संत सोयराबाई अभंग

अवघा रंग एक झाला – संत सोयराबाई अभंग

अवघा रंग ए झाला – संत सोयराबाई अभंग


अवघा रंग एक झाला ।
रंगी रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूंपण गेलें वायां ।
पाहतं पंडरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचें तें काम ।
पळोनी गेले क्रोध काम ॥३॥
देही असुनी तूं विदेही ।
सदा समाधिस्थ पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दुरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥५॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका..

अवघा रंग एक झाला – संत सोयराबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *