कातरीनेँ कातरला दुःशासन – संत संताजीचे अभंग – ३८
कातरीनेँ कातरला दुःशासन कौरव ।
आणिक भस्मासुर भस्म केला ।।
आणिक कातर चालली ती कशी ।
अहि महि लंकेशीं बळी दिले ।।
संतु म्हणे कातर ज्याचेँ देहीँ आहे ।
त्याची चक्रपाणी वाट पाहे।।
कातरीनेँ कातरला दुःशासन कौरव ।
आणिक भस्मासुर भस्म केला ।।
आणिक कातर चालली ती कशी ।
अहि महि लंकेशीं बळी दिले ।।
संतु म्हणे कातर ज्याचेँ देहीँ आहे ।
त्याची चक्रपाणी वाट पाहे।।