Skip to content
चित्त नाहीं हातीं – संत सेना महाराज अभंग – ६१
चित्त नाहीं हातीं ।
करूं जाता हरिभक्ति ॥ १॥
मज इतुली वासना।
भेटी द्यावी नारायणा ॥२॥
कोण जाणे दानधर्म ।
नव्हे स्वतंत्र कैचें कर्म ॥३॥
सेना म्हणे सांगें मात।
जेणें माझें होय हित ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
चित्त नाहीं हातीं – संत सेना महाराज अभंग – ६१