संत तुकाराम अभंग

नव्हे ब्रम्हज्ञान बोलतां सिद्ध – संत तुकाराम महाराज अभंग – 1813

नव्हे ब्रम्हज्ञान बोलतां सिद्ध – संत तुकाराम महाराज अभंग – 1813

नव्हे ब्रम्हज्ञान बोलतां सिद्ध । जंव हा आत्मबोध नाहीं चित्तीं ॥१॥
काय करिसी वांयां लटिकाचि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥ध्रु.॥
मीच देव ऐसें सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोंकोनियां ॥२॥
अमृताची गोडी पुढिलां सांगसी । आपण उपवासी मरोनिया ॥३॥
तुका म्हणे जरि राहील तळमळ । ब्रम्ह तें केवळ सदोदित ॥४॥

अर्थ

केवळ भराभर बोलण्याने ब्रम्‍हज्ञान होत नाही ;जोपर्यंत वृत्तीत आत्म्याचा ब्रम्‍हरूपाने निःसंदिग्ध अपरोक्ष साक्षात्कार झाला नाही तोपर्यंत ‘ ब्रम्‍हज्ञान झाले ‘ असे म्हणता येत नाही .अनुभवावाचून खोटे पाल्हाळ काय करावयाचे आहे ?कारण ,आपली विद्वत्ता दाखविणे म्हणजे केवळ श्रम आहेत . वैषयिक सुखावर दृष्टी ठेवून ‘ मीच देव आहे ‘ असे खोटेच पुढे बसलेल्या या भोळ्या श्रोत्यांना सांगतोस ;आणि त्यांना फसवितोस . आपण उपवासी राहून दुसर्‍याला मात्र अमृताची गोडी सांगतोस ,हे आश्चर्य आहे . तुकाराम महाराज म्हणतात ,जर तुझ्या चित्तातील संसाराची तळमळ थांबली ,तर तू सर्वकाळ अखंड ब्रम्‍हरूप आहेसच .त्यासंबंधी व्यर्थ वाचाळपणा करण्याचे काय कारण आहे ?


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *