संत सावतामाळी महाराज

योग याग तप धर्म – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 32

योग याग तप धर्म – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 32

योग याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता॥
तीर्थ व्रत दान अष्टांग । याचा पांग आम्हा नको ॥
समाधी आणि समाधान । तुमचे चरण पाहता ॥
सावता म्हणे दया क्षमा । हेचि तुम्हा उचिता ॥

 

मथितार्थ:- संत सावता महाराज या अभंगांमध्ये नामाचे महत्त्व सांगतात सर्व जगाचे दैवत असणारा परब्रम्ह स्वरूप विठ्ठल आणि या विठ्ठलाचे नाम हाच सर्वश्रेष्ठ मंत्र प्रत्येक मानवाला जीवनरुपी भवसागर तारुन नेणारा मंत्र आहे. परमेश्वर भेटायचा असेल तर जप करणे व्रतवैकल्य करणे समाधी लावून बसणे अष्ट सिद्धी सारख्या योगाचा अवलंब करणे हे सगळे व्यर्थ आहे फुकट आहे या गोष्टी केल्याने शरीराला त्रास तर होतोच पण परमेश्वराची ही प्राप्ती होत नाही.

परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी यज्ञयाग करणे किंवा प्रपंच्याचा त्याग करण्याची गरज नाही सतत मुखाने परमेश्वराचे नाव घ्यावे नाम घ्यावे नामस्मरणाचा हा सहज सोपा मार्ग सावतोबा सांगतात ते म्हणतात हे विठ्ठला तुमच्या पायाचे दर्शन झाले की आमची समाधी लागते आणि मनाचे समाधान होते हे विठ्ठला तू तुझ्या भक्तांना क्षमा करावी त्यांच्यावर कृपा करून त्यांच्याविषयी तुझ्या मनात दयाभाव निर्माण व्हावा. परमेश्वराचे नामस्मरण या साधनेचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे नामस्मरण आणि मुखाने परमेश्वराचे नामस्मरण करण्यासाठी कोणतेही साधन लागत नाही नामस्मरणाचे महत्त्व सावतोबांनी या अभंगात सांगितले आहे……

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

 

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *