ऐकावे विठ्ठल धुरे - संत सावतामाळी अभंग

समयासी सादर व्हावें – संत सावतामाळी अभंग

समयासी सादर व्हावें – संत सावतामाळी अभंग


समयासी सादर व्हावें ।
देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर ।
कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर ।
चालून जावें ॥ १ ॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन ।
कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण ।
कोठें साठवावें ॥ २ ॥
कोणे दिवशीं यम येती चालून ।
कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन ।
एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा ।
कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा ।
दर्शन द्यावें ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.


संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

play store

समयासी सादर व्हावें – संत सावतामाळी अभंग समाप्त 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *