संत सोयराबाई अभंग

आणिक देवाचे न करा साधन – संत सोयराबाई अभंग

आणिक देवाचे न रा साधन – संत सोयराबाई अभंग


आणिक देवाचे न करा साधन ।
बायां होय शीण आदि अंती ॥१॥
आपुलिया पोटा आणिकां पीडिती ।
ते काय पुरविती मन इच्छा ॥२॥
रोटीसुठीलागीं पिडिताती जगा ।
हेंचि त्यांचे अंगा देवपण ॥३॥
म्हणोनी तयांचे नका पडूं भरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आणिक देवाचे न करा साधन – संत सोयराबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *