omkareshwar temple

omkareshwar temple – ओंमकारेश्वर ज्योतिर्लिग

omkareshwar temple information marathi

ॐकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे. हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मंधाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे. हे भगवान शंकराच्याच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मोरटक्का गावापासून जवळपास १२ मैल (२० कि.मी.) अंतरावर आहे. हे द्वीप हिन्दू पवित्र चिन्ह  च्या आकारामध्ये बनले आहे. येथे दोन मंदिरे आहेत ॐकारेश्वर आणि अमरेश्वर

ॐकारेश्वराचा डोंगर नर्मदा नदीकाठी असून त्याचा आकारच ॐ सारखा आहे. नर्मदा भारतातली पवित्र समजली जाणारी नदी आहे. ॐकारेश्वर येथे एकूण ६८ तीर्थ आहेत. याशिवाय २ ज्योतिस्वरूप लिंगांसहित १०८ प्रभावशाली शिवलिंगे आहेत. मध्यप्रदेशात प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी २ ज्योतिर्लिंगे आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैन मध्ये, व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे.


हे पण वाचा :- सर्व ज्योतिर्लिंगांची संपूर्ण माहिती


इतिहास – ओंमकारेश्वर ज्योतिर्लिग (omkareshwar temple history)

देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून येथे एका विशिष्ट दिवशी मातीची १८ हजार शिवलिंगे तयार करून, पूजा केल्यानंतर त्यांचे नर्मदेत विसर्जित करण्याची प्रथा आहे.


कथा ओंमकारेश्वर ज्योतिर्लिग (omkareshwar temple katha)

राजा मांधाताने येथे नर्मदा किनार्‍यालगतच्या पर्वतावर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्याच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले. तेव्हा पासून ही तीर्थ नगरी ओंकार-मान्धाता या नावानेही ओळखली जाऊ लागली.


ओंकारेश्वरातील अन्य देवळे – (omkareshwar mandir)

ओंकारेश्वर तीर्थ क्षेत्रामध्ये चोवीस अवतार, माता घाट (सेलानी), सीता वाटिका, धावड़ी कुंड, मार्कण्डेय शिला, मार्कण्डेय संन्यास आश्रम, अन्नपूर्णाश्रम, विज्ञान शाला, बड़े हनुमान, खेड़ापति हनुमान, ओंकार मठ, माता आनंदमयी आश्रम, ऋणमुक्तेश्वर महादेव, गायत्री माता मंदिर, सिद्धनाथ गौरी सोमनाथ, आड़े हनुमान, माता वैष्णोदेवी मंदिर, चाँद-सूरज दरवाजे, वीरखला, विष्णु मंदिर, ब्रह्मेश्वर मंदिर, शेगावचे गजानन महाराज यांचे मंदिर, काशी विश्वनाथ, नरसिंह टेकडी, कुबेरेश्वर महादेव, चन्द्रमोलेश्वर महादेवाचे मंदिरसुद्धा वगैरे देवळे आहेत.


ओंकारेश्वराला कसे जातात? – (omkareshwar jyotirlinga)

  • ओंकारेश्वर हे इंदूरपासुन ७७ किमी अंतरावर इंदूर- खांडवा महामार्गावर आहे.
  • ॐकारेश्वर रोड हे रेल्वेस्थानक गावापासून १२ किमी अंतरावर आहे.
  • नर्मदा नदीत होड्या सुरू असतात, त्यांतूनही ओंकारेश्वराला पोहोचता येते.
  • खांडवा शहरापासून ॐकारेश्वर ७२ किमीवर आहे.

तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

source wikipedia

omkareshwar-khandwa mahiti

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *