घरासी आले संत देखोनिया – संत सेना महाराज अभंग – ३७
घरासी आले संत देखोनिया। म्हणे यासी खावया कोठुनी घालूं ॥१॥ ऐसा हा निर्धारीम दुष्ट दुराचारी। जन्मोनियां झाला भूमि भारी ॥२॥ दासीचें आर्जव करोनि भोजन । घाली समाधान करी तीचें ॥३॥ आणि आवडीनें करी तिची सेवा । म्हणे सुख जीवा फार माझ्या ॥४॥ संतानीं पाणी मागतां म्हणे काय । मोडले की पाय जाय आणि ॥५॥ सेनां म्हणे कारे गाढवा नेणसी । कुंभपाक वस्तीसि केला आहे ॥६॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
घरासी आले संत देखोनिया – संत सेना महाराज अभंग – ३७