Skip to content
नामाचें चिंतन श्रेष्ठ पैं – संत सेना महाराज अभंग – ५३
नामाचें चिंतन श्रेष्ठ पैं साधन।
जातील जळोनि महापापें ॥१॥
नलगे धूम्रपान पंचाग्निसाधन ।
करितां चिंतन हरी भेटे ॥ २॥
बैसुनि निवांत करा एकचित्त ।
आवडी गायें गीत विठोबाचें ॥ ३॥
सकळाहुनि सोपें हेंची पैं साधन।
सेना म्हणे आण विठोबाची ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
नामाचें चिंतन श्रेष्ठ पैं – संत सेना महाराज अभंग – ५३