धनदाई माता म्हसदी

श्री धनदाई देवीची महती सिद्धी बुद्धिप्रदे देवी, भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।। मंत्र, यंत्र, मूर्ती सदा देवि, धनदाई नमोस्तुते ।। ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांची उपासना करून द्रैत्यानी अनक इच्छित वर प्राप्त केल्यानंतर दैत्य अर्जिक्य, अत्याचारी बनले. सातपुडा परिसरातील जनतेवर दैत्य अत्याचार करू लागले. त्याच्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी जनतेने आदीशक्तीची करूणा भाकली भक्तांच्या प्रार्थेला प्रसत्न होऊन धनदाई, …

श्री क्षेत्र कोल्हार श्री भगवतीमाता

श्री क्षेत्र कोल्हार श्री भगवतीमाता मानवी जीवनात शक्तीच्या उपासनेला प्राचीन काळापासून अनन्य साधारण महत्व आहे. दु:खितांचे दु:ख दूर करणारी, भक्ताला शक्ती व युक्ती प्रदान करुन जीवनात येणाऱ्या संकटांना निर्भिडपणे सामोरे जाण्यासाठी धैर्य देणारी, जीवनात भगवतीमातेचे स्थान काही वेगळेच मानले जाते. कोल्हार भगवतीपूरच नव्हे तर महाराष्ट्रामधील असंख्य भाविकांनी देवी भगवतीला मातेच्या रुपात मानले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील …

श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी

श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इतिहास –पुरूषोत्तमपुरी हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र- २२२ वर माजलगाव-गेवराई दरम्यानच्या सावरगाव पासून १० कि.मी.अंतरावर आहे. संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. हे मंदिर इसवी सन १३१० मध्ये रामचंद्र देव यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने उभारले. यामुळेच या गावाला पुरुषोत्तमपुरी हे नाव पडले. मंदिरातील मुख्य देवतेलाही याच नावाने …

योगेश्वरी देवी

योगेश्वरी देवी इतिहास – महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठी वसलेले एक गाव म्हणजे अंबेजोगाई. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्ण पीठे, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ. काही लोकांच्या मते अंबेजोगाईची योगेश्वरी, हे अर्धे पीठ. मराठीचे आद्य कवी, ‘विवेकसिंधु’कर्ते मुकुंदराज आणि दासोपंतांचा अधिवास लाभलेले हे स्थान. वास्तू – अंबेजोगाई येथील योगेश्वरी …

श्री क्षेत्र कडगंची

श्री क्षेत्र कडगंची स्थान: गाणगापूर पासून ३४ कि.मी. अंतरावर,आळंद-गुलबर्गा मार्गावर (कर्नाटक राज्य) सत्पुरूष: श्रीगुरूंचा पट्टशिष्य सायंदेव साखरे विशेष: काळ्या पाषाणाची अतिशय सुंदर दत्त मूर्ती,श्री गुरुचरित्राची मूळ प्रत चे ठिकाण पादुका: करुणा पादुका श्री कडगंची,श्रीदत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थळ! कर्नाटक राज्यातील आळंद-गुलबर्गा मार्गावर असलेलं सुमारे १०,००० च्या आसपास लोकसंख्या असलेलं एक काहीसं अज्ञात आणि दुर्लक्षित …