Skip to content
कशासाठी करितां खटपट – संत सेना महाराज अभंग – ३५
कशासाठी करितां खटपट ।
तप तीर्थ व्रतें अचाट ॥१ ॥
नलगे शोधावें गिरिकानन।
भावें रिघा विठ्ठला शरण ॥२॥
विभांडक श्रृंगी तपस्वी आगळा।
क्षण न लागत रंभेने नागविला ॥ ३॥
जाणोनि सेना निवांत बैसला।
केशवराजा शरण रिघाला ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
कशासाठी करितां खटपट – संत सेना महाराज अभंग – ३५