प्राचीन शिवमंदिर बिलवाडी

प्राचीन शिवमंदिर बिलवाडी – prachin shivmandir bilwaadi

प्राचीन शिवमंदिर बिलवाडी

नाशिक जिल्ह्यातील कळवण पासून पश्चिमेला साधारणपणे ३० कि.मी. अंतरावर असलेल बिलवाडी हे एक छोटस आदिवासी बहुल गाव. गावाची लोकसंख्या तशी जेमतेम. पण गावात छोटर्स पण अतिशय देखणे असे प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराची अजूनही येथील स्थानिक लोकांपलीकडे कोणताच जास्त माहिती नाही. या मंदिराकडे प्रशासनाने व पुरातत्व खात्याने देखील दुर्लक्ष केल्यामुळे मंदिराचा काही भाग आज ढासळू लागला आहे.

या गावाच्या शिवारात अनेक प्राचीन मंदिरे होती असे स्थानिक लोक सांगतात. त्या मंदिरांचे अवशेष, चिरे, कलाकुसर असलेले दगड, शिल्प, शिवलिंग या परिसरात ठिकठिकाणी झाडीत, गवतात, शेतांच्या बांधावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी हे एकमेव मंदिर आजमितीस शिल्लक आहे.

अहिवंतगडाच्या मागच्या बाजूस असलेल्या बिलवाडी गावात आत शेतांमध्ये हे मंदिर आहे. मंदिरावर फार कलाकुसर दिसत नाही पण मंदिराचा अंतर्भाग निव्वळ अप्रतिम उताच्या आतले नक्षीकाम अतिशय सुंदर आणि प्रमाणबद्ध आहे. शिल्प मोजकीच पण देखणी आहेत. मंदिराजवळ अनेक वैशिष्ट्यपूर्ण वीरगळी आहेत.

मंदिर अंदाजे बाराव्या शतकाच्या सुमारासच बांधले असावे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग काही दिसत नाही. येथील लोकांच्या माहीती नुसार मंदिरात शिवलिंग नाही तरी देखील मंदिराची पूजा केली जाते. मंदिराचा निम्मा भाग हा जमिनीखाली असल्यामुळे पावसाळ्यात पानी मंदिरात शिरून ते पाणी मरेपर्यंत राहते. महाशिवरात्रीला पुजा होवून कार्यक्रम साजरे होतात यावेळेस आदिवासी बांधव मोठ्या संख्येने जमा होतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *