श्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र

श्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र

श्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र, ए प्रभावी उपाना


श्रीदत्तात्रेयवज्रकवचम्‌ एक अलौकिक व अद्भुत प्रासादिक स्तोत्र.
धर्म, अर्थ, काम व मोक्ष देणारे हेच श्रेष्ठ स्तोत्र आहे. तसेच हत्ती, घोडे, रथ, पायदळ इत्यादी सर्व प्रकारचे ऎश्वर्य देणारे आहे. हे पुत्र, मित्र, पत्नी इत्यादी सर्व प्रकारचे समाधान देणारे असून वेद, शास्त्र इत्यादी विद्यांचे ते श्रेष्ठ निधान आहे. हे संगीत, शास्त्र, साहित्य आणि उत्तम कवित्व प्राप्त करून देणारे आहे. तसेच बुद्धी, विद्या, स्मृती, प्रज्ञा आणि अध्यात्मज्ञान देणारे आहे. हे सर्व प्रकारचे दु:ख दूर करणारे व सर्व प्रकारचे सुख देणारे आहे. तसेच हे शत्रूंचा नाश करणारे असून तत्काळ विपुल कीर्ती वाढविणारे आहे.

आठ प्रकारचे महारोग, तेरा प्रकारचे संनिपात, शहाण्णव प्रकारचे नेत्ररोग, वीस प्रकारचे मूत्ररोग,
अठरा प्रकारचे कुष्ठरोग, आठही प्रकारचे गुल्मरोग, ऎशी प्रकारचे वातरोग, चाळीस प्रकारचे पित्तरोग,
वीस प्रकारचे कफरोग, शिवाय क्षयरोग, चार-चार दिवसांनी येणारे ताप इत्यादी, शिवाय मंत्र, यंत्र,
कुयोग, जादूटोणा इत्यादींपासून निर्माण झालेल्या पीडा, ब्रह्मराक्षस-वेताळ-पिशाचबाधा यांपासून
उत्पन्न झालेल्या पीडा, सांसर्गिक रोग, देश-कालानुसार उत्पन्न होणारे रोग, आधिदैविक, आधिभौतिक
व आध्यात्मिक असे त्रिविध ताप, नवग्रहांमुळे, तसेच महापातकांमुळे उत्पन्न होणारे असे सर्व प्रकारचे
रोग सहस्त्रावर्तनांमुळे खात्रीने समूळ नाहीसे होतात.
याचे दहाहजार वेळा पठन करण्यामुळे वांझ स्त्री पुत्रवती होईल.
वीस हजार पाठ केले असता अपमृत्युवरविजय मिळेल.
तीस हजार पाठ केले असता आकाशगमनाची शक्ती प्राप्त होईल.
एक हजार ते दहा हजार आवृत्ती होण्याच्या आत सर्व कार्ये सिद्ध होतील.
याच्या एक लाख आवृत्ती केल्या असता कोणतेही कार्य सिद्ध होईलच, यात मुळीच शंका नाही.
(शत्रुनाशाच्या हेतूने) विषवृक्षाच्या मुळाशी दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून एक महिनापर्यंत पाठ केला असता शत्रू दुर्बल होतात.
उत्कर्षाची इच्छा करणार्‍याने औंदुबराखाली, वैभवाची इच्छा करणार्‍याने बेलाच्या झाडाखाली,
शान्तीसाठी चिंचेखाली, ओजाची कामना करणार्‍याने पिंपळाखाली, विवाहेच्छूंनी आंब्याखाली,
ज्ञानाची इच्छा असणार्‍यांनी तुळशीखाली, अपत्याची इच्छा असणार्‍यांनी मंदिराच्या गर्भागारात,
द्र्व्याची इच्छा असणार्‍यांनी पवित्र ठिकाणी, जनावरांची इच्छा असणार्‍यांनी गोठ्यात आणि
कोणतीही इच्छा असणार्‍यांनी देवालयात जप करावा. त्यायोगाने तत्काळ सर्व कामना पूर्ण होतात.

नाभीइतक्या पाण्यात उभा राहून जो सूर्याकडे पाहून याचा एक हजार जप करील, त्याचा युद्धात
किंवा शास्त्रांच्या वादात जय होईल. गळ्याइतक्या पाण्यात उभा राहून जो रात्री हे कवच म्हणेल,
त्याचा ताप, फेपरे, कुष्ठरोग इत्यादी तसेच इतर ताप नाहीसे होतात.
जेथे जे जे कायमचे (संकट) असेल किंवा जे जे तात्कालिक (संकट) येईल ते ते नाहीसे होण्यासाठी
त्याने तेथे जप करावा. त्यामुळे निश्चित ते (संकट) दूर होईल.
असे हे अत्यंत गुप्त व कल्याणकारी वज्रकवच श्रीशंकरांनी श्रीगौरींना सांगितले.
जो याचे पठन करील, तो श्रीदत्तात्रेयांच्यासारखा होईल.
पूर्वी जे श्रीदत्तात्रेयांनी दलादमुनील सांगितले होते, तेच श्रीशिवांनी श्रीपार्वतींना सांगितले.
जो कोणी या वज्रकवचाचे पठण करील, तो या जगात दीर्घायुषी योगिश्रेष्ठ होऊन श्रीदत्तात्रेयांप्रमाणे आचरण करील.


श्री दत्तात्रेय वज्रकवच

II श्री गणेशाय नमः II
श्री दत्तात्रेयाय नमः II ऋषय ऊचुः II
कथं संकल्पसिद्धिः स्याद्वेवव्यास कलौ युगे I
धर्मार्थकाममोक्षाणां साधनं किमुदाहृतं II १ II

व्यास उवाच II
शृण्वन्तु ऋषयः सर्वे शीघ्रं संकल्पसाधनं I
सकृदुच्चारमात्रेण भोगमोक्षप्रदायकं II २ II

गौरीशृंगे हिमवतः कल्पवृक्षोपशोभितं I
दीप्तेदिव्यमहारत्नहेममंडपमध्यगं II 3 II

रत्नसिंहासनासीनं प्रसन्नं परमेश्वरं II
मंदस्मितमुखांभोजं शंकरं प्राह पार्वती II ४ II

श्री देव्युवाच II
देवदेव महादेव लोकशंकर शंकर I
मंत्रजालानि सर्वाणि यंत्रजालानि कृत्स्नशः II ५ II

तंत्रजालान्यनेकानि मया त्वत्तः श्रुतानि वै I
इदानीमं द्रष्टुमिच्छामि विशेषेण महीतलं II ६ II

इत्युदीरितमाकर्ण्य पार्वत्या परमेश्वरः I
करेणामृज्य सन्तोषात्पार्वतीं प्रत्यभाषत II ७ II

मयेदानीं त्वया सार्धं वृषमारुह्य गम्यते I
इत्युक्त्वा वृषमारुह्य पार्वत्या सह शंकरः II ८ II

ययौ भूमंडलं द्रष्टुं गौर्याः चित्राणि दर्शयन् I
क्वचित विंध्याचलप्रान्ते महारण्ये सुदुर्गमे II ९ II

तत्र व्याहर्तुमायांतं भिल्लंपरशुधारिणं I
वर्ध्यमानं महाव्याघ्रं नखदंष्ट्राभिरावृतं II १० II

अतीव चित्रचारित्र्यं वज्रकाय समायुतं I
अप्रयन्तमनायासमखिन्नं सुखमास्थितं II ११ II

पलायन्तं मृगं पश्चादव्याघ्रो भीत्या पलायितः I
एतदाश्चर्यमालोक्य पार्वती प्राह शंकरं II १२ II

श्री पार्वत्युवाच II
किमाश्चर्यं किमाश्चर्यमग्रे शंभो निरीक्ष्यतां I
इत्युक्तः स ततः शंभुर्दृष्ट्वा प्राह पुराणवित् II १३ II

श्री शंकर उवाच II
गौरी वक्ष्यामि ते चित्रमवाड्मानसगोचरं II
अदृष्ट पूर्वं अस्माभिः नास्ति किंचिन्न न कुत्रचित् II १४ II

मया सम्यक समासेन वक्ष्यते शृणु पार्वति I
अयं दूरश्रवा नाम भिल्ल परम धार्मिकः II १५ II

समित्कुशप्रसूनानि कंदमूल फलादिकं I
प्रत्यहं विपिनं गत्वा समादाय प्रयासतः II १६ II

प्रिये पूर्वं मुनींद्रेभ्यः प्रयच्छति न वांछति I
ते अपि तस्मिन्नपि दयां कुर्वते सर्व मौनिनः II १७ II

दलादनो महायोगी वसन्नेव निजाश्रमे I
कदाचित स्मरत सिद्धं दत्तात्रेयं दिगम्बरं II १८ II

दत्तात्रेयः स्मर्तृगामी चेतिहासं परीक्षितुं I
तत्क्षणात सोSपी योगीन्द्रो दत्तात्रेय उपस्थितः II १९ II

तद दृष्टवाSSश्चर्यतोषाभ्यां दलादन महामुनिः I
संपूजाग्रे निषीदन्तं दत्तात्रेमुवाच तं II २० II

मयोपहूतः संप्राप्तो दत्तात्रेय महामुने I
स्मर्तुगामी त्वमित्येतत किंवदन्ती परीक्षितुं II २१ II

मयाद्य संस्मृतोSसि त्वमपराधं क्षमस्व मे I
दत्तात्रेयो मुनिं प्राह मम प्रकृतिरिदृशी II २२ II

अभक्त्या वा सुभक्त्या वा यः स्मरेन्मामनन्यधीः I
तदानीं तमुपागत्य ददामि तदभीप्सितं II २३ II

दत्तात्रेयो मुनिं प्राह दलादन मुनीश्वरं I
यदिष्टं तत् वृणीष्व त्वं यत प्राप्तोSहं त्वया स्मृतः II २४ II

दत्तात्रेयं मुनिः प्राह मया किमपि नोच्यते I
त्वच्चित्ते यत्स्थीतं तन्मे प्रयच्छ मुनिपुंगव II २५ II

श्री दत्तात्रेय उवाच II
ममास्ति वज्रकवचं गृहाणेत्यवदन्मुनिं I
तथेत्यंगीकृतवते दलादन मुनये मुनिः II २६ II

स्ववज्रकवचं प्राह ऋषिच्छन्दः पुरःसरं I
न्यासं ध्यानं फलं तत्र प्रयोजनमशेषतः II २७ II

अस्य श्रीदत्तात्रेयवज्रकवचस्तोत्रमंत्रस्य II किरातरुपी महारुद्र ऋषिः II
अनुष्टुप् छन्दः II श्री दत्तात्रेयो देवता II
द्रां बीजं II आं शक्तिः II क्रौं कीलकम् II
ओम आं आत्मने नमः II ओम द्रीं मनसे नमः II
ओम आं द्रीं श्रीं सौः II
ओम क्लां क्लीं क्लुं क्लैम् क्लौं क्लः II
श्रीदत्तात्रेयप्रसादसिध्यर्थे जपे विनियोगः II
अथ करन्यासः II
ओम द्रां अंगुष्ठाभ्यां नमः II ओम द्रीं तर्जनीभ्यां नमः II
ओम द्रूं मध्यमाभ्यां नमः II ओम द्रें अनामिकाभ्यां नमः II
ओम द्रौं कनिष्ठिकाभ्यां नमः II ओम द्रः करतलकरपृष्ठाभ्यां नमः II
अथ हृदयादि न्यासः II
ओम द्रां हृदयाय नमः II ओम द्रीं शिरसे स्वाहा II
ओम द्रूं शिखायै वषट् II ओम द्रैं कवचाय हुं II
ओम द्रौं नेत्रत्रयाय वौषट् II ओम द्रः अस्त्राय फट् II
ओम भूर्भुवःस्वरोमिति दिग्बंधः II


श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्रम् चा मराठी अर्थ

श्री गणेशाय नमः I श्री दत्तात्रेयाय नमः I
ऋषिगण व्यासऋषींना म्हणाले की, हे महर्षी ! या कलीयुगांत आपल्या इच्छित गोष्टींची सफलता कशाने होते? तसेच धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळविण्याचे सुलभ साधन कोणते आहे? II १ II
वेदव्यासऋषि म्हणाले, हे ऋषिनों ऐका संकल्पसिद्धि ताबडतोप करणारे व एकदाचा उच्चार केल्याने भोग-मोक्ष देणारे असे साधन सांगतो. II २ II हिमालयांतील गौरीनावाच्या शिखरावर दिव्यरत्नमय सुवर्णमंडपामध्ये रत्नमय सिंहासनावर बसलेल्या प्रसन्नमुख व मंद हास्य करणाऱ्या परमेश्वर श्री शंकरांना श्रीपार्वतीने पुढीलप्रमाणे प्रश्न विचारला II ३-४ II
श्रीपार्वतीदेवीने असे विचारले की, हे परमेश्वरा ! हे महादेवा ! हे लोकहित करणाऱ्या श्रीशंकरा ! सर्व प्रकारची मंत्र-यंत्र व तंत्र मी आपल्याकडून ऐकली. आता मी ते भूमंडळ पाहू ईच्छिते. II ५-६ II
श्रीपार्वतीचे असे भाषण ऐकून संतुष्ट झालेल्या श्रीशंकराने हाताने श्रीपार्वती देवीला शाबासकी दिली व ते तिला असे म्हणाले की, बरे, तर मग चला, आत्ताच आपण दोघे नंदीवर बसून निघू. असे म्हणून श्रीपार्वतीसह नंदीवर आरूढ होऊन श्रीमहादेव पृथ्वीवर आले व श्री पार्वतीला अनेक चित्रविचित्र भूप्रदेश दाखवीत दाखवीत विंध्यपर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अत्यंत दुर्गम अशा महाराण्यांत आले. II ७-८-९ II
तेथे त्यांनी सहज विहारासाठी आलेल्या व कुऱहाड हातात घेतलेल्या अशा उंच्या-पुऱ्या शरीराच्या भिल्लास पाहिले. तेथेच त्यांना एक मोठा वाघ दिसला. त्याची नखे व दाढा अत्यंत भयप्रद होत्या. II १० II
तेथेच एक मजबूत शरीराचा मृग आरामांत बसलेला व खुशींत असलेला व ताज्या दमाचा व नाचत-बागडत असलेला पार्वतीला दिसला. विशेष म्हणजे त्या हरिणाला पाहून एक मोठा वाघ भिऊन पळत सुटला होता. हे आश्चर्यकारक दृश्य पाहून श्रीपार्वती देवीने श्री शंकरना पुढीलप्रमाणे विचारले. II ११-१२ II
श्रीपार्वतीदेवी श्रीशंकरांना असे म्हणाली की, हे महादेवा जरा इकडे बघा तरी ! काय आश्चर्य आहे ! तेव्हा तिकडे पाहून श्री महादेवांनी पूर्व इतिहास जाणून पार्वतीला तो पुढील प्रमाणे कथन केला. II १३ II
श्रीशिवशंकर असे म्हणाले की, हे पार्वती ! मन-वाणीला अगोचर असे आम्ही न पाहिलेले असे काहीही कोठेही नाही. II १४ II
मी तुला थोडक्यांत जे चांगले आहे ते सांगतो. ते तू श्रवण कर. हा दूरश्रवा नावाचा भिल्ल आहे. तो अत्यंत धर्मा चरणी आहे. II १५ II
हा दररोज अरण्यांत जाऊन, मोठ्या प्रयत्नाने समिधा, दर्भ, फुले, कंदमुळे व फळे इत्यादि आणून येथील मुनिवर्याना देत असे व त्याच्या मोबदल्यांत कशाचीही इच्छा करीत नसे. मुनिवर्यमात्र त्याच्यावर कृपादृष्टी करीत असत. II १६-१७ II
एकदा दलादन नावाच्या महायोगी ऋषींनी आपल्या आश्रमांत बसल्या बसल्याच सिद्ध व दिगंबर अशा श्री दत्तात्रेयांचे स्मरण केले. II १८ II
श्री दत्तात्रेय हे स्मरण करताच त्यांचे स्मरण करणाराकडे लगेच येतात, या ऐकीव इतिहासाची परीक्षा पाहण्या साठी दलादन ऋषींनी हे स्मरण केले होते. त्याचक्षणी ते योगीराज श्रीदत्तात्रेय तेथे प्रगट झाले. II १९ II
ते पाहून आश्चर्याने व आनंदाने श्रीदलादन ऋषींनी श्रीदत्तात्रेयांना आपल्यासमोर आसनावर बसवून त्यांचे पूजन केले व त्यांना असे म्हणाले की, हे प्रभो दत्तात्रेया ! आपण स्मर्तृगामी आहात, हे जे सर्वत्र प्रसिद्ध आहे, त्याची परीक्षा घेण्यासाठी मी आपले स्मरण केले. या माझ्या अपराधाबद्दल मी आपली क्षमा मागतो. तेव्हा श्री दत्तात्रेय त्या मुनींना म्हणाले की, अरे माझा स्वभावच स्मर्तृगामी असा आहे. II २०-२१-२२ II
अभक्तीने वा सद्भक्तीने जो माझे अनन्य भावाने स्मरण करेल, त्याच्याकडे मी त्याचक्षणी जाऊन त्याचे ईच्छीत त्यास देतो. त्यासाठी हे दलादन मुनी आपल्याला जे इष्ट असेल ते आपण मागा. कारण तुम्ही स्मरण केल्याने मी आलो आहे. त्यावर दलादन मुनी श्री दत्तात्रेयांना असे म्हणाले की, मला काहीही मागावयाचे नाही. आपल्या मनांत जे असेल ते आपण मला द्यावे. II २३-२४-२५ II
हे ऐकताच श्री दत्तात्रेय त्यांना असे म्हणाले की, माझे एक कवच आहे. त्याला वज्रकवच असे म्हणतात. ते तू, घ्यावेस. असे म्हणताच, बरे आहे, असे म्हणून श्रीदलादन मुनींनी त्यांना होकार दिला. लगेचच मुनिवर्य श्री दत्तात्रेयांनी ऋषि, छन्द, न्यास, ध्यान, फल व प्रयोजन यांसह स्वतःचे वज्रकवच त्यांना सांगितले. II २६-२७ II
या श्रीदत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र मंत्राचा किरातरूपी (महाभिल्ल रूपी) महारुद्र ऋषि आहे. छन्द अनुष्टुप् आहे.
श्री दत्तात्रेय देवता आहे. द्रां हे बीज आहे. आं ही शक्ती व क्रौं हे कीलक आहे. ओम आत्मने नमः म्हणजे आत्मतत्वाला नमस्कार असो. ओम द्रीं मनसे नमः म्हणजे मनस्तत्वाला नमस्कार असो.
ओम आं द्रीं श्रीं सौः II
ओम क्लां क्लीं क्लुं क्लैम् क्लौं क्लः II


श्री दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे वज्रकवच म्हणावे.

आता पुढीलप्रमाणे दोन्ही हातांनी दोन्ही हातांचे न्यास करावेत. ओम द्रां असे म्हणून दोन अंगठ्यांना तर्जनीने म्हणजे पहिल्या बोटाने स्पर्श करून नमस्कार करावा. ओम द्रीं असे म्हणून दोन तर्जनींना अंगठ्याने स्पर्श करून नमस्कार करावा. ओम द्रूं असे म्हणून दोन्ही मधल्या बोटांना अंगठ्याने स्पर्श करून
नमस्कार करावा. ओम द्रें असे म्हणून अनामिकांना म्हणजे तिसऱ्या बोटांना व ओम द्रौं असे म्हणून दोन्ही करंगळ्यांना अंगठ्याने स्पर्शपूर्वक नमस्कार करावा. ओम द्रः असे म्हणून दोन्ही तळहात एकमेकावर फिरवून स्पर्श करून नमस्कार करावा.

आता पुढील प्रमाणे हृदय इत्यादि शरीराच्या भागांचे न्यास करावेत. ओम द्रां हृदयाय नमः असे म्हणून हृदयाला उजवा हात लाऊन नमस्कार करावा. ओम द्रीं शिरसे स्वाहा डोक्याला हात लाऊन नमस्कार करावा. ओम द्रूं शिखायै वषट् असे म्हणून शेंडीला हात लाऊन नमस्कार करावा. ओम द्रें कवचाय हुं असे म्हणून दोन्ही हात शरीराकडे वळवून व फिरवून नमस्कार करावा. ओम द्रौं नेत्रत्रयाय वौषट् असे म्हणून उजव्या हाताच्या तर्जनीने उजव्या डोळ्याला व अनामिकेने डाव्या डोळ्याला व मध्यमेने आज्ञाचक्राला स्पर्श करून नमस्कार करावा. ओम द्रः अस्त्राय फट् असे म्हणून उजव्या हाताने चुटक्या वाजवत डोक्याभोवती हात फिरवून डाव्या हातावर टाळी वाजवावी. ओम भूर्भुवःस्वरोम् असे म्हणून दश दिशांना अक्षता टाकून व नमस्कार करून दिग्बंधन करावे.


अथ ध्यानं II
जगदंकुरकंदाय सच्चिदानंदमूर्तये I
दत्तात्रेयाय योगींद्रचन्द्राय परमात्मने II १ II

कदा योगी कदा भोगी कदा नग्नः पिशाचवत् I
दत्तात्रेयो हरिः साक्षाद्भुक्तीमुक्तीप्रदायकः II २ II

वाराणसीपुरस्नायी कोल्हापुरजपादरः I
माहुरीपुरभिक्षाशी सह्यशायी दिगंबरः II ३ II

इंद्रनीलसामाकारःचंद्रकांतीसमद्दुतिः I
वैडूर्यसदृशस्फूर्तिःचलत्किंचिज्जटाधरः II ४ II

स्निग्धधावल्ययुक्ताक्षोSत्यंतनील कनीनिकः I
भ्रूवक्षःश्मश्रुनीलांकः शशांकसदृशाननः II ५ II

हासनिर्जितनीहारः कंठनिर्जितकंबुकः I
मांसलांसो दीर्घबाहुः पाणिर्निर्जितपल्लवाः II ६ II

विशालपीनवक्षाश्यच ताम्रपाणिर्दलोदरः I
पृथुलश्रोणिललितो विशालजघनस्थलः II ७ II

रंभास्तंभोपमानोरुर्जानुपूर्वैकजंघकः I
गूढगुल्फः कूर्मपृष्टो लसत्पादोपरिस्थलः II ८ II

रक्तारविंदसदृशरमणीयपदाधरः I
चर्माम्बरधरो योगी स्मर्तृगामी क्षणे क्षणे II ९ II

ज्ञानोपदेशनिरतो विपद्धरणदीक्षितः I
सिद्धासनसमासीन ऋजुकायो हसन्मुखः II १० II

वामहस्तेन वरदो दक्षिणेनाभयंकरः I
बालोन्मत्तपिशाचीभिः क्वचिद्दुक्तः परीक्षितः II ११ II

त्यागी भोगी महायोगी नित्यानंदो निरंजनः I
सर्वरुपी सर्वदाता सर्वगः सर्वकामदः II १२ II

भस्मोद्धूलितसर्वांगो महापातकनाशनः I
भुक्तिप्रदो मुक्तिदाता जीवन्मुक्तो न संशयः II १३ II

एवं ध्यात्वाSनन्यचित्तो मद्वज्रकवचं पठेत् I
मामेव पश्यन्सर्वत्र स मया सह संचरेत् II १४ II

दिगंबरं भस्मसुगंधलेपनं I
चक्रं त्रिशूलं गरुडम् गदायुधं I
पद्मासनं योगिमुनीन्द्र वंदितं i
दत्तेति नामस्मरेण नित्यं II १५ II

अथ पंचोपचारैः संपूज्य,
ओम द्रां इति १०८ वारं जपेत् I


श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्रम् चा मराठी अर्थ

अथ ध्यानं II
श्री दत्तात्रेय हे जगदरुपी अंकुराचे किंवा वृक्षाचे कंद अर्थात् मूळ आहेत. ते सत् , चित् व आनंदरुपी आहेत. ते योगीश्रेष्टान् मध्ये चंद्रासारखे शीतल प्रकाशदायी आहेत. ते आत्मस्वरूपी आहेत. त्यांना मी नमस्कार करतो. II १ II

श्री दत्तात्रेय हे एखाद्या वेळी योगी, एखाद्या वेळी भोगी, एखाद्या वेळी दिगंबर, तर एखाद्या वेळी पिशाच्चाप्रमाणे भासतात. हे श्री दत्तात्रेय साक्षात् हरि म्हणजे भक्तांचे दु;ख हरण करणारे श्री विष्णुच आहेत. हे भुक्ती व मुक्ती देणारे आहेत. II २ II

श्री दत्तात्रेय काशी क्षेत्रांतील भागीरथी नदींत स्नान करतात. कोल्हापुरांत संध्याजपादि करतात. माहुरक्षेत्रांत भिक्षा मागून भूक शांत करतात व संह्याद्री पर्वतावर विश्रांती घेतात. त्यांचा वर्ण इंद्रनील मण्याप्रमाणे आहे. त्यांची अंगकांती चंद्राप्रमाणे शीतल व मोहक आहे. त्यांचे तेज वैडूर्यरत्नाप्रमाणे सर्वत्र पसरणारे आहे. त्यांचा जटाभार किंचित सैलसर, चंचल व हलणारा आहे. II ३-४ II

त्यांचे डोळे शुभ्र व स्नेहाळ आहेत व त्यांतील बाहुल्या निळ्या आहेत. त्यांच्या भिवया, छाती, दाढी व मिश्यांचे केस किंचित् निळसर आहेत. तर मुख चंद्राप्रमाणे आकर्षक आहे. त्यांच्या हास्याने कमळांना जिंकले आहे. त्यांचे खांदे पुष्ट व भरीव आहेत. हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. करतळ हे पल्लवाहून कोवळे किंवा नाजूक आहेत. II ५-६ II

श्री दत्तात्रेयांची छाती रुंद व पुष्ट आहे. तळहात तांबूस आहेत. त्यांचा उदरभाग पाकळीप्रमाणे पातळ आहे. त्यांचा कटिभाग रुंद व सुंदर आहे. जंघा भरीव व मोठ्या आहेत. त्यांच्या मांड्या केळीच्या बुंध्याप्रमाणे गोल व वर्तुळाकार आहेत. त्यांचे गुढघे व पोटऱ्या स्पष्ट दिसतात. मात्र त्यांचे घोटे मांसल असल्याने स्पष्ट दिसत नाहीत. त्यांची पाठ कासवाच्या पाठीसारखी थोडी फुगीर आहे. त्यांचे तळपाय व ओठ तांबड्या कमलाप्रमाणे लाल आहेत. ते हरीण-व्याघ्रादी प्राण्यांची कातडी वस्त्राप्रमाणे वापरतात. ते योगनाथ अर्थात योगीश्रेष्ट आहेत. ते त्यांची आठवण केल्यावर लगेच धावून येतात. II ७-८-९ II

श्री दत्तात्रेय ज्ञानोपदेश देण्यांत रमलेले, भक्तांची संकटे हरणं करण्याची दीक्षा घेतलेले, सिद्धासनांत सदा बसणारे, देह सरळ ठेवणारे, मंद हास्य करणारे व हसऱ्या चेहऱ्याचे असे आहेत. II १० II

श्री दत्तात्रेय डाव्या हाताने वर देतात. उजव्या हाताने अभय देतात. श्री दत्तात्रेयांसारख्या महापुरुषांच्या भोवती लहान मुले, उनाड-उन्मत्त मुले व पिशाचवृत्तीची माणसे किंवा भुते क्वचित् प्रसंगी वेढा देवून असतात. श्री दत्तात्रेयांची दृष्टी चौकस, सावध व परीक्षा करणारी असते. श्री दत्तत्रेया हे विरक्त ( त्यागी ) आहेत. भोगासक्तही आहेत आणि महान योगीही आहेत. ते सदैव आत्मानंदांत असतात. ते निर्लेप म्हणजे दोषरहित आहेत. ते सर्व स्वरूपी, सर्व देणारे, सर्वत्र गमनशील व भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत. II ११-१२ II

श्री दत्तात्रेय हे सर्व शरीराला नेहमी भस्म लावतात. ते मोठमोठ्या पातकांचा नाश करतात. भोगेच्छूना भोग देतात व मुमुक्षूंना मोक्ष देऊन मुक्त करतात. ते स्वतः जीवनमुक्त आहेत ह्यांत काही संशय नाही. II १३ II

माझे ( श्री दत्तात्रेयांचे ) हे रूप ध्यानात आणून हे वज्रकवच पठण करावे व मला अर्थात श्री दत्तात्रेयांना सर्वत्र पाहावे व मला मनांत ठेवून सर्वत्र खुशाल फिरावे. II १४ II

पूर्वादि दिशा हे ज्यांचे वस्त्र आहे म्हणजे जे दिगंबर आहेत, ज्यांच्या देहावर सुगंधी भस्माचा लेप आहे, ज्यांच्या हातात चक्र, त्रिशूल व गदा आहे, ज्यांच्या जवळ गरुड आहे, जे नेहमी पद्मासनांत बसतात, किंवा ज्यांचे आसन कमळाचे आहे आणि योगिवर्य व मुनिवर्य ज्यांना नेहमी वंदन करतात अशा श्री दत्तात्रेयांचे नामस्मरण करीत नित्य असावे. II १५ II

यानंतर पंचोपचारांनी गंध, अक्षदा, फुले, धूप व नैवेद्यांनी श्री दत्तात्रेयांचे पूजन करून ओम द्रां असा १०८ वेळा जप करावा.


अथ वज्रकवचं II
ओम दत्तात्रेय शिर: पातु सहस्राब्जेषु संस्थितः I
भालं पात्वानसूयेय: चंद्रमंडलमध्यग: II १ II

कुर्च मनोमय: पातु हं क्षं द्विदलपद्मभू: I
ज्योती रूपोSक्षिणी पातु पातु शब्दात्मक: श्रुती II २ II

नासिकां पातु गंधात्मा मुखं पातु रसात्मक: I
जिव्हां वेदात्मक: पातु दन्तोष्ठौ पातु धार्मिकः II ३ II

कपोलावत्रिभू: पातु पात्वशेषं ममात्मवित् I
स्वरात्मा षोडशाराब्जस्थित:स्वात्माSवताद् गलम् II ४ II

स्कन्धौ चंद्रानुज: पातु भुजौ पातु कृतादिभूः I
जत्रुणी शत्रुजित् पातु पातु वक्षःस्थलं हरिः II ५ II

कादिठांतद्वादशारपद्मगो मरुदात्मकाः I
योगीश्वरेश्वरः पातु हृदयं हृदयस्थितः II ६ II

पार्श्वे हरिः पार्श्ववर्ती पातु पार्श्वस्थितः स्मृतः I
हठयोगादियोगज्ञः कुक्षी पातु कृपानिधि: II ७ II

डकारादिफकारान्तदशारसरसीरुहे I
नाभिस्थले वर्तमानो नाभि वन्ह्यात्मकोSवतु II ८ II

वन्हितत्त्वमयो योगी रक्षतान्मणि पूरकम् I
कटिं कटिस्थब्रम्हांड वासुदेवात्मकोSवतु II ९ II

वकारादिळकारान्तषट्पत्रां बुजबोधकाः I
जलतत्त्वमयो योगी स्वाधिष्ठानं ममावतु II १० II

सिद्धासनसमासीन ऊरू सिद्धेश्वरोSवतु I
वादिसांतचतुष्पत्रसरोरुहनिबोधक: II ११ II

मूलाधारमं महीरूपो रक्षताद्विर्यनिग्रही I
पृष्टं च सर्वतः पातु जानुन्यस्तकरांबुजः II १२ II

जंघे पात्ववधूतेंद्रः पात्वंघ्री तीर्थपावनः I
सर्वांगं पातु सर्वात्मा रोमाण्यवतु केशवः II १३ II

चर्म चर्माम्बर:पातु रक्तं भक्तिप्रियोSवतु I
मांसं मांसकरः पातु मज्जामज्जात्मकोSवतु II १४ II

अस्थीनिस्तिरधी: पायान्मेधां वेधाः प्रपालयेत् I
शुक्रं सुखकरः पातु चित्तं पातु दृढाकृतिः II१५ II

मनोबुद्धिमहंकारं हृषीकेशात्मकोSवतु I
कर्मेंद्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेंद्रियाण्यजः II १६ II

बंधून् बंधूत्तमः पायाच्छत्रुभ्य: पातु शत्रुजित् I
गृहारामधनक्षेत्रपुत्रादी:छन्करोSवतु II १७ II

भार्यां प्रकृतिवित् पातु पश्वादीन्पातु शांर्गभृत् I
प्राणान्पातु प्रधानज्ञो भक्ष्यादीन्पातु भास्करः II १८ II

सुखं चंद्रात्मकः पातु दुःखात् पातु पुरांतकाः I
पशुन्पशुपतिः पातु भूतिं भूतेश्वरो मम II १९ II

प्राच्यां विषहरः पातु पात्वाग्नेय्यां मखात्मकः I
याम्यां धर्मात्मकः पातु नैऋत्यां सर्ववैरीहृत् II २० II

वराह: पातु वारुण्यां वायव्यां प्राणदोSवतु I
कौबेर्यां धनदः पातु पात्वैशान्यां महागुरुः II २१ II

ऊर्ध्वं पातु महासिद्धाः पात्वधस्ताज्जटाधरः I
रक्षाहीनं तु यत्स्थानं रक्षत्वादीमुनीश्वरः II २२ II

मालामंत्र जपः II हृदयादिन्यासः II
एतन्मे वज्रकवचं यः पठेत् शृणुयादपि I
वज्रकायः चिरंजीवी दत्तात्रेयोSहमब्रुवं II २३ II

त्यागी भोगी महायोगी सुखदुःखविवर्जितः I
सर्वत्रसिद्धसंकल्पो जीवन्मुक्तोSद्य वर्तते II २४ II

इत्युक्वाSन्तर्दधे योगी दत्तात्रेयो दिगंबरः I
दलादनोSपि तज्जप्त्वा जीवन्मुक्तः स वर्तते II २५ II

भिल्लो दूरश्रवा नाम तदानीं श्रुतवानिदम् I
सकृत् श्रवणमात्रेण वज्रांगोSभवदप्यसौ II २६ II

इत्येतद्वज्रकवचं दत्तात्रेयस्य योगिनः I
श्रुत्वाशेषं शंभूमुखात् पुनरप्याह पार्वती II २७ II


मराठी अर्थ

मुख्य कवच
१) मस्तकांतील सहस्रदलीय कमलांत वास करणारे श्री दत्तात्रेय माझ्या मस्तकाचे रक्षण करोत. चंद्रमंडळात राहणारे अनसूयेचे पुत्र श्रीदत्तात्रेय माझ्या कपाळाचे रक्षण करोत.

२) मनोमय असणारे श्रीदत्तात्रेय माझ्या हनुवटीचे रक्षण करोत. हं व क्षं या बिजाक्षरांच्या रूपाने द्विदलकमलांत म्हणजे आज्ञा चक्रांत राहणारे श्रीदत्तात्रेय आमचे रक्षण करोत. ज्योती: स्वरूपधारी श्रीदत्तात्रेय माझ्या दोन डोळ्यांचे रक्षण करोत. शब्दरूपी श्रीदत्तात्रेय माझ्या दोन कानांचे रक्षण करोत.

३-४) गंधात्मा म्हणजे सुगंधांत राहणारे श्रीदत्तात्रेय माझ्या नाकाचे रक्षण करोत. रसात्मा श्रीदत्तात्रेय माझ्या मुखाचे रक्षण करोत. वेदात्मा श्रीदत्तात्रेय माझ्या जिव्हेचे व धार्मिक श्रीदत्तात्रेय माझ्या दातांचे व ओठांचे रक्षण करोत. अत्री ऋषींपासून उत्पन्न झालेले श्रीदत्तात्रेय माझ्या दोन गालांचे रक्षण करोत. आत्मवेत्ते श्रीदत्तात्रेय सर्व दृष्ट्या माझ्या सर्वांगाचे रक्षण करोत. १६ पाकळ्यांच्या कमलांत राहणारे स्वरूप आत्मा असलेले श्रीदत्तात्रेय माझ्या डोळ्यांचे रक्षण करोत.

५-६) चंद्राचा बंधू असलेले श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करोत. कृतादीयुगांच्या आदी असणारे श्रीदत्तात्रेय माझ्या भूज्यांचे रक्षण करोत. शत्रूंना जिंकणारे श्रीदत्तात्रेय हे माझ्या खांद्याच्या सांध्यांचे रक्षण करोत. हरिरूप श्रीदत्तात्रेय माझ्या छातीचे रक्षण करोत. ककारापासून ठकारापर्यंतच्या बारा पाकळ्यांच्या कमलांत राहणारे श्रीदत्तात्रेय वायुरूपी आहेत ते माझे प्राण रक्षण करोत. योगीश्वरेश्वर श्रीदत्तात्रेय हे हृदयांत राहणारे आहेत. ते माझ्या हृदयाचे रक्षण करोत.

७-८-९) पार्श्ववर्ती म्हणजे बरगड्यांत राहणारे श्रीदत्तात्रेय हे माझ्या बरगड्यांचे रक्षण करोत. हटयोगादि योगांना जाणणारे कृपानिधी श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही कुशींचे म्हणजे पोटाचे रक्षण करोत. डकारापासून फकारापर्यंत असलेल्या दहा शब्दांनीयुक्त अशा दहा पाकळ्यांच्या कमलरूप नाभि स्थानात राहणारे अग्निरूपी प्रभू दत्तात्रेय हे माझ्या बेंबीचे रक्षण करोत. अग्नित्तत्वमय योगी श्रीदत्तात्रेय माझ्या मणिपूर चक्राचे रक्षण करोत. कटी स्थानीय ब्रह्मांडमय श्रीवासुदेव प्रभू श्रीदत्तात्रेय माझ्या कंबरेचे रक्षण करोत.

१०) वकारापासून ळकारापर्यंत असलेल्या अशा सहा शब्दांनी अंकित असलेल्या सहा पाकळ्यांच्या कमळास जागे करणाऱ्या जलतत्तवमय योगी श्रीदत्तात्रेय माझ्या स्वाधिष्ठान चक्राचे पालन करोत. ( मला स्वकार्य करण्याची स्फूर्ती देवोत.)

११-१२) सिद्धासनांत बसणारे व सिद्धांचे नियंते अर्थात् नियामक प्रभू श्रीदत्तात्रेय माझ्या मांड्यांचे रक्षण करोत. वकारापासून सकारापर्यंत चार शब्दांनी अंकित असलेल्या चार पाकळ्यांच्या कमळास हे श्रीदत्तात्रेय उमलवितात. पृथ्वीरूपी वीर्य किंवा शुक्राचा निरोध करणाऱ्या अशा श्रीदत्तात्रेयांनी माझ्या मूलाधाराचे रक्षण करावे. गुडघ्यावर हात ठेवून बसलेल्या श्रीदत्तात्रेयांनी माझ्या पृष्ठभागाचे रक्षण करावे.

१३) अवधूतांमध्ये श्रेष्ट श्रीदत्तात्रेय माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करोत. तीर्थानाही पावन करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही पायांचे रक्षण करोत. सर्वस्वरूपी श्रीदत्तात्रेयांनी माझ्या सर्वांगाचे अर्थात् सर्व अवयवांचे रक्षण करावे. केशवस्वरूपी श्रीदत्तात्रेयांनी माझ्या अंगावरील रोमांचे म्हणजे केसांचे रक्षण करावे.

१४) वाघाचे कातडे पांघरणारे श्रीदत्तात्रेय माझ्या चर्माचे रक्षण करोत. भक्तीप्रिय श्रीदत्तात्रेय माझ्या रक्ताचे रक्षण करोत. मांसल अर्थात पुष्ट हातांच्या श्रीदत्तात्रेयांनी माझे मांस रक्षण करावे. मज्जांचा आत्मा अशा श्रीदत्तात्रेयांनी माझ्या शरीरांतील सर्व नाड्यांचे रक्षण करावे.

१५) स्थिर बुद्धिच्या श्रीदत्तात्रेयांनी माझ्या अस्थींचे रक्षण करावे. सृष्टी उत्पन्न करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांनी माझ्या धारणाशक्तीचे रक्षण करावे. सुख देणारे श्रीदत्तात्रेय माझ्या वीर्याचे रक्षण करोत. बळकट शरीर असलेल्या श्रीदत्तात्रेयांनी माझ्या चित्ताचे रक्षण करावे.

१६) हृषीकेशात्मक श्री दत्तात्रेयांनी माझ्या मनाचे, बुद्धिचे व अहंकाराचे रक्षण करावे. ईशाने अर्थांत परमेश्वराने ( श्री दत्तात्रेयांनी ) माझ्या कर्मेंद्रियांचे रक्षण करावे आणि जन्मरहित असलेल्या श्रीदत्तात्रेयांनी माझ्या ज्ञानेंद्रियांचे रक्षण करावे.

१७) जिवलगश्रेष्ट व बंधूश्रेष्ट श्रीदत्तात्रेयांनी आमच्या बांधवांचे रक्षण करावे. शत्रूंना पराभूत करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांनी शत्रूंपासून आमचे रक्षण करावे. शंकरांनी अर्थांत कल्याण करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांनी आमचे घर, बाग, बगीचा, शेतीवाडी व पुत्रादिकांचे रक्षण करावे.

१८) त्रिगुणात्मक प्रकृतीचे ज्ञाते श्रीदत्तात्रेय माझ्या पत्नीचे रक्षण करोत. शांर्गधनुर्धारी श्रीदत्तात्रेय माझे गायी, घोडे इत्यादि


अथ फलश्रुती II

पार्वत्युवाच II
एतत्कवचमाहात्म्यं वद विस्तरतो मम I
कुत्र केन कदा जाप्यं किं यज्जाप्यं कथं कथम् II २८ II

उवाच शंभुस्तत्सर्वं पार्वत्या विनयोदितम् I
श्रीशिव उवाच I
श्रुणु पार्वति वक्ष्यामि समाहितमनाविलम् II २९ II

धर्मार्थकाममोक्षाणामिदमेव परायणं I
हस्त्यश्वरथपादातिसर्वैश्वर्यप्रदायकम् II ३० II

पुत्रमित्रकलत्रादिसर्वसंतोषसाधनम् I
वेदशास्त्रादिविद्यानां निधानं परमं हि तत् II ३१ II

संगीतशास्त्रसाहित्यसत्कवित्वविधायकम् I
बुद्धिविद्यास्मृतिप्रज्ञामतिप्रौढिप्रदायकम् II ३२ II

सर्वसंतोषकरणं सर्वदुःखनिवारणम् I
शत्रुसंहारकं शीघ्रं यशःकीर्तिविवर्धनम् I I ३३ II

अष्टसंख्या महारोगाःसन्निपातास्त्रयोदश I
षण्णवत्यक्षिरोगाश्च विंशतिर्मेहरोगकाः II ३४ II

अष्टादश तु कुष्ठानि गुल्मान्यष्टविधान्यपि I
अशीतिर्वातरोगाश्च चत्वारिम्शत्तु पैत्तिकाः II ३५ II

विंशति श्लेष्मरोगाश्च क्षयचातुर्थिकादयः I
मंत्रयंत्रकुयोगाद्याः कल्पतंत्रादिनिर्मिताः I I ३६ II

ब्रह्मराक्षसवेताल कुष्मान्डादिग्रहोद् भवाः I
संघजा देशकालस्थास्तापत्रयसमुत्थिताः II ३७ II

नवग्रहसमुद्भुता महापातकसंभवाः I
सर्वे रोगा प्रणश्यन्ति सहस्रावर्तनाद् ध्रुवम् II ३८ II

अयुतावृत्तिमात्रेण वंध्या पुत्रवती भवेत् I
अयुतद्वितयावृत्त्या ह्यपमृत्युजयो भवेत् II ३९ II

अयुतत्रितयाच्चैव खेचरत्वं प्रजायते I
सहस्रादयुतादर्वाक् सर्व कार्याणि साधयेत् II ४० II

लक्षावृत्त्या कार्यसिद्धिर्भवत्येव न संशयः II ४१ II

विषवृक्षस्यमूलेषु तिष्ठन् वै दक्षिणामुखः I
कुरुते मासमात्रेण वैरिण विकलेंद्रियम् II ४२ II

औदुंबरतरोर्मूले वृध्दीकामेन जाप्यते I
श्रीवृक्षमूले श्रीकामी तिन्तिण्याम् शांतिकर्मणि II ४३ II

ओजस्कामोSश्वत्थमूले स्त्रीकामैः सहकारके I
ज्ञानार्थी तुलसीमूले गर्भ गेहे सुतार्थीभिः II ४४ II

धनार्थीभिस्तु सुक्षेत्रे पशुकामैस्तु गोष्ठके I
देवालये सर्वकामैस्तत्काले सर्वदर्शितम् II ४५ II

नाभिमात्रजले स्थित्वा भानुमालोक्य यो जपेत् I
युद्धे वा शास्त्रवादे वा सहस्रेण जयो भवेत् II ४६ II

कंठमात्रे जले स्थित्वा यो रात्रौ कवचं पठेत् I
ज्वरापस्मारकुष्ठादितापज्वर निवारणम् II ४७ II

यत्र यत्स्यात्स्थिरं यद्दत्प्रसन्नं तन्निवर्तते I
तेन तत्र हि जप्तव्यं ततः सिद्धिर्भवेद्ध्रुवम् II ४८ II

इत्युक्त्वा च शिवो गौर्ये रहस्यं परमं शुभम् I
यः पठेत् वज्रकवचं दत्तात्रेयसमो भवेत् II ४९ II

एवं शिवेन कथितं हिमवत्सुतायै
प्रोक्तं दलादनमुनयेSत्रिसुतेन पूर्वम् I
यः कोSपि वज्रकवचं पठतीह लोके
दत्तोपमश्चरती योगिवरश्चिरायुः II ५० II

इति श्रीरुद्रयामले हिमवत्खंडे मंत्रशास्त्रे उपासनाकांडे शिवविजयसिद्धान्ते
उमामहेश्वरसंवादे श्रीदत्तात्रेयवज्रकवच स्तोत्रं संपूर्णम् II


मराठी अर्थ
२८ ) पार्वतीने विचारले कि, हे शिवा ! या कवचाचे महात्म्य मला विस्ताराने सांगा. कोणी, कोठे व केव्हां याचा जप करावा ? आणि कसा व किती करावा ?

२९ ) श्रीपार्वतीने विनयाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीशंभूमहादेवांनी पुढीलप्रमाणे दिले. ते असे म्हणाले की, तुला सर्व स्पष्ट व विस्तृत सांगतो. ते तू श्रवण कर.

३०) धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ या कवचामुळे सहज साध्य होतात. हत्ती, घोडे, रथ व पायदळ इत्यादि सर्व ऐश्वर्य या कवचामुळे मिळते.

३१) पुत्र, मित्र व कलत्र यांचा लाभ होतो. वेदशास्त्रादि सर्व विद्यांचे हे आगर आहे. अर्थात् या श्रीदत्तात्रेय वज्रकवचामुळे सर्व विद्यांचा लाभ होतो.

३२) या वज्रकवचामुळे संगीत व साहित्याचा लाभ होतो. उत्कृष्ट काव्य रचना मनुष्य करू शकतो.धारणाशक्ती, विद्या, स्मरणशक्ती व बुद्धि यात त्याला प्रौढी मिळते.

३३) हे श्रीदत्तात्रेयवज्रकवच सर्व संतोष कारक असून हे सर्व दु:खनाशक आहे. हे वज्रकवच शत्रूंचा शीघ्र नि:पात करणारे असून यश व कीर्ती वाढविणारे आहे.

३४) ह्या श्रीदत्तात्रेयवज्रकवचामुळे आठ प्रकारचे महारोग, तेरा तऱ्हेचे संनिपात, शहाण्णवरीतीचे नेत्ररोग आणि वीस तऱ्हेचे महारोग नष्ट होतात.

३५ ते ३८) ह्या श्रीदत्तात्रेयवज्रकवचामुळे अठरा कुष्टे व आठ प्रकारचा गुल्म (उदररोग विशेष), तसेच ८० वातरोग, ४० पित्तरोग आणि २० कफरोग तसेच क्षयरोग, वातार्थीकादिज्जर, दुष्टमंत्र, दुष्टयंत्र, वाईटयोग वगैरे जे कल्प तंत्रादिकांत सांगितले आहे ते आणि ब्रह्मराक्षस, वेताळ, कुष्मांडादि ग्रहांमुळे होणाऱ्या पीडा, सहभोजन, आसन, वस्त्र धारणादि समुदायोत्पन व्याधी, देशकालोत्पन प्लेग, महामारी त्रिविध तापामुळे होणाऱ्या पीडा, शनी, राहु इत्यादि नवग्रहांच्या पीडा आणि महापातकांमुळे होणारा जाच हे सर्व या श्रीदत्तात्रेयवज्रकवचाच्या हजार आवर्तनाने पूर्ण नष्ट होतात.

३९) या श्रीदत्तात्रेयवज्रकवचाच्या दहा हजार आवर्तनाने वंध्येला पुत्र होतील आणि वीस हजार आवर्तने केल्यास अकालमृत्यू, अपमृत्यू अर्थात् अपघाती मृत्यू टळतो.

४० ते ४१) या श्रीदत्तात्रेयवज्रकवचाच्या तीस हजार आवर्तना नी खेचरत्व, देवत्व म्हणजे गगनांतून चालणे अर्थांत् निराधार गमनशक्ती प्राप्त होईल. सह्स्त्रात्, अयुतात्, अर्वाक्, म्हणजे हजारो पाठांनी म्हणजे लक्षसंख्यादि पाठांनी सगळी कामे सर्व इच्छा पूर्ण होतील. अशाप्रकारे या श्रीदत्तात्रेयवज्रकवचाचे लक्ष पाठ केल्याने कार्यसिद्धी होतेच यात काहीही संशय नाही.

४२) विषवृक्षाच्या (रुई, कुचला वगैरे ) झाडाच्या खाली दक्षिणाभिमुख उभे राहून हे श्रीदत्तात्रेयवज्रकवच जपल्यास शत्रू विकलेंद्रिय, लुळा, पांगळा, मुका, बहिरा, आंधळा वगैरे व दुबळा होतो.

४३) बुद्धिची इच्छा करणाऱ्याने औदुम्बराच्या (उंबराच्या) वृक्षाखाली बसून हे वज्रकवच जपावे. बिल्ववृक्षाच्या मुळाशी बसून लक्ष्मीची इच्छा करणाऱ्याने हे वज्रकवच जपावे. शान्तिकर्मांत चिंचेच्या झाडाखाली बसून हे वज्रकवच जपावे.

४४) ओजस्विता व तेजस्विता इच्छिणाऱ्याने पिंपळाखाली बसून हे वज्रकवच जपावे. पत्नी इच्छिणाऱ्याने आम्रवृक्षाखाली बसून हे वज्रकवच जपावे. ज्ञानेच्छूने तुलसीजवळ बसून हे वज्रकवच जपावे. पुत्रेच्छूने तळघरात बसून हे वज्रकवच जपावे.

४५) धर्मार्थी लोकांनी सुक्षेत्रांत (आपल्या शेतांत वा तीर्थक्षेत्रांत ) या कवचाचा जप करावा. गाई, म्हशी इत्यादि पशूंची इच्छा करणाऱ्यांनी गोठ्यामध्ये बसून हे कवच म्हणावे. सर्वेच्छू लोकांनी म्हणजे वाटेल ते योग्य इच्छा करणाऱ्यानी देवालयांत बसून हे वज्रकवच म्हणावे. अशा रीतीने स्थळ, काल, कामना व जपसंख्या इत्यादि सर्व सांगितले.

४६) नाभीपर्यंत खोल पाण्यांत उभे राहून सूर्याकडे पाहात जो हे वज्रकवच जपेल तो युद्धांत हजारो योद्ध्यांना जिंकेल व शास्त्रवादांत शेकडो पंडीतांना निरुत्तर करेल.

४७) आकंठपाण्यांत उभे राहून रात्री जो हे कवच पठण करील त्याचे ज्वर, फेफरे, कुष्ठादि त्वचारोग व संनिपातज्वर वगैरे सर्व नष्ट होतात.

४८) जेथे ज्याचे चित्त स्थिर व प्रसन्न राहील व हे वज्रकवच म्हणावेसे वाटेल तेथे त्याने या कवचाचा जप करावा. त्यामुळे कार्यसिद्धी निश्चित होते.

४९) असे सांगून पुन्हा श्रीशिवप्रभू श्रीपार्वतीदेवीस असे म्हणाले की, तुला परम मंगल रहस्य म्हणून असे सांगतो की,जो हे वज्रकवच पठण करील तो श्रीदत्तात्रेयांसारखा प्रति दत्तात्रेय होईल.

५०) अशा रीतीने श्रीशिवांनी श्रीपार्वतीला अर्थांत् हिमगिरी कन्यकेला जे सांगितले ते श्रीदलादनमुनींना श्री अत्रिपुत्र श्रीदत्तात्रेयांनी पूर्वीच सांगितले होते. या मृत्यूलोकी जो कोणी हे वज्रकवच पठण करील, तो श्री दत्तात्रेयांप्रमाणेच दीर्घायू होईल, योगीश्रेष्ठ होईल व कोठेही अनिर्बंध संचार करेल.

अशा रीतीने श्रीरुद्रयामलतंत्रांतर्गत हिमवतखंडामधील, मंत्रशास्त्राच्या उपासनाकांडातील शिवविजय सिद्धांतयुक्त असे उमामहेश्वर संवादरूपाने प्रकट झालेले श्रीदत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र संपूर्ण झाले.


श्री वासुदेवानंद सरस्वती रचित, श्रीदत्तात्रेय कवचम्

श्रीपादः पातु मे पादावूरु सिद्धासनस्थितः ।
पायाद्दिगंबरो गुह्यं नृहरिः पातु मे कटिं ॥ १ ॥
नाभिं पातु जगतस्त्रष्टोदरं पातु दलोदरः ।
कृपालुः पातु हृदयं षड्भुजः पातु मे भुजौ ॥ २ ॥
स्त्रक्कुंडी-शूल-डमरु शंख-चक्र-धरः करान् ।
पातु कंठं कंबुकंठः सुमुखः पातु मे मुखम् ॥ ३ ॥
जिह्वां मे वेदवाक् पातु नेत्रे मे पातु मे दिव्यदृक् ।
नासिकां पातु गंधात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ॥ ४ ॥
ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः ।
कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥ ५ ॥
सर्वान्तरोन्तः करणं प्राणान्मे पातु योगिराट् ।
उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ॥ ६ ॥
अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारुप धरोऽवतु ।
वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ॥ ७ ॥
राजतः शत्रुतो हिंस्त्राद्दुष्प्रयोगादितोऽघतः ।
आधि-व्याधि-भयार्तिभ्यो दत्तात्रेयः सदावतु ॥ ८ ॥
धन-धान्य-गृह-क्षेत्र-स्त्री-पुत्र-पशु-किंकरान् ।
ज्ञातींश्च पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः ॥ ९ ॥
बालोन्मत्त पिशाचाभोद्युनिट्संधिषु पातु माम् ।
भूत-भौतिक-मृत्युभ्यो हरिः पातु दिगंबरः ॥ १० ॥
य एतद्दत्तकवचं संनह्याद्भक्तिभावितः ।
सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः ॥ ११ ॥
भूतप्रेतपिशाचद्यैर्देवैरप्यपराजितः ।
भुक्त्वात्र दिव्य भोगान् स देहांतेतत्पदंव्रजेत् ॥ १२ ॥

॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीदत्तात्रेय कवचं संपूर्णम् ॥

मराठी अनुवाद
(कै. जेरेशास्त्री यांनी केलेला आहे)


१) श्री म्हणजे लक्ष्मी ज्याच्या पायाचा आश्रय निरन्तर करुन राहते तो श्रीपाद दत्तात्रय माझ्या पायांचे रक्षण करो. सिद्धासनस्थ असलेला दत्त माझ्या मांड्यांचे रक्षण करो. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा दत्तात्रेय माझ्या गुद व जननेंद्रिय यांचे रक्षण करो. माझ्या कंबरेचे रक्षण नृहरि दत्तात्रेय करो.
२) सर्व जगाला निर्माण करणारा म्हणजे ब्रह्मदेव हे रुप धारण करणारा दत्तात्रेय माझ्या नाभीचे रक्षण करो. पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ उदर असलेला दत्तात्रेय माझ्या उदराचे रक्षण करो. कृपाळू दत्तात्रेय माझ्या हृदयाचे रक्षण करो. सहाभुजा असलेला दत्तात्रेय माझ्या भुजांचे रक्षण करो.
३) माला, कमंडलु, त्रिशूल, डमरु, शंख व चक्र धारण करणारे दत्तात्रेय माझ्या हातांचे रक्षण करोत. कंबू म्हणजे शंख त्याच्याप्रमाणे ज्यांचा कंठ आहे असे दत्तात्रेय माझ्या कंठाचे रक्षण करोत. सुंदर मुख असलेले दत्तात्रेय माझ्या मुखाचे रक्षण करोत.
४) सर्व वेद ज्या विराटस्वरुप दत्तात्रेयाचे वागिंद्रिय आहे असे दत्तात्रेय माझ्या जिभेचे रक्षण करोत. ज्यांची दृष्टी दिव्य आहे असे दत्तात्रेय माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करोत. ज्यांचे शरीर सर्वदा व स्वभावतःच सुगंधी आहे आणि जे गंधरुप आहेत असे दत्तात्रेय माझ्या नाकाचे रक्षण करोत. ज्याच्या स्वरुपाचे व गुणांचे श्रवण पुण्यकारक आहे असे दत्तात्रेय माझ्या कानांचे रक्षण करोत.
५) हंसरुप दत्तात्रेय माझ्या ललाटाचे रक्षण करोत. जटा धारण करणारे दत्तात्रेय माझ्या मस्तकाचे रक्षण करोत. सर्वांचा ईश असलेला दत्तात्रेय माझ्या वाणी,जननेन्द्रिय, गुद, हात व पाय अशा पांच कर्मे्द्रियांचे रक्षण करो. ज्याला जन्म नाही असा म्हणजे जन्मानंतरचे विकार नसलेला दत्त डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या पांच ज्ञानेद्रियांचे रक्षण करो.
६) सर्वांच्या आंत राहणारा दत्त माझ्या अंतःकरणाचे रक्षण करो. सर्व योग्यांचा राजा माझ्या प्राणापानादि दशवायूंचे रक्षण करो. वरती, खाली, पाठीमागे, डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना व पुढच्या बाजूला अशा दश दिशांना दत्तात्रेय माझे रक्षण करोत.
७) नानारुप धारण करणारा दत्त आत-बाहेर म्हणजे घराच्या किंवा शरीराच्या आत व बाहेर माझे रक्षण करो. ज्या स्थानांना कवच लागले नाही त्या स्थानांचेही दिव्यदृष्टी असणारा दत्तात्रेय रक्षण करो.
८) राजापासून, शत्रूपासून, हिंस्त्र प्राण्यांपासून जारण-मारणापासून दुष्ट प्रयोगांपासून, पापांपासून, मानसिक व्यथेपासून, शारीरिक व्यथेपासून तसेच इतर भयांपासून व पीडांपासून गुरु दत्तात्रेय माझे सदा रक्षण करोत.
९) माझ्या पैशाचे, धान्याचे, घराचे, शेताचे, स्त्रीचे, मुलांचे, पशुंचेसेवकांचे व इतर सर्व कुटुंबाचे अनसुयेचा आनंद वाढविणार्‍या मुलाने म्हणजेच श्रीदत्तात्रेयाने रक्षण करावे.
१०) केंव्हां केव्हां लहान मुलासारखा वागणारा केंव्हां केव्हां उन्मत्त होणारा श्रीगुरुदेव दत्त दिवसा, रात्री व दिवसरात्रीच्या संधीत पंचमहाभूते व त्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थापासून व मृत्यु पासून माझे रक्षण करो.
११) हे दत्तकवच जो कोणी भक्तीने युक्त होऊन जपेल व पाठ करेल तो सर्व अनर्थांतून मुक्त होईल. तसेच सर्व ग्रहांच्या पीडेपासून मुक्त होईल.
१२) भूत, प्रेत व पिशाच्च यांचे हे कवचधारण करणारापुढें काहीही चालणार नाही. देवसुद्धा त्याला पराजित करु शकणार नाहीत. या लोकांत स्वर्गांत असलेल्या सुखांप्रमाणे सर्व सुखे मिळतील. देहान्ती कवच जपणारा दत्तस्वरुपास प्राप्त होईल.

अशारीतीने हे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीनीं रचिलेले श्रीदत्तात्रेय कवच संपूर्ण झाले.


श्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र माहिती समाप्त 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *