
नायकीली विठाई माउली तेसी मज ॥४॥

७३७
कल्पतरुखाली बैसला भुकेला
तरी नाही घाला काय ऐसे ।।१।।
सापडला किंवा परीस जयाला ।
दारिद्र्याची त्याला पीडा उरे||१||
घरी कामधेनू असताही बाधी
पोटाची उपाधी जयालागी ||३||
होय परी ऐसे माझिया मनाते।
लाज आणिकाते काय देवा ||४||
बहेणि म्हणे येथे बोलावे ते कोणा
तुज नारायणा वाचोनिया ॥ ५॥

७३८
धरियेले तुझे पाय आता
सोय करी चापा।।१।।
नको लावू लोटोनीया
पंढरीराया कृपावंता ॥२॥
लोखंड लागता परिसा ।
सुवर्ण कैसा न होय बा ||३||
जरी झाले ऐसे तरी
उरे केवी थोरी परिसाची ||४
बहेणि म्हणे कोण थोर ।
तुजहुनी पामर हा उद्धराया ॥५॥

७३९
सर्व देवांचा तू देव तुजहुनी
देव थोर कोण ।।१।।
तुज सांडुनि नारायणा।
बंदू चरणा कोणाचिये ॥२॥
निवारील माझी चिंता।
ऐसा कोण दाता तुजवीण||३||
तुझी होता अवकृपा।
कोण कृपा करू धजे ॥४॥
बहेणि म्हणे पायी राखा
माझे न देखा गुणदोषा ||५||
(संत बहेणाबाईचा गाथा संपा. शालिनी जवडेकर)

परिशिष्ट ‘आ’
संतमहात्म्यपर
७४०
संत तेचि होती खरे विश्वंभरे आवडले जे ||१||
नित्य वसे शांती अंगी प्रेमरंगी रंगले ॥२॥
कृपादृष्टी जगावरी विषयांवरी भर नाही ||३||
बहिणी म्हणे तया ध्याता आले हाता परब्रह्म ||४||

७४१
संताचा तो संग जाहालियावरी
उणा केवि हरी होय तेथे ॥ | १ ||
देवही इच्छिती संग त्यांचा घडो ।
देह कार्यों पडो संतांचिये ॥२॥
न वर्णवे तो संतांचा महिमा किती
ही उपमा न देता पुरे।।३।।
बहिणी म्हणे जैसी प्रारब्धाची रेषा ।
तैसे जगदीशा करणे भाग ||४||
(प्रा. म. रा. जोशी यांचे खासगी संग्रहातून)

७४२
अवचिते लोखंड हाणी दुश्चितपणे
तया ऐसे आन पाप नाही।।१।।
ऐसे ते जाणावे मतीचे चांडाळ ।
प्रचितीचे बळ न दिसे तया ॥२॥
निद्रितावधी अग्नी लावी घरा
पातेजोनि बरा विष घाली ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे विश्वासघातकी
वास त्या नरकी सर्वकाळ ॥४॥

७४३
” संतासी सुखदुःख सारिखेचि
भासे तो संत निःशेषे जाणिजेसु ।।१।।
बेराची अवधी जाण चित्रकथा ।
जोवरी नाहीं चित्ता अनुताप ||२||
वादनिंदाभेद जो राहे गिळोनी
तो एक संतजन मिरवे देखा ॥३॥
कामक्रोधहिंसा नये ज्याच्या चित्ता।
तो संत तत्त्वत्ता एक होय ||४||
आशा मनसा तृष्णा कल्पना बिधरे।
तो संत साचारे जाण तुम्ही ॥५॥
बहेणि म्हणे जीवे जिता ना मेलासा।
संतत्वाची दशा जाणिजे ते।।६।।

७४४
नलगे संपादनी द्यावा परिहार।
अंतरी अंतर जाणवते ।।१।।
घराची ते बोज दाखवी अंगन
कळे ते आपण क्रिया तैसी ||२||
न लगे ते झाकावे न लगे ते लोपावे
कळते अवघे अंतसाक्षी ॥३॥
बहेणि म्हणे सीत पहावे चेपोनी ।
अवघे घोटोनी काय काज ॥४॥

७४५
घनाचे घाई निवडे जो हिरा
तेव्हा मोल खरा पावेल बापा।।१।।
बेर ते फलकटे जाती फुटोनिया
करणीचे वाया फुकट जाई ||२||
मोहरा तोचि एक न जळे
सूतसंगे दुखता पोट वेगे बरे करी ॥३॥
बहेणि म्हणे परिस कळे तोचि
जना लोहाचे कांचना करी जेव्हा ||४||

७४६
तोचि एक शूर जाणे पावडाव रक्षोनिया
जीव (न) फिरे मांगे।।१।।
तोचि एकबळी विवेकबुद्धिचा।
जाणे अनुभवाचा अंगसंग ॥२॥
पाउलापाउली सारी भूमी मागे न
करी स्वामीसंगे वंचकता ||३||
राखोनी आपणासी तारी जिवासी
बणि म्हणे त्यासी मोल नाही ॥४॥
समर्थ वाग्देवतामंदिर, पुन

७४७
रांड तेचि खरी मुखी नाही
हरी ते जाणावी निर्धारी जन्मरांड ॥ १ ॥
जया पुरुषाचिये मुखी नाही हरी ।
जाणावा तो खर जन्मा आला ॥ २॥
टिळे टोपी माळा नराचा
आकार जाळावा विचार ज्ञानेवणि॥३॥
बहेणि म्हणे जया नाही
आत्मज्ञान जाणावे ते श्वान जन्मा आले ॥४॥

७४८
संकल्पापासोनी हिरोनी घेतले
मन हारपले विकारेसी ।।१।।
सुख ते सांगता सुखदुःख प
कोनाचिया बजे बोल बोलो। २॥
इंद्रियांची आंति पावली हा
बोल बोलता नवल ऐसे झाले ||३||
बहेणि म्हणे भेटी अक्षराची
चित्ता होताचि पूर्णता हारपली ||४||

७४९
तूप ‘असे क्षीरआत साकर
उसाच्या रसाच्या ।।१।।
परी पाहिजे हो ज्ञान
वस्तुप्राप्तीचे कारण ।।२।।
सोनयाचे होती नग पट सूताचे अनेक॥३॥
अहो काहामाजी अग्नी
तिळामाजी तेल जाण ॥१४॥
बहेणि म्हणे देही देव ज्ञानेविण सर्व वाव ॥५॥

७५०
येकादसी व्रत व्रतामाजी श्रेष्ठ गाईत्री
वरिष्ठ जपामाजी ।।१।।
येणेची जीवासी होईल ते
मुक्ती ठेवावी विरक्ति मनामाजी ||२||
सद्गुरूची सेवा करी अन्नदान।
भूतदया पूर्ण माने जया ||३||
बहेणि म्हणे नाम जपावे सर्वदा
येणे परमपदा पावसील॥४॥
(महाराजा सरफोजी-सरस्वती महाल, तंजावरमधून)

७५१
शुभ्र सिंधु वरती वरेला लडीयावरी दाविती शोभा।
कर्ण विराजित शोभत सुंदर अद्भुत तेज उणे रविबिंचा।
दुष्टप्रसीध नसे मन स्वस्ति कथा करी व्यस्त पाहात रभा ।।
सांगत सर्व आपूर्व जनि हारि कथा परि व्यर्थ शुभा ।।
टाळ मृदांगविणे धृपदे मग मेळविती धन मानप्रतिष्ठा ।
हींडती देशविदेश विशेषत नाम विकुनि ते दाविती निष्ठा ।।
मंत्रउपासन सांगती साधक नाटक ते ठक मान्ये कनिष्ठा ।।
बहेणि म्हणे असे संत नव्हेत रे सांगतसे निजसज्जन ईष्टा।।
(भारत इतिहास संशोधक मंडळ पुणेमधून)

७५२
संतनारायण प्रत्यक्ष जाणा साधकासि जीवदान :
जयाचे स्मरणे जाति सर्व दोश वैकुंठ ते भुवण :
परंपरा हेचि कुळदेव आम्हा बोलति वेद आपण :
शुक वामदेव व्यास वसीष्ट निरंतर करू
त्यांचे स्मरण मेरे या ।।१।।धृ.॥ संत
आम्हा देव संत आम्हा देव संतचरण भाव जडला :
सदा नाम त्याचे उच्चारू वाचे हाचि करू जप भला :
नित्य स्नानसंध्या करू देवार्चन परम धर्म भक्त (1) ला :
गाऊ नाचो नित्य करू हरीकथा आम्हासि तो सुखसोहळारे या ॥धृ॥
सिद्ध रुषी मुनि शैव वैष्णव योगी मानुभाव जाणा :
गण गंधर्व क्षये किन्नर शडदर्शणाच्या खुणा
जे जे भक्त कोन्ही होऊनि गेले न करवे त्याचि गणणाः ।।
उच्चारिता वाचे वादल ग्रंथ सकळा माझे लोटांगणरे या॥२॥
व्यास ऋषि आणि वैष्णव भक्त अट्यासी सहस्र मुनिः सुरनर
पं भक्त आनेग मिळाले जे चक्रपाणि तथा
संताता नमन माझे चीयुगामाजी जे ज्ञानि।।
भावभक्ति मने वाचा काया हे ठेवियेली त्याचे चरणिरे या ॥३॥
मुद्गल विष्णुदास आच्युताश्रम पाठकनामा रोहिदास :
मत्छद्र गोरेख सालया रसाळ चौभाशा सिद्धमुद्धेश :
मृत्युंजय आणि रेणुकानंद विटावर बस नागेश
मुकुंदराज आणि श्रीधर अवधूत सदा करू नामी घोसरे या ||४||
जनसत एका जनार्दन भानुदास मिराबाई जयदेव जाल्हण
परमानंद जोगा नित्यानंदक्क पाहि कान्हया हरिदास
भोजलिंग पोशा तुळसीदास नरसाबाई
कुर्मदास अंत देव भक्तजन आठवति माझा
हृदई रे या ॥५॥ निवृत्ति सोपान
ज्ञानदेव जाण मुक्ताई वटेश्वर : काकोडका
बाळाजनका पोका चोखामेळा खेचर :
परसा भागवत जनमैत्र नागा हरमा परम पवित्र :
बहिरोपिसा आणि कान्होपाठक
उच्चार हे निरंतर या ॥६॥ कबीर कान्पात्र
गोराकुंभार सांवता नरहरि सोनार नामा
माहदा विठा नारा नामसेटी परम भक्त साचार:
जनी राजाई माता गोनाई है जातिचि सिंघे साचार:
सदा माझे देही आठवति हे न पडे तयाचा विसरे या ।।७।।
नरसा मेथा आणि बाबा उदगीरकर व्यंकटेश निंबाजी
भक्त रामदास रामभक्त रंगावादतावा स्मरावा नित्य :
सुवारण्य आणि निंबाजी हरीदास कृष्णाजी हृदयी
स्मरता ऐसे या कलयुगी आवतरले योगी
त्याचे पाई दृढ चितरे या॥३८॥
कृष्णदास आणि केशवानंद सिवकल्याण
या मूर्ति शंकर गोसाव देखीयले डोळा
दासा कल्याण कीर्ति सीवाजी गोसावी
माझा मी धाकला ज्याचा तो ध्यातसो चित्ति :
वैसे निजभक्त हृदयई माझा वाहतसे नेणो किति ।।१।।
देवदास देवदत्त देवाजी देमयादत गोसावि बापुजिबुवा
बल्ली आखुदाया आठवति माझा जीव सांगितले
संत गुप्त हो असत त्यासी न (म) स्कार भावी :
आता कोण उद्धरल्या खिया त्याचि नामे परिसावी ॥१०॥
लक्षुमि आठ सत्यभामा आदि नारी सहस्राही सोळा :
अहिल्या द्रौपदी सीता मंदोदरी तारा या वा उद्धरल्या:
पार्वति सावित्री आरुंधति या पाविनत्य घननिळा :
चुडाळ या देवाहुति पतिव्रता उद्धरला या सकळारे या ।।११।।
वेथव्य चाटुन दीघल सजीण घरोघरी वाण
पाहीलती व तुका सेव मेहमद बनरवडी नानक
बसारमा वलभदास जयराम भक्तसुद्र रामीरामदास ।।आ।
याही वेगळे आसति शुष्टीवरी गुप्त आथवा उदास
संतनामावळी बगिची जप तरता न लगती सायास ||१२||

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *