bhadra maruti

bhadra maruti – भद्रा मारुती

bhadra maruti information marathi

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात. महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे.

खुलदाबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. भद्रा मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत. हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावाला ‘रत्‍नापूर’नावाने देखील ओळखले जाते.खुलताबाद येथे दरवर्षी ऊरूस भरतो.खुलताबाद येथे जर्जरीबक्ष दर्गा आहे.

खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान ह्यासाठी देखील विशेष परिचित आहे.भद्रा मारूती ह्या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातीलअलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातून पायी चालत येतात


इतिहास – भद्रा मारुती (bhadra maruti)

फार पूर्वी ह्या गावाचे नाव रौझा असेही होते; त्याचा अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो..तसेच ह्या गावास संतांची दरी भूमी किंवा शाश्वत निवासस्थान असेही संबोधले जायचे. ह्याचे कारण १४ व्या शतकात अनेक सूफी संत ह्या ठिकाणी वास्तव्यास होते व तदनंतर त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे खुलदाबाद येथेच दफन करण्यात आले


भारतात असलेल्या हनुमानाच्या विविध मूर्ती

 • गुडीवाड, आंध्र प्रदेश
 • मैलम्पावली
 • हळ्ळेबीड
 • ग्वालियर, म.प्र.
 • बुलढाणा
 • बंगलोर
 • दमणजोडी
 • अब्बिरजुपालेम
 • झाकू मंदिर
 • हल्दियागड
 • विशाखपट्टनम्
 • छत्तरपूर
 • नीमच, म.प्र.
 • गिरिसोला, ओडिशा
 • नृसिंहनाथ
 • परिताला,विजयवाडा, आंध्र प्रदेश

तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

bhadra maruti information marathi 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *