Paithan

paithan – तीर्थक्षेत्र पैठण

paithan information marathi

पैठण(paithan) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण(paithan) तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. औरंगाबादेपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. कसे याल– औरंगाबाद हून अनेक वाहने उपलब्ध आहेत.


इतिहास – (paithan history)

साडीप्रकाराचे पैठणी(paithan) हे नाव ज्या ठिकाणावरून पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष (ही वर्षे कुठून मॊजायची?) स्वतःचे वेगळेपण राखून आहे. हे गाव प्राचीन कालापासून ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. पूर्वी (मूळ नाव “प्रतिष्ठान”) ही सातवाहन राजाची राजधानी होती. त्या काळापासून अगदी आतापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे.

एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असॆ गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे.

फाल्गुन वद्य षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो. गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. झानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे. ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.


तीर्थक्षेत्र पैठण प्रेक्षणीय स्थळे – (paithan)

संत एकनाथ महाराजांचे समाधिस्थान

संत एकनाथ महाराजणांचा वाडा

सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात.

जायकवाडी धरण : गोदावरी नदीवरील जायकवाडी हे धरण पैठण(paithan dam) जवळच आहे.

  • जांभुळ बाग
  • संत ज्ञानेश्वर उद्यान
संत ज्ञानेश्वर उद्यान
  • नागघाट
  • लद्दू सावकाराचा वाडा
  • जामा मशीद
  • तीर्थ खांब
  • मौलाना साहब दर्गा
  • जैन मंदिर पैठण
  • सातबंगला पैठणी साडी केंद्र
  • वीज प्रकल्प, जुने कावसान नाथसागर धरण
  • नवनाथ मंदिर, पालथी नगरी पैठण
  • छत्रपती शिवाजी महाराज चौक
  • मराठा क्रांती भवन (महाराष्ट्रातील पहिले क्रांती भवन (?))

फाल्गुन वघ षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो. गोदावरीच्या काठावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. झानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे. ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.


नाथ महाराजांच्या आयुष्यात घडलेले काही महत्वपुर्ण चमत्कार 

ईश्वर हा संताचे ब्रीद राखण्यास सदैव तत्पर असतो त्यामुळेच् संताच्या जीवनचरित्रात असामान्य असे काही चमत्कारिक प्रसंग आपल्याला पहायला मिळतात. त्यातील काही प्रसंग आपल्यापुढे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.

१) पितरांस श्राद्धान्न 

एकदा नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची वाट पाहत नाथ दारात उभे होते. गिरिजाबाईंचा स्वयंपाक तयार होता. नाथवाडयाबाहेरुन जाणाऱ्या तीन चार हरिजनांस त्या स्वयंपाकाचा सुवास आला. आपल्याला असे अन्न मिळाल्यास किती बरे होईल ही त्यांच्यातील चर्चा नाथांनी ऐकली. ते अन्न हरिजनांस मिळावे असा विचार नाथांच्या मनात उत्पन्न झाला. त्यांनी गिरिजाबाईस ते अन्न हरिजनांस वाटण्यास सांगितले. हरिजनांना श्राद्ध भोजन घातल्याचे पैठणस्थ(paithan) ब्राह्मणास समजले. नाथांच्या घरी श्राद्धान्न घेण्यास त्यांनी नकार दिला. वास्तविकत: इकडे नाथांनी शुचिर्भूत होऊन गिरिजाबाईं करवी पुन्हा स्वयंपाक करवून घेतला. तथापि ब्राह्मणांनी नकार दिला. श्राद्धविधी वेळेत होणे महत्वाचे होते तेव्हा वाट पाहुन नाथांनी पितृत्रयींच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णु महेश रुपी पितरांस जेवू घातले व आपले श्राद्ध कार्य पूर्ण केले.*

२) एकच नाथ दोन ठिकाणी 

पैठणास(paithan) राणु नावाचा एक हरिजन गृहस्थ राहत असत. तो व त्याची पत्‍नी नित्य नाथांच्या प्रवचनास येत. त्यांचे आचरण शुद्ध होते. नाथांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. एकेदिवशी त्यांच्या मनात विचार आला कि आपण नाथांना आपल्या घरी जेवण्यास बोलवावे. त्यांनी नाथांना आमंत्रण दिले ते नाथांनी स्वीकारले. संपूर्ण पैठणभर चर्चेचा एकच विषय कि नाथ हरिजानाकडे जेवणार. ठरलेल्या दिवशी नाथ घरातून बाहेर पडले. काही जण टप्याटप्याने नाथांवर नजर ठेवून होते. नाथ राणूच्या घरी गेले. उभयतांनी नाथांचे मनोभावे पूजन केले. नाथ जेवायला बसले. चमत्कार असा झाला कि, एकाच वेळी लोकांनी नाथांना राणूकडे जेवतांना आणि आपल्या वाडयात प्रवचन सांगताना दिसले. नाथ एकच, वेळ एकच परंतु दोन ठिकाणी दोन भिन्न कार्य हे बघून लोकांनी नाथांचा जयजयकार केला.

३) नाथांकडे अनेक परीस 

पैठणास(paithan) एक सावकार राहत असे. त्याच्याजवळ एक परिस होता तो त्यास खूप जपत असे. एकदा त्या सावकारास तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली. परंतु परीस घेवून आपण प्रवासात सुरक्षित राहू शकत नाही हे जाणुन नाथांसारख्या निष्काम श्रेष्ठ भक्‍ताजवळ तो परीस सुरक्षित राहील या भावनेने तो नाथांकडे आला. नाथ देवांची पूजा करीत होते. त्या सावकाराने परीस नाथांकडे दिला; तीर्थयात्रा झाल्यानंतर तो घेण्यासाठी मी परत येईन असे त्याने नाथांना सांगितले.

नाथांनी तो परीस देव्हाऱ्याखाली ठेवून दिला. बऱ्याच दिवसानंतर तो सावकार परीस घेण्यासाठी नाथांकडे आला व परीसाची मागणी केली तेव्हा तो परीस देण्यास नाथांनी उद्धवास सांगितले. परीस काही सापडेना, नाथ म्हणाले कदाचित निर्माल्यासोबत तो गोदावरीत अर्पण झाला असावा. असे म्हणताच तो सावकार नाथांना भलतेसलते बोलू लागला. आपण निस्वार्थ असाल असा विचार करुन आपणाजवळ परीस ठेवण्यास दिला मात्र आपण तो चोरला. नाथांनी त्यास गोदावरीत नेले, तळात हात घालून ओंजळभर दगडे उचलली व म्हणाले, “तुझा परीस यातुन निवडून घे.” त्या सावकाराने लोखंडाचे गोळे काढले. प्रत्येक दगडास त्याचा स्पर्श होताच सोने होऊ लागले. नाथांनी त्यापैकी एक देवून बाकी सर्व नदीत टाकुन दिले. परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते हे ठीक परंतु नाथांच्या स्पर्शानं दगडाचे परीस होतात हे मात्र विशेष.


कृषी क्रांती 

paithan information marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *